Home Blog Page 767

भाजपच्या सदस्यता अभियानाची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात बैठक

मुंबई -विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प

विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ

देशात सदस्यता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश मुख्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, विक्रांत पाटील, माधवी नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. देशात यापूर्वीच सदस्यता अभियानाची सुरुवात झाली होती पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रात अभियान राबविण्यात आलं नव्हतं. आता विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला आहे.
मिस कॉलद्वारे मिळवा मेंबरशिप
तुम्हालाही भाजपचे सदस्यत्व मिळवायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या फोनवरून 8800002024 या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल करावा लागेल. मिस कॉल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये सदस्यत्व क्रमांक दिला जाईल.

सावकारांच्या तगाद्याला वैतागून भवानी पेठेतील व्यावसायिकाची आत्महत्या

पुणे : पावसाळ्यात आलेल्या पुराने ताडीवाला रोड येथील गोदामात पाणी शिरुन मालाचे नुकसान झाले. याचे पैसे द्यावेत म्हणून व्यावसायिकाकडे सावकारांनी तगादा लावला़ मुलाला उचलून नेण्याची धमकी दिली. या मानसिक त्रासामुळे एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

राजा परदेशी (वय ४४, रा. महाराष्ट्र तरुण मंडळा शेजारी, हरकानगर, काशेवाडी, भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी कंचन राजा परदेशी (वय ३८, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी लक्कडसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काशेवाडी येथील घरात शनिवारी दुपारी १२ वाजता घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा परदेशी यांचे ताडीवाला रोड येथे गोदाम होते. लक्कडसिंग हा त्यांना डुक्कर पुरविण्याचे काम करीत असे. परदेशी हे या डुक्करांचे मांस तयार करुन ताडीवाला रोड येथील गोदामात ठेवत असे. ग्राहकांच्या मागणी नुसार त्यांना पुरवठा करत असे. पावसाळ्यात त्यांच्या गोदामात पुराचे पाणी शिरले आणि सर्व माल खराब झाला. जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाले.

हे नुकसान परदेशी भरुन काढू शकले नाही. दुसरीकडे लक्कडसिंग हा त्यांच्याकडे तुझे नुकसान झाले त्याला मी काय करु,
माझे पैसे दे, असे म्हणून पैशांची वारंवार मागणी करत होता.तो शिवीगाळ करुन मानसिक त्रास देत होता. मुलांना उचलून नेण्याची धमकी देत होता.त्याच्या या मानसिक त्रासाला कंटाळून राजा परदेशी यांनी शनिवारी दुपारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करीत आहेत

मुंबई -पुणे महामार्गावर कात्रजकडे जाणार्‍या वारजे पुलावर गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प

पुणे : मुंबई -पुणे महामार्गावर कात्रजकडे जाणार्‍या वारजे पुलावर एलपीजीने भरलेला टँकर उलटला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अग्निशमन दलाचे दोन क्रेनने हा ट्रॅकर बाजूला करण्याचे काम सुरु आहे.
मुंबईहून एलपीजीने भरलेला टँकर कात्रजकडे जात होता. वारजे येथील पुलावर आल्यावर या टँकरच्या पुढील बाजूचा टायर फुटला. त्यामुळे टँकरची पुढील बाजू पुलाला घासत जाऊन पलटला. त्यामुळे टँकरची मागील बाजूची कॅप्सुल संपूर्ण रोडवर आडवी झाली. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. याची खबर रविवारी सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी अग्निशमन दलाला मिळाली. त्याबरोबर वारजे येथील गाडी घटनास्थळी पोहचली. पोलीसही दोन क्रेनसह आले. ही घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. एलपीजी गॅस भरलेला टँकरची मागील कॅप्सुल बाजूला करण्याचे काम सुरु आहे. तासाभराच्या प्रयत्नानंतर पोलिसांना टँकरचा पुढील भाग व कॅप्सुल बाजूला करण्यात यश आले आहे. दोन्ही बाजूची वाहतूक सुरु करण्यात आली आहे. आता तिसरी क्रेन मागविण्यात आली असून तिच्या सहाय्याने टँकरची कॅप्सुल पुढील भागावर ठेवण्यात येणार आहे

भरधाव मोटारसायकल दुभाजकाला धडकल्याने चालक तरुणाचा मृत्यु ! कात्रजमधील घटना

पुणे : दुभाजक उजेडात असावेत , त्यावर लाईट्स असावेत दुभाजकाची जाणीव वाहनचालकाला अगोदरच होईल अशी व्यवस्था असावी असे सारे नियम असतानाही पुण्यात एकाच रात्री दोन ठिकाणी भरधाव मोटारसायकल दुभाजकाला धडकून अपघात झालेत. भरधाव मोटारसायकल दुभाजकाला धडकल्याने एका घटनेत चालकाचा मृत्यु झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

हर्षद दिपक बर्गे (वय २५, रा. मिलेटरी हौसिंग सोसायटी,सदर बाजार, सातारा) असे मृत्यु पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र ऋषिकेश हेमंत धोत्रे (वय २६, रा. देशमुख कॉलनी, सदर बाजार, सातारा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात कात्रजमधील मोरेबाग बसस्टॉपसमोर शनिवारी पहाटे अडीच वाजता घडला.

फिर्यादी व त्यांचा मित्र हर्षद बर्गे हे मोटारसायकलवरुन जात होते. बर्गे याने भरधाव मोटारसायकल चालविताना मोरेबाग बसस्टॉपसमोरील दुभाजकाला धडक दिली. त्यात ते रस्तावर पडल्याने दोघे जखमी झाले. हर्षद बर्गे याचा मृत्यु झाला असून ऋषिकेश धोत्रे हा जखमी झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

दुसरी घटना कर्वे रोडवरील रांका ज्वेलर्ससमोरील उड्डाण पुलाच्या सुरुवातीला घडली. त्यात वैभव हनुमंत पिंपळे (वय ३५, रा. सरस्वती कॉलनी, शिवनगर, संभाजीनगर, सातारा) हा तरुण जखमी झाला आहे. याबाबत पोलीस अंमलदार अमोल खारतोडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव पिंपळे हा शुक्रवारी रात्री अकरा वाजता भरधाव वेगाने कर्वे रोडवरुन जात होता.नळस्टॉपजवळील उड्डाणपुल सुरु होत असताना पुलाच्या कठड्याला दुचाकीची जोरात धडक दिली.
त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगिता गायकवाड तपास करीत आहे

अदानींवरील आरोपामुळे देशाच्या प्रतिष्ठेला धक्का !

अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने ( एसईसी) अदानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी,त्यांचा पुतण्या सागर अदानी व सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अब्जावधी डॉलरची लाचखोरी केल्याचा आरोप ठेवला आहे. ही लाच भारतातल्या काही सरकारी अधिकाऱ्यांना दिलेली असली तरी हा पैसा अमेरिकेतील गुंतवणूकदारांकडून गोळा केला असल्याचा त्यांचा दावा आहे. एकाच वेळेला लाचखोरी आणि गुंतवणूकदारांची फसवणूक असे दुहेरी आरोप अदानी समूहाविरुद्ध करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा मागोवा.

भारतातील सेबीप्रमाणे अमेरिकेतील भांडवली बाजाराचे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) हे नियंत्रक आहेत. अमेरिकेतील भांडवली बाजारात कर्जरोखे, शेअर्स यांची विक्री करून भांडवल उभारणाऱ्या कंपन्या, तेथील बाजारातील व्यवहारांवर त्यांचे नियंत्रण असते. न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायालयात या नियंत्रकांच्या वतीने फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली असून अदानी समूहाविरुद्ध कायमची मनाई, दिवाणी स्वरूपातील दंड व तीन अधिकारी व संचालकांच्या अटकेची मागणी केली आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात अदानी समूहावर भारतातील काही राज्यांमधील सरकारी अधिकाऱ्यांना सौर वीज खरेदीसाठी दिल्याचा आरोप केला आहे. मात्र ही लाच दिलेली रक्कम किती आहे, कोणाला दिली आहे याचा कोठेही उल्लेख नाही. प्रसारमाध्यमांनी ही रक्कम 250 मिलियन डॉलर्स ( सुमारे 2200 कोटी रुपये) इतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जगातील कोणत्याही देशात लाच देणे घेणे हा गुन्हा आहे. त्याचे कोणीही समर्थन करत नाही. परंतु अदानींच्या संदर्भात करण्यात आलेले हे आरोप आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे किंवा कसे हेही पाहण्याची गरज आहे. चीन किंवा अमेरिकेतील ‘डीप फेक’ मधील सोरोस सारखी ‘ फेक नेरेटिव्ह’ करणारी मंडळी यामागे आहेत किंवा कसे हेही पाहिले पाहिजे. अर्थात भ्रष्टाचाराचे कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणीही समर्थन करणे हे नीतिमत्तेला धरून नाही.

