Home Blog Page 779

काँग्रेसने कर्नाटकात दिलेल्या ५ गॅरंटी यशस्वीपणे सुरु, अंमलबजावणीसाठी बजेटमध्येच ५६ हजार कोटींची तरतूद: जी. परमेश्वरा

पंतप्रधान मोदी व भाजपा नेत्यांचा काँग्रेस गॅरंटीबद्ल अपप्रचार, अंमलबजावणीच्या पाहणीसाठी कर्नाटकात त्यांचे स्वागत.

मुंबई,

कर्नाटकात काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या ५ गॅरंटींची यशस्वीपणे अंमलबजाणी सुरु असून कर्नाटकातील लाखो लोक या गॅरंटींचा लाभ घेत आहेत. सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ५ गॅरंटी लागू करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु आहे. या ५ गॅरंटीसाठी कर्नाटक सरकारने अर्थसंकल्पातच ५६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने निधीची कमतरता असण्याचे काहीच कारण नाही असे स्पष्ट करत पंतप्रधान मोदी व भाजपा नेते काँग्रेसच्या ५ गॅरंटीबद्दल अपप्रचार करत आहेत. या गॅरंटींच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी त्यांनी कर्नाटकात यावे त्यांचे स्वागत आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा म्हणाले.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने सुरु केलेल्या ५ गॅरंटींची माहिती टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत देताना जी. परमेश्वरा पुढे म्हणाले की, गृहलक्ष्मी गॅरंटी अंतर्गत राज्यातील सर्व महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना २ हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेचा आतापर्यत १.२२ कोटी लाभार्थींनी लाभ घेतला असून ३०,४१६ कोटी रुपये त्यांच्या खात्यात दिले आहेत. गृहज्योती योजनेचे १.६६ कोटी लाभार्थी असून त्यावर १४,०६५ कोटींच्या निधीचे वाटप केले आहे. युवानिधी गॅरंटीखाली बेरोजगार तरुणांना महिन्याला ३ हजार रुपये दिले जात आहेत. या योजनेचे ४.३० लाख लाभार्थी आहेत व २०० कोटींचे वाटप केले आहे. शक्ती गॅरंटीअतंर्गत प्रत्येक महिलेला कर्नाटक सरकारच्या बस मधून मोफत प्रवासाची सुविधा सुरु आहे. शक्ती गॅरंटीअंतर्गत ३१७ कोटी महिलांनी प्रवास केला असून ६१२५ कोटी रुपये आतापर्यत खर्च करण्यात आले आहेत तर अन्नभाग्य गॅरंटीअंतर्गत १० किलो धान्य मोफत दिले जात आहे. या गॅरंटीचा १.१५ कोटी लाभार्थींनी लाभ घेतला असून ८२२९ कोटींचे वाटप केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे नेते जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अपप्रचार करत आहेत. या ५ गॅरंटी सरकारचा कालावधी पूर्ण होईपर्यंत सुरुच राहतील अशी ग्वाही जी. परमेश्वरा यांनी दिली.
महाराष्ट्रातील भाजपा शिंदे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून जलयुक्त शिवार योजनेत १० हजार कोटींचा घोटाळा, रुग्णवाहिका खरेदीत ८ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात ड्रग्जची खुलेआम विक्री होत असून तरुणपिढी नशेच्या आहारी जात आहे. महाराष्ट्रातील भाजपा सरकार हे सावकारांचे सरकार आहे. महाराष्ट्रातील वातावरण हे महाविकास आघाडीसाठी अनुकुल असून मविआ सरकार स्थापन करेल, असा विश्वासही जी परमेश्वरा यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला माजी मंत्री सुरेश शेट्टी, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत, प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, सचिव श्रीकृष्ण सांगळे उपस्थित होते.

अमरावतीत राहुल गांधी यांच्या सामानाची तपासणी:EC च्या अधिकाऱ्यांनी केली पडताळणी

0

अमरावती -निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अमरावती येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सामानाची झाडाझडती घेतली. महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्याच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे राजकारण तापले आहे.

राहुल गांधी यांची शनिवारी अमरावतीत प्रचारसभा झाली. तत्पूर्वी त्यांचे हेलिकॉप्टर येथील हेलिपॅडवर उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांचे हेलिकॉप्टर व सामानाच्या बॅगांची कसून तपासणी केली. त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमाची व्हिडिओग्राफीही केली. राहुल यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना याकामी मदत केली. यावेळी राहुल गांधी काही क्षण हेलिकॉप्टरजवळ थांबले. पण त्यानंतर ते तेथून आपल्या सभास्थानाकडे निघाले. यावेळी ते आपल्या सहकाऱ्यांना काही सूचना करतानाही दिसून आले.दुसरीकडे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या कारचाही आज महाराष्ट्रात तपासणी करण्यात आली. रेवंत रेड्डी शनिवारी नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने जात होते. रस्त्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने त्यांच्या कारची झाडाझडती घेतली. या घटनेचाही व्हिडिओ समोर आला आहे.दरम्यान, निवडणूक आयोगाने या निवडणुकीत उद्धव ठाकरे व राहुल गांधीच नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. अमित शहा यांच्या बॅगांची कालच हिंगोलीत तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत ही प्रक्रिया निकोप व निष्पक्ष निवडणुकीसाठी आवश्यक असल्याचे म्हटले होते.

