पुणे-पुण्यात निर्भय बनो ची सभा राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारकाच्या आवारात होत असताना निखील वागळे ,असीम सरोदे, विश्वंभर चौधरी येण्यापुर्वीच मोठा धुमाकूळ दिसला. भाजपच्या तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी येथे जोरदार निदर्शने रस्त्यावरून केली तर त्यास कॉंग्रेस , शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर देत सभेला संरक्षण पुरविले. यावेळेचा जबरदस्त तणाव पाहून पोलिसांनी तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड केल्यावर सभास्थळी उशिरा पोलीस बंदोबस्तात येत असलेल्या निखील वागळे आणि विश्वंभर चौधरी यांच्या मोटारीवर भाजपच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हल्ला केला . निर्भय बनो कार्यक्रमाचे पुण्यातील साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाच्या आधी या कार्यक्रमात भाषण करणाऱ्या पत्रकार निखील वागळेंवर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हा कार्यक्रम उधळून लाऊ अस पुणे शहर भाजपने जाहीर केलय तर भाजपने कार्यक्रमास विरोध केल्यास आपण या कार्यक्रमास सुरक्षा पुरवू अस म्हटलं. त्यासाठी कॉंग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले. आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, संजय मोरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे, तर दुसरीकडे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. निखील वागळे यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन येत असताना भाजपकडून निखील वागळेंची गाडी फोडण्यात आली. गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली.
पुण्यातल्या खंडोजी बाबा चौकात निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आता महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या तरुण कार्यकर्त्यांनी या हल्ल्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. हल्ला करणाऱ्यांनी निखिल वागळे यांच्या समर्थकांवर अंडे फेकल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. हल्ला झाला तेव्हा निखिल वागळे, वकील असीम सरोदे हे गाडीतच होते. ते त्याच गाडीने कार्यक्रमस्थळी आले आणि सभेला उपस्थित राहीले. भाजपच्या आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या आंदोलकांनी केला आहे.
मोंदींवर आक्षेपार्ह विधान केल्याने हल्ला
वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर आडवाणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले होते. या पार्श्भूमीवर, शनिवारी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच त्यांनी हा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला, मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, समविचारी पक्ष व संघटनानी एकत्र येत हाणून पाडला.