आज निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवाजीनगरच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने सिध्दार्थ शिरोळे यांची मिरवणूक काढण्यात आली व विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विजयाच्या क्षणांमध्येही, त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी आपल्या “झुंज” ह्या निवासस्थानी येऊन माझ्या आणि कुटुंबीयांच्या भेटीसाठी आवर्जून वेळ दिला. त्यांची ही भेट मनाचा ठाव घेणारी आणि एक जनसेवक म्हणून त्यांच्या साधेपणा व मोठेपणा अधोरेखित करणारी आहे.
“आपण माझ्यासाठी घेतलेले परिश्रम, दिलेली निःस्वार्थ साथ, आणि माझ्या विजयामागील आपल्या योगदानाची जाणीव मी आयुष्यभर ठेवेन. शिवाजीनगरच्या विकासासाठी भविष्यात देखील आपली साथ ही मोलाची राहील,” असे त्यांच्या बोलण्यामधून व्यक्त झालेली माझ्याविषयीची आपुलकी आणि भविष्यातील विकासाची तळमळ मनाला विशेष उभारी देणारी आहे. शिवाजीनगरचे कार्यसम्राट मा. आमदार विनायक (आबा) निम्हण यांनी सुरू केलेल्या विकासपर्वाला पुढे नेत, शिवाजीनगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते झोकून देऊन काम करतील, याची खात्री त्यांची ही वचनबद्धता देत आहे.
त्यांच्या हातून असंख्य विकासकामे घडून शिवाजीनगरच्या जनतेचे जीवन अधिकाधिक समृद्ध आणि सुखकर होवो, हीच सदिच्छा.
मा. श्री. सिद्धार्थ शिरोळे यांच्या विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाबद्दल आणि पुनःश्च एकदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या या प्रवासात आपण सोबत होतो, याचा अभिमान वाटतो. शिवाजीनगरच्या उज्ज्वल भविष्याची ही नवी पहाट आहे.
सनी विनायक निम्हण