वायनाड:राहुल गांधी यांनी रायबरेलीची जागा निवडल्याने वायनाडची जागा रिक्त झाली होती. यानंतर प्रियांका गांधी वाड्रा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. 9.52 लाख मतांपैकी प्रियंका गांधी यांना सुमारे सहा लाख मते मिळतील, असा अंदाज स्थानिक काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला होता.आजवायनाड पोटनिवडणुकीचा निकाल ही जाहीर झाला आहे. प्रियंका गांधी यांनी सुमारे 4 लाख मतांची आघाडी घेऊन प्रियंका गांधी यांनी त्यांचे भाऊ राहुल गांधी यांच्या विजयाच्या फरकाला मागे टाकले आहे.राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 3,64,422 मतांनी विजय मिळवला होता. राहुल गांधी यांनी 6,47,445 मते मिळवून मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाऊ राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त मते मिळवली आहेत. केरळमधील वायनाड पोटनिवडणूक त्यांनी ४ लाखांहून अधिक मतांनी जिंकलीये. प्रियंका गांधी यांनी या विजयाबद्दल वायनाडच्या जनतेचे आभार मानले.
प्रियंका गांधी यांनी X वर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. मी खात्री करून घेईन की कालांतराने, तुम्हाला हा विजय खरोखरच तुमचा विजय वाटेल आणि तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले आहे ती तुमच्या आशा आणि स्वप्ने समजून घेऊन तुमच्यासाठी लढेल. संसदेत तुमचा आवाज होण्यासाठी मी उत्सुक आहे.