Home Blog Page 691

जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय:शरद पवार यांचे आरक्षण आंदोलनावर मत

पुणे-जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय आहोत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडले आहे.यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे. तसेच सरकारने देखील याबाबत विलंब लावू नये, असा सल्ला देखील शरद पवारांनी सरकारला दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. तीन पक्ष एकत्र लढताना त्यावेळी कुठल्याही एका जागेवर तिघांपैकी कोणी ती जागा लढवावी याबाबतचा निर्णय आणि एकवाक्यता करावी लागेल, ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत आहेत. जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर प्रत्येक पक्ष कोणता उमेदवार द्यायचा यावर विचार करेल, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे.

राज्यात सुरू असलेल्या आरक्षण मुद्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, आरक्षणामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र तणाव होण्याचे कारण नाही, शेवटी आपण सगळे जात धर्म काही असली तरी भारतीय आहोत. महाराष्ट्राचे घटक आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये सामंजस्य कसे करता येईल याबाबतची भूमिका या क्षेत्रात नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. याच सोबत राज्य सरकारने देखील या प्रश्नांना विलंब लावू नये, लोकांना विश्वासात घ्या आणि त्याची पूर्तता करून वातावरण चांगले कसे राहील याची काळजी घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी सरकारला दिला आहे.

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या अतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. यावर देखील शरद पवारांनी भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले, अरविंद केजरीवाल चांगले काम करत होते. अरविंद केजरीवाल यांना एका विशिष्ट स्थितीत कॉर्नर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले गेले. यानंतर अरविंग केजरीवाल यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री म्हणून ज्यांची निवड करण्यात आली त्यांचे काम आम्ही दिल्लीत पाहिले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून या पूर्वी दोन महिला नेत्यांनी नेतृत्व केले होते. त्याच प्रकारे अतिशी देखील काम करत दिल्लीच्या प्रशासनाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

‘विखाराऐवजी प्रेम वाटणारे लेखन महत्वाचे ‘

पुणे:महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे  ग्रंथालय आणि युवक क्रांती दलाच्या वतीने ‘किताबे कुछ कहती है ‘ हा चर्चात्मक कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता . शनिवार,दि.२१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम गांधी भवन(कोथरूड) येथे झाला.या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. 
‘ बोलना ही है’ ,’इष्क में शहर होना’ या  रवीश कुमार यांच्या  दोन पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. पत्रकार,लेखिका हिना खान यांनी या दोन पुस्तकांचे रसग्रहण प्रस्तुत केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी ,या उपक्रमाच्या समन्वयक प्रा.डॉ.शशिकला राय, डॉ.ऊर्मिला सप्तर्षी ,विश्वस्त अन्वर राजन,अप्पा अनारसे,अॅड.स्वप्नील तोंडे,कैलास यादव  , प्रमोद मुजुमदार,रजनी रणपिसे, अप्पा अनारसे उपस्थित होते. प्रारंभी स्वामिनी पारखे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे  वाचन केले. पोपट खोसे यानी हीना खान यांचा सत्कार केला एड. स्वप्नील तोंडे यांनी प्रास्ताविक केले. तेजस भालेराव यांनी आभार मानले 
रविशकुमार यांच्या लिखाणाबद्दल बोलताना हीना खान म्हणाल्या,’ अल्पसंख्य समुदायाच्या हक्कांचा संकोच केला जात आहे.अल्पसंख्य समुदाय हा बहुसंख्य समुदायाच्यापेक्षा दुय्यम आहे,असे जाणवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.तशी सभोवताली परिस्थिती आहे.या पार्श्वभूमीवर रवीश कुमार यांच्या लिखाणाचे महत्व आहे.हा खेड्यातून शहरात आलेला पत्रकार आहे. अशावेळी शहरात वावरताना मनावर दडपण असते. पण संवेदनशीलता हे त्यांचे वैशिष्ट्य घेऊन ते पुढे जातात. बोलण्यासाठी कोणी तयार नाही, असे अनेक मुद्दे रवीश कुमार बोलत असतो. भय वाटू न देता तो बोलतो आणि तसेच लिहितो. त्यांची मांडणी मित्राने धीरगंभीरपणे बोलावे तशी आहे’.
‘आपल्यातील भीती संपली की सत्तास्थाने डळमळू लागतात. माणसाला माणसा विरुद्ध उभे केले जात आहे. पत्रकारिता खोटी होवू लागली आहे,हेच रवीश कुमार या पुस्तकातून मांडत राहतो. बोलणे, लिहिणे हेच पत्रकारांचे काम असून त्यावर बंधने आली आहेत. आवाज बंद करण्याच्या प्रवृत्तीचा निषेध होताना दिसत नाही. कळ लावून देणे ही पत्रकारिता वाहिनींच्या स्टुडिओ त वाढत आहे.टीकेच्या पातळीचा विचार केला जात नाही. सोशल मीडियावर आवेग दिसतो, मुद्दे कमी दिसत आहेत. अशावेळी रवीश कुमार यांची पुस्तकलेखनातील छोटी -छोटी वाक्ये प्रभावी ठरतात.’इश्क में शहर होना ‘मधून प्रेमळ आश्वासक व्यक्ती समोर येते. सर्व भिंती ओलांडून होणारे प्रेम सिनेमातून दिसत नाही. प्रेमासाठी शहरात जागा आहे का, असाही प्रश्न रवीश कुमार विचारतात. ‘प्रेम, सहवास यासाठी जागा नाही. मोकळीक नाही. माध्यमातून प्रेमाच्या गोष्टी पुढे न येता विखार येत आहे,असे रवीश कुमार मांडतात.ही दोन्ही पुस्तके वेगळी असली तरी लेखकाची ती अभिन्न अंग आहेत’,असेही हीना खान यांनी सांगितले. 

सशस्त्र दरोडा टाकणारे आरोपी दोन तासामध्ये जेरबंद

चतुःश्रृंगी पोलिसांची कारवाई

पुणे- तीन दुचाकींवर येवून बालेवाडी ज्युपीटर हॉस्पीटलचे मागे असलेल्या एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपींना चतुःश्रृंगी पोलिसांनी अवघ्या २ तासात गजाआड केले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक २०/०९/२०२४ रोजी सायंकाळी ०५/३० वा चे सुमारास विराज ऑटोमोबाईल्स अॅण्ड वॉशिंग सेंटर, विलास तात्या बालवडकर चौक, ज्युपीटर हॉस्पीटलचे मागे, डी.एस. के. गंधकोश इमारती शेजारी, बालेवाडी, पुणे याठिकाणी एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर आठ ते नऊ जणांनी तीन दुचाकींवर येवून दुकान मालकास तसेच दुकानामध्ये आलेल्या त्यांच्या चार मित्रांना लोखंडी हत्याराने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून धमकावून त्यांचेकडील रोख रक्कम ४९,०००/- रु व २०,०००/- रु चा मोबाईल फोन असा एकूण ६९,०००/- रु चा मुद्देमाल हे जबरदस्तीने घेवून गेलेबाबत सिध्देश्वर दिगंबर ढेरे, वय ३४ वर्षे, धंदा मोटारगॅरेज, रा. फ्लॅट नं. ३०३, क्रिआंश बिल्डींग, पाटीलवस्ती, बालेवाडी, पुणे यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गु. र. क्र. ७५८/२०२४ भा. न्या. सं. कलम ३१० (२) ३११ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१),१३५ अन्वये दाखल करण्यात आला .
या गुन्हयाच्या घटनास्थळी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पो. नि. (गुन्हे) युवराज नांद्रे, विजयानंद पाटील तसेच तपास पथकामधील आधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देवून घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासून तपासाची चक्रे फिरवली. तपास पथकाने गोपनिय बातमीदारामार्फत माहिती काढून नमूद गुन्हा हा औंध येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आल्ल्या सय्यद, मोहन आडागळे व देवा शिरोळे यांनी त्यांच्या साथीदारांसह केला असून ते सध्या पिंपळे गुरव येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलीस पथकासह पिंपळे गुरव येथे जावून सापळा रचून गुन्हयातील आरोपी १) अलीम ऊर्फ आल्ल्या सिंकदर सय्यद, रा. पी एम सी कॉलनी बिल्डीग, रुम नं. ४२, नागरास रोड, वात्सल्य विहार शेजारी, औध, पुणे, २) देव ऊर्फ देवा काकासाहेब शिरोळे, रा. भोई गल्ली, विठठल मंदीराजवळ, कसबा पेठ, पुणे व ३) मोहन अरुण अडागळे, रा. जय गणेश कॉलनी, दत्तनगर, बाबुलाल किराणामाल दुकानाशेजारी, विधातेवस्ती, औध, पुणे यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली . तपासादरम्यान आरोपीतांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर पाच ते सहा ज्युवेनाईल साथीदारांसह केला असल्याची कबूली दिली आहे. गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपींनी सदरचा गुन्हा हा पैशांच्या हव्यासापोटी केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. तरी गुन्हयाचा पूढील तपास सहा. पोलीस निरीक्षक० नरेंद्र पाटील हे करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेशकुमार, पोलीस सह- आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परि-४, पुणे शहर, हिंमत जाधव, सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयानंद पाटील, सपोनि नरेंद्र पाटील, पोउनि प्रणिल चौगुले, पोहवा दुशिंग, पोहवा वाघवले, पोहवा दांगडे, पोहवा दुर्गे, पोहवा मोमीन, पोहवा विशाल शिर्के, पोहवा श्रीधर शिर्के, पोहवा माने, पोशि भांगले, पोशि खरात व पोशि तरंगे यांनी केली आहे.

या,या.. राष्ट्रपती महोदया,PM साहेब आमच्या पुण्यात ७ दिवस राहून दाखवा .. प्रशांत जगतापांनी लिहिले थेट राष्ट्रपतींना पत्र

पुणे- पुण्यात महापालिका आयुक्त पदावर राजेंद्र भोसले आल्यापासून महापालिकेत बदल्यांच्या कारभाराला अन शहरात समस्यांना ऊत आलाय हेच नाही कमी तर शहरात कोयते , बंदुका घेऊन फिरणारी लहान लहान मुले अन गुन्हेगारीचाही पूर आलाय , एकीकडे पावसाच्या पुराने वेढलेले , रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण झालेले, आणि वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या या पुण्यात आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान देखील येत आहेत .पुणेकरांनो सांगा बरे आता यावर तुम्ही काय म्हणाल? असा प्रश्न कोणी चॅनेलवाला विचारेल ही… पण आता त्या अगोदर पोलीस आयुक्तांनीच म्हणे महापालिका आयुक्तांना पत्र देऊन राष्ट्रपती येण्या अगोदर सारे रस्ते खड्डे बुजवून व्यवस्थित करा अशी विनवणी केली आहे.अगदी हाच मुद्दा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उचलला नाही तर नवलच नाही काय ? अगदी चंद्रकांत दादा मंत्री असूनही त्यांच्या मतदार संघातील रस्त्यांचे खड्डे त्यांना आमदार निधीतून बुजवायची वेळ आली कि हो .. तिथे तर स्वतः दादांच्या समवेत भाजपचे केंद्रातले मंत्री आणि खासदार आहेत तिथे हि अवस्था … मग काय .. विरोधकांनाही बहर येणारच … प्रशांत जगताप यांनी थेट राष्ट्रपतींना पत्रच लिहिलेय .. आणि या महोदया … आमच्या पुणे शहरात मुक्काम करा व पुणेकरांच्या यातना जाणून घ्या.. अशा स्वरूपाचे विशेष निमंत्रण दिले आहे.

