भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी
पुणे- दक्षिण पुण्यात गावठी कट्टे पिस्टल बाळगणाऱ्या काहींना यापूर्वी पोलसांनी पकडलेले आहे त्यानंतर काल पुन्हा आणखी एका २० वर्षाच्या मुलाला गावठी पिस्टल सह स्वामी नारायण मंदिराजवळ भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडून गजाआड केले.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक ०७/०२/२०२४ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गोरे, निलेश ढमढेरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, “रेकॉर्डवरील आरोपी राधेमोहन (मुन्ना) सिताराम पिसे, वय २० वर्षे, रा. प्रेमा कॉलनी, लेन नंबर ०२, यशोदिप चौक, वारजे माळवाडी, पुणे हा भुमकर चौकाकडुन स्वामी नारायण मंदीराकडे जाणाऱ्याकडे रोडवर कमरेला पिस्टल लावुन थांबला आहे” अशी बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी स्वामीनारायण मंदीराचे जवळ जावुन सदर आरोपीचा शोध घेतला असता नमुद आरोपी एक ४०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व २००/- रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकुण ४०,२००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा मुद्देमाल जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १२६/२०२४, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.