स्वदेशी लिथियम आयन बॅटरीमुळे भारताचीआत्मनिर्भरतेकडे वाटचाल-डॉ. राजेंद्रकुमार शर्मा

Date:

पुणे : “मोबाईल, लॅपटॉप, ई-व्हेईकल्स आदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर होतो. देशात प्रथमच लिथियम आयन बॅटरी उत्पादित करण्याचे संशोधन पुण्यातील शास्त्रज्ञांनी केले आहे. या संशोधनाला उत्पादनात रूपांतरित करून स्वदेशी लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन सुरु होणार असल्याने भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे,” असे मत संशोधक आणि स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांनी व्यक्त केले.

टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनतर्फे (टीटीए) भारतीय बनावटीच्या लिथियम आयन बॅटरीची प्रगती यावर आयोजित व्याख्यानात डॉ. शर्मा बोलत होते. रविवारी झूम मिटद्वारे झालेल्या या व्याख्यानावेळी ‘टीटीए’चे यशवंत घारपुरे, सचिव विलास रबडे, विश्वास काळे आदी उपस्थित होते. ‘टीटीए’चे हे ३६ वे व्याख्यान होते. सुपर कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड भारतातील एकमेव कंपनी आहे.

डॉ. राजेंद्रकुमार शर्मा म्हणाले, “लिथियम आयन बॅटरीच्या जगातील संशोधनात भारतीयांचा वाटा ७० टक्के आहे. शिवाय ही बॅटरी बाजारात येऊन २० वर्षे होत आली. मात्र, दुर्दैवाने या बॅटरीच्या उत्पादनात एकही भारतीय कंपनी नाही. ही बाब लक्षात घेऊन मिनिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने सेंटर ऑफ मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन रिचार्जेबल बॅटरी टेक्नॉलॉजी उभारण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर येथे बॅटरीचे संशोधन उत्पादन होत आहे.”


“या बॅटरीची भारतात मोठी गरज आहे. त्यामुळे लघु व माध्यम उद्योगांनी पुढाकार घेऊन लिथियम बॅटरीच्या उत्पादनात उतरले पाहिजे. त्यांना उत्पादनासाठी लागणारे संशोधन, परीक्षण व अन्य सर्व प्रकारचे सहकार्य या सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारा केले जाणार आहे. आर्थिक विकासात आज ‘एमएसएमई’चा हातभार मोठा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात याचे उत्पादन सुरु झाले, तर भारताला चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

“सी-मेटच्या पुण्यातील केंद्रात ३५ हजार स्क्वेअर फूट परिसरात हा प्रकल्प उभारला जात असून, प्रायोगिक तत्वावर येथे बॅटरीचे उत्पादन सुरु होणार आहे. सेल, इलेक्ट्रोड व लागणाऱ्या अन्य गोष्टी पुरविण्यात येतील. ज्या कंपन्यांना या बॅटरीचे उत्पादन करायचे आहे, त्यांच्याशी सामंजस्य करार केला जाईल. त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करण्याची भूमिका या सेंटर ऑफ एक्सलन्सची आहे.” विलास रबडे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास काळे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...