Home Blog Page 576

मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या निधीत कपात तर अमली पदार्थांत वाढ-अनंत गाडगीळ

पुणे-देशाला सर्वाधिक करनिधी देणाऱ्या महाराष्ट्राला मोदी सरकार सावत्र वागणूक देत असून महायुतीच्याच कालखण्डात महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत कपात तर अमली पदार्थात वाढ, अशी वस्तुस्तिथी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी केला आहे.

राज्य निधी वाटप अंतर्गत उत्तर प्रदेशला जवळपास २५ हजार कोटी , बिहारला व आंध्र प्रदेशला प्रत्येकी सुमारे १४ हजार कोटी, मध्य प्रदेशला ११ हजार कोटी, ओडिसाला ७ हजार कोटी तर महाराष्ट्राला मात्र अवघा ८ हजार कोटीं रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची आकडेवारीच गाडगीळ यांनी सादर केली असूनही महायुतीचे नेते यावर का मौन बाळगून आहेत असा सवालही त्यांनी केला आहे.

२०४७ पर्यंत ” अमली पदार्थ मुक्त भारत ” करण्याची गर्जना करणाऱ्या पंतप्रधान मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षाच्या काळात सुमारे ५.५ लाख किलोचे तब्ब्ल २० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. केंद्र सरकारनीच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमली पदार्थांचा एवढा साठा जर पकडला जात असेल तर कुणाच्या राजवटीत अमली पदार्थाचे सेवन वाढल्याचे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही असा उपरोधक टोमणाही गाडगीळ यांनी लगावला आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे, अवघ्या काही महिन्यापूर्वीच जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या साठा वरून मुंबई – पुण्यासारख्या शहरातून महायुती सत्तेवर असताना, सेवनाचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे सिद्धच होते आहे असेही गाडगीळ यांनी म्हंटले आहे.

‘एक हैं तो सेफ हैं’ म्हणजे देशात फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ हैं’! : राहुल गांधी

पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्याने धारावीची एक लाख कोटी रुपयांची जमीन अदानीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा दिमतीला.

विधानसभेची निवडणूक मुंबई व महाराष्ट्राची संपत्ती लुटणारे दोन उद्योगती व शेतकरी, तरुण, महिला यांच्यातील लढाई.

मविआची सत्ता येताच ३ लाखांची शेतकरी कर्जमाफी, २.५ लाख सरकारी पदे भरणार, महिलांना ३ हजार रुपये व मोफत बस प्रवास आणि २५ लाखांचा आरोग्य विमा देणार.

मुंबई, दि. १८ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती व राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे. धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका व्यक्तीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असून मोदींची घोषणा ‘एक हैं तो सेफ हैं’ म्हणजे फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ ही हैं’ असा जोरदार प्रहार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एक बंद तिजोरी (सेफ) सादर करून पत्रकारांसमोर ती उघडली. त्यात मोदी आणि अंबानींचा फोटो आणि धारावीचा नकाशा ठेवण्यात आला होता. अदानी-मोदी देश लुटण्यासाठी ‘एक है तो सेफ है’ असा आरोप ही तिजोरी दाखवत राहुल गांधी यानी केला.

मुंबईतील हॉटेल सोफीटेलमधील भरगच्च पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विधानसभा निवणुकीतील मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मुंबईतील धारावी ही लघु व मध्यम उद्योगाचे हब आहे. हे हब बंद करुन धारावी अदानीच्या घशात घालण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. हा फक्त धारावीच्या जमिनीपुरताच मुद्दा नसून मुंबई, मुंबईचे पर्यावरण यांच्याशीही संबंधीत आहे. देशातील सर्व विमानतळ, संरक्षण साहित्य बनवण्याचे काम, बंदरे, उर्जा निर्मीती प्रकल्प सर्वकाही एकाच व्यक्तीच्या हातात देण्यासाठी भाजपा सरकार काम करत आहे. भाजपाची नजर मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याशिवाय हे होणे शक्य नाही, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धारावीकरांच्या इच्छा अपेक्षानुसार त्यांचे हित जोपासत हा प्रकल्प राबविला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.

निवडणुकीत महागाई व बेरोजगारी हे दोन मुख्य मुद्दे आहेत पण त्याकडे भाजपा सरकार वा पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष देत नाहीत. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, सोयाबीन, कापूस, कांदा यासह शेतमालाला भाव नाही तर बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. परंतु भाजपा सरकार नोकर भरती करत नाही. उलट महाराष्ट्रात येणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क ड्रग प्रकल्प, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र यासारखे तब्बल ७ लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्याबरोबरच इथल्या युवकांचे ५ लाख रोजगार महाराष्ट्रातून गुजरातसह इतर राज्यात गेले असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

मविआची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचे ३ लाखांचे कर्ज माफ करणार, सोयाबीनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव, कांदा, कापसाला योग्य हमी भाव, महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये व मोफत बस प्रवासाची सुविधा, राजस्थानच्या धर्तीवर २५ लाखांचा आरोग्य विमा दिला जाईल. बेरोजगारांना महिना ४ हजारांचा भत्ता तसेच २.५ लाख रिक्त सरकारी जागांची भरती केली जाईल. जातनिहाय जनगणना करणे व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवणे यावर भर दिला जाईल असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसच्या ५ गॅरंटी व मविआच्या जाहिरनाम्यातील पुर्तता करण्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणामध्ये काँग्रेसने अशाच गॅरंटी दिल्या होत्या त्याची यशस्वी अंमलबजाणी सुरु आहे असे राहुल गांधी यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, राष्ट्रीय सचिव यु. बी. व्यंकटेश आदी उपस्थित होते.

५० खोकेवाल्या गद्दारांना विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा व भाजपाचाही सुपडासाफ करा: मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंची वसईत प्रचारसभा.

मुंबई, दि. १८ नोव्हेंबर २०२४
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. आता विधानसभा निवडणुतही ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवून भारतीय जनता पक्षाचा सुपडासाफ करा आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे.

काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची वसई येथे प्रचार सभा झाली. बटेंगें तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं या भाजपाच्या घोषणांचा समाचार घेत खर्गे म्हणाले की महाराष्ट्राची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर सुरु आहे पण काही लोकांना जाती धर्मांमध्ये भांडणे लावायची आहेत. काँग्रेस मविआचा मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचे पालन करून सर्वांना मजबूत करणे हा हेतू आहे. भारतीय जनता पक्ष जाती धर्मात फूट पाडण्याचे काम करत आहे तर काँग्रेस जोडण्याचे काम करत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकतेसाठी बलिदान दिले आहे हे विसरू नका. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी कन्याकुमारी के काश्मीर पदयात्रा काढली. देशाची लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी ही लडाई असून हे काम सर्वांना करायचे आहे.

भाजपा युती सरकारच्या राजवटीत शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचे जगणे कठीण केले आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, शेतमालाला भाव नाही. भाजपा युती सरकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार करून महाराष्ट्राला लुटले आहे. काँग्रेसच्या ५ गॅरंटी व महाराष्ट्रनामामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी करेल असे सांगून २० तारखेला जनताच भ्रष्टभाजपा युतीला सत्तेतून खाली खेचेल असा विश्वास मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केला आहे.

पोलीस दलाच्या माध्यमातून रसद पुरवून मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न सुरु

निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून निष्पक्षता जपावी

मुंबई, १८ नोव्हेंबर २०२४

२० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना चेन्नीथला म्हणाले की, पोलीस दलाकडून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचे काँग्रेस पक्षाने सातत्याने निदर्शनास आणून दिले होत. त्यानंतर या संदर्भातल्या लेखी तक्रारी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने देशाच्या मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेऊन पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाची मागणी लक्षातच घेऊन निष्पक्ष निवडणुका पार पडाव्यात म्हणून आयोगाने रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करून संजयकुमार वर्मा यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. त्यानंतरही राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षातील बडे नेते पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रभावीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आमच्या निदर्शनास येत आहे. हे लोकशाहीसाठी योग्य नाही. काँग्रेस पक्ष या संदर्भात निवडणूक आयोग आणि मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार करणार आहेच. पण आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी हस्तक्षेप करावा असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

महायुतीचे उमेदवार भिमराव तापकीर यांच्या बाईक रॅलीला धनकवडी गावात मोठ्ठा प्रतिसाद

पुणे-

भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार भिमराव धोंडिबा तापकीर यांनी आज खडकवासला मतदारसंघात विविध भागांतून भव्य बाईक रॅली आणि पदयात्रा आयोजित केली. त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आपले दृष्टिकोन स्पष्ट केले.सकाळी 8.45 वाजता धनकवडी, बालाजीनगर आणि भारती विद्यापीठ परिसरातून भव्य बाईक रॅलीला सुरुवात झाली.श्री जानुबाई मंदिर,तळजाई पठार,संभाजी नगर,तापकीर स्मृती,चैतन्यनगर,विद्या नगरी,कात्रज डेअरी,वंडर सिटीनारायणी धाम या मार्गाने रॅली संपन्न झाली