अदानी उद्योग समूहातील अदानी ग्रीन या कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये 750 मिलियन डॉलर्स ची उभारणी केली होती. त्यातील 175 मिलियन ( सुमारे साडे सतरा कोटी डॉलर्स ) इतकी रक्कम अमेरिकेच्या गुंतवणूकदारांच्या मार्फत उभारलेली होती. गौतम व सागर अदानी यांनी त्यांच्या अदानी ग्रीन व अझुरे पॉवर या दोन कंपन्यांना फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून काही लाख डॉलर्स रक्कम भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. या दोन्ही कंपन्यांकडून बाजारपेठेपेक्षा जास्त दराने वीज खरेदी करण्यासाठी ही लाच देण्यात आली. अझुरे पॉवर या कंपनीचे माजी संचालक सिरील काबेन्स आहेत.त्यांनी ‘फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट'(एफसीपीए)कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केले असल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनचे हंगामी संचालक संजय वाधवा यांनी सांगितल की या सर्व मंडळींनी अमेरिकेच्या कायद्याचे उल्लंघन केले असल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. अदानी समूहाने अमेरिकेत भांडवल गोळा केले तेव्हा तेथील बँका व गुंतवणूकदार यांना कोणत्याही वीज प्रकल्पासाठी लाच देणार नाही किंवा लाच देण्याचे आश्वासनही कोणाला देणार नाही अशी हमी दिलेली होती. अशा प्रकारची हमी दिलेली होती किंवा कसे याबाबत काहीही स्पष्टता नाही. 7 मार्च 2023 या दिवशी किंवा त्याच्या जवळपास अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन (एफबीआय) या गुन्हे तपासणी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सागर अदानी यांची अमेरिकेत भेट घेऊन त्यांच्या ताब्यातील इलेक्ट्रॉनिक उपकरण ताब्यात घेतले. त्याचवेळी त्यांनी सागर अदानींच्या कार्यालयाची झडती घेण्याचे वॉरंटही दाखवले. यामध्ये अमेरिकेच्या कायद्याचा भंग केल्याचे तसेच गैरव्यवहार केल्याचे नमूद केले होते.त्यावेळी सागर आदानींबरोबरच गौतम अदानी विनीत जैन यांच्याही नावाचा व इंडियन एनर्जी कंपनी यांचा उल्लेख केलेला आहे. अमेरिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने भारतात प्रत्यक्ष येऊन लाच दिली किंवा कसे याबाबत प्रत्यक्ष चौकशी केलेली नाही. आंध्र प्रदेश व ओडिषा या दोन राज्यांमध्ये सौरऊर्जा पुरवठ्याची कंत्राटे मिळावीत म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यात आल्याचा आरोप त्यात आहे.

दरम्यान लाचखोरीचे सर्व आरोप निराधार व बिन बुडाचे असल्याची प्रतिक्रिया अदानी समूहाने दिली आहे. दाखल केलेल्या खटल्यातील हे केवळ आरोप आहेत व जोपर्यंत ते न्यायालयात सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपीला निर्दोष मानले जाते असे अमेरिकेच्या न्याय विभागाने स्पष्ट केल्याचा उल्लेख अदानी समूहाच्या पत्रकामध्ये केलेला आहे. अदानी समूह उच्च दर्जाच्या तत्वांचा अंगीकार करून पारदर्शकता व नियमांचे पालन करणारा समूह आहे. आमचा समूह जगभरात कार्यरत असून आम्ही नेहमीच कायद्याचे पालन करणारे आहोत. या आरोपांविरुद्ध संबंधित न्यायालयात सर्व ते शक्य कायदेशीर मार्ग शोधून आमची बाजू योग्यरित्या मांडण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान या बातमीचे पडसाद भारतीय बाजारात उमटून अदानी समूहाचे शेअरचे भाव गडगडले आहेत.त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचेही मोठे नुकसान कागदोपत्री झालेले आहे. साहजिकच भारतीय राजकारणात आरोपांची राळ पुन्हा उडालेली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानींच्या चौकशीची, अटकेची मागणी केली आहे. संसदेच्या येत्या अधिवेशनात त्याचे पडसाद उमटणार असून सर्व कामकाज बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान भारतातील एकाही तपास संस्थेने किंवा सेबी यांनी अदानी समूहाविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने अदानी कंपनीबरोबर केलेल्या कराराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. तसेच केनयाने अदानी उद्योग समूहा बरोबर केलेला विमानतळ व वीज निर्मितीचा प्रकल्प रद्द केल्याचे जाहीर केले आहे. या घडामोडींमुळे अदानी समूहच नाही तर भारताची प्रतिमा डागाळली जात आहे. भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला लागलेला धक्का व आर्थिक स्थानाचा विचार करता सत्ताधारी मोदी सरकारने याची उच्चस्तरीय संसदीय सखोल व निष्पक्ष चौकशी करून हे प्रकरण विनाविलंब तडीस लावावे अशी अपेक्षा आहे.

