काँग्रेसकडून महिलांसमवेत महाराष्ट्राचा विश्वासघात

Date:

पुणे : काँग्रेससह इंडी आघाडीने नारी शक्ती वंदन अधिनियम आणि परिसीमन विधेयकाला विरोध करून महिलांसमवेत महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रतिनिधित्वाच्या हक्काचाही विश्वासघात केला आहे, असा घणाघात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी केला. महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

लोकसभा आणि सर्व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियमातील दुरुस्ती आणि परीसीमन विधेयक संसदेत पारित होऊ शकले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवली. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, प्राजक्ता जोशी, प्रणव गंजीवाले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

तेजस्वी सूर्या म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नांनंतरही काँग्रेस व इंडी आघाडीच्या घटक पक्षांनी महिला आरक्षणाची वाट रोखली. संसदीय इतिहासात १९९६ पासून २०२६ पर्यंत एकूण पाच वेळा महिला आरक्षण विधेयक संसदेत आले. प्रत्येक वेळी काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी सुनियोजित कट रचून महिला आरक्षणाला विरोध केला. भाजपने मात्र विरोधात असतानाही महिला आरक्षणाला सदैव पाठिंबा दिला आहे. आता आगामी काळात संसदेत पुन्हा ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ मांडले जाणार असून, त्या वेळी महिलाविरोधी भूमिका घेण्याची हिंमत कोणताही पक्ष करणार नाही.’

काँग्रेसचा इतिहास महिलाविरोधीच

‘काँग्रेसचा इतिहासच महिलाविरोधी असून, महिलांच्या प्रगतीत काँग्रेसने कायम अडथळे आणले आहेत. हिंदू महिलांना हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाला तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शहाबानो खटल्यातही काँग्रेसने व्होटबँकेचे तुष्टीकरण करण्यासाठी गरीब मुस्लिम महिलांवर अन्याय केला. तिहेरी तलाकच्या अमानवी व बेकायदा प्रथेचे समर्थन केले,’ अशी टीका तेजस्वी सूर्या यांनी केली.

महाराष्ट्राचे मोठे नुकसान

‘परीसीमन विधेयकाद्वारे महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात लोकसभेच्या ५० टक्के जागा प्रो-रेटा बेसवर वाढविण्यात येणार होत्या. मात्र, काँग्रेससह शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शपने त्याला विरोध दर्शविल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार असून, त्याबाबत मतदारांनी विरोधकांना जाब विचारला पाहिजे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या ५४३ जागांची पुनर्रचना केल्यास महाराष्ट्राच्या वाट्याला अवघी एक अतिरिक्त जागा येणार आहे. मोदी सरकारच्या फॉर्म्युलानुसार, महाराष्ट्राला २४ अतिरिक्त जागा मिळतील. त्यामुळे महाराष्ट्राचा फायदा होईल. मात्र, विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचाही विश्वासघात केला असून मतदारच विरोधकांना धडा शिकवतील,’ असा विश्वास तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अस्पृश्यता पाळण्याऱ्या बागेश्वरबाबाला माजी सरन्यायाधीशांचा पाठिंबा आहे का ? – सुनील माने

पुणे ता. २२ : संविधानविरोधी, विज्ञानविरोधी, अस्पृश्यता पाळून...

रस्ता वाहतुकीसाठी तुमच्या आंदोलनासाठी नाही, या महिलेने पेटविली क्रांतीची ठिणगी

क्रांती करणारे..वेडेच ठरविले जातात : तिला शाळेतून मुअलाला पिकअप...

कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांना गती-मुंढवा चौकात १२६ कोटींचा फ्लायओव्हर

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,: कोरेगाव पार्क–कल्याणी...