या दौऱ्यात माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, अश्विनी भागवत, राणी भोसले, मोहिनी देवकर, आप्पा धावणे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष अरुण राजवाडे, संतोष फरांदे, विश्वास आहेर, युवराज रेणूसे, शंकर कडू, अभिषेक तापकीर, सचिन बदक, गणेश पवार, सागर भागवत, सागर साबळे, आनंद शिंदे, दत्ता सावंत, अंकुश सोनवले, महेश भोसले, सत्यवान कामठे, सतिश घाटे, उल्हास खुटवड,दादा देवकर, पांडुरंग भोसले, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी, प्रभाग अध्यक्ष अमोल चौधरी, रायबा भोसले, भाजपा सरचिटणीस युवा मोर्चा ओंकार डवरी, जितू कोंढरे, चिन्मय भोसले, राहुल पाखरे, रितेश रासकर, आनंद साळुंखे, अंकुश कोकाटे, मंगेश पवार, तसेच इतर मान्यवर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
यावेळी मतदारांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजनांसाठी सकारात्मक दृष्टिकोन मांडला. अशा उत्साहपूर्ण बाईक रॅलीने नागरिकांमध्ये विश्वास आणि ऊर्जा निर्माण केली. सामाजिक सेवा व लोककल्याणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकास कामांची रूपरेषा सादर केली.

भिमराव तापकीर यावेळी म्हणाले,’: “खडकवासला मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. या भागाचा विकास आणि प्रगती हेच माझे ध्येय आहे. जनतेच्या विश्वासामुळे विजय निश्‍चित आहे

मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणारे संदेश पाठविल्यास कडक कारवाई

पुणे, दि. १८: मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सअपद्वारे पसरविला जात असल्याचे आढळून येत आहे. असे निवडणूक प्रक्रियेविषयक चुकीचे संदेश, अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिला आहे.

मतदान यादीत नाव नसल्यास फॉर्म क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याच्या संदेश मोबाईलद्वारे पसरविण्यात येत आहे. फॉर्म क्र. १७ हा दहावी, बारावीच्या परीक्षेस बाह्यरित्या प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून नागरिक व प्रशासन अशा दोघांना विनाकारण त्रासाला सामारे जावे लागत आहे. असे संदेश जिल्ह्यात पसरविले जात असल्याचे निदर्शनास आले असून दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीबाबत विशेष संक्षिप्त मोहीम २०२४ अंतर्गत मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीबाबत सर्व विधानसभा मतदार संघात गेली वर्षभर काम करण्यात आले असून त्यानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत. मतदाराचे नाव वगळणी करताना नियमानुसार सर्व कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप संदेशाद्वारे प्रसारीत केलेली माहिती अत्यंत चुकीची आहे.

मतदार यादीत नाव नसेल तर संबंधितास मतदान करता येणार नाही. मतदार यादीत नाव असल्यास मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या १२ पुराव्यापैकी एक दाखवून मतदान करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांचा कमिन्सच्या कर्मचाऱ्यांशी संवादाने प्रचाराचा समारोप

पुणे-

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चंद्रकांतदादा पाटील यांनी कमिन्सच्या कर्यचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कमिन्स कर्मचाऱ्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना जास्तीत जास्त मतदान करुन विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, सरचिटणीस विठ्ठल आण्णा बराटे, दीपक पवार, नवनाथ जाधव, राजाभाऊ बराटे, बाळासाहेब टेमकर, अमित तोरडमल, बाळासाहेब दांडेकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कामगार युनियनचे उपाध्यक्ष सुधीरबापू सरोदे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत चंद्रकांतदादा पाटील यांचे काम सर्वसमावेशक आहे. कोणतीही जात पंथ यांचा विचार न करता तुम्ही प्रत्येक घटकांसाठी काम केले आहे. त्यामुळे तुम्हाला विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करु, अशी कामगार युनियनच्या वतीने ग्वाही दिली.

