पुणे- महापालिकेतील आरोग्य खात्यात नियमबाह्य बदल्या आणि कमाईच्या जागा मिळविण्यासाठीची रस्सीखेच झाल्यावर आता शहरात डेंग्यू आणि चिकन गुनिया ने थैमान घातले असताना महापालिकेचे आरोग्य प्रमुख अजूनही पुण्यात बदली करवून घेतल्याच्या आनंदी गुंगीतच आहेत काय ? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे तर एक्सपायरी डेट च्या औषधांच्या अद्लाबद्लीत आणि भांडारात अडकून पडलेले सहायक प्रमुख अजूनही UK तच मौजमजा करताहेत काय ?तसेच त्यांच्या सोनेरी टोळीतील आणखी प्रसिद्धीचे आणि लोभी कार्यकर्त्यांचे सोनेरी वलय प्राप्त झालेले अधिकारी आता कोणत्या षड्यंत्रात बिझी आहेत ? असे सवाल करत आरोग्य खात्यावर आता भडीमार होऊ पाहतो आहे.याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी म्हणून यशस्वी कारकीर्द सांभाळलेल्या माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी शहरातील अनारोग्याच्या स्थितीवर महापालिका आयुक्तांचेच डोळे उघडावेत म्हणून त्यांना एक पत्रही पाठविले आहे .
गणेश बिडकर यांनी काय म्हटले आहे पत्रात ते वाचा जसेच्या तसे ….
सध्यःस्थितीमध्ये संपुर्ण पुणे शहरामध्ये मोठया प्रमाणावर डेंग्यु, चिकनगुणिया व इतर साथीच्या रोगांच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वच भागांमधील नागरिक या रोगांचे बळी झाले असल्याने पुणे शहरातील सर्व छोटे-मोठ्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना औषधोपचाराकरिता बेडसाठी प्रतिक्षा करावी लागत असून वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेक नागरिकांची तब्येत खालावत असून यामध्ये काही नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे.
तसेच पुणे मनपामार्फत कीटक फवारणी देखील फक्त पुणे मनपाच्या कायम सेवकांमार्फत सुरु असून सदर सेवक संख्या ही अपुरी असल्याने पुणे शहराच्या संपुर्ण परिसरामध्ये कीटक फवारणी पुर्णपणे होत नाही. त्याचअनुषंगाने पुणे मनपामार्फत गेले अनेक वर्षांपासून कीटक फवारणी करिता निविदा राबवून कंत्राटी कर्मचा-यांमार्फत पुणे शहरामध्ये संपुर्ण परिसरामध्ये कीटक फवारणी करण्यात येत होती, परंतु गेले ३ ते ४ वर्षे सदर निविदा प्रक्रिया न राबविल्यामुळे पुणे शहराच्या संपुर्ण भागात कीटक फवारणी होत नाही व त्यामुळेच सर्वत्र साथीचे रोग झपाटयाने पसरत आहेत.
याबाबत आज दि. २०/०९/२०२४ रोजी मी महापालिका आयुक्त, पुणे मनपा यांची समक्ष भेट घेतली व महापालिका आयुक्त यांना सध्यःस्थितीमध्ये संपुर्ण पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर डेंग्यु, चिकनगुणिया व इतर साथिच्या रोगांचा प्रमाण वाढत असल्याने सदर रोगांबाबत पुणे मनपामार्फत त्वरीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून साथीच्या रोगांना नियंत्रणात आणावे व याबाबत संपुर्ण पुणे शहरामध्ये जनजागृती करण्यात यावी. पुण्यातील नागरिकांच्या आरोग्याची दक्षता आपण आता तरी घ्याल अशी अपेक्षा आहे.