Home Blog Page 575

दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राची पकड घट्ट झालेली पहायला मिळेल : शिवेंद्रराजे भोसले

डॉ. तारा भवाळकर, शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आधारित ‌‘मु. पो. तालकटोरा‌’ पुस्तकाचे प्रकाशन
99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान साताऱ्यास मिळावा : शिवेंद्रराजे भोसले

पुणे : मराठी भाषेची ओळख कधीच पुसली जाणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणे हा एकच ध्यास घेवून महाराष्ट्र साहित्य परिषदेसह सर्वांनी प्रयत्न केले. दिल्लीतील आंदोलन तसेच सतत पाठपुरावा करून या इच्छेला मूर्त स्वरूप मिळाले आहे. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी केले याचे कौतुक आहे. महाराष्ट्र आता मागे वळून पाहणार नाही. दिल्ली आता दूर नाही. दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राची पकड घट्ट झालेली पहायला मिळेल, असा विश्वास महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान साताऱ्यास मिळावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

सरहद, पुणे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार आणि उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आधारित ‌‘मु. पो. तालकटोरा‌’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या मसापच्या कार्यकर्त्यांचा सत्कार मंत्री भोसले यांच्या हस्ते आज (दि. 17) करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्ली येथे शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या निमित्त त्यांचा सन्मान प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. तर कार्यकर्त्यांचा सत्कार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, सरहद, पुणेचे संचालक डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर व्यासपीठावर होते.

राजकारण्यांना नेहमीच पत्रकार आणि साहित्यिकांची भीती असते असे सुरुवातीस सांगून शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, माझा साहित्याचा अभ्यास नाही परंतु, आवड नक्कीच आहे. साताऱ्यात साहित्यिक आणि कलाकार यावेत यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. साहित्य क्षेत्रात साताऱ्यातील मसाप शाखेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जात आहेत. सतत कार्यशील असणाऱ्या सातारकरांचा परिषदेवर ठसा उमटला आहे. सत्काराचा संदर्भ देऊन भोसले पुढे म्हणाले, एखाद्या मंत्र्याचे आंदोलक म्हणून स्वागत व सत्कार इतिहासात पहिल्यांदाच झाला असेल. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात मराठी भाषिकांना खुला प्रवेश मिळण्यासाठी तसेच स्पर्धा परिक्षा देणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची सोय करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.


मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आजीव सभासद आहे. परिषदेच्या अनेक उपक्रमात मी सहभागी असतो. परिषदेचे काम प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली उत्तम सुरू असून आम्ही साहित्य परिषदेच्या बरोबर आहोत.- शिवेंद्रसिंहराजे भोसले

अध्यपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, उदारमतवाद आणि वैचारिक मोकळेपणा हे महाराष्ट्राची परंपरा आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनात वैचारिक मोकळेपणाचे दर्शन घडले. विविध विचारधारांची आणि मतांची माणसे व्यासपीठावर होती; तरीही आपल्या विचारांशी ठाम राहतानाही त्यांच्यातील सौहार्द पाहायला मिळाले. याचीच आजच्या काळात गरज आहे. ते पुढे म्हणाले, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व करतात अशी लोकभावना आहे. ती दृढ करण्याचे काम संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या बाणेदार अध्यक्षीय भाषणातून केले. मराठी माणसांची मानसिकता हेच त्याच्या समोरचे मोठे आव्हान आहे. संकुचित मनोवृत्ती आणि कोतेपणा हा प्रगतीतला सगळ्यात मोठा अडसर आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी पक्ष, विचारधारा आणि राजकारण दूर ठेवून महत्त्वाच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची मानसिकता आणि राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली तरच महाराष्ट्राचे भले होईल. देशाला विचार आणि दिशा देणारे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे, ती जपली पाहिजे, असे आवाहन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. साताऱ्याला साहित्य संमेलनाचा मान मिळावा अशी गेल्या दहा वर्षांपासून मागणी आहे. या मागणीचा साकल्याने विचार केला जाईल, असे प्रा. जोशी म्हणाले. दिल्ली येथील साहित्य संमेलनाविषयी जेव्हा जेव्हा बोलले जाईल त्या त्या वेळी डॉ. भवाळकर, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यासह संमेलनाचे संयोजक संजय नहार यांचेही नाव आवर्जून घेतले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, दिल्ली म्हणजे पानीपत, दिल्लीचे तख्त मिळवता येणार नाही असा न्यूनगंड मराठीजनांमध्ये निर्माण झाला होता. दिल्लीत मराठी माणसे एकत्र येत नाहीत हा समजही दिल्ली येथे झालेल्या 98व्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दूर झाला. मराठी माणूस एकत्र येण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन दिल्लीतील मराठी जनांसाठी खुले करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राची दिल्लीतील पत वाढविण्यासाठी पुन्हा एकदा भोसले यांच्याबरोबर शिंदे आले तर हे शक्य होईल. तसेच पवार-शिंदे-भोसले एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्राचे नाव दिल्लीत गुंजणार नाही.

