पुणे – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींजींनी विकसित भारत करण्यासाठी हा अमृतकाल आहे असे देशवासीयांना सांगितले आहे. या अमृतकालच्या प्रवासात देशाच्या विकासासाठी नारीशक्तीची तेवढीच गरज आहे ती उद्योजक महिलांकडून जास्त प्रमाणात मिळणे अपेक्षित आहे. महिलांना व्यवसायाच्या घरगुतीकरणातून बाहेर काढून व्यवसायिकतेकडे नेण्याची गरज आहे. त्यासाठी महिला व्यावसायिक व बचत गटांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व मदतकेंद्र कोथरूड परिसरात उभे करावे. त्यासाठी मेधा कुलकर्णी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी आज राजाराम पुलाजवळील मॅजेन्टा लॉनयेथील “धागा” प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी केले. यावेळी या केंद्रासाठी आमदार निधीतून १० लाख रूपये देण्याची घोषणा त्यांनी केली.
मुक्तछंद तर्फे स्वयंरोजगाराचा “धागा” विणणा-या पुण्यातील उद्योजक नारींच्या शक्तीच्या क्षमता आणि कौशल्य अधोरेखीत करणा-या त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन दि. 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या हस्ते झाले. यावेळी यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर प्रदर्शनाच्या मुख्य संयोजक प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, अनिता तलाठी, गौरी करंजकर, सुनिषा शहा आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
डॉ. गो-हे म्हणाल्या, उत्तम स्वयंपाक या महिलाच करतात पण मोठ्या कामासाठी महाराज किंवा आचारी सांगतात. शिवणकला महिलाच चांगल्या करतात पण कपडे शिवण्यासाठी टेलर असतो. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांच्या कौशल्यांचे घरगुतीकरण झाले होते. पण गेल्या पंचवीस वर्षात आणि विशेषत: सन 2014 नंतर महिलांच्यात व्यवसाय करण्याची इच्छाशक्ती वाढताना दिसत आहे. पण आजही व्यवसाय वाढीसाठी अर्थसहाय्य कसे मिळवायचे किंवा त्यासाठीची कौशल्ये कशी मिळवयाचे याबद्दल अनेक महिला अनभिज्ञ आहेत. महिला बचत गटांचे लाखो रूपये बँकेत जमा असतात पण त्यावर कर्ज आपण घेऊन व्यवसाय वाढवू शकतो याची महितीच त्यांना नसते. आपला माल परदेशी पाठवणे हे आपल्या आवाक्याबाहेर नाही याचीही महिती त्यांनी नसल्याने त्या तिथेच एकाच वर्तुळात फिरत रहातात. अशा सर्व महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व मदत केंद्राची आवश्यकता आहे.
आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, महिलांचे सबलीकरण अशी उक्ती पूर्व सर्वत्र वापरण्यात येत होती. पण पंतप्रधान श्री मोदीजींनी ही उक्ती चुकीची असल्याचे सांगून महिला ही स्वत: शक्ती, उर्जा आहे. तिचे सबलीकरण करण्याची गरजच नाही. फक्त तिला आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच त्यांनी वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्या मार्फत महिलांसाठी अनेक नव्या योजंना सुरू करून संसदेत महिला आरक्षण देत त्यांना कारभारातही सहभागी करून घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, महिलांनी त्यातही व्यवसाय करणा-या महिलांनी आता आत्मसंतुष्ट न रहाता मुक्तछंदच्या या व्यासपीठाचा उपयोग आपल्या व्यवसायाची प्रगती करण्यासाठी करून घ्यावा. कारण त्यांच्या व्यवसायाची प्रगती म्हणजेच त्या कुटुंबाची प्रगती असते. अशी प्रगती कऱणा-या कुटुंबातूनच समाजाची प्रगती साधली जात असते. अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी उद्योजक महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्या मागे पुरूषांनी उभे रहावे असे आवाहन केले.
स्वागतपर प्रास्ताविक करताना संयोजिका प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, महिलांच्यातील क्षमता, कौशल्य त्यां करत असलेल्या व्यवसायातून दिसते. अशा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही मुक्तछंदतर्फे वर्षातून दोन – तीन प्रदर्शने भरवतो. या शिवाय उद्योजक महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठीही प्रयत्नशील असतो. एमएसईमी मंत्रालयांच्या योजनांची महिती देतो. त्यांना मोफत उद्यम आधार कार्ड काढून देतो. या प्रदर्शनासाठी माजी नगरसेवक जयंत भावे, कल्पना पुरंदरे आदींनी सहकार्य केले. प्रदर्शनासाठी मयूर हटाळे, गणेश कडू, अपर्णा लोणारे, गणेश पासलकर, शुभांगी जोशी यांची टीम काम करत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचल बाळकृष्ण नेरूरकर यांनी केले.
उदघाटनाच्या दिवशी दुपारी “साडी ड्रेपींग” विषयावरील कार्यशाळा झाली. यात तज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबरच प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. उद्या दि. 10 फब्रुवारी, ला “मेकअप” या विषयावर प्रात्यक्षिकासह कार्यशाळा होणार आहे. त्यासाठी ऑफिस लूक आणि आपला ट्रेडिशनल लूक असे विषय आहेत.
या प्रदर्शनात महिला उद्योजकानी तयार केलेल्या विविध नाविऩ्यपूर्ण साड्या, कुडतीज, ड्रेस मटेरियल, हँण्डमेड पर्सेस – बॅग्ज, दागिने, हस्तकला वस्तू, सौंदर्य प्रसाधने, खवैय्य पुणेकरांसाठी पुण्यातील निवडक अन्नपूर्णांचे खाद्य पदार्थांचे असे एकूण शंभर स्टॉल्स प्रदर्शनात आहेत.
हे प्रदर्शन दि. 9 ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान, राजराम पुला जवळ, डी. पी. रोडवरील मॅजेंटा लॉन्स येथे भरणार आहे. प्रदर्शन आणि वस्तूंची विक्री सकाळी 10 ते रात्रा 9 वाजेपर्यंत सुरू रहाणार आहे.