लेखकप्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत)

महायुतीला मिळालेले निर्विवाद बहुमत राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी -मसालाकिंग धनंजय दातार

पुणे- मसालाकिंग धनंजय दातार, (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स, दुबई, युएई)यांनी म्हटले आहे कि,’महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला २०० हून अधिक जागा देत निर्विवाद बहुमत दिले आहे. हा निकाल महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी आणि उत्साहवर्धक ठरेल, असे एक उद्योजक या नात्याने मला वाटते. कारण कोणत्याही राज्याची आर्थिक-औद्योगिक प्रगती ही शासकीय धोरणांच्या स्थिरतेवर अवलंबून असते आणि धोरणे स्थिर राहण्यासाठी तेथील राजवट मजबूत असावी लागते. केंद्रात व महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे एकाच आघाडीचे, एकविचाराने चालणारे आणि विकासाभिमुख सरकार काम करणार असल्याने आगामी काळात अस्थिर सरकार, तडजोडीचे सरकार किंवा राष्ट्रपती राजवट अशा आव्हानांचा मुकाबला करावा लागणार नाही आणि विकासासाठी केंद्रीय निधीचीही कमतरता भासणार नाही, हे खूप आश्वासक आहे.

महायुतीच्या गेल्या शासनकाळात राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात प्रगतीची व्यापक आणि वेगवान पावले पडलेली दिसली आहेत. त्याच दमदार वाटचालीचा पुढचा टप्पा भविष्यकाळातही कायम राहील. पायाभूत सुविधा विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ततेच्या टप्प्यात आहेत. त्यातील काही महाराष्ट्राइतकेच देशाच्या भरभराटीसाठीही महत्त्वाचे आहेत. समृद्धी महामार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन, नवे रस्ते व रेलमार्ग बांधणी तथा विद्यमान मार्गांचा विस्तार, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित वाढवण बंदर ही त्यापैकी काही उदाहरणे. महाराष्ट्रात गुंतवणूक, वाहतूक, आयात-निर्यात, औद्योगिक विकास यांना पुढील पाच वर्षांत जोरदार चालना मिळेल, ज्याचा परिणाम राज्याची आर्थिक भरभराट होण्यावर होईल. नव्या सरकारला आणि नेतृत्वाला अनेक शुभेच्छा.

“खडकवासला विधानसभा निवडणूक कार्यालय: प्रभावी व्यवस्थापनाचा आदर्श”

पुणे:खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाने निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात प्रभावी व्यवस्थापनाचे उदाहरण दिले आहे. या कार्यालयाने पारदर्शकतेची आणि अचूकतेची उच्चतम पातळी गाठत एक आदर्श कार्यप्रणाली स्थापित केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे, इव्हीएम कक्षाचे नोडल अधिकारी सचिन आखाडे, सहा. अधिकारी नारायण पवार, प्रमोद भांड, अंकुश गुरव आणि इतर अधिकारी तसेच कर्मचार्‍यांच्या योग्य नेतृत्वामुळे निवडणूक प्रक्रिया सुसंगत पार पडली.
निवडणूक काळात, मतदार यादीचे अद्ययावत व्यवस्थापन, मतदान केंद्रांची अचूक योजना, आणि प्रशिक्षण सत्रांचे आयोजन अत्यंत काटेकोरपणे पार पडले. याशिवाय, मतदान केंद्रांवर तांत्रिक साधनांचा वापर करत प्रक्रिया सुलभ करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापन सुलभ बनवण्यात आले.योगेश हांडगे यांच्या नेतृत्वात मीडिया कक्षाने या कार्यप्रणालीचे व्यवस्थित वृत्तांकन केले आणि त्यामुळे अनेक वर्तमानपत्रांमध्ये अनेक बातम्या प्रसारित होऊन मतदारांमध्ये जागरूकता निर्माण झाली. या कार्यकालात, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेच्या माध्यमातून जनतेचा विश्वास प्राप्त करण्यात आले.खडकवासला विधानसभा निवडणूक कार्यालयाने आपल्या कार्यप्रणालीच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेचे उच्च मानक ठेवले आणि एक आदर्श प्रशासकीय कार्यसंस्कृती निर्माण केली.