पुस्तकाविषयी बोलताना श्रीराम पवार म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्र धर्म काय आहे, तो काय सांगतो आणि भारताला तो काय देऊ इच्छितो याविषयी डॉ. तारा भवाळकर, शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार प्रकट झाले आहेत. राज्याची अस्मिता मातृभाषेशी जोडली जाते, राज्यकर्ते म्हणून भाषिक अस्मितेची भावना समजून घ्यावी, संमेलनाच्या मांडवात राजकारणी यावेत का, संमेलनाचा पोत राजकारण्यांमुळे बिघडतो का तसेच उत्तर आणि दक्षिणेचा संयोग असलेली महाराष्ट्राची समन्वयवादी संस्कृती, लोकसाहित्याचे मूल्य अशा विविध विषयांवर गंभीर चिंतन, मंथन, संचित या पुस्तकाद्वारे समाजापुढे येत आहे, हे नुसतेच दस्तावेजीकरण नव्हे तर या पुस्तकातून ठाम विचार पुढे येत आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विनोद कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. महाराष्ट्राच्या इतिहासाची उजळणी होताना छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य वगळून पुढे जाता येणार नाही, असे ते म्हणाले.

वासंतिक उटी कार्यक्रमाने एरंडवणा झाला भक्तीमय

पुणे- एरंडवणा भागातील वंदे मातरम् मित्र मंडळ, दहा चाळ येथे वारकरी सांप्रदाय पुणे (पश्चिम विभाग) यांच्यावतीने वासंतिक उटी कार्यक्रम पार पडला. वेळी टाळ मृदुंग गजरात अंभग भजनात तल्लीन भक्त, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती,लहान मुले आदी सहभागी झाले होते. वारकऱ्यांच्या सुमधुर पांडुरंगाच्या भजनाने संपूर्ण परिसर भक्तीमय केला होता.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या भक्ती करताना वारकरी सांप्रदायाकडून पुणे शहरातील विविध ठिकाणी वासंतिक उटीचे आयोजन केले जाते.यावेळी वारकरी सांप्रदाय, पुणे (पश्चिम विभाग) मधील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या श्री स्वामींच्या मठासमोरील बागेत वृक्षारोपण करण्यात आले. सदर प्रसंगी विणेकरी ह.भ.प. राघू महाराज सातपुते, ह.भ.प. पंढरीनाथ महाराज दुधाने, अध्यक्ष ह.भ.प. अण्णा गोसावी, सेक्रेटरी ह.भ.प. प्रताप चोरगे, खजिनदार ह.भ.प. अनंत सुतार, उपाध्यक्ष ह.भ.प. शिवाजी कदम, सह सेक्रेटरी ह.भ.प. अजित ठोंबरे, ह.भ.प. गणेश ठाकर, कार्याध्यक्ष ह.भ.प. परशुराम खाडे, सह कार्याध्यक्ष ह. भ.प. गणेश शेडगे, भजन समिती ह.भ.प. शंकर महाराज खोपडे,ह. भ.प. अण्णा महाराज चव्हाण, ह. भ.प. वसंतरावजी कंधारे यांचा श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानकडून सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वासंतिक उठी कार्यक्रम संपल्यानंतर मोठ्या संख्येने भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सदरप्रसंगी एरंडवणा भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक युवती श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दर्शन पोटे,वंदे मातरम मित्र मंडळचे अध्यक्ष, युवा नेतृत्व अजय कंधारे,तेजस वाशिवले, वैभव पानगावकर, स्वप्नील लोखंडे, सुयश बलकवडे,एकनाथ साठे, दशरथ पिसे,राहुल मारणे, केतन साळुंखे, सुमित मालपोटे, ऋषिकेश गायकवाड,किशोर साळुंखे,नयन गोपालघरे,शुभम गोळे, साहिल साठे,सचिन पोटे,तेजस शिळवणे, किरण शेडगे, सोहम ठोंबरे, देवा मारणे, अमोल भिलारे,वेंकटेश कदम,चैतन्य पोटे,शुभम लोखंडे,यश मारणे,राहुल जाधव ओम मारणे ,ओमकार बलकवडे,तसेच वारकरी संप्रदाय पुणे पश्चिम विभाग चे वारकरी,वंदे मातरम मित्र मंडळ आणि प्रेरणा मंदिराचे सभासद सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

