पुणे:पुणे जिल्हयातील २१ मतदारसंघात यंदा विधानसभा निवडणुकीसाठी ६१.०५ टक्के मतदान पार पडले हाेते. .महायुतीने जिल्हयातील २१ पैकी १८ जागा जिंकल्या असून त्यांचा एक अपक्ष देखील निवडून आल्याने १९ जागा प्राप्त करत त्यांनी माेठा विजय मिळवला आहे. तर, शरद पवार गट अाणि उबाठा गट यांना प्रत्येकी एक जागा मिळाली असून काँग्रेस पुणे जिल्हयातून हद्दपार झाली अाहे. पुणे जिल्हयात सर्वाधिक महत्वपूर्ण निवडणुक बारामती मतदारसंघात अजित पवार विरुध्द युगेंद्र पवार अशी हाेती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर खा.शरद पवार यांच्या करिष्मामुळे लाेकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवास समाेरे जावे लागले हाेते. त्यामुळे विधानसभा निवडणुक अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली हाेती परंतु या निवडणुकीत एकतर्फी काैल मतदारांनी त्यांना दिला आहे. तर, पुण्यातील कसबा मतदारसंघात अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला हाेता. परंतु पाेटनिवडणुकीत दीड वर्षापूर्वी काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी आमदारकी प्राप्त केली हाेती. परंतु त्यानंतर पराभूत झालेले भाजपचे हेमंत रासने यांनी मतदारसंघात संर्पक व कामाच्या माध्यमातून पुर्नबांधणी करुन हा मतदारसंघ पुन्हा भाजपला मिळवून देण्यात यशस्वी झाले आहे. तर, काेथरुड मतदारसंघात राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक लाखापेक्षा अधिक आघाडी घेत मनसे व शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारांना चीतपट केले. पुण्यातील पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ व खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर यांनी सलग चाैथ्यंदा विजय संपादन केल्याने भावी मंत्रीमंडळाचे वेध त्यांना लागले आहे. तर, पाेर्श कार प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अामदार सुनील टिंगरे यांना शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापू पठारे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
राज्यात राजकीय दृष्टया महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हयात नेमका निकाल काेणाच्या बाजूने लागताे याची उत्सुकता हाेती. लाेकसभा निवडणुकीत आघाडीने बाजी मारली असली तरी विधानसभा निवडणुकीत त्याचा काेणताही परिणाम दिसून आला नाही