मोदी यांच्यात हिम्मत असेल तर.. येण्या जाण्याची व्यवस्था करतो.500 रुपयात सिलेंडर, 200 युनिट वीज मोफत, मोफत बस सेवा देतो कि नाही प्रत्यक्ष दाखवतो

पुणे -तेलंगणाचा काँग्रेस काळातील विकास पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी कोणत्याही संसदेतला मंत्री किंवा सदस्य तेलंगणाला पाठवावा. त्यांच्याकडे येण्यासाठी पैसे नसतील तर मी विमान पाठवतो, दिल्लीत असेल तर दिल्लीत किंवा मुंबईत असेल तर मुंबई मी त्यांच्या येण्या जाण्याची व्यवस्था करतो. तेलंगणात आम्ही सत्तेत आल्यावर 25 दिवसात 18 हजार कोटींची 23 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असल्याचे मत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहंमद, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड उपस्थित होते.

रेड्डी म्हणाले, एक कोटी दहा लाख महिलांना मोफत बस सेवा दिली आहे. त्याकरिता बस प्रशासन यांना 3600 कोटी रुपये दिले गेले. सिलेंडर किंमत 1100 रुपये झाल्याने जनता त्रस्त आहे. सिलेंडरसाठी लोकांना आम्ही 500 रुपयात व्यवस्था केली आहे. जनतेला 200 युनिट वीज मोफत देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एक कोटी 50 लाख धान्य उत्पादन तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांनी घेतले असून त्यांना आम्ही पीक हमी भाव दिला आहे. कॉर्पोरेट रुग्णालय मध्ये लोकांना राजीव गांधी आरोग्य सेवा अंतर्गत सवलत मध्ये आरोग्य सेवा दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे आम्ही पोकळ आश्वासन देत नाही. जे आश्वासने जनतेस दिले आहे त्याची पूर्तता करण्यात येत आहे. मागील 11 महिने आमचे सरकार नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करत आहे त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार आहे. महारष्ट्र मध्ये गद्दार अड्डा बनला आहे. मुंबई हे आर्थिक राजधानी पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली त्यांचा मुलगा उध्दव ठाकरे पक्ष चालवत असताना त्यांनी गद्दारी करून सत्ता मिळवली. तसेच अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याशी गद्दारी करून सत्तेत सहभागी झाले.

खासदार अशोक चव्हाण देखील काँग्रेस पक्षा सोबत गद्दारी करून भाजप सोबत गेले. हे सर्वजण गुजरातचे गुलाम झाले असून मुंबई लुटण्याचे काम करत आहे. उद्योगपती गौतम अदानी यांना मुंबईतील भूखंड देण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. नरेंद्र मोदी यांची गुजरात किंवा देशात कोणती यशस्वी योजना नसून ते केवळ विरोधी पक्ष यांच्यावर आरोप करत आहे. तसेच धार्मिक आणि जातीय मुद्दे पुढे करत आहे. याबाबत नागरिकात राग असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीला साथ दिली आहे. यंदा देखील विधानसभा निवडणुकीत जनता आम्हाला साथ देईल अशी अपेक्षा आहे.

‘पर्वती’चा १५ वर्षात खुंटलेला विकास५ वर्षात पूर्ण करणार: आबा बागुल

पुणे-पर्वती विधानसभा मतदारसंघाचा १५ वर्षात खुंटलेला विकास ५ वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी दिली.
आबा बागुल यांच्या प्रचाराला सर्वच स्तरातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचाराच्या विविध टप्प्यात मतदारांनी मतदारसंघातील १५ वर्षांपासून भेडसावत असलेल्या समस्यांची कैफियत आबा बागुल यांच्यासमोर मांडली. विविध समस्यांच्या गर्तेतून सुटका कधी अशी व्यथा मांडताना पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वाहतूक कोंडी, कचरा,महिला सुरक्षितता आदींसह सर्वच प्रश्न जटील बनले आहेत.आता आमचे जगणे सुसह्य करायचे आहे. भावी पिढीचे जीवनमान उंचवायचे आहे. त्यामुळे आता आम्ही परिवर्तन करणार असा निर्धारही मतदारांनी व्यक्त केला आहे.