प्रियांका गांधी 4 लाखाहून अधिक मतांनी वायनाड जिंकल्या…

वायनाड:राहुल गांधी यांनी रायबरेलीची जागा निवडल्याने वायनाडची जागा रिक्त झाली होती. यानंतर प्रियांका गांधी वाड्रा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. 9.52 लाख मतांपैकी प्रियंका गांधी यांना सुमारे सहा लाख मते मिळतील, असा अंदाज स्थानिक काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला होता.आजवायनाड पोटनिवडणुकीचा निकाल ही जाहीर झाला आहे. प्रियंका गांधी यांनी सुमारे 4 लाख मतांची आघाडी घेऊन प्रियंका गांधी यांनी त्यांचे भाऊ राहुल गांधी यांच्या विजयाच्या फरकाला मागे टाकले आहे.राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 3,64,422 मतांनी विजय मिळवला होता. राहुल गांधी यांनी 6,47,445 मते मिळवून मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाऊ राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त मते मिळवली आहेत. केरळमधील वायनाड पोटनिवडणूक त्यांनी ४ लाखांहून अधिक मतांनी जिंकलीये. प्रियंका गांधी यांनी या विजयाबद्दल वायनाडच्या जनतेचे आभार मानले.

प्रियंका गांधी यांनी X वर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. मी खात्री करून घेईन की कालांतराने, तुम्हाला हा विजय खरोखरच तुमचा विजय वाटेल आणि तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले आहे ती तुमच्या आशा आणि स्वप्ने समजून घेऊन तुमच्यासाठी लढेल. संसदेत तुमचा आवाज होण्यासाठी मी उत्सुक आहे.

दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत विजयाची केली हॅटट्रिक

0

इंदापूर : इंदापूर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत विजयाची हॅटट्रिक केली आहे. दत्तात्रय भरणे यांनी 20 हजार 36 मते घेऊन आपली विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील १ लाख ७४ हजार ८३२ पुरुष, १ लाख ६६ हजार ६३१ महिला, इतर २२ असे एकूण ३ लाख ४१ हजार ४३५ एकूण मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ३६ हजार १५२ पुरुष, १ लाख २६ हजार ४७२ महिला असे एकूण २ लाख ६२ हजार ६३५ मतदारांनी मताचा अधिकार बजावला होता.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर तात्काळ त्यांची महाविकास आघाडी मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर झाली होती. राज्यामधील महत्त्वाची लढत म्हणून सर्वांचे लक्ष या इंदापूर विधानसभा निवडणुकीकडे लागले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली होती. महाविकास आघाडीमधून प्रवीण दशरथ माने यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवीली होती. शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी इंदापूर तालुक्यामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते. हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज असलेल्या बड्या नेत्यांची समजूत काढून मूठ बांधण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला. दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी आपला उमेदवार विजयी होण्यासाठी अनेक दुसऱ्या फळीतील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न केला.या निवडणुकीमध्ये जातीची समीकरणे बांधण्याचा सर्वच नेत्यांच्याकडून प्रयत्न झाला. मराठा, मुस्लिम आणि अनुसूचित जाती जमाती यांची एका बाजूला फळी मजबूत करण्याचा प्रयत्न केला गेला. तर अजित पवारांनी ओबीसी समाज एकत्र केला. त्यामुळे दत्तात्रेय भरणे यांच्याकडे धनगर, माळी असे सूत्र दिसून आले. मागील दहा वर्ष सत्तेपासून वंचित राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांची साथ अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सोडली.

त्यामध्ये कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर आदींसह अनेकांचा समावेश आहे. हर्षवर्धन पाटील यांचे बंधू मयूरसिंह पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांची साथ देणे पसंत केले. या प्रमुख कारणांमुळे हर्षवर्धन पाटील यांच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसली आहे.

पहिल्या फेरीत दत्तात्रय भरणे यांना ४ हजार ८६६, तर हर्षवर्धन पाटील यांना ४ हजार ५३० मते मिळाली. अपक्षउमेदवार प्रवीण माने यांनी १ हजार २५० मते घेतली. दत्तात्रय भरणे यांनी ३३६ मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीपासून दत्तात्रय भरणे यांनी मताची आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या फेरीमध्ये दत्तात्रय भरणे यांची आघाडी 1 हजर 29 मतांची होती. तिसऱ्या फेरीमध्ये कमी होऊन 333 मतांची आघाडी मिळाली होती.

शेवटच्या फेरीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी 1 लाख 16 हजार 748 मते घेतली, तर हर्षवर्धन पाटील 97 हजार 673 मते मिळाली. अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी 37 हजार 843 मते घेतली. दत्तात्रेय भरणे यांनी 19 हजार 75 मताधिक्य घेऊन तिसऱ्यांदा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. सलग तीन वेळा हर्षवर्धन पाटील यांना भरणे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले.

मागील निवडणुकीमध्ये १ लाख १० हजार मते हर्षवर्धन पाटील यांना मिळाली होती. या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना एक लाख मते सुद्धा ओलांडता आली नाहीत. अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी मतांचे विभाजन केल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना मोठा फटका या निवडणुकीत बसलेला दिसतो.

विजयी होताच सिद्धार्थ ने घेतलेली भेट..जनसेवक म्हणून त्यांच्या साधेपणा व मोठेपणा अधोरेखित करणारी : सनी निम्हण

आज निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवाजीनगरच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने सिध्दार्थ शिरोळे यांची मिरवणूक काढण्यात आली व विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विजयाच्या क्षणांमध्येही, त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी आपल्या “झुंज” ह्या निवासस्थानी येऊन माझ्या आणि कुटुंबीयांच्या भेटीसाठी आवर्जून वेळ दिला. त्यांची ही भेट मनाचा ठाव घेणारी आणि एक जनसेवक म्हणून त्यांच्या साधेपणा व मोठेपणा अधोरेखित करणारी आहे.

“आपण माझ्यासाठी घेतलेले परिश्रम, दिलेली निःस्वार्थ साथ, आणि माझ्या विजयामागील आपल्या योगदानाची जाणीव मी आयुष्यभर ठेवेन. शिवाजीनगरच्या विकासासाठी भविष्यात देखील आपली साथ ही मोलाची राहील,” असे त्यांच्या बोलण्यामधून व्यक्त झालेली माझ्याविषयीची आपुलकी आणि भविष्यातील विकासाची तळमळ मनाला विशेष उभारी देणारी आहे. शिवाजीनगरचे कार्यसम्राट मा. आमदार विनायक (आबा) निम्हण यांनी सुरू केलेल्या विकासपर्वाला पुढे नेत, शिवाजीनगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते झोकून देऊन काम करतील, याची खात्री त्यांची ही वचनबद्धता देत आहे.

त्यांच्या हातून असंख्य विकासकामे घडून शिवाजीनगरच्या जनतेचे जीवन अधिकाधिक समृद्ध आणि सुखकर होवो, हीच सदिच्छा.

मा. श्री. सिद्धार्थ शिरोळे यांच्या विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाबद्दल आणि पुनःश्च एकदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या या प्रवासात आपण सोबत होतो, याचा अभिमान वाटतो. शिवाजीनगरच्या उज्ज्वल भविष्याची ही नवी पहाट आहे.
सनी विनायक निम्हण

सिद्धार्थ अनिल शिरोळे पुन्हा विजयी

पुणे:शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा ३६,७०२ मतांच्या फरकाने पराभव करत मोठा विजय मिळवला आहे.

शिरोळे यांनी ८४,६९५ मते मिळवत मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला असून ते सलग दुसऱ्यांदा येथून आमदार झाले आहेत.

२० फेऱ्यांनंतर शिवाजीनगरची अंतिम आकडेवारी

  • सिद्धार्थ शिरोळे (भाजप): ८४,६९५ मते (+३६,७०२)
  • दत्ता बहिरट (काँग्रेस): ४७,९९३ मते
  • मनीष आनंद (काँग्रेस बंडखोर): १३,०६१ मते

भाजपचा शिवाजीनगरमधील दबदबा कायम

सिद्धार्थ शिरोळे यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती, जी अखेरपर्यंत टिकून राहिली. काँग्रेसचे दत्ता बहिरट यांनी जोरदार प्रचार केला असला, तरी शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पक्ष संघटनेची ताकद मतदारसंघात वर्चस्व राखणारी ठरली. शिरोळे यांच्या सलग दुसऱ्या विजयाने पक्षाचा गड अधिक मजबूत झाला आहे.

स्वतंत्र उमेदवार प्रभावहीन

स्वतंत्र उमेदवार आनंद मनीष सुरेंद्र यांनी १३,०६१ मते मिळवली. काँग्रेस आणि भाजप यांच्यातील थेट लढतीत पक्षातील बंडखोरीमुळे झालेल्या मतविभाजनाचा काँग्रेसला फटका बसला.

