Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘इंडिया ट्रॅव्हल ॲवॉर्ड्स’ पुरस्कार समारंभ पुण्यात उत्साहात संपन्न

Date:

a12

 

पुणे : तिसऱ्या इंडिया ट्रॅव्हल वॉर्ड्स (पश्चिम) या पुरस्कार समारंभाची सांगता नुकतीच येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली. नगर रोडवरील नोव्होटेल हॉटेलमध्ये हा समारंभ तीन दिवस सुरु होता. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या श्रेणीसाठीचे पुरस्कार देऊन मालवाहतूक (कार्गो), आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) आणि पर्यटन (ट्रॅव्हल) क्षेत्रांतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या संस्थांना सन्मानित करण्यात आले. हे विजेते यानंतर प्रतिष्ठित अशा माया करंडकासाठी चुरशीने स्पर्धा करतील.

 या समारंभांतर्गत ३ ऑगस्टला इंडिया कार्गो वॉर्ड्स, ४ ऑगस्टला इंडिया हॉस्पिटॅलिटी वॉर्ड्स, तर ५ ऑगस्टला इंडिया ट्रॅव्हल वॉर्ड्स हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ब्लॅक टाय या समारोप सत्रानिमित्त पुण्यातील प्रवास व पर्यटन, आतिथ्य आणि मालवाहतूक क्षेत्रातील अनेक नामवंत एकवटले होते. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप इंडिया हॉस्पिटॅलिटी वॉर्ड्स समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. विशेष पाहुण्या ग्लॅडरॅग्ज मिसेस इंडिया विजेत्या सौदामिनी नाईक या सर्व तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमांना उपस्थित होत्या.

 प्रवास व पर्यटन, तसेच मालवाहतूक क्षेत्रातील यश आणि समृद्धीचा उत्कर्ष घडवणे, हा या पुरस्कारांमागील हेतू आहे. यासंदर्भात इंडिया ट्रॅव्हल वॉर्ड्सचे मेंटॉर श्री. संजीत म्हणाले, की आम्ही या पुरस्कार समारंभाच्या माध्यमातून असाधारण कामगिरी करणाऱ्यांना अभिवादन करतो. यंदा या पुरस्कार समारंभाचे तिसरे वर्ष असून पुरस्कारार्थींच्या निवडीसाठी आम्हाला जगभरातून २.४७ लाख मते प्राप्त झाली. गेल्या काही वर्षांत प्रवास व पर्यटन, तसेच मालवाहतूक क्षेत्रांचा नेत्रदीपक विकास झाला असून त्याचाच ठळक प्रत्यय या पुरस्कार समारंभातून आला आहे. या उद्योगाच्या भरभराटीचा गौरव करण्यास कारणीभूत ठरल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि हे कार्य यापुढेही आम्ही सुरु ठेवणार आहोत.

 पुरस्कारप्राप्त काही प्रतिष्ठित विजेते पुढीलप्रमाणे

 बेस्ट बिझनेस हॉटेल : नोव्होटेल, नगर रोड, पुणे

बेस्ट पिल्ग्रिमेज टूर कंपनी : ए. के. इंटरनॅशनल टुरिझम

बेस्ट एनटीओ : साऊथ आफ्रिका टुरिझम

बेस्ट वेडिंग हॉटेल : जे. डब्ल्यू. मॅरियट, सहार, मुंबई

बेस्ट लक्झरी हॉटेल : आयटीसी ग्रँड सेंट्रल, मुंबई

मोस्ट एन्टरप्रायझिंग जनरल मॅनेजर : बंदीश मेहता, नोव्होटेल, नगर रोड, पुणे

बेस्ट मार्केटिंग प्रोफेशनल : राजीव दुग्गल

बेस्ट एअरलाईन : इंटरनॅशनल – एमिरेट्स

बेस्ट कार्गो एअरपोर्ट : केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट, बंगळुरु

 

बेस्ट पिल्ग्रिमेज टूर कंपनी हा पुरस्कार मिळवणाऱ्या ए. के. इंटरनॅशनल टुरिझमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित कामले म्हणाले, की या उद्योगातील दिग्गजांमध्ये समावेश, तसेच सन्मान होणे आमच्यासाठी खरोखर गौरवास्पद आहे. इंडिया ट्रॅव्हल वॉर्ड्स हे यासाठीचे खरोखर महान व्यासपीठ होते.

 

इंडिया ट्रॅव्हल वॉर्ड्सविषयी

 इंडिया ट्रॅव्हल वॉर्ड्स हा उपक्रम भारतीय प्रवास व पर्यटन उद्योगातील उत्कृष्टता निश्चित करुन तिचा गौरव करतो, या क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांची उत्पादने व सेवांचा दर्जा मापदंड सातत्याने उंचावण्यासाठी प्रेरणा देतो व या माध्यमातून या क्षेत्राच्या प्रसिद्धी व विकासास साह्य करतो. परीक्षक मंडळाची निवड व मतदान अशा अभिनव प्रणालीवर आधारित असणारे हे पुरस्कार पारदर्शी व निःपक्षपाती असतात ज्याचा समारोप या क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्याच्या शानदार अशा औपचारिक ब्लॅक टाय समारंभाने होतो.

 या पुरस्कार उपक्रमाला भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे पाठबळ असून आता तो भारतीय पर्यटन उद्योगातील सर्वाधिक नामांकित पुरस्कारांपैकी एक समजला जातो.

या उपक्रमाला पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (पीएटीए), असोसिएशन ऑफ डोमेस्टिक टूर ऑपरेटर ऑफ इंडिया (एडीटीओआय), आऊटबाऊंड टूर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ओटीओएआय), ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (टीएएफआय) व आयएटीए एजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएआय) अशा नामवंत व्यापारी मंडळांनीही सहकार्य केले आहे.

 

इंडिया ट्रॅव्हल वॉर्ड्सअंतर्गत या उद्योगातील सर्वाधिक ठळक क्षेत्रे व उत्पादनांचा गौरव करण्यासाठी विविध पुरस्कार देण्याचा व्यापक कार्यक्रम विकसित करुन त्याचे कार्यान्वयन व संचालन केले जाते. दक्षिण, पूर्व, पश्चिम व उत्तर अशा चार विभागांत पुरस्कार दिले जातात. पुरस्कार विजेत्यांचा वर्षभर गौरव केला जातो आणि पर्यटनविषयक माध्यम सहयोगींकडून त्यांना नियमित प्रसिद्धी दिली जाते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...