पुणे दि. 6 : अन्न व नागरी पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व कझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडीया (सीजीएसआय) यांच्या संयुक्त विद्यमाने मार्केट यार्ड येथील पुना मर्चंट चेंम्बरच्या सभागृहात ग्राहकांसाठी मेगा कॅम्प व दुध तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीरात विविध उत्पादनांच्या 84 तक्रारदारांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या.
या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम, सीजीएसआयचे चेअरमन डॉ. सिताराम दिक्षीत, सचिव डॉ. एम.एस. कामथे, सहसचिव दिनेश भंडारे, सहाय्यक अन्न धान्य वितरण अधिकारी दिलीप सावंत, नायब तहसिलदार यु.के.बडे, सीजीएसआयचे सर्टिफाईड फायनांशिअल प्लॅनर रंजन वर्मा, आनंदिता कौर, ॲङ राजीव काकडे, संतोष शुक्ला, मिलन मेस्त्री, प्रसाद चाळके, सत्यवान गावकर यांच्या उपस्थितीत तक्रारदारांच्या सुनावण्या घेण्यात आल्या.
या शिबीरात आलेल्या प्रत्येक तक्रारीची छाननी करुन सदरील तक्रार संबंधित विभागाकडे निराकरणासाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच या शिबीरात योग्य व फायदेशीर गुंतवणूकीचे व्यवस्थापन कसे करावे, वित्तीय संकल्पना आणि धोरण, वित्तीय उत्पादने, म्युच्युअल फंड आणि शेअर्स मधील फरक, गुंतवणूकीची फायदेशीर योजना कशी निवडावी, आर्थिक अफवांपासून आपले संरक्षण कसे करावे, आयुर्विमा किंवा वैद्यकीय विमा कसा घ्यावा यावर उपस्थितांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.