इतिहासात प्रथमच महिलेने मंत्र्याला एवढ्या शिव्या दिल्या:भाजपला लोक कंटाळलेत, काँग्रेसचे मंत्री महाजनांच्या व्हायरल व्हिडिओवर भाष्य

Date:

मोदी व फडणवीस सीरियल लायर

मुंबई-काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना महिलेने केलेल्या कथित शिविगाळीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा उपयोग जनतेला त्रास देण्यासाठी होत असल्यामुळे एका महिलेने काल एका मंत्र्याला भररस्त्यात शिविगाळ केली. इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या, असे ते म्हणालेत.

लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने सोमवारी मुंबईत एका मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन आपला संताप व्यक्त केला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या व्हिडिओवरून सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सीरियल लायर असल्याचा आरोप केला आहे.

नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सीरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. अशा विधानावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी असे वाटत नाही. खोटे बोलणाऱ्यालाच ते लागते. महिला विधेयकाविषयी ज्या पद्धतीने लोकांना भ्रमित करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक पारित झाले आहे. राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्याचे नोटिफिकेशन जारी झाले आहे. हे विधेयक 2024 मध्ये लागू करण्यास तुम्हाला कुणी रोखले होते. आज 181 महिला सभागृहात पहायला मिळाल्या असत्या.सरकारने प्रथम सांगितले की, आम्ही जातनिहाय जनगणना करू. आता ते सांगत आहेत की, आता प्रथम आम्ही घरांची गणना करू. तुमच्याकडे महापालिका, नगरपंचायत, पंचायती, ग्राम पंचायत आदींमध्ये सर्व रेकॉर्ड आहे. त्यामुळे खोटे कोण बोलत आहे? बहुजनांवर सातत्याने अन्याय करणारी मानसिकता आज सत्तेत आहे. ही सत्तेतील मानसिकता बहुजनांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या खोटारड्या लोकांना जनतेने आता ओळखले आहे. भाजपला लोक आज कंटाळले आहेत.नाना पटोले म्हणाले, मुंबईतील महिलेचा संताप हा भाजपच्या सत्तेच्या माजाचा परिणाम आहे. आमची सत्ता आहे. या सत्तेचे ज्या पद्धतीने दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो, याचे सर्वात मोठे उदाहरण काल फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून दिसून आला. सामान्य लोकांनी त्याला कसे ट्रोल केले. एक महिलाच त्यांना शिव्या घालत होती. महाराष्ट्रातील इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या.
नाना पटोले यांनी यावेळी यवतमाळच नव्हे तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून महिला व मुली बेपत्ता होत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात केवळ यवतमाळच नव्हे तर अनेक जिल्ह्यांतून मुली बेपत्ता होत आहेत. नागपूर सारख्या शहरातूनही मुली बेपत्ता होत आहेत. त्याच्या तक्रारीही आहेत. तिथे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री राहतात. आज महाराष्ट्रातील हजारो महिला व मुली बेपत्ता आहेत. पण सरकार हे दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मुली असो किंवा महिला या महाराष्ट्रात त्यांचा सन्मान झाला पाहिजे. पण आज भाजप सरकारकडून महिलांचा सातत्याने अवमान होत आहे. ही वस्तुस्थिती आहे की, यवतमाळच नव्हे तर मुली व महिला बेपत्ता होत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्ता वाहतुकीसाठी तुमच्या आंदोलनासाठी नाही, या महिलेने पेटविली क्रांतीची ठिणगी

क्रांती करणारे..वेडेच ठरविले जातात : तिला शाळेतून मुअलाला पिकअप...

कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांना गती-मुंढवा चौकात १२६ कोटींचा फ्लायओव्हर

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,: कोरेगाव पार्क–कल्याणी...

खरात ची वरात कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मधून रुग्णालयाकडे

अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास;...

विधान परिषदेवर भाजपचे ६ : कोणाला मिळणार संधी ?आज रात्री वर्षा निवासस्थानी बैठक

मुंबई- महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची...