पुणे-विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी घेतली असून, आज मतदारांच्या भेटीगाठीसाठी रिक्षातून प्रवास केला.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोचला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदारांच्या भेटीगाठीसोबतच प्रचाराठी बाईक रॅली, कॉर्नर सभा, सोसायटी भेट अशा विविध मार्गांनी मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या पाच वर्षातील कार्यअहवाल देण्यासोबतच भविष्यातील कामाबद्दल माहिती देत आहे.
सोमवारी त्यांनी रिक्षातून प्रवास करत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांनी प्रभाग क्रमांक ११ मधील जयभवानी नगर मधील शिवसेना नेत्या रंजना दळवी यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी नगरसेविका लिना पानसरे, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला हे देखील उपस्थित होते.