कर्जत : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार 1243 मतांनी विजयी झाले आहेत.त्यांनी भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांना दुसर्यांदा पराभवाची धूळ चारली.
या मतदारसंघात आमदार पवार व भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात टाईट-फाईट लढत झाल्याचे मतमोजणीवरून दिसून येत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून या दोघांमध्ये चुरस होती. मतमोजणीच्या फेर्यांमध्ये आमदार पवार व आमदार शिंदे हे आलटून-पालटून आघाडी घेत होते. त्यांच्यातील काटे की टक्करमुळे विजयाबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली होती.अखेर राष्ट्रवादीचे आमदार पवार यांनी 391 मतांनी बाजी मारली. या दोघांमध्ये कोण विजयी होईल, हे शेवटच्या फेरीपर्यंत अंदाज बांधणे कठीण होते. शेवटी आमदार शिंदे यांना आमदार पवार यांच्याकडून दुसर्यांदा पराभव पत्करावा लागला.