धंगेकरांच्या प्रतिहल्ल्याने भाजपला हादरा ..

फडणविसांणी माझी नाटकं पहिलीत जी सर्वच त्यांना झोंबली..म्हणूनच त्यांना कसब्यात सभा घ्यावी लागली

पुणे- माझी नाटकं फडणविसांनी पाहिली , ती युवा पिढीला व्यसनापासून वाचविण्यासाठी आणि भाजपचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणणारी होती म्हणून त्यांना झोंबली आणि आता रस्नेंचा पराभव दिसू लागला म्हणून त्यांना कसब्यात सभा घ्यावी लागली अशी खार्मार्तीतिका करत फडणविसांच्या कालच्या वक्तव्यांचा कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी समाचार घेतला आहे. आज धंगेकर यांनी जोरदार प्रतिहल्ला करत भाजपच्या रासने गोटात जोरदार हादरा दिल्याचे मानले जाते

कसब्यातील सलोखा बिघडवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न
आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप

ज्येष्ठ भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी पुणेकरांना नेमके काय दिले या माहितीपेक्षा या मतदारसंघात विद्वेष पसरवणारी भाषा केली. त्याद्वारे त्यांनी कसबा मतदारसंघातील धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचेच काम केले आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.

धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काल झालेल्या फडणवीस यांच्या सभेतील आरोपाचा मुद्देसूद समाचार घेतला. धंगेकर म्हणाले की, पुण्याचा कसबा मतदार संघ हा सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदणारा मतदारसंघ आहे. वर्षानुवर्षे येथील सामाजिक सलोखा टिकून आहे. पण येथे धार्मिक विद्वेषाचा खडा टाकून फडणवीस यांनी हे वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. तथापि, त्यांच्या या प्रयत्नांना येथील मतदार जराही भिक घालणार नाहीत. निवडणुका येतात आणि जातात पण अशा विद्वेषाच्या भावनेतून मनावर ओरखडे उमटवणारा प्रचार केला गेला तर त्याचा समाजमनावर विपरीत परिणाम होतो ही बाब भाजपच्या नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे.

या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा पराभव होत असल्याची जाणीव झाल्यानेच त्यांनी हा प्रयत्न केला असावा असे मतही धंगेकर यांनी व्यक्त केले.

फडणवीस यांनी आपल्यावर व्यक्तिगत टीका करताना, आपण नाटक करतो किंवा आपण नाटकी आमदार आहोत अशी भाषा वापरली आहे. पुण्यातील ड्रग रॅकेट प्रकरण, पोरशे कार अपघात प्रकरण, आणि बेकायदेशीर पब प्रकरण या प्रकरणी मी पोटतिडकीने आवाज उठवला. त्याबाबत पोलीस यंत्रणा आणि सरकारी यंत्रणांना कारवाई करण्यास भाग पाडले. या प्रश्नांबरोबरच या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नाबाबत मी सातत्याने आवाज उठवला, माझी ही कृती जर फडणवीस यांना नाटक वाटत असेल, तर मी हे नाटक या पुढील काळातही करत राहीन, असे प्रत्युत्तरही धंगेकर यांनी यावेळी दिले.

धंगेकर यांना फडणवीस यांनी नाटकी म्हणणे भाजपला पडणार महागातगेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कसबा मतदारसंघात प्रचार करताना आणि पत्रकारांशी बोलताना ‘हू इज धंगेकर?’ असा प्रश्न विचारून आमदार रवींद्र धंगेकर यांची अवहेलना करण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न कसबा मतदारसंघातील नागरिकांना आवडला नाही. त्यामुळे मतदारांनी धंगेकर यांच्या बाजूने हिरिरीने मतदान करून पोटनिवडणुकीत धंगेकर यांना निवडून आणले. आता फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रचारात धंगेकर यांना नाटकीपणाची उपमा दिली आहे, ते नाटक करतात असे म्हटले आहे. फडणवीस यांचे हे विधानही चंद्रकांत पाटील यांच्या विधानाप्रमाणेच आता कसबा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला महागात पडणार आहे असे प्रतिपादन धंगेकर यांच्या समर्थकांनी केले आहे.

सिद्धार्थ शिरोळे यांचा सुज्ञ मतदारांवर विश्वास

विविध स्तरामधून शिरोळे यांना वाढता पाठींबा

पुणे, दि. १६ नोव्हेंबर, २०२४ : “शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व स्तरांतील, वयोगटातील नागरिकांसाठी आणि तरुण सहकाऱ्यांसाठी मी पाच वर्षांमध्ये काम करून दाखविले आहे. ही कामे जनतेसमोर असल्याने विरोधकांच्या भुलथापांना जनता फसणार नाही. शिवाजीनगरच्या सुज्ञ मतदारांवर माझा विश्वास आहे”, असे भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केले.

लोकांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि सरकारकडून आवश्यक निधी आणण्यासाठी केलेली खटपट यांतूनच जनहिताची अनेक कामे करू शकलो, असे आमदार शिरोळे यांनी स्पष्ट केले. शिवाजीनगर, औंध भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. यावेळी शिरोळे यांनी लहान थोर, महिला, युवा, व्यापारी, नोकरदार अशा सर्वच नागरिकांशी आपुलकीने संवाद साधलेला पहायला मिळाला.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, “आमदार शिरोळे यांनी सांगितले, की पुणे मेट्रो ही शिवाजीनगरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरली आहे. या मेट्रोची दहा स्थानके शिवाजीनगर मतदारसंघात आहेत. याच जोडीला आता शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे कामदेखील विक्रमी वेळेत पूर्ण होताना दिसत आहे. या मेट्रो मार्गामुळे शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिकांना मेट्रोची आणखी तीस स्थानके उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे शिवाजीनगरमधील विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी सर्व जण जलद आणि आरामदायी प्रवास करू शकणार आहेत. “

पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, येत्या जानेवारीत ते पूर्ण होईल. या पुलामुळे वाहतूक कोंडी निश्चितपणे कमी होईल. जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. सोबतच खडकी व रेंज हिल्स येथील अंडर ब्रिजच्या विस्तारीकरणाचा विकास आराखडा तयार केला जात आहे. यासाठी महापालिकेने निधी राखीव ठेवला आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. भूमिगत मेट्रोवर प्रशस्त एसटी स्थानक तयार होत आहे. केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानेच ही सर्व कामे मार्गी लागली आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले क्रांतिगुरू लहुजी वस्ताद स्मारक लवकरच पूर्णत्वास जाईल. तीन मजली होमी भाभा रुग्णालयही पूर्ण होत आल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त वसाहतीमधील जवळपास बाराशे गाळ्यांना आणि जनवाडी, पांडवनगर येथेही ‘एफएसआय’ वाढवून देण्याची गरज आहे. यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जनतेच्या आशीर्वादाने २३ तारखेनंतर हे काम मार्गी लावून दाखवेन. महायुती सरकारमध्ये सर्वसामान्यांच्या कामाला निधी कमी पडत नाही, असे आमदार शिरोळे म्हणाले.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी प्रचारात सहभागी

कोथरूड मधील मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन

पुणे:

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेत; घरोघरी संपर्काद्वारे मतदारांना आवाहन केले.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे स्त्रीचा भक्कम आधार असतो. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा यांना त्यांच्या पत्नी आणि व्यवसायाने कॉस्ट ऑडिटर असलेल्या अंजली पाटील यांची वेळोवेळी साथ मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली आहे. नागरिकांमधूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांनीही निवडणूक प्रचारात सहभागी होऊन; कोथरूड मधील अनेकांच्या घरोघरी भेटी घेत आहेत.

यामध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सुनिती जोशी, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ. वासंती पटवर्धन आणि भुपाल पटवर्धन, प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ माया तुळपुळे, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे आणि मधुमिता बर्वे यांच्या भेटी घेऊन मतदानासाठी आवाहन केले.

यावेळी माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, उद्योजिका स्मिता पाटील ह्या देखील उपस्थित होत्या.

पर्वतीत सायबर पोलिस स्टेशन उभारणार आमदार माधुरी मिसाळ

पुणे:नागरिकांचे आर्थिक व्यवहार हे बहुतांशी ऑनलाइन पद्धतीकडे वळल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा ऑनलाइन गुन्हेगारीकडे वळविल्याचे दिसून येते. शहरात दिवसाकाठी 70 ते 80 तक्रार अर्ज दाखल होतात. गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हे दुप्पट झाले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या सायबर पोलीस ठाण्यावर मोठा ताण येतो. सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघात सायबर पोलिस स्टेशन उभारणार असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.

मिसाळ यांच्या प्रचारार्थ सॅलिस्बरी पार्क परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले, डॉ. भरत वैरागे, बंटी मोकळ, देवेंद्र बनसोडे, सुनील इंगळे, प्रसन्न वैरागे, निखिल शिळीमकर, उमेश शहा, सिद्धार्थ चिंचोळकर, किरण रामसिन्हा, राजेंद्र सरदेशपांडे, गणपत मेहता, पूजा जोशी, संगीता कांबळे, वंदना गावडे, रेणुका पाठक,अनिल भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिसाळ म्हणाल्या, वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर गुन्हेगारांच्या नवनवीन क्लुप्त्या पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. गंभीर गुन्हे हाताळण्यासाठी 30 पोलिस ठाणी आणि संपूर्ण गुन्हे शाखा काम करते. मात्र गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांची संख्या दुप्पट असूनही त्याचा ताण केवळ एकाच सायबर पोलिस ठाण्यावर येत आहे. या पोलिस ठाण्यात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. तक्रार अर्जांची संख्या लक्षात घेता प्रत्येक गुन्ह्याचा तपास करणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्वतीत सायबर पोलिस ठाणे उभारून प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहोत.