त्यावर आबा बागुल यांनी विकासाचा अनुशेष भरून काढताना राज्य शासनाच्या पातळीवर दर्जेदार शिक्षण, निरामय आरोग्य, सुरक्षितता, कोंडीमुक्त वाहतूक, कचऱ्याचे निवारण, तरुणांना रोजगार, मुबलक आणि समान पाणीपुरवठा यासह सर्वच प्रश्नांवर मी धोरणात्मक निर्णय करून घेण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यासाठी मला एकदा संधी द्या, त्याचे सोने केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.त्यासाठी बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी हिरा निशाणीसमोरील बटन दाबून विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

पर्वती मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा आराखडा तयार आहे. राज्यपातळीवर त्यासाठी धोरणात्मक निर्णय करून घेऊन पर्वती मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत समृद्ध केले जाईल. आजवर नगरसेवक पदाच्या माध्यमातून विविध आदर्शवत प्रकल्पांची उभारणी केली आहे. त्यामुळे ती दृष्टी माझ्याकडे आहे. जनहितासाठीच मी सदैव कटिबद्ध आहे. त्यासाठी जनतेचा उमेदवार म्हणून मला हिरा निशाणीसमोरील बटन दाबून विक्रमी मतांनी देणे आवश्यक आहे. असेही आबा बागुल म्हणाले.

स्वातंत्र्यानंतरही हिंदुस्थानचा समृद्ध इतिहास दडविला गेला : शरद पोंक्षे

‌‘सावरकर : एक क्रांतिज्वाला‌’ विषयावर व्याख्यान
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा उपक्रम
स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिज्वाला दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी : विश्व रानटी अवस्थेत जगत असताना सुसंस्कृत जीवनपद्धती जगणारा देश अशी हिंदुस्थानची ओळख होती. आक्रमणकर्त्यांमुळे हिंदू संस्कृतीची मोडतोड झाली. इंग्रजांच्या राजवटीत देशवासीयांना मानसिक, बौद्धिक पातळीवर दुबळे बनविले गेले. हिंदुस्थानची समृद्ध संस्कृती स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही दडपली गेली. हिंदूंनो आता तरी जावे व्हा, निदान स्वातंत्र्यानंतरचा इतिहास तरी वाचा त्यातून देशाचे वाटोळे कुणी केले हे तरी समजेल, असे परखड प्रतिपादन सावरकर अभ्यासक, चतुरस्र अभिनेते, लेखक शरद पोंक्षे यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे ‌‘सावरकर : एक क्रांतिज्वाला‌’ या विषयावर आयोजित व्याख्यानात पोंक्षे बोलत होते. निगडी प्राधिकरणातील मनोहर वाढोकार सभागृहात आयोजित कार्यक्रमात सावरकर साहित्य अभ्यासक, वक्ते अक्षय जोग यांची प्रमुख उपस्थिती होते. स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, विक्रम दिवाण, कृष्णा वैद्य, अतुल रेवाणीकर मंचावर होते. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिज्वाला या दिनदर्शिकेचे प्रकाशन या वेळी पोंक्षे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचा पदवितरण सोहळा या प्रसंगी झाला त्यात अमित सबनीस (ठाणे शहराध्यक्ष), आदीश जोशी (ठाणे शहर कार्याध्यक्ष), विदुला शेट्टीगार (अंबरनाथ शहर प्रमुख), श्री. वर्बे (महाराष्ट्र राज्य समन्वयक) यांना पद बहाल करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण हिंदू म्हणून जगू शकलो नसतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरुस्थानी मानून आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वेचले, असे नमूद करून शरद पोंक्षे म्हणाले, देशाचा वैभवशाली इतिहास शिक्षणपद्धतीत असावा यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आग्रही होते. पण इतिहासाची मोडतोड करून इतिहास शिकविला गेला. इतिहासात कुणाला रस नाही, संस्कृतीविषयी अभिमान नाही असे असताना भविष्य ठरविणार कसे? इतिहास वाचा कारण इतिहास भविष्य ठरवायला मदत करतो असे स्वातंत्र्यवीर सावरकर सांगत असत. आजही सरस्वतीचा अपमान होत आहे, हे विसरून कसे चालेल? राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करा, राष्ट्रासाठी खारीचा वाटा उचला, असे आवाहन पोंक्षे यांनी केले.
अक्षय जोग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वाविषयी विवेचन केले.
प्रास्ताविकात स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. सावरकर क्रांतिज्वाला दिनदर्शिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर विविध देशांमध्ये पोहोचली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. मान्यवरांचा परिचय सागर बर्वे यांनी करून दिला तर आभार सौरभ दुराफे यांनी मानले. सूत्रसंचालन शितल कापशीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसाद सराफ, चैतन्य कुलकर्णी, केदार भातलवंडे, रमाकांत जोग, संदीप गद्रे यांनी परिश्रम घेतले.