सलग चाैथ्यंदा विजय : भीमराव तापकीर मंत्री होणार ?काँग्रेस पुणे शहर जिल्ह्यातून हद्दपार

पुणे:पुणे जिल्हयातील २१ मतदारसंघात यंदा विधानसभा निवडणुकीसाठी ६१.०५ टक्के मतदान पार पडले हाेते. .महायुतीने जिल्हयातील २१ पैकी १८ जागा जिंकल्या असून त्यांचा एक अपक्ष देखील निवडून आल्याने १९ जागा प्राप्त करत त्यांनी माेठा विजय मिळवला आहे. तर, शरद पवार गट अाणि उबाठा गट यांना प्रत्येकी एक जागा मिळाली असून काँग्रेस पुणे जिल्हयातून हद्दपार झाली अाहे. पुणे जिल्हयात सर्वाधिक महत्वपूर्ण निवडणुक बारामती मतदारसंघात अजित पवार विरुध्द युगेंद्र पवार अशी हाेती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर खा.शरद पवार यांच्या करिष्मामुळे लाेकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवास समाेरे जावे लागले हाेते. त्यामुळे विधानसभा निवडणुक अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली हाेती परंतु या निवडणुकीत एकतर्फी काैल मतदारांनी त्यांना दिला आहे. तर, पुण्यातील कसबा मतदारसंघात अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला हाेता. परंतु पाेटनिवडणुकीत दीड वर्षापूर्वी काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी आमदारकी प्राप्त केली हाेती. परंतु त्यानंतर पराभूत झालेले भाजपचे हेमंत रासने यांनी मतदारसंघात संर्पक व कामाच्या माध्यमातून पुर्नबांधणी करुन हा मतदारसंघ पुन्हा भाजपला मिळवून देण्यात यशस्वी झाले आहे. तर, काेथरुड मतदारसंघात राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक लाखापेक्षा अधिक आघाडी घेत मनसे व शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारांना चीतपट केले. पुण्यातील पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ व खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर यांनी सलग चाैथ्यंदा विजय संपादन केल्याने भावी मंत्रीमंडळाचे वेध त्यांना लागले आहे. तर, पाेर्श कार प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अामदार सुनील टिंगरे यांना शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापू पठारे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

राज्यात राजकीय दृष्टया महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हयात नेमका निकाल काेणाच्या बाजूने लागताे याची उत्सुकता हाेती. लाेकसभा निवडणुकीत आघाडीने बाजी मारली असली तरी विधानसभा निवडणुकीत त्याचा काेणताही परिणाम दिसून आला नाही

कसब्यात धंगेकर पराभूत.. रासने विजयी

दीपक मानकर,रमेश बागवे, रुपाली पाटील अशा नेत्यांच्या साथीने रवींद्र धंगेकर यांनी गेल्या 2 वर्षापूर्वी कसबा काँग्रेस कडे खेचून आणला होता.तो भाजपने पुन्हा आता स्वतःकडे खेचण्यात यश मिळवले आहे.

  • हेमंत रासने : ९० हजार ४६
  • रवींद्र धंगेकर : ७० हजार ६२३
  • गणेश भोकरे : ४ हजार ८९४
  • कमल व्यवहारे : ५५२

दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत विरोध कौल देणाऱ्या कसब्याने यंदा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना पसंती दिली. या मतदार संघात झालेल्या चौरंगी लढतीत रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा १९ हजार ४२३ मतांनी पराभव केला.
त्यामुळे रासने यांच्या विजयाने बालेकिल्ला परत मिळविण्यात भाजपला यश आले आहे.
रासने आणि धंगेकर यांच्यासह माजी महापौर आणि कॉंग्रेसच्या बंडखोर कमल व्यवहारे आणि मनसेचे उमेदवार गणेश भोकरे रिंगणात होते. त्यामुळे चुरशीची लढत होणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पहिल्या फेरीपासून रासने यांनी मतांची आघाडी घेतली. अखेरच्या फेरीत १९ हजारांहून अधिक मताधिक्य घेत रासने यांचा विजय झाला.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत रासने विरुद्ध धंगेकर अशी लढत होती. त्यात महाविकास आघाडीचे धंगेकर यांनी विजयी मिळविला होता. मध्यंतरी युती आणि आघाडीतील मित्रपक्षात बदल झाले. महायुतीने पुन्हा एकदा रासने यांना, तर महाविकास आघाडीने धंगेकर यांना संधी दिली. धंगेकर यांच्या कामाचा झपाटा, तर पराभवानंतर घरी बसून न राहता रासने यांनी घेतलेली मेहनत, पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रतिष्ठेची केलेली निवडणूक यामुळे रासने यांचा सरळ विजय झाला. याउलट पक्षांतर्गत असलेली नाराजीआणि बंडखोरी थोपविण्यात कॉंग्रेसला अपयश आले. तसेच निवडणुकीतील शिलेदारांनी साथ सोडल्याने धंगेकर यांना पराभव पत्कारावा लागला. पोटनिवडणुकीत दगा दिलेल्या १५ नंबर प्रभागाने यंदा रासने यांना मोठे मताधिक्य दिले. त्याचबरोबर धंगेकर यांना मताधिक्य देणाऱ्या १७ आणि १८ नंबरच्या प्रभागात रोखण्यात भाजपला यश आले.

