मुंबई दिनांक ९ फेब्रुवारी २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरातमधील तेली जातीत झाला आहे, असे बेताल वक्तव्य करून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या प्रतीकात्मक फोटोचे दहन करण्यात आले.
राहुल यांचा हा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे, असा आरोप भाजयुमो मुंबई अध्यक्ष तजिंदर सिंग तिवाना यांनी केला. काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षण विरोधात राहिली आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी भाजयुमो मुंबई महामंत्री दीपक सिंह, जिल्हाध्यक्ष अजित सिंह, भाजपा दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर, भायखळा मंडळ अध्यक्ष नितीन बनकर, दिलीप धुरी, भायखळा विधानसभा निवडणूक प्रमुख रोहिदास लोखंडे, मुंबई महामंत्री कमलेश डोके, भाजयुमो दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सनी सानप, जिल्हा महामंत्री राजेश मिश्रा, राज सराफ, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष प्रथमेश कानडे,विशाल कांबळे, धर्मेंद्र दोशी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.