मिसाळ पुढे म्हणाल्या, पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि वाढणारी पुणे शहराची हद्द लक्षात घेता आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, काळे, फुरसुंगी, काळेपडळ या ठिकाणी पोलिस स्टेशन उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या पोलिस ठाण्यांवरील ताण कमी होऊ शकेल. पर्वती मतदारसंघात सिंहगड रस्ता आणि बिबवेवाडी परिसरात प्रत्येकी एक पोलिस स्टेशन व पोलिस चौकी उभारण्यात आली. या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देता आले. तसेच प्रशासनात गतिमानता यावी यासाठी संगणक उपलब्ध करून दिले. गुन्ह्यांचा तपास तत्काळ आणि कुशलतेने होण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांना बूस्ट मिळाला. त्यामुळे मतदारसंघातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.

रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध :रासने

पुणे:

रिक्षा हा पुण्याच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. रिक्षाचालकांना एकेरी हाक न मारता अहो, रिक्षावाले काका असे म्हणण्याचे संस्कार आणि संस्कृती स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांनी निर्माण करून या व्यावसायिकांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यानुसार रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची भावना कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली.

दत्तवाडी, साने गुरुजी नगर परिसरात रासने यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. धीरज घाटे, धनंजय जाधव, प्रशांत सुर्वे, विजय गायकवाड, दीपक पोटे, तानाजी ताकपिरे, चंद्रकांत पोटे, अश्विनीताई पवार, शैलेश लडकत, सुनिता जंगम, केदार मानकर, विशाल पवार, आनंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

रासने म्हणाले, महायुती सरकारने राज्यातील रिक्षाचालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या नावाने महामंडळ स्थापन केले. या मंडळाअंतर्गत प्रत्येक रिक्षाचालकाला जीवन विमा कवच आणि मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. अपघातात कोणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये केली जाईल. रिक्षाचालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तर उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यांच्या मुलांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल करण्यात येणार आहे. तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. या सर्व योजना कसबा विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
रासने पुढे म्हणाले, रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती बेताची असते. कृतज्ञतेच्या भावनेने मध्य वस्तीतील 1200 रिक्षाचालकांना गणवेश वितरित करण्यात आले. रिक्षाचालकांसाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाही मोठ्या संख्येने रिक्षाचालकांनी लाभ घेतला. रिक्षाचालकांना सक्तीचा केलेला दररोजचा 50 रुपयांचा वाहन योग्यता प्रमाणपत्र दंड रद्द करावा यासाठी आग्रही राहीन. रिक्षा ॲपसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून, मेट्रोला पूरक नव्याने शेअर रिक्षा धोरण राबविणार आहे. शहरातील प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने महापालिकेच्या माध्यमातून रिक्षांना सीएनजी किटसाठी प्रत्येकी 12 हजार रुपयांचे अनुदान मिळवून दिले. शहराची वाढती हद्द आणि लोकसंख्या लक्षात घेऊन रिक्षा स्टँडची संख्या वाढविण्यावर भर देणार आहे.

गोरगरिबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कायमच प्राधान्य – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

0

एकमेकांवरील विश्वास ढळू देऊ नका – डॉ गोऱ्हे यांचे आवाहन

मुंबई दि.१५: आजच्या बदललेल्या जगात घर, पाणी वीज सर्व काही मिळेल पण विश्वास मिळणार नाही. आपण सर्वांनी तो विश्वास भारत वाघमारे यांच्यावर दाखविला आणि आतापर्यंत जी वाटचाल केलेली आहे त्याबद्दल प्रत्येकाचे अभिनंदन केले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत वाघमारे यांना चर्चेद्वारे येथील समस्येवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यातूनच येथील घरांचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

चेंबूर येथील एस. आर. ए. हक्क परिषदेला डॉ गोऱ्हे यांनी आज मार्गदर्शन केले. याप्रसंगी, मुख्यप्रवर्तक भारत वाघमारे, समृद्धी काते, ऍड. अभिजित रंजन, प्रकाश थोरवडे, गोरखनाथ कांबळे, अविनाश वाघमारे, संजय कांबळे, राजू आठवले, प्रकाश कोटी व इतर मान्यवर उपस्थित होते.

चेंबूर येथील सिद्धार्थनगरमधील एस.आर.ए. योजनेमधील घरे उभी करताना येथील लोकांना अक्षरशः वेठीस धरले गेले आहे, याकडे लक्ष वेधतांना, या गोरगरिबांच्या हक्कांच्या घरासाठी अनेकदा आपण लढा दिला असून यामध्ये पुण्यासह इतर ठिकाणी देखील गोरगरीब लोकांच्या भूखंडावर डल्ला मारणाऱ्या विकासकांवर आयुष्यभर तुरुंगात राहण्याची वेळ आलेली आहे, याची आठवण डॉ गोऱ्हे यांनी यावेळी करुन दिली.

या लढ्यामध्ये कायद्याचे आणि नियमांचे संरक्षण आपल्याला आहे, असे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, पूर्वी ब्रिटिश काळात एखादी वस्तू आंदण म्हणून दिली जायची, सिद्धार्थ नगर कॉलनी देखील आंदण दिल्याप्रमाणे येथे राजेशाही नाही तर गुंडशाही सुरू आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावनाही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

येथील नागरिकांनी विकासकाच्या दबावाला बळी न पडता एकमेकावरील विश्वास कायम ठेवावा, असे अवाहन डॉ गोऱ्हे यांनी केले. या योजनेत होत असलेल्या गैरप्रकाराची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, हे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून देत येथील नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत, अशी ग्वाही डॉ गोऱ्हे यांनी दिली.

येत्या २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी मतदान करावे आणि राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आणावे, असे आवाहनही शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रसंगी केले.

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे ग्रहण दूर होणार – संजय राऊत

रमेशदादा मोठ्या फरकाने विजयी होणार

पुणे : कोयता गँग, ड्रग्ज, ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण यामुळे कँटोन्मेंटवर डाग लागला आहे. सभ्य पुणे शहर भाजपमुळे बदनाम झाले आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी भाजपवर केली. कँटोन्मेंटची प्रतिमा बदलण्यासाठी बदल झालाच पाहिजे. पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाला लागलेले ग्रहण दूर करण्याची वेळ आली आहे. रमेशदादा मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक तसेच महाविकास आघाडीचा मेळावा क्वार्टर गेट येथील पीजीआय हॉल येथे संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी उत्साहात पार पडला. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, उमेदवार रमेश बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट तसेच डॉ. अमोल देवळेकर आणि जावेद शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आप आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कँन्टोन्मेंटमधील विविध जाती-धर्माच्या समाजात फूट पाडण्याचे काम भाजपने केले आहे. लोक या खोके सरकारला कंटाळले असून महाविकास आघाडी सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेने केले आहे. आता रमेशदादांना निवडून द्यायचे आहे, असे आवाहन राऊत यांनी केले. अजित पवार हे वाघासारखे होते. आता त्यांची मांजर झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कँटोन्मेंट मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या (उबाठा) वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. शिवसैनिकांनी तयार केलेल्या केकवर किंगमेकर संजय राऊत असा उल्लेख करण्यात आला होता. गुरू नानक जयंती निमित्त रमेश बागवे यांनी कॅम्पमधील प्रसिद्ध हॉलिवूड गुरुद्वारा येथे शुक्रवारी भेट दिली. गुरुद्वारा येथे दर्शन घेऊन शीख बांधवांना गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी शीख बांधवांनी रमेश बागवे यांचे स्वागत करून विजय निश्चित असल्याचा विश्वास दिला. यावेळी शीख बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बटेगे तो कटेंगे ‘हे वास्तव असून त्याला माझा पाठिंबा :विनोद तावडे

पुणे, –
‘बटेगे तो कटेंगे ‘हे वास्तव असून त्याला माझा पाठिंबा आहे. जम्मू काश्मीर मध्ये काश्मिरी पंडित विभागले गेले आणि स्थलांतरित झाले. जाती जाती मध्ये लोक विभागले गेले की, त्याचा फायदा इतरांना होत असतो. या शब्दाचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतात, त्यामुळे काहीजण विरोध दर्शवतात. मराठा समाजाचा प्रश्नावर कोणी आंदोलन केले तर ते चांगले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम आरक्षण दिले नंतर त्याच्या बाबत विविध मागण्या वेळोवेळी समोर आल्या. मंडल आयोग माध्यमातून देखील आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. आम्ही सत्तेत असताना ,मराठा आरक्षण दिले आणि उच्च न्यायालयात ते टिकून दाखवले तरी मराठा नेते मनोज जरांगे भाजपला दोष का देत आहे ?
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, हेमंत लेले,प्रशांत कोतवाल ,पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
तावडे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राज्यात प्रचार दौरा करत असताना सामान्य मतदाराची भावना समजून घेतली तर या निवडणुकीत महायुती स्पष्ट बहुमत पलीकडे जाईल असे आज चित्र आहे. लोकसभेला महायुतीच्या जागा कमी आल्या त्यामुळे अनेकांच्या मनात विविध कल्पना निर्माण झाल्या. त्यांनी लोकसभा निवडणूक विश्लेषण नीट करणे गरजेचे होते आघाडी पेक्षा केवळ ०.३ टक्के मते युतीला कमी होती. आता अनेक पक्ष निवडणूक रिंगणात आहे त्यामुळे मत विभाजन होऊन युतीला चांगल्या जागा मिळतील. मनसे मानसिक दृष्ट्या युती सोबत आहे असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत ४०० पार नारा मुळे मोदीच निवडून येणार असल्याने चार टक्के लोक मतदानास आले नाही ते यंदा येतील. राज्यात स्पष्ट बहुमत युतीचे सरकार राज्यात सत्तेवर येईल. महायुतीने राजकारण करताना प्रत्यक्ष लाभार्थी आणि अप्रत्यक्ष लाभ माध्यमातून विकास साधला आहे. विविध सरकारी योजना याद्वारे पायाभूत सुविधा निर्माण होऊन नागरिकांना फायदा झाला आहे. लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय झाली आहे. अशावेळी जेष्ठ नेते शरद पवार सांगत होते की, लाडकी बहिण योजना राबवताना इतर सर्व खात्याचे पैसे वळवण्यात आल्याचा आरोप केला आणि स्वतःच्या जाहीरनाम्यात योजना राबवणार असल्याचे सांगत दुटप्पी भूमिका घेत आहे. उध्दव ठाकरे हे राम मंदिर, हिंदुत्व कलम ३७० यास विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत जाऊन त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणे आणि आघाडी सोबत जाणे जनतेस पटले नाही. जातीगत जनगणना माध्यमातून लोकसंख्या टक्केवारीनुसार आरक्षण देण्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी सांगत असून याबाबत उध्दव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी.

शरद पवार यांच्या सभेचे नियोजन करणारी व्यक्ती उद्या पाऊस कुठे आहे हे पाहून त्यांचे सभेचे आयोजन करत आहे. त्यांच्या सभा ज्याठिकाणी होतात तिथे पाऊस पडल्यावर जागा जिंकता येतात हा भ्रमनिरस आहे. सातारा मधील लोकसभा जागा आम्ही जिंकली नाही तरी विधानसभा जागा जिंकली आहे. मी राज्यातील मुख्यमंत्री पदाचा शर्यती मध्ये नाही. माझ्यासाठी राष्ट्र प्रथम असून आता मी केंद्रीय स्तरावर काम करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप आणि महायुती सरकार येण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत दिल्ली मध्ये निवडणूक निकाल नंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

भीमराव तापकिरांची वारजे व माळवाडी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड परिसरात प्रचार यात्रा

खडकवासला: भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसादमिळत असून यांचा चौथ्या विजयासाठीचा प्रचार सध्या खडकवासला मतदारसंघात जोमाने सुरू आहे. सलग तीन कार्यकाळ यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर, निवडणुकीला सामोरे जात असताना तापकीर यांना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण आणि शहरी भागांचा संगम असलेल्या खडकवासला मतदारसंघात तापकीर यांनी विकासाच्या कामांमुळे ठसा उमटवला आहे. तापकीर यांच्या प्रचाराला मिळणारा चांगला प्रतिसाद मिळत असून वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, वारजे, माळवाडी आणि इतर भागांमध्ये तापकीर यांच्या प्रचार दरम्यान नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. “तापकीर म्हणजे विकास,” अशा घोषणा या सभांमध्ये ऐकायला मिळत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली परिसराचा झालेला कायापालट नागरिकांच्या मनावर ठसला आहे. मितभाषी स्वभाव आणि सादगीपूर्ण राहणीमान: तापकीर यांचे नागरिकांशी प्रामाणिक आणि साधे वर्तन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकीची भावना आहे. मागील तीन कार्यकाळांमध्ये त्यांनी विधानसभेत खडकवासला मतदारसंघाच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवला. यामध्ये मिळकतकराचा प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा आणि नागरी सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी भरीव कामगिरी केली. गेल्या पाच वर्षांत आमदार तापकीर यांनी मतदारसंघात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले आहेत ते फक्त कागदावर नसून सत्यात उतरल्याचे पाहवयास देखील मिळत आहे.

याशिवाय, स्मार्ट शाळा, सोलर प्रकल्प, आणि मेट्रोचे जाळे यांसारख्या लोकहिताच्या कामांमुळे खडकवासला मतदारसंघाचा विकास वेगाने झाला आहे.

तापकीर यांच्या प्रचार सभांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. प्रचारादरम्यान नागरिक “तापकीर साहेबच हवेत,” अशा प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि स्थानिक नेते प्रचंड जोमाने काम करत आहेत. खडकवासल्याचा सर्वांगीण विकास हा आमचा प्रमुख उद्देश आहे,” असे सांगत तापकीर यांनी मतदारांना आश्वस्त केले आहे की, पुढील कार्यकाळात सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळेल आणि परिसराचा विकास आणखी वेगाने होईल.

वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, वारजे, माळवाडी भागांतील नागरिक म्हणतात, “तापकीर यांच्या नेतृत्वाखाली खडकवासला मतदारसंघाचा विकास झाला आहे. त्यांच्या सडेतोड आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे या निवडणुकीत विजय निश्चित आहे.”

भिमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली खडकवासला मतदारसंघ विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. चौथ्या टर्मसाठी यशस्वी होण्यासाठी तापकीर आणि त्यांचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करत असून “मतदारांचा विश्वासच माझी ताकद आहे,” असे ठामपणे सांगत तापकीर यांनी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

धंगेकर यांनी कसब्यातून क्रांतीची मशाल पेटवली – खासदार संजय राऊत

कसब्यातील मतदार पोटनिवडणुकीतील
निकालच कायम ठेवतील

पुणे:रवींद्र धंगेकर यांनी कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीतून क्रांतीची मशाल पेटवली. या पोटनिवडणुकीत कसब्यातील नागरिकांनी जो निकाल दिला, त्यानंतरच हा मतदारसंघ ठळकपणे महाराष्ट्राच्या नकाशावर आला. येथील मतदार याही निवडणुकीत हाच निर्णय कायम ठेवतील आणि धंगेकर यांना विजयी करतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

लोकमान्य सभागृह केसरी वाडा येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. ते म्हणाले की कसब्यातील शिवसैनिक जोरात आहेत. ते धंगेकर यांना समर्थपणे साथ देतील. महाराष्ट्राच्या सत्तेवरची घाण उखडून फेकण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांच्या व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मदतीचा हात देऊन पुण्यात यश मिळवलेच पाहिजे. त्याखेरीज पुण्यात निर्माण झालेली ही कोयता गॅंग उध्वस्त करता येणार नाही. एकेकाळी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आज कोयता गॅंगचे शहर, भ्रष्टाचाराचे शहर अशी झाली आहे. त्याला सध्याचे सत्ताधारीच जबाबदार आहेत. सध्याच्या सत्ताधाऱ्यांची पैशाची भूक भागलेली नाही. जे आमदार आणि खासदार विकले गेले ते मोदी-शहांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. त्यांनी मुंबई संपवली, आता ते पुणे संपवायला निघाले आहेत. या राज्यात जर पुन्हा फडणवीस यांची सत्ता आली, तर ते पहिला विदर्भ वेगळा करतील, त्यानंतर मुंबई तोडली जाईल, त्यांचे हे महाराष्ट्र तोडण्याचे षडयंत्र बरेच दिवस शिजते आहे. जोपर्यंत एकसंध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत महाराष्ट्र तोडता येणार नाही, अशी खात्री पटल्यामुळेच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. गुजरातचे लोक हे व्यापारी वृत्तीने राज्य करतात त्यांनी देशभर लूट चालवली आहे. त्यांनी आता पैशाची मस्ती दाखवायला सुरुवात केली आहे, ही पैशाची मस्ती आपण खपवून घ्यायची नाही आणि एकजूट कायम राखून या महाराष्ट्रविरोधी शक्तींना सत्तेवरून खाली खेचायचे असा निर्धार आपण केला पाहिजे असे आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की आपण मोठ्या मताधिक्याने विजय होवू.

या कार्यकर्ता मेळाव्याला अंकुश काकडे, संजय मोरे, गजानन थरकुडे, मोहन जोशी, रोहित टिळक, बाळासाहेब अमराळे, नीता परदेशी, गणेश नलावडे आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊत आणि रवींद्र धंगेकर यांना समर्थन दिले.

दरम्यान, आज चातुर्मास परिवर्तन दिवसाच्या निमित्ताने आमदार रवींद्र धंगेकर यांनी दादावाडी जैन श्वेतांबर मंदिर येथे साकारण्यात आलेल्या शत्रुंजय गिरीराज पर्वत म्हणजेच शत्रुंजयपटाचे दर्शन घेतले. या दिनानिमित्त जैन साधू एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी विहार करतात, त्यामुळे जैन समाजात या दिवसाला खूप महत्त्व असते. यावेळी रमेश बोराणा, कांतीलाल पार्लेचा, सुरेश जैन, शांतीलाल जैन, संपत जैन आदी उपस्थित होते. उपस्थित जैन बांधवांनी यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा दिल्या.

स्वमग्न मुलांच्या थेरपी सेंटर साठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार – संदीप खर्डेकर.

पुणे:क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने गुरुनानक जयंती व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वमग्न मुलांच्या केंद्रास विविध उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.

स्वमग्न मुलांच्या समस्या खूप वेगळ्या असून त्यांचा दिनक्रम बघितल्यावर आणि त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ऐकून त्यांच्या वेदनांची कल्पना येते असे संदीप खर्डेकर म्हणाले.अश्या मुलांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ही संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आज गुरुनानक देव यांच्या 555 व्या जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रसन्न ऑटिझम सेंटर येथील मुलांसाठी विविध उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,प्रसन्न ऑटिझम सेंटर च्या कार्यकारी संचालिका साधना गोडबोले, संचालक सुभाष केसकर व स्वमग्न विद्यार्थी उपस्थित होते.
केंद्र सरकारने दिव्यांग जनांच्या यादीत स्वमग्न मुलांचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार च्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना साधनाताई गोडबोले यांनी ” राज्य सरकार ने अश्या मुलांसाठी थेरपी सेंटर उभरावेत ” अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुणे मनपा तर्फे देखील अश्या मुलांच्या संगोपन व उपचारासाठी केंद्र उभारावेत यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
भावी काळात ही ह्या मुलांना सर्वतोपरी मदत करण्याचे वचन नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट चे विश्वस्त मनोज हिंगोरानी आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर यांनी दिले.

