पुणे- कॉंग्रेस मध्ये चाललेले कुरघोड्यांचे खेचाखेचीचे राजकारण कॉंग्रेसला अगदी पद्धतशीर पणे संपवीत आहे. कुणा भाजपवाल्याने कुणा नेत्याला शहर कॉंग्रेस संपविण्याची दिलेली सुपारी आपले काम तंतोतंत करताना दिसते आहे. कमल व्यवहारे यांनी आपल्यावरील अन्याय उजेडात यावा म्हणून राजीनामा देऊन कसब्यात अपक्ष अर्ज दाखल केला आहे तर मनीष आनंद सारख्या तडफदार उमद्या युवा नेत्याने देखील राजीनामा देऊन शिवाजीनगर मधील उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त करून स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
काल पुणे शहर कॉंग्रेसने मनीष आनंद , कमल व्यवहारे आणि आबा बागुल यांना निलंबित केल्याचे प्रदेश कॉंग्रेसचे पत्र व्हायरल केले त्यासाठी कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही . ४०/ ४० वर्षे व्यवहारे आणि बागुल यांनी पक्षात काम केले आहे . बागुल यांनी आपल्या प्रभागात सातत्याने सलग विजय मिळविण्याची ठेवलेली परंपरा आणि नवनवीन प्रकल्प राबविण्यासाठी घेतलेले परिश्रम वाखणण्याजोगेच नाही तर इतरांनी त्यांच्या पावलावर पाउल ठेऊन काम करण्याजोगे असल्याचे कौतुक अनेकदा कॉंग्रेसच्या आणि विरोधी पक्षांच्याही सर्व बड्या नेत्यांनी केले आहे. न्यायाचा अधिकार या सर्व अपक्ष म्हणून लढणाऱ्या उमेदवारांना देखील आहे. पण तो डावलून त्यांना काल पक्षात आलेले किंवा पुण्याबद्दल काहीही माहिती नसलेले नेते निलंबित करून त्यांची बदनामी करू पाहत आहेत यामुळे हे तिन्ही नेते आता संतापणार आहेत . ज्या मुलाला लहानाचे मोठे एखादा पिता करतो त्याप्रमाणे आम्ही पक्षाच्या हिताची जपणूक केली ,कुटुंबाकडे दुर्लक्ष केले आणि आता आम्हालाच … एखाद्या उर्मट पुत्राने बाहेर काढल्यासारखी वागणूक मिळत असेल तर ? आम्ही पक्षाहून खचितच मोठे नाही , पक्षच आमचा पिता आहे पण तो बाहेरख्याली आणि नादान नेत्यांच्या हाती जाणे या सारखे दुखः आम्हाला नाही असा पवित्र आता घेण्यात येऊ लागला आहे.
दरम्यान या संदर्भात कालच मनीष आनंद यांनी आपण दिलेल्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल केले आहे ते पहा .