पुणे-कोरेगाव पार्क मधील अल्पवयीन मुलाने बार मध्ये दारू पिऊन आलिशान कार भरधाव वेगात चालवत दोन तरुण जीव घेतला आहे. या प्रकरणी आता काँग्रेसचे आमदार आणि लोकसभा मतदार संघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही, असेही रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
नेमके धंगेकर काय म्हणालेत त्यांच्याच शब्दात वाचा …
न्याय हवा, अन्याय सहन करणार नाही!
काल कल्याणीनगर परिसरात घडलेल्या दुर्घटनेत दोन निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. मद्यप्राशन करून भरधाव वेगात दुचाकीस्वाराला धडक देणाऱ्या बिल्डरच्या मुलाला पोलीस प्रशासनाने दिलेली वागणूक आणि तत्काळ मिळालेला जामीन यात गौडबंगाल आहे. याबाबत आज येरवडा पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी उपस्थिती केलेले मुद्दे खालील प्रमाणे,
• वडगांव शेरी, कोरेगाव पार्क या ठिकाणी पबमुळे स्थानिक रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र याला कोणतीही सकारात्मक उत्त्तर मिळाले नाही. • काल बिल्डरच्या मुलाने दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला. मात्र त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करता पोलीस प्रशासनाकडून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला.• कालचे प्रकरण हाताळताना पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपीवरती इतर गुन्हे दाखल करायला हवे होते. मात्र, त्याच्यावरती कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित तपास अधिकारावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. • आज पुण्यात पोलीस बंदोबस्तात पब संस्कृतीला अभय दिले जात आहे. त्यामुळे तरुणाई नेस्तूनाबत होत आहे.• आरोपीच्या गाडीचे रजिस्टर झाले तर नंबर का पडला नाही. याबाबत आरटीओच्या पोलीस अधिकाऱ्यांनी याची उत्तरे द्यायला हवीत.• कोरेगाव पार्क व वडगांव शेरी या भागात दोन पोलिस पब चालवतात. या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांना लहान मुलांवरती लक्ष देता येत नाही का ? अशावेळी पोलीस काय करतात ?• पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ४ महिन्यापूर्वी कारवाई केलेले हॉटेल पुन्हा सुरू कसे झाले? अशावेळी अन्न औषध विभागाचे अधिकारी काय करतात ? त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. • गेल्या काही वर्षात सत्ताधारी व प्रशासनाच्या माध्यमातून पुण्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार घडत आहेत पोलीस प्रशासन भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले आहे.• पुण्यातील सर्व पब चेक केले पाहिजेत. शासकीय परवाना नसलेल्या, बांधकाम परवाना नसलेल्या पबवर कठोर कारवाई करत पब संस्कृती थांबली गेली पाहिजे.