Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘ख्रिसमस पार्टीमध्ये २५० विशेष मुलांनी लुटला आनंद

Date:

पुणे :
‘रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल’ आणि ‘इनरव्हिल क्लब ऑफ पुणे सेंट्रल’च्या संयुक्त विद्यमाने ‘ख्रिसमस पार्टी’चे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये विविध संस्थामधील २५० विशेष मुले सहभागी झाली होती. यामध्ये अंध, कॅन्सरग्रस्त आणि मूक-बधिर मुलांचा सहभाग होता. सहभागी मुलांनी जादूचे प्रयोग, विविध खेळ, जंपिंग, संगीत खुर्ची, टॅटू आणि नृत्य प्रकार आदी मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आनंद लुटला. या उपक्रमाचे हे १२ वे वर्ष आहे.
ही ‘ख्रिसमस पार्टी ’ बुधवारी ‘लेडिज क्लब’, ब्लू नाईल जवळ, दस्तूर शाळे समोर, 3 लेफ्टनंट कॉलोनी, तारापूर रोड, कॅम्प, पुणे -०१ येथे दुपारी ३ ते ६ या वेळेत पार पडली.
यावेळी ‘रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे अध्यक्ष संजीव कुमार, ‘इनरव्हिल क्लब ऑफ पुणे सेंट्रल’च्या अध्यक्ष उमा केजरीवाल, अनिल बोरा, अजय चिटणीस, मंजूळा विश्‍वनाथन्, मुनीर चिनॉय आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलांनी सांताक्लॉज समवेत खाऊ, गाणी याचा आनंद घेतला. त्यांच्यासाठी ही ‘ख्रिसमस पार्टी’ अविस्मरणीय ठरली.
सहभागी संस्थांमध्ये ‘एकलव्य फाऊंडेशन’, ‘कॅन्सर पेशंट असोसिएशन’, भांडारकर रोड येथील मूक -बधिर शाळा, ‘जागृती अंध मुलींची शाळा’ (आळंदी), ‘वेद वासुदेव प्रतिष्ठान’च्या विविध महाविद्यातील अंध विद्यार्थी यांचा समावेश होता. स्वयंसेवी संस्था देखील सहभागी होणार आहेत.
‘रोटरी क्लब’च्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यातील ‘ख्रिसमस पार्टी’ हा एक उपक्रम गेली १२ वर्षे क्लबच्या वतीने राबविण्यात येत आहे. अंध, कॅन्सरग्रस्त मुलांना आनंद मिळावा या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो’, अशी माहिती ‘रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी दिली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...