हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांवर अन्याय- प्रियांक शाह

Date:

पुणे:- पुणे व पिंपरी शहराबरोबरच जिल्ह्यात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लादत हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे . बिबेवाडी- कोंढवा येथील प्रसिद्ध हॉटेल गोकुळ रेस्टॉरंटचे मालक प्रियांक शाह या निर्बंधांना विरोध करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याविषयी बोलताना प्रियांक शाह म्हणाले, “मागील वर्षभरात लॉकडाऊनचा परिणाम म्हणून शहरातील ४० % रेस्टॉरंट बंद झाली आहेत. जी सुरु आहेत त्यांचा ५०% सुद्धा व्यवसाय होत नाहीये. अशा परिस्थितीत आणखी ७ दिवस हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय हा जाचक आहे. हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना आज भाडे भरण्याची देखील अडचण असून व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. अशी परिस्थिती असताना आजच्या बैठकीत लागलेल्या निर्बंधांमुळे आम्ही हवालदिल झालो आहोत. इतर व्यापार, भाजीमंडई, दुकाने सुरु असताना हॉटेल व रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवणे म्हणजे आमच्या क्षेत्रावर अन्याय करण्यासारखे आहे.”
तसेच हॉटेल व्यवसायावर अनेकांचे पोट भरत असते. उदाहरणार्थ हॉटेल मध्ये काम करणारे वेटर, आचारी, डिलिव्हरी बॉय , त्याच प्रमाणे हॉटेल व्यवसायावर किराणा दुकान, भाजी विक्रेता, डेअरी, उत्पादक आदींचा हि व्यवसाय अवलंबून असतो . त्या मुळे हॉटेल व्यवसायिकांना या निर्बंधातून सूट देण्यात यावी अशी मागणी प्रियांक शाह यांनी राज्य सरकार आणि प्रशासनसकडे केली आहे. हॉटेल व्यवसाय टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावा. पुणे शहरात सुमारे दहा ते बारा हजार हॉटेल व्यावसायिक आहेत. या निर्णयामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ येईल आणि यांच्या सोबत जोडले गेलेल्या व्यक्तींवर उपास मारीची वेळ येईल .
कोरोनाची वर्षभरातील परिस्थितीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन संपला तरी आमच्यावर लागलेले निर्बंध मात्र कायम राहिले इतकेच नाही तर ते अधिक कडक होत गेले. आम्हीही गेले वर्षभर तोटा सहन करीत काम करीत राहिलो. आता मात्र या क्षेत्राला टिकून राहणे देखील शक्य नाही. सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करण्यास तयार असून आम्हालाही व्यवसाय करायची संधी द्यावी, अशी मागणी या वेळी प्रियांक शाह यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोलंबो परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड!

पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील...

राज्यात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना, तर घरोघरी जाऊन घरांची यादी आणि गृहगणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार

मुंबई, महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन...

येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न

बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी...

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि...