Home Blog Page 592

घरोघरी भेटीगाठी; अन् रिक्षातून प्रवास

पुणे-विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी घेतली असून, आज मतदारांच्या भेटीगाठीसाठी रिक्षातून प्रवास केला.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोचला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदारांच्या भेटीगाठीसोबतच प्रचाराठी बाईक रॅली, कॉर्नर सभा, सोसायटी भेट अशा विविध मार्गांनी मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या पाच वर्षातील कार्यअहवाल देण्यासोबतच भविष्यातील कामाबद्दल माहिती देत आहे.

सोमवारी त्यांनी रिक्षातून प्रवास करत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांनी प्रभाग क्रमांक ११ मधील जयभवानी नगर मधील शिवसेना नेत्या रंजना दळवी यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी नगरसेविका लिना पानसरे, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला हे देखील उपस्थित होते.

आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना स्त्रियांचे जीवनमान उंचावणारे निर्णय

मुंबई दि.१०: स्त्री शक्ती केंद्रा मार्फत दिनांक १० नोव्हेंबर रोजी वरळी येथील आदर्श नगर येथे महिला मेळावा व हळदी कुंक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधताना सांगितले की, स्त्रियांना संसार चालवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकदा सणासुदीच्या दिवशी स्त्रियांना रेशन भरताना विचार करावा लागतो. यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील, रोजच्या जीवनात नित्य उपयोगी असणाऱ्या किराणाचे दर स्थिर राहावेत यासाठी प्रयत्न केले मात्र अनेक वर्ष रेंगाळत पडलेली ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने त्यांच्या विचाराचा गांभीर्याने विचार करून ‘आनंदाचा शिधा’ ही संकल्पना राज्यभर राबवली आणि सणासुदीच्या दिवशी गोरगरीब जनतेला मोफत शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा हा स्त्रियांना संसार चालवताना निश्चितपणे झाला आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून महिलांना आर्थिक बळ मिळावे याकरिता ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबविण्यात आली आणि त्यातून अनेक स्त्रियांचे जीवनमान उंचावण्यासाठी हातभार लागला आहे. आगामी काळात देखील स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राज्यभरात लागू करण्यात येतील त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला पुन्हा राज्याच्या सत्तेत बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यभरातून महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून द्यावेत असे आवाहन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन स्त्री शक्ती केंद्र अध्यक्ष ॲड. सुशिबेन शाह यांनी केले होते. यावेळी माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, शिवसेना माजी नगरसेविका रत्ना महाले, समन्वयक प्रशांत गवस, युवती सेना निकिता घडशी, कीर्ती पांचाळ, विकास कोळी हे उपस्थित होते.

कमल व्यवहारे नंतर मनीष आनंदही संतापले , तुम्ही कोण कारवाई करणारे ?तुमच्या अन्यायाला प्रत्यूत्तर म्हणून आम्हीच स्वतः १० दिवसांपूर्वीच राजीनामा दिलाय

पुणे- कॉंग्रेस मध्ये चाललेले कुरघोड्यांचे खेचाखेचीचे राजकारण कॉंग्रेसला अगदी पद्धतशीर पणे संपवीत आहे. कुणा भाजपवाल्याने कुणा नेत्याला शहर कॉंग्रेस संपविण्याची दिलेली सुपारी आपले काम तंतोतंत करताना दिसते आहे. कमल व्यवहारे यांनी आपल्यावरील अन्याय उजेडात यावा म्हणून राजीनामा देऊन कसब्यात अपक्ष अर्ज दाखल केला आहे तर मनीष आनंद सारख्या तडफदार उमद्या युवा नेत्याने देखील राजीनामा देऊन शिवाजीनगर मधील उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त करून स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

काल पुणे शहर कॉंग्रेसने मनीष आनंद , कमल व्यवहारे आणि आबा बागुल यांना निलंबित केल्याचे प्रदेश कॉंग्रेसचे पत्र व्हायरल केले त्यासाठी कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही . ४०/ ४० वर्षे व्यवहारे आणि बागुल यांनी पक्षात काम केले आहे . बागुल यांनी आपल्या प्रभागात सातत्याने सलग विजय मिळविण्याची ठेवलेली परंपरा आणि नवनवीन प्रकल्प राबविण्यासाठी घेतलेले परिश्रम वाखणण्याजोगेच नाही तर इतरांनी त्यांच्या पावलावर पाउल ठेऊन काम करण्याजोगे असल्याचे कौतुक अनेकदा कॉंग्रेसच्या आणि विरोधी पक्षांच्याही सर्व बड्या नेत्यांनी केले आहे. न्यायाचा अधिकार या सर्व अपक्ष म्हणून लढणाऱ्या उमेदवारांना देखील आहे. पण तो डावलून त्यांना काल पक्षात आलेले किंवा पुण्याबद्दल काहीही माहिती नसलेले नेते निलंबित करून त्यांची बदनामी करू पाहत आहेत यामुळे हे तिन्ही नेते आता संतापणार आहेत . ज्या मुलाला लहानाचे मोठे एखादा पिता करतो त्याप्रमाणे आम्ही पक्षाच्या हिताची जपणूक केली ,कुटुंबाकडे दुर्लक्ष केले आणि आता आम्हालाच … एखाद्या उर्मट पुत्राने बाहेर काढल्यासारखी वागणूक मिळत असेल तर ? आम्ही पक्षाहून खचितच मोठे नाही , पक्षच आमचा पिता आहे पण तो बाहेरख्याली आणि नादान नेत्यांच्या हाती जाणे या सारखे दुखः आम्हाला नाही असा पवित्र आता घेण्यात येऊ लागला आहे.

दरम्यान या संदर्भात कालच मनीष आनंद यांनी आपण दिलेल्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल केले आहे ते पहा .

सत्रीय कथक आणि खोल पखवाजच्या जुगलबंदीतून उलगडली आसामी संस्कृती

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि संगीत सत्र आसाम यांच्या वतीने ‘संगीत स्तुती’ कार्यक्रम

पुणे : आसामचे पारंपरिक तालवाद्य खोल आणि पखवाजची बहारदार जुगलबंदी… भरतनाट्यम आणि कथकचे डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्य…सत्रीय नृत्याचे मनमोहक सादरीकरण आणि कथक-सत्रीय नृत्याची जुगलबंदी… बासरीचे मंद स्वर… पारंपरिक आसामी गीते अशा संगीत, नृत्य आणि सूर यांच्या मिलापाने आसामी संस्कृतीचे विश्व पुणेकरांसमोर उलगडले. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि संगीत सत्र आसाम यांच्यावतीने ‘संगीत स्तुती’ या कार्यक्रमाचे आयोजन एरंडवण्यातील कर्नाटक हायस्कूलच्या श्रीमती शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियम येथे करण्यात आले होते.  भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, पंडिता मनीषा साठे, विद्यापीठाचे कुलसचिव जयकुमार, संगीत सत्र संस्थेचे संयुक्त सचिव पार्थ प्रतिम बोराह आणि अध्यक्ष स्वप्निल बरुआही, संगीत सत्राच्या सचिव गुरु रंजनमोनी सैकिया,अध्यक्ष राजीब बोरकटाकी उपस्थित होते.


या कार्यक्रमामध्ये नृत्य आणि संगीत विषयातील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे पुणे आणि आसाम मधील विद्यार्थी यांनी सादर केलेल्या नृत्य, संगीत आणि सुरांच्या सादरीकरणामुळे रसिकांना आसामी संस्कृतीची वेगळीच ओळख पाहायला मिळाली.


आसाम मधील विद्यार्थिनी अन्वेषा फुकण हिने राग भारती मध्ये एकतालात आसामी गाणे सादर करून कार्यक्रमाची  सुरुवात केली. त्यानंतर पखवाज आणि आसामी संस्कृतीमधील खोल या वाद्याची जुगलबंदीचा रसिकांनी आनंद घेतला. यामध्ये स्वप्निल सूर्यवंशी यांनी पखवाज तर आसाम मधील कलाकार अर्णव ज्योती भास्कर यांनी रसिकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले. आसाम मधील विद्यार्थी आणि गुरू यांनी पारंपरिक गायन – बयान प्रस्तुत करून आसाम मधील जुनी परंपरा दाखवली. प्रसिद्ध गीत रामायण काव्या वरती डॉ देविका बोरठाकूर आणि विद्यार्थ्यांनी सात्रिय नृत्य प्रस्तुत करून रसिकांची मने जिंकली.
अरुंधती पटवर्धन यांचे भरतनाट्यम तर शर्वरी जमेनीस यांच्या कथक नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळीच उंची लाभली.  नृत्य,नाट्य संगीत आणि ताल यांच्या  मिलापामुळे रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

खडकवासला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण शिबीर यशस्वीरीत्या संपन्न

पुणे: खडकवासला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील शिस्तबद्धता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण शिबीर नुकतेच यशस्वीरित्या संपन्न झाले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात मतदान प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटकांवर तसेच ईव्हीएम मशीन (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) व वीव्हीपॅटच्या (VVPAT) वापरावर विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
शिबिराची सुरुवात तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, पारदर्शकता, मतदारांची ओळख तपासणी, गुप्त मतदान प्रक्रिया, मतपेटी हाताळणी, तसेच ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन केले. श्री. सुरवसे यांनी ईव्हीएम आणि वीव्हीपॅटची कार्यप्रणाली स्पष्ट करून कर्मचाऱ्यांना मशीनच्या सुसज्जतेबाबत दक्ष राहण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी मतदान केंद्रांवरील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तंत्रांचा वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन केले.
प्रा. तुषार राणे, प्रा. माधुरी माने आणि प्रा. पल्लवी जोशी यांनी मतदानाच्या प्रक्रियेत काटेकोर पालन करणे कसे महत्त्वाचे आहे यावर भर दिला. ईव्हीएम मशीनची सुरक्षित हाताळणी, मशीन प्रमाणपत्र तपासणे, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतपेट्यांचे सुरक्षित हस्तांतरण यासारख्या विषयांवर त्यांनी प्रशिक्षण दिले. त्यांनी मतदानाच्या शेवटी मतमोजणी प्रक्रियेची पूर्वतयारी कशी करावी यासंबंधी सूचना दिल्या, तसेच मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले.
याशिवाय नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी मतपेटी आणि ईव्हीएमची सुरक्षित हाताळणी, मतमोजणी प्रक्रिया, आणि मतदानाच्या वेळी शक्य असलेल्या तांत्रिक अडचणींवर मार्गदर्शन केले. ईव्हीएम आणि वीव्हीपॅट वापराचे तंत्र आणि त्यातील तांत्रिक बाबींसाठी कर्मचार्‍यांना विशेष निर्देश दिले, ज्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत त्रुटी निघण्याची शक्यता कमी होईल.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनात मनुष्यबळ कक्षाचे अधिकारी अश्विनी कुलकर्णी, अर्चना देवकते, आणि प्रियांका शिंगाडे यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. त्यांनी शिबिराच्या व्यवस्थापनात समर्पक भूमिका बजावली आणि सर्व व्यवस्थापन पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली.
मनपा सहा. आयुक्त विजय नायकल, अधिक्षक विजय शिंदे, प्रमोद भांड, धम्मदीप सातकर, भूमेश मसराम, आणि साहीर सय्यद यांनी मतदान प्रक्रियेतील त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन कर्मचारी वर्गासमोर मांडले. शिबिरादरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेत येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत प्रश्न विचारले आणि त्यांना तज्ञांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली.
या प्रशिक्षण शिबिरामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, ते आता आगामी निवडणुकीसाठी अधिक सज्ज झाले आहेत.

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५४ तक्रारींवर कार्यवाही

पुणे, दि. ११ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजिल’ ॲपच्या माध्यमातून १५ ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत प्राप्त १ हजार ५४ तक्रारींपैकी ९९७ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात आल्याची तर तथ्य आढळले नसलेल्या उर्वरित ५७ तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती तक्रार निवारण कक्ष व जिल्हा नियंत्रक कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वित आहे.

सी-व्हिजिल ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करुन आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करु शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या ॲपमध्ये आहे. अशा प्रकारे १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत १ हजार ५४ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ९९७ तक्रारींवर कारवाई तर उर्वरित ५७ तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर वगळण्यात आल्या.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते.

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारी व कंसात कारवाई झालेल्या तक्रारी:
आंबेगाव विधानसभा-२६ (२५), बारामती-३३ (२८), भोर-५ (२), भोसरी-७६ (७३), चिंचवड-१८ (१७), दौंड-१० (८), हडपसर-४९ (४५), इंदापूर-३८ (३७), जुन्नर-३४ (३३), कसबापेठ-१६० (१५२), खडकवासला-२१ (१७), खेड आळंदी-३ (१), कोथरूड-६ (४), मावळ-१२ (११), पर्वती-१२५ (१२५), पिंपरी-१३ (११), पुण कॅन्टोन्मेंट-५८ (५६), पुरंदर-३ (१), शिरूर-२२ (९), शिवाजीनगर-४० (४०) व वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात – ३०२ (३०२) अशा एकूण १ हजार ५४ तक्रारी प्राप्त झाल्या व तथ्य आढळलेल्या ९९७ तक्रारींवर कारवाई झाली. यापैकी ९४५ तक्रारींवर पहिल्या १०० मिनीटात कार्यवाही झाली असून त्याचे प्रमाण ९५ टक्के आहे.

जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र किंवा चित्रफीत काढावी आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आणि १८००२३३३३७२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही निवडणूक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000

महाराष्ट्राची अधोगती करणाऱ्यांना घरी बसवा

  • जयंत पाटील यांचे प्रतिपादन; प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ कात्रजमध्ये जाहीर सभा

पुणे: “मोदी-शहांना खुश ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला आहे. राज्याच्या तिजोरीतील पैशांची हवी, तशी उधळपट्टी सुरु आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी विकासाच्या बाबतीत अग्रेसर असलेला आपला महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. ही परिस्थिती थांबवायची असेल, तर महाराष्टाची अधोगती करणाऱ्यांना घरी बसवायचे आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

https://www.youtube.com/live/ryYI2Il1g5Y?si=bfVqn02JRPQxdX2C

हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. कात्रज येथील स्वर्गीय अजितदादा बाबर भाजी मंडई मैदानातील सभेवेळी प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, अॅड. अभय छाजेड, भगवानराव वैराट, शिवसेनेचे वसंततात्या मोरे, योगेश ससाणे, कल्पना थोरवे, संभाजी थोरवे, निलेश मगर, प्रवीण तुपे, समीर तुपे, सचिन खरात, विजयराव देशमुख, डॉ. सुनील जगताप यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रातून सर्वाधिक कररुपी पैसा केंद्र सरकारला जातो. मात्र, केंद्राकडून महाराष्ट्राला काय मिळते, याचा विचार केला पाहिजे. वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. बेरोजगारी वाढल्याने युवकांच्या हाताला काम नाही. गुन्हेगारी वाढल्याने महिला सुरक्षित नाहीत. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आरक्षणाच्या मुद्यांवरून जाती-धर्मांत तेढ निर्माण होत आहे. असे असतानाही राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार स्वतःची पोळी भाजून घेण्यात दंग आहे. अशा स्वार्थी, भ्रष्ट सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी २० तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याची गरज आहे.”

“केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालून पक्ष फोडण्याचे काम केले, याचा खुलासा छगन भुजबळ यांनी केला आहे. आम्हाला कारभार जमणार नाही, अशी टीका काहीजण करतात. पण मीही अनेक वर्षे महाराष्ट्राचा अर्थमंत्री राहिलोय. तेव्हा महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होता. आज महाराष्ट्राची स्थिती दयनीय होत चालली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यासह त्यांचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली महायुतीतील नेते धर्माधर्मात द्वेष पसरवत आहेत. महिलांचा अपमान करीत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारात दिसला तर फोटो काढून पाठवा, म्हणून कोल्हापूरातला एक नेता धमकावतो. हीच का यांची लाडकी बहीण? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

प्रशांत जगताप म्हणाले, “मागच्या आमदारांनी काय दिले, याचा जाब विचारण्याची ही संधी आहे. पवार साहेबांशी गद्दारी करणाऱ्या अकार्यक्षम आमदारांना घरी बसवायची वेळ आली आहे. गद्दारीचा शिक्का पुसून काढायचा आहे. विकासकामात पैसे खाणारा आमदार हवा की, विकासकामे प्रामाणिकपणे मार्गी लावणारा हवा, हे ठरवायची संधी तुम्हाला आहे. ही लढाई स्वाभिमानी विरुद्ध गद्दारी अशी आहे. हडपसर, कात्रजच्या विकासासाठी, उड्डाणपुलांसाठी, चोवीस तास पाणीपुरवठा होण्यासाठी, वाहतूककोंडी व गुन्हेगारीमुक्त परिसरासाठी महाविकास आघाडीला निवडून देण्याची गरज आहे.”

जयंत पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  • हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रशांत जगताप यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे.
  • महाराष्ट्रातील एकमेव शहराध्यक्ष आहेत, ज्यांनी शरद पवारांची साथ दिली.
  • निष्ठावान प्रशांत जगताप यांना निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे.
  • लोकसभेनंतर महाराष्ट्रातील सरकार घाबरले आणि काहीही करायला लागले
  • आमचे घड्याळ चोरीला गेलेय, पण त्याचे काटे पवार साहेबांनी थांबवलेत
  • वाहतूककोंडी, गुन्हेगारी, ड्रगमुक्त, कोयता गँगमुक्त शहर करायचे आहे

चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली!

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे प्रतिपादन

पुणे : कोथरूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्याशिवाय पाच वर्षांत चंद्रकांतदादांनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींच्या कुटुंबांसाठी काम केलंय. त्यामुळे दादांचा नम्रपणा समोरच्याला पराभूत करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष दिपकभाऊ मानकर यांनी व्यक्त केला.

कोथरूड मतदारसंघातील रिक्षा चालक संघटनांचा सस्नेह मेळावा संपन्न झाला.यावेळी महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पिंपरी चिंचवडचे सदाशिव खाडे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा कोथरूड सरचिटणीस गिरीश भेलके, रिक्षाचालक संघटनेचे केशव क्षीरसागर, सुनील मालुसरे यांच्या सह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिपक मानकर म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील हे अतिशय सामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना नेहमीच साथ दिली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेता यावे; यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला. सध्या विरोधकांकडे मुद्देच राहिलेले नाहीत. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांचा नम्रपणाच विरोधकांना पराभूत करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरूड हे कुटुंब मानून गेल्या पाच वर्षांत काम केलं. त्यापूर्वी कोल्हापूर मध्ये ही असंच काम करत राहिलो. समाजाची गरज पाहून कार्यक्रम करणं, उपक्रम राबविणे याला माझे नेहमीच प्राधान्य असते. महायुती सरकारने रिक्षाचालकांना महायुती सरकारने महामंडळ निर्माण केलंय. त्याचा रिक्षाचालकांना लाभ होईल, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला जास्तीत जास्त मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन केले.

खडकवासल्यातून तापकीरांना मोठे मताधिक्य मिळवून द्या:दीपक मानकर

पुणे:खडकवासल्यातून तापकीरांना मोठे मताधिक्य मिळवून द्या असे आवाहन राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष, माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केले.खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी महत्वपूर्ण बैठक घेतली यावेळी कार्यकर्त्यांना नियोजनासाठी त्यांनी काही सूचना केल्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडकवासला विधानसभा मतदारसंघतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मतदारसंघातील प्रचारयंत्रणा आणि त्याचे नियोजन याचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांना प्रचारदरम्यान येणाऱ्या अडचणी देखील समजून घेतल्या. बैठकीला उपस्थित असलेले महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्याशी चर्चा करून योग्य प्रचारयंत्रणा राबवून मोठे मताधिक्य मिळवण्याचे उद्धीष्ठ ठेऊन काम करण्याचा निर्धार सर्वांनी केला.

यावेळी माजी उपमहापौर दिलीप बराटे, शंकर (बंडू) केमसे, प्रदीप देशमुख, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे पक्षाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, राहुल पोकळे, प्रवीण शिंदे, राजेंद्र पवार, सागर कोल्हे, संतोष फरांदे, सागर भागवत, सौ.सुनिता डांगे, सौ. भावना पाटील, अमोल भगत, योगेश शेलार, संजय पाटील उपस्थित होते.

झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावणे हा माझा जीवन ध्यास ! साडेपाचशे चौरस फुटांचे हक्काचे घर देणार – रमेश बागवे

पुणे : कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावणे हा माझा जीवन ध्यास आहे. प्रत्येक झोपडपट्टीवासीयास त्याच जागी साडेपाचशे चौरस फुटांचे हक्काचे मोफत घर देण्यास मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी रविवारी दिले.रमेश बागवे यांच्या प्रचारासाठी काशेवाडी आणि परिसरात निघालेल्या पदयात्रेचे रविवारी ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यापूर्वी नगरसेवक , आमदार आणि मंत्री असताना झोपडपट्टीवासियांना वीज, पाणी, स्वच्छतागृहे या मूलभूत नागरी सुविधा मी उपलब्ध करून दिल्या होत्या. पुढील पाच वर्षांत झोपडपट्टीवासियांना हक्काची पक्की घरे, आरोग्य , शिक्षण, पाणी या मूलभूत सुविधांसह रोजगार देण्याचा मी प्रयत्न करणार आहे , असे आश्वासन बागवे यांनी दिले.

तरुणांना आणि महिलांना रोजगार देण्यासाठी तसेच खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. फुले-शाहू-आंबेडकर, मौलाना आझाद, अण्णा भाऊ साठे, लहुजी वस्ताद यांचे विचार रूजवून जातीय व धार्मिक सलोखा जपण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

काशेवाडीतील पतसंस्थेपासून सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. व्यापारी मंडळ, धम्मपाल गल्ली, मेमजादे अपार्टमेंट, विशाल मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, सिद्धार्थ नगर, दीपज्योत बंधुभाव मित्र मंडळ, म्हसोबा मंदिर, सेवक तरुण मंडळ चमनशाह चौक, शहीद अब्दुल रहेमान चौक, एसआरए राजीव गांधी हाउसिंग सोसायटी येथे पदयात्रा उत्साहात पार पडली. सायंकाळी वानवडी परिसरात निघालेल्या पदयात्रेचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. गवळी धाडगे नगर, फातिमा कॉन्वेंट, साबळे वस्ती, वानवडी गाव, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मदली तालीम, विकास नगर, येथे कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत पदयात्रा पार पडली.

माजी नगरसेवक अविनाश बागवे, रफीक शेख, पल्लवी जावळे, उत्तमराव भुजबळ, जावेद खान, जुबेर शेख, कनव चव्हाण, संगीता दामजी, सुरेखा खंडाळे, उस्मान तांबोळी, भीमराव पाटोळे, पप्पू जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप तसेच विविध संघटना यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पेढे वाटून आणि फटाके फोडून स्थानिक कार्यकर्त्यांनी रमेशदादा बागवे यांचे स्वागत केले. काशेवाडी आणि वानवडी परिसरातून रमेशदादांना भरघोस मतदान होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी व्यक्त केला. एकच वादा रमेशदादा या घोषणेने परिसर दणाणून गेला.

ठिकठिकाणी महिलांनी रमेश बागवे यांचे औक्षण करून स्वागत केले. रमेशदादा हेच आमचे लाडके भाऊ आणि आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

प्रशांत जगताप यांचा रविवार ठरला प्रचारवार

  • सुट्टीचा योग साधत घरोघरी जाऊन हडपसरवासियांशी साधला संवाद

पुणे: हडपसर मतदारसंघात सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडीवर राहिलेल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी रविवारच्या सुट्टीचा योग साधत घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यामुळे मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना जगताप यांच्यासाठी हा रविवार प्रचारवार ठरला.

रविवारी जगताप यांनी सकाळच्या सत्रात हडपसर, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर परिसरात, तर दुपारच्या सत्रात काळे बोराटेनगर, ससाणेनगर, हिंगणेमळा परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. लोहिया नगर उद्यान परिसरात नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. या प्रचारयात्रेदरम्यान जगताप यांनी परिसरांतील मंदिरे, स्मारकांना अभिवादन करीत नागरिकांचे आशीर्वाद घेतले. अनेक ठिकाणी फटाके वाजवून, पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर माता-भगिनींनी औक्षण करीत ‘विजयी भव’चा आशीर्वाद दिला.

पदयात्रेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. योगेश ससाणे, विजय देशमुख, अविनाश काळे, संजय शिंदे, प्रशांत सुरसे, नितीन आरू, गणेश बोराटे, महेंद्र बनकर, आसिफ मणियार, राहुल होले, अनिल सागरे आदी उपस्थित होते. स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत ‘एकच वादा, प्रशांत दादा’ असा जयघोष केला. येणाऱ्या काळात हडपसरच्या विकासाची हमी घेत जगताप यांनी जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच जगताप यांना चांगला प्रतिसाद दिला.

प्रशांत जगताप म्हणाले, “हडपसरच्या जनतेने आदरणीय शरद पवारसाहेब आणि माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे. नगरसेवक, महापौर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. सेवेतून, विकासकामांतून योगदान देता आले, याचा आनंद आहे. आता हडपसर मतदारसंघाचा आमदार म्हणून मला या भागाच्या विकासासाठी विधिमंडळात आवाज उठवायचा आहे. त्यासाठी आपण मला संधी द्याल, असा विश्वास आहे. आपल्या पाठिंब्याने ही लढाई नक्की यशस्वी करू आणि येत्या काळात हडपसरचे रूप बदलू. एक सुंदर, स्वच्छ व सुसंस्कृत शहर निर्माण करू, असा शब्द देतो.”

पिंपरी चिंचवड शहरात बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती

पुणे, दि. १० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्यावतीने आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. मतदानाच्या दिवशी शासकीय व खासगी आस्थापनांना पगारी सुट्टी देण्यात आली असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा व इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले.

या रॅलीचा निगडी येथील भक्ती शक्ती चौकात आयुक्त श्री.सिंह यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे, उपआयुक्त अण्णा बोदडे, सहायक आयुक्त अविनाश शिंदे, राजीव घुले, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, महापालिकेचे कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी, युथ आयकॉन उपक्रमातील स्पर्धक यांच्यासह विविध भागातून आलेले सुमारे ३५० पेक्षा अधिक बाईक रायडर्स आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.

शहरातील मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. निगडी येथील भक्ती शक्ती चौकात जीएनडी ग्रुपच्या बालकलाकारांनी मतदार जनजागृतीपर नृत्य सादरीकरण केले. या कलाकारांनी आपल्या मनमोहक, चित्तथरारक व प्रबोधनात्मक नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तिनही मतदार संघातील प्रमुख मार्गांवरुन सुमारे ३३ किलोमीटर अंतराची बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीची सांगता भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झाली.

महापुरुषात द्वंद्व उभे करण्याचे प्रयत्न चुकीचे: प्रा. डॉ.राजा दीक्षित

पुणे :’महापुरुषात द्वंद्व उभे करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांचे विचार वेगळे असले,मतभिन्नता असली तरी समान धागे आहेत.ते व्यक्ती नसून इतिहासाच्या साखळीचे भाग आहेत. त्यामुळे गांधी विरुद्ध आंबेडकर, गांधी विरुद्ध नेताजी, नेताजी विरुद्ध नेहरू अशा लढाया लावण्यात अर्थ नाही ‘,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विश्वकोष महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. राजा दीक्षित यांनी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर झाले . विश्वकोष महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.राजा दीक्षित( गांधीजी आणि नैतिकता), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे (सर्वसमावेशक राष्ट्रवादाचे प्रणेते महात्मा गांधी ),महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी (गांधी आणि मौलाना अबुल कलाम आझाद ) या मान्यवरानी मार्गदर्शन केले . ‘ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे पंधरावे शिबीर होते .

युवक क्रांती दलाचे शहराध्यक्ष सचिन पांडुळे यांनी स्वागत केले.प्रा. शशिकला राय, प्रा.रा.ना. चव्हाण,अजय भारदे,गणेश खुटवड,तेजस भालेराव आदी उपस्थित होते. अॅड.स्वप्नील तोंडे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रा.राजा दीक्षित म्हणाले,’गांधीजी क्रांतीकारक होते, त्यांची क्रांती अहिंसक होती, शांततामय होती. महाराष्ट्रात गांधीजींना कमी लेखण्याचा प्रयत्न नेहमी होतो.भय आणि हिंसा हे दोनच पर्याय असतील तर मी हिंसा निवडेन,असे गांधीजींनी ‘यंग इंडिया’ मध्ये लिहिले होते.त्यांची अहिंसा ही नेभळटाची अहिंसा नव्हती,तर सबलाची, मानसिक कणखर व्यक्तींची अहिंसा होती.

गांधीजींचे तत्वज्ञान हे सांगण्या, बोलण्याचे नव्हते तर कृतीचे तत्वज्ञान आहे. भांडवलशाही,शोषण पाहिल्यावर आपल्याला अपरिग्रह शब्दाचे महत्व पटते. गांधीजींचा प्रभाव भारतीय जीवनपद्धतीवर समग्र असा आहे.

सत्याचा शोध घ्या, सत्य हाच माझा परमेश्वर आहे, अशी भूमिका गांधीजींनी घेतली होती. सार्वजनिक जीवनाचे नैतिकीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.त्यात गुरु- शिष्य परंपरा होती,भारतीय स्वातंत्र्य लढयाला वैचारिक बैठक होती.सत्तेच्या मोहात पडू नका,अशा सांगण्यात त्यांचे महानपण होते, असेही प्रा. दीक्षित यांनी सांगीतले.

आज मात्र राजकारणाची भाषा,राजकीय संस्कृती रसातळाला गेली आहे. महाराष्ट्र कुठे गेला हे पाहून मान शरमेने झुकते. आजही त्यासाठीच गांधी विचार महत्वाचा आहे.त्या विचाराकडे पाहून आपण कृतीची पावले टाकली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’ भौतिक प्रगतीच्या पाश्चात्य कल्पनेला गांधींनी मर्यादा घातली. पुढील पिढीची नैसर्गिक साधन संपत्ती आपण आताच संपवणार का ? हा प्रश्न गांधीजी विचारत. पाश्चिमात्य संस्कृती विषयी गांधींजींचे आकलन आणि आक्षेप होते, म्हणूनच गांधीजी नोबेलला मुकले. भारतीय प्रेमळ आणि वैविध्य असणारा देश पूर्वी होता.तो हिंसक, क्रूर नव्हता. म्हणून जगभरातून लोक इथे आले.समाज टिकवण्यासाठी नीतीमत्ता आवश्यक आहे. माणूसपणाची जाणीव टिकून राहिली पाहिजे. अनीतीमान असे काही टिकत नाही, हेच गांधीजींनी सांगीतले आहे.’

गिरीश बापट यांनी माझ्या सारख्या असंख्य भाजप कार्यकर्त्यांना घडविले- हेमंत रासने

पुणे-‘कामाचे नियोजन करा आणि नियोजनाप्रमाणे काम’ हा कानमंत्र देत स्वर्गीय गिरीश बापट यांनी ज्या कार्यालयातून देऊन माझ्या सारख्या असंख्य भाजप कार्यकर्त्यांना घडविले, त्याच कार्यालयातून मुख्य निवडणुक कचेरी सुरू करताना विशेष आनंद होतो, अशा भावना भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केल्या.

रासने यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन 95 वर्षांच्या माजी नगरसेविका मीराताई पावगी यांच्या हस्ते आणि महायुतीच्या महिला लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करताना रासने बोलत होते. शहराध्यक्ष धीरज घाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

रासने म्हणाले, “महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांना सन्मान दिला. तोच संदेश आम्हाला कसब्यातील मतदारांना द्यायचा आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ सारखी योजना आणून राज्यात कौटुंबिक जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण केले. असेच वातावरण कसब्यात निर्माण व्हावे म्हणून आम्ही माता-भगिनींच्या हस्ते कचेरीचे उद्घाटन केले.”

रासने पुढे म्हणाले, “सरकारी दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या रकान्यात न करता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा स्वरूपात नोंदवणे बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला. यावरून महायुती शासन महिलांचा सन्मान करते ही बाब अधोरेखित होते.”

रासने यांच्या प्रचारार्थ कसबा गणपतीपासून महिलांची पदयात्रा आयोजित केली होती. साततोटी चौक, कस्तुरी चौक, घोरपडे पेठमार्गे समता भूमी येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करून पदयात्रेचा समारोप झाला. स्वरदा बापट, रुपाली ठोंबरे, अश्विनी पवार, वैशाली नाईक, सुरेखा पाषाणकर, कल्पना जाधव, आरती कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर, सुप्रिया कांबळे, सुरेखा कदम-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पानशेत पूरग्रस्तांना मिळाला मालकी हक्कआमदार माधुरी मिसाळ

पुणे -पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना 99 वर्षांचा भाडेतत्त्वावर दिलेल्या जागा पूरग्रस्तांना मालकी हक्काने देण्याचा दुरुस्तीचा अध्यादेश सरकारने काढला होता. या सोसायट्यांशी संबंधित विविध बाबींविषयी पुरेशी स्पष्टता नव्हती. त्यामुळे सुधारित अध्यादेश काढावा यासाठी पाठपुरावा केला. नवीन अध्यादेशामळे सोसायट्यांसाठी नियमावली, दंड आणि अन्य कायदेशीर बाबींबाबत पुरेशी स्पष्टता आहे. या निर्णयाचा शहरातील 103 सोसायट्या, चार हजार कुटुंब आणि 80 हजार पुणेकरांना लाभ होणार असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.

मिसाळ यांच्या प्रचारार्थ सहकार नगर परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. गजानन महाराज चौकातून प्रचारफेरीला प्रारंभ झाला. सहकारनगर नंबर 2, ढुमे हॉल चौक, सारंग पोलीस चौकी, गंगातीर्थ रोड, अरण्येश्वर मंदिर, शिवदर्शन, सत्यवीर मित्र मंडळमार्गे राजीव गांधी ई लर्निंग स्कूल येथे पदयात्रेचा समारोप झाला. महेश वाबळे, गणेश घोष, अनिल जाधव, प्रशांत थोपटे, श्रृती नाझीरकर, सुधीर कुरुमकर, हरीष परदेशी, बिपीन पोतनीस, रामदास गाडे, औदुंबर कांबळे, आर्पपा कोरपे, दत्ता टिकेकर, रफीक शेख, रवींद्र चव्हाण, अमोल खंडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिसाळ म्हणाल्या, “बिबवेवाडीतील हिल टॉप हिल स्लोप आरक्षणातील काही ठरावीक जमीन वगळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सुमारे सात एकरचे तीन भूखंड वगळण्याची अधिसूचना नगर विकास विभागाने काढली होती. या ठिकाणच्या सर्व भूखंडधारकांसाठी एकच निर्णय घ्यावा आणि सर्वांना न्याय द्यावा अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत घेऊन या निर्णयाला स्थगिती दिली.”