विधानसभा निवडणूक मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. १८: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामासाठी मतदार संघांच्या बाहेर असतील, तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने उदा. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व अन्य आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींना ही सुट्टी किंवा सवलत लागू राहील.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात सवलत देण्यात येते. मात्र, काही आस्थापना, संस्था भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे आदेश देण्यात आले असून सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास आस्थापनांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
0000

मतदानादिवशी सुट्टी किंवा सवलत न देणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येणार-अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ

पुणे, दि. १८: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास आस्थापनांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिली आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील, कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामासाठी मतदार संघांच्या बाहेर असतील, तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने उदा. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व अन्य आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींना ही सुट्टी किंवा सवलत लागू राहील. सर्व आस्थापना, कारखाने व दुकानांनी या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास पुणे विभाग सहाय्यक कामगार आयुक्त श्री. नि. अ. वाळके, भ्रमणध्वनी क्र.9975933416, श्रीमती त. श. अत्तार, भ्रमणध्वनी क्र. 9890424813, श्री. डी. डी. पवार, भ्रमणध्वनी क्र. 7775963065, दुकाने निरीक्षक श्री. बी. व्ही. लांडे, भ्रमणध्वनी क्र. 9921971163, श्री. राजेंद्र ताठे, भ्रमणध्वनी क्र. 9420763111 तसेच अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या alcpune5@gmail.com व कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, पुणे जिल्हा या कार्यालयाच्या dyclpune2021@gmail.com ई-मेल आयडीवर तक्रार दाखल करावी, असेही श्री. पोळ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

शाश्वत सुरक्षिततेची जाणीव झाल्यास झाडे मैत्री करतात; संवाद साधतात : दीपक जोशी

पुणे : झाड तोडले जात असताना त्यालाही प्रचंड वेदना होतात. ते आक्रोश करते, किंचाळतेही. झाडाला शाश्वत सुरक्षिततेची जाणीव करून दिल्यास ते आपल्याशी मैत्री करते, संवाद साधते, अशा भावना नक्षत्र वन उभारणारे दीपक जोशी यांनी व्यक्त केल्या. झाडे कधीही फसवत नाहीत, ती मतलबी नसतात तर कायम आधारस्तंभच असतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
वृक्षांना भावभावना असतात त्या जाणून पाच हजारांपेक्षा जास्त वृक्ष लावून त्यांचे संगोपन करणारे तसेच भारतातले पहिले संस्कारित वृक्षांचे नक्षत्र वन उभारणारे दीपक जोशी यांचा संवाद, पुणे, भावार्थ आणि अक्षरसेवा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योतिष विद्यावाचस्पती आरती घाटपांडे यांच्या हस्ते ‌‘वृक्षसखा पुरस्कार‌’ देऊन आज गौरव करण्यात आला. त्या व्ोळी सत्काराला उत्तर देताना जोशी बोलत होते. आयुर्वेदाचार्य डॉ. वेदिका साधले यांची प्रमुख उपस्थिती होती. अक्षरसेवाच्या विनिता पिंपळखरे, संवाद, पुणेचे सुनील महाजन, भावार्थच्या कीर्ती जोशी मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते. कोथरूड येथील भावार्थ पुस्तक दालनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दीपक जोशी म्हणाले, गुरूंच्या आदेशानुसार नक्षत्र वनाच्या निर्मिती कार्यास प्रारंभ केला. त्यांनी मला वनस्पतींशी संवाद साधण्याचे तंत्र शिकविले. वनस्पतींनीही मला खूप शिकविले, सतत मार्गदर्शन केले. झाडे एकमेकांशीही संवाद साधतात. मला झाडांशी बोलायला आवडते. प्रत्येक झाडाचा स्वभाव सुंदरच आहे, तो कळण्यासाठी त्याच्याशी दोस्ती होणे आवश्यक आहे. झाडांमध्ये जातीयवाद नाही, मोठे झाड कायमच लहान झाडाची काळजी घेते. अनेक झाडांना संगीत आवडते, असे सांगताना नक्षत्र वनात एका सुहृदांनी माऊथ ऑर्गनवर गाणे वाजविल्यावर बकुळीचे झाड कसे डोलू लागले याचा अनुभवही त्यांनी सांगितला. चैत्य वन, बोधी वन, नक्षत्र वन, शांती वन, गणेशमंत्र वन, पसायदान वन, देवराई आदी वनांची निर्मिती झाडांवरील प्रेमातून झाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