रोहीत पवार विजयी…

0

कर्जत : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार 1243 मतांनी विजयी झाले आहेत.त्यांनी भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांना दुसर्‍यांदा पराभवाची धूळ चारली.

या मतदारसंघात आमदार पवार व भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात टाईट-फाईट लढत झाल्याचे मतमोजणीवरून दिसून येत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून या दोघांमध्ये चुरस होती. मतमोजणीच्या फेर्‍यांमध्ये आमदार पवार व आमदार शिंदे हे आलटून-पालटून आघाडी घेत होते. त्यांच्यातील काटे की टक्करमुळे विजयाबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली होती.अखेर राष्ट्रवादीचे आमदार पवार यांनी 391 मतांनी बाजी मारली. या दोघांमध्ये कोण विजयी होईल, हे शेवटच्या फेरीपर्यंत अंदाज बांधणे कठीण होते. शेवटी आमदार शिंदे यांना आमदार पवार यांच्याकडून दुसर्‍यांदा पराभव पत्करावा लागला.

ईव्हीएम’विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार-डॉ.हुलगेश चलवादी

पुणे, २३ नोव्हेंबर २०२४
राज्यातील प्रतिष्ठित लढत समजल्या जाणाऱ्या वडगाव शेरी मतदार संघात धक्कादायक निकाल समोर आले आहेत. ५० हजारांहून अधिकची हक्काची मतं असून देखील तेवढीही मतं न मिळाल्याने ईव्हीएम यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप वडगाव शेरी मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आणि प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (ता.२३) केला.ईव्हीएम यंत्रणेसंबंधी अनेक तक्रारी असून देखील त्यावरच निवडणूकीचे चक्र अवलंबून असल्याने आता याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून लवकरच जनहित याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती डॉ.चलवादींनी दिली आहे.
प्रस्थापित पक्षांनी यावेळी मतदार संघात पैशांचे अमाप वाटप केल्याने हा धनबलाचा आणि ईव्हीएमचा कौल आहे; जनमताचा नाही, अशी खंत देखील डॉ.चलवादी यांनी बोलून दाखवली.वडगाव शेरी मतदार संघात जवळपास १५० कोटींचे वाटप झाल्याचा धक्कादायक आरोप देखील त्यांनी यावेळी केला.मतदार संघात दलित, मागासवर्गीय, ओबीसी,अल्पसंख्याक मतदारांची मोठी संख्या आहे. ही सर्व मतदार बहुजन समाज पक्षांच्या बाजूने कौल देतात. यंदा मतदारसंघात बसपाचे वारे होते. विविध वस्त्यांमध्ये, सोसायटी,परिसरात बसपचीच चर्चा होती. 
डॉ.चलवादी यांनी त्यांच्या प्रचारातही अगोदरपासून आघाडी घेतली होती. प्रसारमाध्यमांमध्ये देखील बसप आणि डॉ.चलवादींचे नाव चांगलेच चर्चेत होते.पहिल्या तीन उमेदवारांमध्ये डॉ.चलवादींची चर्चा होती. असे असतांना केवळ ३ हजार ७६२ मतं मिळाल्याने ईव्हीएम यंत्रणेत घोळ झाल्याचा संशय डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला आहे. वडागाव शेरी मतदार संघातील सर्व जनता ठामपणे पाठिशी उभी असतांना देखील प्रत्यक्षात मिळालेली मतं बघता हा निकाल जनतेचा नाही, तर भ्रष्ट ईव्हीएमचा असल्याचा दावा डॉ.चलवादी यांनी केला.यामुळे मतपत्रावर निवडणूक होणे आवश्यक आहे. जेणेकरून मतदारांचे खर मत कुणाला हे कळत.आता ईव्हीएम विरोधात अधिक तीव्र आंदोलन उभारू असे,डॉ.चलवादी म्हणाले.