हडपसरमध्ये भीषण आग: जवानांनी वाचविले तिघांचे प्राण (व्हिडीओ)

अनधिकृत व्यवसायीकाच्या हलगर्जीपणाने दुर्घटना

पुणे- आज सकाळी हडपसर येथे वैभव सिनेमागृहा जवळील भीमाशंकर सोस्यातीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली . या आगीत तिसऱ्या मजल्यावरच अडकलेल्या तिघांचे प्राण वाचविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांनी यश मिळविले तर दुसऱ्या मजल्यावर देखील अडकलेल्या चौघांची जवानांनी सुटका केली अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी प्रमोद सोनावणे आणि अनिल गायकवाड यांनी दिली . हि आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या २३ जवानांनी ३ फायर गाड्या आणि एका टँकरचा वापर केला .

भीमाशंकर सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर अनधिकृत पणे फोटो फ्रेमचा व्यवसाय निवासी भागात चालू होता आता या इमारतीला महापालिकेचा परवाना होता काय ? हि माहिती मिळू शकली नाही मात्र नियम बाह्य पद्धतीने व्यवसाय येथे सुरु होता कोणतेही शोर्ट सर्किट झाले नव्हते . फोटोच्या फर्म तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणत होत्या त्यामुळे हि आग भडकली आणि अपुऱ्या जागेत ये जा करण्याची वहिवाट यामुळे लोक आगीतून बाहेर येणे मुश्कील झाले होते. सुदैवाने अग्निशामक दलाच्या जवनांनी अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवून ती विझवण्यात यश मिळविले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला .

महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम व्हायचे आहे काय ? संजय राऊतांचा सवाल

रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत यांची सभा

पुणे-मोदी,शहा,फडणवीस,शिंदे हे सारे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे शत्रू आहेत,ते महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम बनवू पाहत आहेत,सुज्ञ असलेल्या विचारी असलेल्या पुणेकरांनो आता जास्त विचार करत बसू नका आता बांबू घालायची वेळ आली आहे ती जाऊ देऊ नका महात्मा फुले,सावित्रीमाई फुलेंचे सभ्य पुणे यांनी आता गुन्हेगारीचे शहर बनवलेय वेळीच सावध व्हा आणि आता महार्श्त्रातून भाजपला हद्दपार करा महाविकास आघाडीच्या रमेश बागवे यांना विजयी करा असे आवाहन येथे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. पुणे कँटोंमेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे,तसेच संजय मोरे विशाल धनवडे,अविनाश बागवे,पल्लवी जावळे, वसंत मोरे, विठ्ठल थोरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संजय राउत म्हणाले ,’ फुले शाहू आंबेडकरांचे पुणे सभ्य माणसांचे पुणे मानून ओळखले जात होते.आता कोणते गुन्हे या शहरात घडत नाहीत इथे, रुग्णांना जीवन देणारे ससून रुग्णालय यांनी नशिल्या ड्रग्जचा अड्डा बनवला,कोयता गँग,महिला असुरक्षित,बेरोजगारीने हैराण पुणे.गुन्हेगारांचे पुणे अशी ख्याती होऊ लागली.राजत सरकार बेईमान आणि गद्दार सरकार म्हणून ओळखले जाऊ लागले.आपण महाराष्ट्र कधीही विकू घेऊ शकतो अशी धारणा बाळगणारे मोदी- शहा या महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. सगळे बडे उद्योग कारखाने गुजरातला पळवत आहेत.यांनी कंगाल केलाय महाराष्ट्र, विचार करणारे सुज्ञ असलेल्या.पुण्याच्या लोकांनो आता विचार करू नका आता बांबू घालायची वेळ आली आहे.महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम करून ठेवायचा आहे यांना.ते होऊ द्यायचे नसेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींचे हात बळकट करावे लागतील.हि लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे शिंदे,फडणवीस शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी १०६ लोकांनी बलिदान दिलेय.मराठी माणसाला महाराष्ट्रात स्वाभिमानाने उभे करायला आता महाविकास आघाडीला निवडून द्यावे लागेल. लाडकी बहिण योजनेत १५०० रुपये देतात आमचे सरकार आल्यावर आम्ही ३००० रुपये देणार आहोत.१५०० रुपये देऊन ते लाज काढताय.आम्ही सिलेंडर देखील ५००/६०० रुपयंना देऊ, आरोग्य विमा २५ लाखाचा देऊ,शेतकऱ्यांचे कर्ज ३ लाखापर्यंतचे आपण माफ करणार आहोत.असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.