चतुःश्रृंगी पोलिसांची कारवाई
पुणे- तीन दुचाकींवर येवून बालेवाडी ज्युपीटर हॉस्पीटलचे मागे असलेल्या एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपींना चतुःश्रृंगी पोलिसांनी अवघ्या २ तासात गजाआड केले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक २०/०९/२०२४ रोजी सायंकाळी ०५/३० वा चे सुमारास विराज ऑटोमोबाईल्स अॅण्ड वॉशिंग सेंटर, विलास तात्या बालवडकर चौक, ज्युपीटर हॉस्पीटलचे मागे, डी.एस. के. गंधकोश इमारती शेजारी, बालेवाडी, पुणे याठिकाणी एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर आठ ते नऊ जणांनी तीन दुचाकींवर येवून दुकान मालकास तसेच दुकानामध्ये आलेल्या त्यांच्या चार मित्रांना लोखंडी हत्याराने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून धमकावून त्यांचेकडील रोख रक्कम ४९,०००/- रु व २०,०००/- रु चा मोबाईल फोन असा एकूण ६९,०००/- रु चा मुद्देमाल हे जबरदस्तीने घेवून गेलेबाबत सिध्देश्वर दिगंबर ढेरे, वय ३४ वर्षे, धंदा मोटारगॅरेज, रा. फ्लॅट नं. ३०३, क्रिआंश बिल्डींग, पाटीलवस्ती, बालेवाडी, पुणे यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गु. र. क्र. ७५८/२०२४ भा. न्या. सं. कलम ३१० (२) ३११ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१),१३५ अन्वये दाखल करण्यात आला .
या गुन्हयाच्या घटनास्थळी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पो. नि. (गुन्हे) युवराज नांद्रे, विजयानंद पाटील तसेच तपास पथकामधील आधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देवून घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासून तपासाची चक्रे फिरवली. तपास पथकाने गोपनिय बातमीदारामार्फत माहिती काढून नमूद गुन्हा हा औंध येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आल्ल्या सय्यद, मोहन आडागळे व देवा शिरोळे यांनी त्यांच्या साथीदारांसह केला असून ते सध्या पिंपळे गुरव येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलीस पथकासह पिंपळे गुरव येथे जावून सापळा रचून गुन्हयातील आरोपी १) अलीम ऊर्फ आल्ल्या सिंकदर सय्यद, रा. पी एम सी कॉलनी बिल्डीग, रुम नं. ४२, नागरास रोड, वात्सल्य विहार शेजारी, औध, पुणे, २) देव ऊर्फ देवा काकासाहेब शिरोळे, रा. भोई गल्ली, विठठल मंदीराजवळ, कसबा पेठ, पुणे व ३) मोहन अरुण अडागळे, रा. जय गणेश कॉलनी, दत्तनगर, बाबुलाल किराणामाल दुकानाशेजारी, विधातेवस्ती, औध, पुणे यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली . तपासादरम्यान आरोपीतांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर पाच ते सहा ज्युवेनाईल साथीदारांसह केला असल्याची कबूली दिली आहे. गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपींनी सदरचा गुन्हा हा पैशांच्या हव्यासापोटी केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. तरी गुन्हयाचा पूढील तपास सहा. पोलीस निरीक्षक० नरेंद्र पाटील हे करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेशकुमार, पोलीस सह- आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परि-४, पुणे शहर, हिंमत जाधव, सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयानंद पाटील, सपोनि नरेंद्र पाटील, पोउनि प्रणिल चौगुले, पोहवा दुशिंग, पोहवा वाघवले, पोहवा दांगडे, पोहवा दुर्गे, पोहवा मोमीन, पोहवा विशाल शिर्के, पोहवा श्रीधर शिर्के, पोहवा माने, पोशि भांगले, पोशि खरात व पोशि तरंगे यांनी केली आहे.