अर्थात हडपसर साठी आमदारकीची लढाई सुरु केलेय जगताप यांच्या पत्र लिहिण्यामागे राजकारण असेलही ..पण असे आठवडाभर जर खरेच PM, प्रेसिडेंट कोणी पुण्यात येऊन राहिले तर मात्र पुणेकरांची खैर नाही …

दरम्यान जगताप यांनी असे सांगितले कि,’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात शहरातील खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागला. यानंतर राष्ट्रपती भवनाने पुणे पोलिसांना कर्मवीर पत्र लिहून खड्ड्यांबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.याच पार्श्वभूमीवर आपण राष्ट्रपतींना एक आठवड्यासाठी पुणे मुक्कामाचे निमंत्रण दिले आहे.दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात आपल्याला शहरातील खड्ड्यांचा प्रत्यय आला, याची दखल घेत त्यांनी प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या याबद्दल त्यांचे मी तमाम पुणेकरांच्या वतीने आभार व्यक्त करणार आहे .

असो नेमके प्रशांत जगताप यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटलेय काय ? ते आम्ही येथे जसेच्या तसे देत आहोत .. वाचा …

प्रती

श्रीमती द्रौपदी मुर्मूजी महामहिम राष्ट्रपती,

भारत सरकार राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली

विषय : पुण्यात एक आठवडा मुक्कामी येण्यासाठी निमंत्रण…..

महोदया, दोन दिवसांच्या पुणे दौन्यात आपल्याला शहरातील खड्ड्यांचा प्रत्यय आला, याची दखल घेत आपण प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या याबद्दल आपले तमाम पुणेकरांच्या वतीने मनापासून आभार. महामहिम राष्ट्रपती जी, पुणेकर नागरिक आपल्या दैनंदिन जीवनात असंख्य यातना भोगत आहेत. रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी, टेकड्यांची फोडाफोडी याने पुण्याचा श्वास गुदमरतोय, अपघातांच्या भीतीने प्रत्येक पुणेकर जीव मुठीत घेऊन फिरतोय, मुळा मुठा नदीला प्रदूषणाचा विळखा, एका पावसात तुंबणारे रस्ते, दिवसाढवळ्या पुण्यातील रस्त्यांवर होणारे खून – दरोडे अशा अवस्थेत पुणेकर जगत आहेत. गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेले सत्ताधारी जनतेच्या वेदनांकडे लक्ष देण्यास तयार नाही. म्हणूनच, पुणेकरांच्या या वेदना अनुभवण्यासाठी आपण पुण्यात एक आठवडा मुक्कामी यावे ही नम्र विनंती ! कळावे !

आपला नम्र

(प्रशांत सुदामराव जगताप)

उठा, उठा..साहेब, उठा मॅडमजी.. PM, आणि राष्ट्रपती यायची वेळ झाली …शहरात रोगराई अन आरोग्यप्रमुखच गुंगीत …

पुणे- महापालिकेतील आरोग्य खात्यात नियमबाह्य बदल्या आणि कमाईच्या जागा मिळविण्यासाठीची रस्सीखेच झाल्यावर आता शहरात डेंग्यू आणि चिकन गुनिया ने थैमान घातले असताना महापालिकेचे आरोग्य प्रमुख अजूनही पुण्यात बदली करवून घेतल्याच्या आनंदी गुंगीतच आहेत काय ? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे तर एक्सपायरी डेट च्या औषधांच्या अद्लाबद्लीत आणि भांडारात अडकून पडलेले सहायक प्रमुख अजूनही UK तच मौजमजा करताहेत काय ?तसेच त्यांच्या सोनेरी टोळीतील आणखी प्रसिद्धीचे आणि लोभी कार्यकर्त्यांचे सोनेरी वलय प्राप्त झालेले अधिकारी आता कोणत्या षड्यंत्रात बिझी आहेत ? असे सवाल करत आरोग्य खात्यावर आता भडीमार होऊ पाहतो आहे.याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी म्हणून यशस्वी कारकीर्द सांभाळलेल्या माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी शहरातील अनारोग्याच्या स्थितीवर महापालिका आयुक्तांचेच डोळे उघडावेत म्हणून त्यांना एक पत्रही पाठविले आहे .

गणेश बिडकर यांनी काय म्हटले आहे पत्रात ते वाचा जसेच्या तसे ….

सध्यःस्थितीमध्ये संपुर्ण पुणे शहरामध्ये मोठया प्रमाणावर डेंग्यु, चिकनगुणिया व इतर साथीच्या रोगांच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वच भागांमधील नागरिक या रोगांचे बळी झाले असल्याने पुणे शहरातील सर्व छोटे-मोठ्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना औषधोपचाराकरिता बेडसाठी प्रतिक्षा करावी लागत असून वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेक नागरिकांची तब्येत खालावत असून यामध्ये काही नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे.
तसेच पुणे मनपामार्फत कीटक फवारणी देखील फक्त पुणे मनपाच्या कायम सेवकांमार्फत सुरु असून सदर सेवक संख्या ही अपुरी असल्याने पुणे शहराच्या संपुर्ण परिसरामध्ये कीटक फवारणी पुर्णपणे होत नाही. त्याचअनुषंगाने पुणे मनपामार्फत गेले अनेक वर्षांपासून कीटक फवारणी करिता निविदा राबवून कंत्राटी कर्मचा-यांमार्फत पुणे शहरामध्ये संपुर्ण परिसरामध्ये कीटक फवारणी करण्यात येत होती, परंतु गेले ३ ते ४ वर्षे सदर निविदा प्रक्रिया न राबविल्यामुळे पुणे शहराच्या संपुर्ण भागात कीटक फवारणी होत नाही व त्यामुळेच सर्वत्र साथीचे रोग झपाटयाने पसरत आहेत.
याबाबत आज दि. २०/०९/२०२४ रोजी मी महापालिका आयुक्त, पुणे मनपा यांची समक्ष भेट घेतली व महापालिका आयुक्त यांना सध्यःस्थितीमध्ये संपुर्ण पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर डेंग्यु, चिकनगुणिया व इतर साथिच्या रोगांचा प्रमाण वाढत असल्याने सदर रोगांबाबत पुणे मनपामार्फत त्वरीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून साथीच्या रोगांना नियंत्रणात आणावे व याबाबत संपुर्ण पुणे शहरामध्ये जनजागृती करण्यात यावी. पुण्यातील नागरिकांच्या आरोग्याची दक्षता आपण आता तरी घ्याल अशी अपेक्षा आहे.

बीड जिल्ह्याला बाल विवाह निर्मुलनासाठी प्रतिष्ठित ‘स्कॉच’ चा पुरस्कार

0

तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी स्वीकारला पुरस्कार

बीड, दिनांक २१ : बीड जिल्ह्याने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा ‘स्कॉच २०२४ राष्ट्रीय पुरस्कार’ बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना आज प्रदान करण्यात आला.

विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार संस्था प्रदान करीत असते. श्रीमती दीपा मुधोळ मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून या काळात होणारे आणि होत असलेले बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. याचीच पोच पावती म्हणून स्कॉच या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने या कामाची दखल घेत बीड जिल्ह्याची बाल विवाह निर्मुलनासाठी निवड केली होती.

आज राजधानी नवी दिल्ली येथे ९९ व्या स्कॉच परिषदेनिमित्त इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या सिल्वर ओक सभागृहामध्ये एका शानदार समारंभात त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बालविवाह निर्मूलनासाठी बीड जिल्ह्याने राबविल्या अभिनव उपाययोजना : दीपा मुधोळ मुंडे

बीड जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमुख कारण म्हणजे उसतोड कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच हुंडा प्रथा, बाल लिंग गुणोत्तर, गरिबी, जुन्या चाली रूढी या समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे बाल विवाह रोखणे तसेच जन जागृती करणे या बाबत बीड जिल्ह्यात तत्कालीन जिल्ह्याधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगीतले.

जिल्ह्यात वर्ष २०२१ पासून विवाह निर्मूलन युनिसेफ, एस बी सी ३ चाईल्ड लाईन बोर्ड, बाल कल्याण समिती बीड, सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्था आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ ची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाय योजना सुरु केल्या.

बाल विवाह निर्मूलन या विषयावर जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत दर महा जिल्हा कृती दलाची बैठक आखली. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पोलीस ठाणी व ग्रामपंचायत येथे दर्शनीय भागात चाईल्ड हेल्प लाईन १०९८ चा लोगो रंगविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या नव्याने स्थापना करण्यात आल्या. सर्व तालुक्यात तालुका बाल संरक्षण समित्या अद्यावत करण्यात आल्या. शिक्षक, केंद्र प्रमुख, अंगणवाडी सेविका आशा सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, व ग्रामसेवक असे एकूण ४ हजार ७५१ कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेतल्या. किशोरवयीन मुलामुलींची बाल विवाह संदर्भात जनजागृतीचे कार्यक्रम आखले.
५१४ केंद्र प्रमुख व बाल रक्षक शिक्षक अंगणवाडी पर्यवेक्षिका व ग्राम सेवक, गट प्रवर्तक पोलीस कर्मचारी शिक्षण विभागाचे कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली.

जिल्हा महिला व बाल विकास, युनिसेफ, एसबीसी ३ व युवा ग्राम विकास मंडळ केज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १२५ माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परिषद शाळेतील ७ हजार ३१३ मुली व ६ हजार ५६२ मुले असे एकूण १३ हजार ८७५ यांचे जन जागृतीचे कार्यक्रम घेतले. त्यांच्या पालकांचे ‘पालक संवेदना’ कार्यक्रम राबवून बाल विवाहाबाबत जन जागृती केली.

सक्षम युवा शक्ती कार्यक्रमातर्गत बीड जिल्ह्यातील २१ महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी रायमोहा (शिरूर कासार) अमळनेर (पाटोदा) व कडा (आष्टी) या ठिकाणी बाल विवाह जन जागृती अनुषंगाने पथनाट्य खेळ व गाण्याचे माध्यमातून ५ हजार पेक्षा अधिक लोकापर्यंत संदेश पोहचविण्यात आला. १५ ऑगस्ट २०२३ रोजी ३ हजार ८०० मुलांची बीड जिल्ह्यात जनजागृती रॅली काढण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दर सोमवारी बालविवाह निर्मुलन विषयी प्रतिज्ञा घेतली जाते. १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्राम सभेत बाल विवाह मुक्त ग्रामपंचायत बाबत ठराव घेण्यात येत आहेत.

‘बाल विवाह मुक्त बीड’ मोहिमेमुळे जिल्ह्यात झालेले परिणाम

चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या क्रमांकाचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जन जागरण झाल्याने एप्रिल ते सप्टेंबर २०२४ अखेर १८२ बाल विवाह थांबवून ३ प्रकरणात बाल विवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

सन २०२२-२३ मध्ये १३२ , २०२३ -२४ मध्ये २५५ बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे, अशी प्रतिक्रिया दीपा मुदळ मुंडे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

बाल विवाह करणे, लावणे, त्यास प्रोत्साहन देणे, बाल विवाहाची बोलणी करणे, मुलगी पाहणे, यादी करणे, साखरपुडा करणे, कुंकू टिळा करणे, हळदी कार्यक्रम करणे हा कायद्याने गुन्हाच आहे.

बाल विवाह लावल्यास गुन्हा कोणावर नोंदविला जातो
नवरा मुलगा, मुलाचे मुलीचे आई-वडील, मुलाचे मुलीचे मामा-मामी, आज्जी आजोबा, विवाह सोहळ्यास उपस्थिती इतर सर्व नातेवाईक, वन्हाडी मंडळी, मंगल कार्यालय वाले, मंडपवाले, आचारी, बाजेवले, फोटोग्राफर, भटजी, पाणी वाले, डीजेवाले, घोडेवाला, व लग्न लावण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे सर्व व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, या सर्वांबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यामुळेच बालविवाह थांबवण्यास यश आले. ज्यांचे बालविवाह थांबवले त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि भविष्यातील त्यांना भेडसावणाऱ्या समस्या थांबविण्यात प्रशासनाला अंशतः का होईना यश आले. आजच्या स्कॉच चा मिळालेला पुरस्कार केलेल्या कामाची पोचपावती आहे, याचा विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया दीपा मुधोळ मुंडे यांनी व्यक्त केली.

गड किल्ल्यांच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनाबाबत ; नौरोसजी वाडिया महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम संपन्न

पुणे, दि.२१ :  छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनाच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम जिल्हा प्रशासन, तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नौरोसजी वाडिया महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला.

यावेळी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. व्ही. चाबुकस्वार, उप जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दानी, नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या डॉ. मंजुषा मुसमदे,  समन्वयक प्रा. प्रमिला दस्तुरे, विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या जनजागृती मोहीमेबाबत माहिती देऊन डॉ. वाहणे म्हणाले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित किल्ल्यांबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रम, जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. वाहणे यांनी केले.

यावेळी लोहगड किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ नामांकन यादीत समावेशनाबाबत प्रोत्साहनात्मक स्वाक्षरी मोहीमही आयोजित करण्यात आली.

कामाच्या ताणामुळे एका सनदी लेखापाल मुलीचा पुण्यात मृत्यू : माध्यमांनी आवाज उठवल्यावर एनएचआरसीने स्वतःहून घेतली दखल

नवी दिल्‍ली, 21 सप्‍टेंबर 2024

महाराष्ट्रात पुणे येथे 20 जुलै 2024 रोजी कामाच्या अतिभारामुळे केरळमधील एका 26 वर्षीय सनदी लेखापाल मुलीचा मृत्यू झाल्याच्या माध्यमांमधील वृत्ताची दखल  राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) ने स्वत:हून घेतली आहे. चार महिन्यांपूर्वी ती अर्न्स्ट अँड यंग कंपनीत रुजू झाली होती. तिच्या आईने नियोक्त्याला पत्र लिहून दावा केला आहे की उशिरापर्यंत काम केल्यामुळे तिच्या मुलीच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे, मात्र कंपनीने हा आरोप फेटाळला आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय या प्रकरणाचा तपास करत आहे.

आयोगाने असे निरीक्षण नोंदवले आहे की माध्यमातील वृत्त जर खरे असेल तर युवा वर्गाला कामाच्या ठिकाणी भेडसावणारी आव्हाने, मानसिक तणाव, चिंता आणि झोप न लागणे, अव्यवहार्य लक्ष्यांचा पाठलाग करताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम यामुळे गंभीर समस्या उद्भवत आहेत. आणि कालांतराने त्यांच्या मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होते. आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित, संरक्षित आणि सकारात्मक वातावरण प्रदान करणे हे प्रत्येक नियोक्त्याचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाने आणि निष्पक्षतेने वागवले जाईल याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे.

व्यवसायांनी मानवी हक्कांच्या मुद्द्यांसाठी जबाबदारी घेतली पाहिजे आणि जागतिक मानवी हक्क मानकांशी संरेखन सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे कार्य आणि रोजगार धोरणे आणि नियम नियमितपणे अद्ययावत आणि दुरुस्त केले पाहिजेत, यावर आयोगाने भर दिला.

त्यानुसार त्यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाला नोटीस बजावून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. या तरुण कर्मचाऱ्याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणातील तपासाचा परिणाम देखील आयोगाला जाणून घ्यायचा आहे. याशिवाय, आयोगाला अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत आणि उचलली जाणार आहेत हे देखील जाणून घ्यायचे आहे. चार आठवड्यांमध्ये हा अहवाल अपेक्षित आहे.

18 सप्टेंबर 2024 रोजी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मृत मुलीच्या आईने दावा केला आहे की तिच्या मुलीचा मृत्यू मोठ्या कार्यसंस्कृतीचे प्रतिबिंब आहे, जे कठोर परिश्रमाचा आदर करते परंतु आरोग्याची किंमत मोजावी लागते. मूल्ये आणि मानवी हक्कांबाबत बोलणारी कंपनी आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी देखील उपस्थित राहू शकत नाही याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.

आव्वाज कुणाचा..? पुरुषोत्तक करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीला शनिवारी (दि. 21) सुरुवात झाली. रविवारी (दि.22) दोन सत्रात संघांचे सादरीकरण होणार असून त्यानंतर पुरुषोत्तम करंडकावर कोण नाव कोरतो ते स्पष्ट होणार आहे. भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे.
शनिवारी सखा (आय. एम. सी. सी.), तेंडुलकर्स्‌ (म. ए. सो.चे सिनिअर कॉलेज), 11,111 (फर्ग्युसन महाविद्याल) या एकांकिकांचे सादरीकरण झाले. तर रविवारी (दि. 22) सकाळच्या सत्रात पार्टनर (स. प. महाविद्यालय, पुणे), तृष्णाचक्र (डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), पाटी (विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती) या एकांकिकांचे तर सायंकाळच्या सत्रात देखावा (न्यू आर्टस्‌‍ कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर), बस नं. 1532 (गरवारे वाणिज्य महाविद्यालय), बिजागरी (बी. व्ही. जी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी) या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून पारितोषिक वितरण ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.

प्रभाताईंचे पहिले प्रेम संगीत : पंडित हरिप्रसाद चौरसिया ‌

पुणे : प्रभाजी महान आणि प्रतिभावान कलाकार होत्या. त्यांचा व माझा अनेक वर्षांचा स्नेह होता. आमचे नाते मैत्रीपूर्ण होते. ज्यात हसी, मजाक, प्यार, गुस्सा यांचा मिलाफ होता. त्या सतत गायन, लेखन, मनन, चिंतन, अभ्यास यात व्यग्र असत. संगीत हेच त्यांचे पहिले प्रेम होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी काढले. ज्यांच्याकडून विद्या मिळवावी, ज्यांना गुरूस्थानी मानावे असे कलाकार आता फार कमी राहिलेले आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
डॉ. प्रभा अत्रे शिष्य परिवारातर्फे स्वरयोगिनी, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या साहित्य, कला आणि संगीत या क्षेत्रांमधील कार्यावर आधारित ‌‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष‌’ या महोत्सवातील पहिल्या दिवशी (दि. 21) प्रभा अत्रे लिखित ‌‘स्वरमयी‌’ पुस्तकाच्या पाचव्या आणि ‌‘सुस्वराली‌’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे लोकार्पण झाले. त्या वेळी पंडित चौरसिया बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विजय कुवळेकर, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. अशोक वळसंगकर, डॉ. मदन फडणीस, ॲड. किरण कोठाडिया, फाऊंडेशनचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे, डॉ. मनिषा रवी प्रकाश व्यासपीठावर होते. ज्येष्ठ कवी, साहित्यिक, समीक्षक डॉ. अशोक वाजपेयी दृकश्राव्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. प्रभा अत्रे यांनी भारतीय संगीतविषयक केलेल्या व्याख्यांनाचा समावेश असलेल्या ‌‘आलोक‌’ या 19 भागांच्या दृकश्राव्य मालिकेच्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण या प्रसंगी करण्यात आले.
डॉ. अशोक वाजपेयी म्हणाले, प्रभा अत्रे या इतर संगीतकारांपेक्षा वेगळ्या होत्या. त्यांच्यामध्ये अनेक दुर्लभ गुण होते. त्या उत्तम गायिका, संगीतकार, लेखिका, अभ्यासक होत्या. त्यांचे संगीताविषयीचे लिखाण अतिशय विचारपूर्वक केलेले असे. व्यावहारिक संगीतकाराच्या भूमिकेतून आलेल्या अनुभवातून त्यांचे विचार कागदावर उतरत असल्याने त्यात प्रामाणिकपणा व विश्वसनीयता होती.
प्रभाताई अत्रे यांच्या आठवणींना उजाळा देताना विजय कुवळेकर म्हणाले, डॉ. प्रभा अत्रे या अत्यंत साध्या आणि तेजस्वी कलाकार होत्या. त्यांच्या आंतरिक तेजाची प्रभा त्यांच्या व्यक्तीमत्त्वातून जाणवत असे. कलाकार म्हणून असलेल्या मोठेपणाचे ओझे त्यांनी कधीच वागविले नाही. प्रतिभावंत कलाकार असूनही माणूस म्हणून त्या खूप महान होत्या. कसोटीच्या प्रसंगातही त्यांनी स्वत्व व सत्व सोडले नाही. संगीत क्षेत्रातील शुद्धपण जपले जावे याकरीता त्या स्पष्ट भाष्य करीत. कृतज्ञता हा त्यांच्या स्वभावाचा लोभसवाणा भाग होता. त्या संवेदनशीलही होत्या. परंपरेच्या चौकटीच्या भिंती न बांधता प्रभाताईंनी गायन क्षेत्रात काळानुरूप बदल स्वीकारात नवनवीन प्रयोगही केले. त्या अपूर्णत्वाची जाण ठेवून पूर्णत्वाचा ध्यास घेतलेल्या कलाकार होत्या.
डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सविच डॉ. भारती एम. डी. यांनी ‌‘स्वरमयी‌’ आणि ‌‘सुस्वरली‌’ पुस्तकांच्या प्रकाशनाविषयी तसेच फाऊंडेशनच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.
मान्यवरांचे सत्कार अशोक वळसंगकर आणि डॉ. मनिषा रवी प्रकाश यांनी केले. सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले तर आभार प्रसाद भडसावळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. प्रभा अत्रे यांच्या पुस्तकांमधील निवडक सांगीतिक लेखांचे अभिवाचन आणि त्यांनी रचलेल्या वेगळ्या घाटातील बंदिशींवर आधारित सांगीतिक सादरीकरण झाले. यात डॉ. केशवचैतन्य कुंटे, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी तसेच डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य डॉ. चेतना पाठक व डॉ. अतिंद्र सरवडिकर यांचा सहभाग होता. कलाकारांना माधव मोडक (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत रघुवीर कुलकर्णी, अशोक वळसंगकर यांनी केले.

थकबाकीमुक्तीसाठी ‘अभय’ योजनेत आतापर्यंत ५५३८ वीजग्राहकांचा सहभाग

थकबाकीमुक्तीच्या संधीला उरले आता ७० दिवस

पुणे, दि. २१ सप्टेंबर २०२४: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीची रक्कम एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. संपूर्ण व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ होणाऱ्या या योजनेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ५ हजार ५३८ ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यातील तब्बल ५ हजार ३१२ वीजग्राहकांनी आणखी सूट घेऊन थकबाकी एकरकमी भरण्यास पसंती दिली आहे.

वीजबिलांच्या थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना ९१ दिवसांसाठी म्हणजे दि. १ सप्टेंबर ते दि. ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. आता या योजनेच्या कालावधीला ७० दिवस शिल्लक आहेत. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे. किंवा मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ६ लाख २९ हजार ८३ अकृषक ग्राहकांकडे सद्यस्थितीत ९०१ कोटी ९७ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील मूळ थकबाकीपोटी ७६२ कोटी १९ लाख रुपयांचा भरणा केल्यास संपूर्ण व्याज व विलंब आकाराचे १०० टक्के म्हणजे १३९ कोटी ७८ लाख रुपये माफ होणार आहेत. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या या सर्व ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त् व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत ५ हजार ५३८ वीजग्राहकांनी थकबाकीमुक्तीसाठी या योजनेत सहभाग घेतला आहे. या ग्राहकांकडे एकूण ११ कोटी ५५ लाख रुपयांची एकूण थकबाकी असून त्यातील मूळ थकबाकीच्या १० कोटी ६ लाखांचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची संपूर्ण १ कोटी ५० लाख रुपये माफ होणार आहे. विशेष म्हणजे यातील ५ हजार ३१२ ग्राहकांनी मूळ थकबाकीचे ९ कोटींची रक्कम एकरकमी भरण्यास पसंती दिली आहे. त्यापैकी ४ हजार ६२ ग्राहकांनी ४ कोटी ५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. पुणे जिल्ह्यात २७८८, सातारा- २५१, सोलापूर- ८७९, कोल्हापूर- ३२१ आणि सांगली जिल्ह्यातील १२९९ थकबाकीदारांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. 

वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदार यांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल असा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे जागा वापरात असो किंवा नसो, वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त होण्याची संधी महावितरणकडून देण्यात आली आहे. तसेच वीजग्राहकांना मागणीनुसार नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. महावितरणच्या फ्रेंचायझी क्षेत्रातील ग्राहक देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात.

या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे योजनेत सहभागी होण्याची व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करावी.

मुंबई, दि. २१ सप्टेंबर
भाजपा महायुतीचे सरकार राज्यात भ्रष्ट मार्गाने आले आणि मागील दोन अडीच वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेतेच दादागिरी करत आहेत, खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत. धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे.राज्यातील परिस्थिती गंभीर असताना राज्य सरकार कारवाई करताना दिसत नाही.राज्यात गृहमंत्री आहेत का,असा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती झाली आहे, असे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी सांगितले आहे.

काँग्रेस शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन महामहिम राज्यपाल यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, चरणजित सप्रा आदी उपस्थित होते.

प्रसार माध्यमांशी बोलताना नसीन खान म्हणाले की, आज आम्ही राज्यपाल महोदयांना भेटून निवेदन दिले आहे. राज्यातील कायदा व युव्यवस्था बिघडलेली आहे. गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत. २५-३० FIR झाले तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. सत्ताधारी पक्षाचे काही आमदार, खासदारच पोलीसांना उघड उघड धमकी देत आहेत. अशा परिस्थितीत पोलीस तरी कशी कारवाई करणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांनाही भाजपाचे खासदार अनिल बोंडे व शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी धमक्या दिल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवला, आंदोलने केली, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली परंतु हे महाभ्रष्ट भाजपा सरकार कारवाई करत नाही. यावेळी महामहिम राज्यपाल यांनी सरकारला योग्य ते निर्देश देऊ, असे आश्वासन दिले आहे असे नसीम खान म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सीमा महेश आहुजा यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.

मुंबई, दि. २१ सप्टेंबर
काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उल्हानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सीमा महेश आहुजा यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

“भारतीय जनता पक्ष कोणाचाच नाही, सर्वात खोटे बोलणारा पक्ष भाजपा आहे. ‘वन नेशन, वन टॅक्स’, इन्स्पेक्टर राज संपवणार, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार अशी भरमसाठ आश्वासने नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली दिली व जनतेने मोदींवर विश्वास टाकून त्यांना सत्ता दिली, पण सत्तेवर येताच मोदींनी या आश्वासनाकडे दुर्लक्ष केले. पहिल्याच दिवशी संसदेला नमन केले व ती संसदच बदलून टाकली, नवे संसद भवन बनवले पण त्यालाही गळती लागली. देशाचा पंतप्रधान खोटे बोलतो हे आधी कधी पाहिले नाही. भाषणात नरेंद्र मोदी महिलांची सुरक्षा करण्याचे सांगतात पण भाजपाच्या राज्यातच महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. जनतेचा आता भाजपावरचा विश्वास उडाला आहे. काँग्रेस पक्षच सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे”, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
या कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, आमदार राजेश राठोड, उल्हासनगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे, प्रवक्ते मदन जाधव, शंकर आहुजा आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित: 27 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याच्या दौऱ्यावर

यंदा निवडणुकीत २ शिवसेना २ राष्ट्रवादी त्यामुळे रंजकता वाढणार- वंचीत , एम आय एम सह आता तिसरी आघाडी ही येणार –

महाराष्ट्रातील 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. गत काही वर्षांत राज्याचे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 2 महत्त्वाच्या पक्षांत फूट अनुभवली आहे. सध्या या दोन्ही पक्षांचे 2 स्वतंत्र गट निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यातच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचेही प्रयत्न सुरू असल्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंजकदार होणार आहे.

27 तारखेपासून सलग 2 दिवस बैठक

मुंबई-केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. हे पथक राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेणार आहे. या बैठकीमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असून, त्याला या बैठकीनंतर हिरवा कंदील मिळेल असा दावा केला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लवकर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग पुढील महिन्यात केव्हाही निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागलेत. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखांची वाट पाहणाऱ्या सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने आपले कान टवकारलेत.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 27 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन सलग दोन दिवस राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. या बैठकीत राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेऊन हे पथक संबंधितांना योग्य ते दिशानिर्देश व सूचना करेल असा अंदाज आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः राज्यातील सणवार व इतर महत्त्वाचे दिवस पाहून या बैठकीत निवडणुकीची तारीख ठरवली जाईल असे सांगितले जात आहे.

राजा असा असावा, जो टीका सहन करू शकेल:यावर आत्मचिंतन करा, हीच लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा- नितीन गडकरी (व्हिडीओ)

देशात विचार शुन्यता सर्वात मोठी समस्या
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
एमआयटीत प्रा.डॉ. पठाण यांच्या सांप्रदायिक सद्भावनेचा आदर्श ग्रंथाचे प्रकाशन

पुणे, २१ सप्टेंबर ः केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, राजा (शासक) असा असावा की त्याच्या विरोधात कुणीही बोलले तरी तो सहन करतो. टीकेवर आत्मपरीक्षण करा. लोकशाहीची ही सर्वात मोठी कसोटी आहे.
गडकरी म्हणाले की, साहित्यिक, विचारवंत आणि कवींनी आपले विचार खुलेपणाने आणि ठामपणे मांडले पाहिजेत.
देशात विचारभिन्नता नाही, तर विचारशून्यता ही सर्वात मोठी समस्या आहे. विचारवंत व साहित्यिकांनी राजाच्या विरूद्ध परखड विचार मांडावे. आणि ते सहन करण्याची राजाची तयारी असावी.” असे मत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.
कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर हॉल येथे माईर्स एमआयटी विश्वशांती केंद्र (आळंदी) व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.डॉ. एस.एन. पठाण अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ (सांप्रदायिक सद्भावनेचा आदर्श) च्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मराठी साहित्य संम्मेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हेाते.
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु. कराड आणि डॉ. सर्फराज पठाण उपस्थित होते.
या प्रसंगी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांच्या विशेष सत्कार व सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
नितीन गडकरी म्हणाले,” परखड विचारांवर राजाने चिंतन करणे हीच लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा आहे. मतभिन्नता ही लोकशाहीला मान्य नाही. त्यामुळेच दुसर्‍यांचे मत आपल्या विरोधात असले, तरी त्याचा सन्मान करणे हे लोकशाही मानणार्‍या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”
राज्यघटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, जात व धर्म यावर आधारित विषमता अयोग्य आहे. राष्ट्राच्या पुननिर्माणाचे स्वप्न साकार करायचे तर या गोष्टी चालणार नाहीत. कोणी कोणाची कशी भक्ती करावी ही वैयक्तिक गोष्टी आहेत.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ” राजकीय नेत्यांनी सर्वधर्मसमभाव संपवला. गडकरींचे राजकीय जीवन निष्कलंक असुन तयांची भुमिका कायम लोकशाहीवादीच राहिली. देशाच्या १४० कोटींना नवा रस्ता दाखविणारे ते बहुआयामी नेतृत्व आहे. वर्तमान काळात संवादाच्या पुलाची गरज असून हिंदू मुस्लिम ऐक्य जपणे गरजेचे आहे.”
डॉ. पठाण म्हणाले,” गावाने मला सांप्रदायिक सद्भभावना शिकविली. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता, परंतू घराच्या गरिबीमुळे शिक्षण होईल का नाही हे कळत नव्हते. परंतू सातार्‍याला कमवा शिकवा योजनेतून संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. नंतर राज्य शिक्षण संचालक आणि नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू या पदापर्यंत पोहचलो.”
याप्रसंगी सर्जराव निमसे यांनी विचार मांडले. डॉ. सर्फराज पठाण यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. शालिनी टोंपे यांनी सूत्रसंचालन केले.