रस्ता वाहतुकीसाठी तुमच्या आंदोलनासाठी नाही, या महिलेने पेटविली क्रांतीची ठिणगी

Date:

क्रांती करणारे..वेडेच ठरविले जातात : तिला शाळेतून मुअलाला पिकअप करायचे होते असे म्हणतात , आणि पोलीस बंदोबस्तातील मोर्चामुळे ती वाहतूक कोंडीत तासभर अडकली ..अन उन्हाच्या तडाख्यात संतापाची लाही लाही झाली ..मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांसह आंदोलक महिलांना असे काही सुनावले कि जणू हि क्रांतीची ठिणगी च म्हणावी …

मुंबई: मुंबईतील वरळी येथे महायुतीच्या महिला आघाडीच्या ‘आक्रोश मोर्चा’मुळे काल (21 एप्रिल) दुपारपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत एका तासापासून अडकलेल्या एका सामान्य महिलाने आंदोलनस्थळी धाव घेऊन प्रचंड गोंधळ घातला. संतापाच्या भरात तिने आंदोलन करणाऱ्या महिलांना शिवीगाळ केली, पोलिसांना जाब विचारला आणि “बाजूच्या मैदानात आंदोलन करा, रस्त्यावर नाही!” असा आग्रह धरला. या घटनेमुळे मोर्च्याच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
नेमकं काय घडलं?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या महिला आघाडीने आज सकाळपासून वरळीतील एका प्रमुख रस्त्यावर ‘आक्रोश मोर्चा’ काढला होता. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत संमत न झाल्याने महायुतीच्या महिला आघाडीने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांविरोधात हा मोर्चा काढला होता. मात्र या मोर्च्यामुळे वरळी आणि आसपासच्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड रांग लागली होती. दुपारी एक वाजता जवळपास एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

याच वेळी एका चारचाकी वाहनातून प्रवास करणारी एक महिला ही या कोंडीत अडकली होती. मात्र तासाभरापासून ट्रॅफिक जाम असल्याने महिलेला संताप अनावर झाला. ती आपली कार सोडून थेट मोर्च्यात सहभागी झालेल्या महिलांकडे धाव घेतली. “एक तासापासून इथे अडकले आहे. तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर बाजूच्या मैदानात बसा! आमच्या रोजच्या आयुष्यात अडथळा आणू नका!” अशा शब्दांत तिने आंदोलनकर्त्यांवर तोंडसुख घेतले.

संतापाच्या भरात तिने काही आंदोलनकर्त्या महिलांना शिवीगाळही केली. तसेच घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तिने थेट जाब विचारला. “तुम्ही काय करताय? लोकांच्या रोजगाराला, मुलांच्या शाळेला अडथळा होत आहे, तरीही तुम्ही आंदोलन चालू ठेवताय? रस्ता खाली करा!” असे म्हणत तिने पोलिसांनाही धारेवर धरले.
या घटनेमुळे मोर्च्यात काही क्षण गोंधळ निर्माण झाला. काही आंदोलनकर्त्या महिलांनी त्या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी तिच्या संतापाला उत्तर दिले. पोलिसांनी तातडीने त्या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिला सुरक्षितपणे बाजूला नेले. मात्र तिच्या आक्रोशामुळे आसपासच्या वाहनचालकांनीही हात उंचावून पाठिंबा दर्शविला.

मंत्री गिरीश महाजन आणि महापौर रितू तावडेंसमोर जाऊन महिलेने व्यक्त केला संताप
दरम्यान, यावेळी या मोर्च्यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे या देखील सहभागी झाल्या होत्या. याचवेळी संबंधित महिलेने थेट त्यांच्यासमोर जाऊन वाहतूक कोंडीबाबत तक्रार केली. तसंच आपला संतापही व्यक्त केला.

सध्या वरळी परिसरात वाहतूक कोंडी अद्याप कायम आहे. पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले असले तरी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.