आरती घाटपांडे म्हणाल्या, वृक्षांवर संस्कार, माया करून, संवाद साधत नक्षत्र वनाची निर्मिती करणारे दीपक जोशी फक्त वृक्षसखाच नाही तर वृक्षांचा प्राणसखा आहेत. प्रत्येक वृक्षाबद्दलचे त्यांचे ज्ञान अगाध आहे. नक्षत्रांचा अभ्यास करताना जोशी यांचे नक्षत्र वृक्षांचे ज्ञान अनुभवायला मिळाले. नक्षत्र वृक्षांच्या सान्निध्यात राहणे हे आपल्याला पोषक ठरू शकते, त्यांच्यातून येणारी स्पंदने पूरक ठरतात.
सुरुवातीस विनिता पिंपळखरे यांनी पुरस्कारच्या आयोजनामागील भूमिका विशद करताना वृक्षांनाही भावभावना असतात, वृक्षांवर अफाट प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची जाणीव ठेवावी या उद्देशाने पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
डॉ. वेदिका साधले म्हणाल्या, दीपक जोशी यांनी निर्माण केलेले नक्षत्रवन संस्कारित आहे. ते वनस्पती संगोपनाचे, त्यांच्या पालन-पोषणाचे कार्य निस्पृहपणे करत आहेत. आयुर्वेद अभ्यासकांना त्यांच्या ज्ञानाचा, नक्षत्र वनाचा नक्कीच उपयोग होईल. समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी जोशी यांचे काम मोलाचे ठरणार आहे.
सन्मापत्राचे लेखन वलय मुळगुंद यांचे होते तर वाचन कीर्ती जोशी यांनी केले. सूत्रसंचालन मेधा गोखले यांनी केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.

प्रियंका गांधी यांच्या ‘रोड शो’त घुसून नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा

नागपूर- काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी नागपूरमध्ये पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे दोन रोड शो आयोजित केले होते. त्यापैकी एक रॅली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल ते बडकस भागापर्यंत होती. तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी कमळाचे झेंडे घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने -सामने येऊन तणाव निर्माण झाला होता. मात्र “भाजपच्या समर्थकांना मी शुभेच्छा देते, पण जिंकणार तर महाविकास आघाडीच,’ असे म्हणत प्रियंका यांनी आणखी चिथावले. त्यामुळे पुन्हा घोषणाबाजी वाढली. तणाव वाढल्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करून गदारोळ करणाऱ्यांना बाहेर काढले.

प्रियंका गांधींनी प्रथमच नागपूरकरांशी संवाद साधला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. यापूर्वी इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया व राहुल गांधी नागपुरात प्रचारासाठी आले होते. मात्र, प्रियंका यांचा हा पहिलाच दौरा होता. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील त्यांचा राेड शो उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. मध्य नागपूर मतदारसंघात मात्र भाजप कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याने त्यास गालबोट लागले.

पतीला धमकावणाऱ्या पत्नीची ‘अजित पवारांच्या राष्ट्रवादी’ची जाहिरात रोखली:निवडणूक आयोगाचा दणका

0

मुंबई- अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रचारासाठी तयार केलेली नवीन जाहिरात अडचणीत आली आहे. त्यात ‘घड्याळाला मतदान केले नाही तर तुम्हाला रात्री जेवायला देणार नाही,’ असे एका पत्नीचे पतीला उद्देशून वाक्य आहे. त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. हे वाक्य काढल्यानंतरच जाहिरात मंजूर करू, असे बजावले.

कुठलीही जाहिरात आयोगाकडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रकाशित करता येत नाही, असा नियम आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जाहिरातीतील काही भागावर, वाक्यावर आक्षेप घेतला आहे. जाहिरातीत पतीला उद्देशून पत्नी जे वाक्य बोलते हा प्रकार एक प्रकारे नवऱ्याला दिलेली धमकी आहे, असे आयोगाचे म्हणणे आहे. विशिष्ट पक्षाला मतदान न दिल्याने कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असे आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळे हा भाग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रवादीच्या जाहिरातीत घड्याळ चिन्ह वापरताना त्याखाली ठळक शब्दात ‘न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून’ असे लिहा तसेच शरद पवार यांचा फोटो बोर्डवर वापरू नका, असे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी सर्वाेच्च न्यायालयात होणार आहे.