वेकअप पुणेकर चळवळीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Date:

स्वारगेट चौकात जाणून घेतल्या समस्या-संयोजक मोहन जोशी

पुणे – शहरातील नागरी प्रश्नांची सोडवणूक पुणेकरांमार्फतच व्हावी, या हेतूने सुरू केलेल्या या चळवळीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजक आ. मोहन जोशी यांनी आज (गुरुवारी) दिली.

या चळवळी अंतर्गत ट्रॅफिक हा विषय प्राधान्याने घेतला असून दि.५ पासून ‘अडकलाय पुणेकर’ या मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका, सूचना, पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी स्वयंसेवकांना मार्गदर्शन, लोकांमध्ये जावून काम सुरू करणे अशा पद्धतीने मोहीम सुरू करण्यात आली आहे. ट्रॅफिक बाबतच्या समस्या आणि उपाययोजना पुणेकरांनीच सुचवाव्यात यासाठी शहरभर प्रश्नावली भरून घेण्यात येत आहेत. विविध चौकांमध्ये ‘वेकअप पुणेकर’ च्या प्रश्नावलीचा क्यूआर कोड स्कॅन करून पुणेकर अभिप्राय देत आहेत. मोहीम सुरू झाल्यापासून बहुसंख्य पुणेकरांनी ट्रॅफिक सुधारण्याविषयी अभिप्राय दिलेले आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.

पोलीसांच्या वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त खाडे तसेच स्मार्ट सिटी चे इंजिनिअर्स यांच्या समवेत स्वारगेट चौकातल्या वाहतूक समस्यांबद्दल तात्काळ मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच स्वारगेट चौकात फेसबुक लाइव्ह करून नागरिकांकडून समस्या जाणून घेण्यात आल्या, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली आहे.

स्वारगेट चौकातील ‘अडकलाय पुणेकर’ या मोहीमेत दत्ता बहिरट, सुरेश कांबळे, आयुब पठाण,शाबीर खान कान्होजी जेधे, प्रथमेश लभडे, अविनाश अडसूळ, आशिष व्यवहारे, साहिल भिंगे, सागर कांबळे, गोरख पळसकर, बाबा सय्यद, सचिन बहिरट, रवी पाटोळे, तिलेश मोटा, अनिकेत सोनवणे, नरेश धोत्रे, स्वाती शिंदे, शोभा पनीरकर, मनीषा गायकवाड, जयश्री पारक, अनिता मखवाणी, रेखा जैन सुनिता नेमूर, ज्योती आढागळे, वनिता सुबकडे, सोनू शेख, कुमार शिंदे, अशोक गायकवाड, जयकुमार ठोंबरे पाटील, दिपक ओव्हाळ, अशोक नेटके, रामविलास माहेश्वरी, पुष्कर आबनावे, भरत सुरना आदी सहभागी होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.