राजगड सहकारी साखर कारखान्यात असे काय झाले , संग्राम थोपटे भाजपात निघाले ….

पुणे- रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आता काँग्रेसला पुण्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मातब्बर नेते आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे देखील काँग्रेसची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. संग्राम थोपटे हे 22 एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संग्राम थोपटे यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नाही. ते सध्या आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत असून चर्चेनंतर रविवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.संग्राम थोपटे हे राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा हा कारखाना अडचणीत असल्याची माहिती आहे. या कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केले होते. पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती. आता या कारखान्याला मदत मिळण्यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

संग्राम थोपटे हे काँग्रेसचे नेते असून भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघांमधून सलग तीन वेळा आमदार झालेले आहेत. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी सहा वेळा भोर विधानसभेचे नेतृत्व केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांना 20 हजार मतांनी पराभूत केले होते.

संग्राम थोपटे हे भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. रविवारी राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या 22 एप्रिल रोजी ते भाजपात प्रवेश करतील. मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होईल, असे सांगितले जात आहे.

संग्राम थोपटे यांना राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांना राजकारणाचे बाळकडू वडिलांकडूनच मिळाले. संग्राम थोपटे हे 2002 ते 2003 या काळात भोर पंचायत समितीचे उपसभापती होते. 2007 ते 2024 या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहिलेले आहेत. याशिवाय ते याच काळात भोर येथील राजगड सहकारी साखर कारखाना अनंतनगर निगडेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. तसेच त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी लढवली होती. या निवडणुकीत ते जिंकून आले होते. यानंतर 2014 आणि 2019 अशी सलग तीनवेळा विधानसभा निवडणूक जिंकले होते.

हनुमान जयंतीच्या दिवशी अजान रोखण्याचा प्रयत्न:खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे- हनुमान जयंतीच्या दिवशी रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी रात्री ८ः१५ वा चे सुमारास पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी यावेळी लगत असलेल्या छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्यासाठी छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यातील मशिदीत शिरण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केला.

डंबाळे म्हणाले,यावेळी स्थानिक मुस्लिम नागरिकांना मेधा कुलकर्णी यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली. परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाईट प्रसंग घडला नाही. दरम्यान या सर्व गोंधळापूर्वी त्यांनी छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा विषयी चिथावणी देणारी विधाने त्यांच्या भाषणातून केली होती. यासंदर्भात छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्ट कडून तातडीने तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक तसेच निंदनीय आहे. मुळात हा मुद्दा व परिसर अत्यंत संवेदनशील असून यावर अशा पध्दतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकीचे आहे. केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखविण्याचा व त्याद्वारे वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा हा प्रकार आहे. हा संपूर्ण प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देणारा असून यामुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे. खासदार यांना जे काही आक्षेपार्ह वाटत असेल त्याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असताना, केवळ स्टंट करुन दंगलसदृश परिस्थिती निर्माण केली. प्रकरणी कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे अशी माहिती राहुल डंबाळे यांनी यावेळी दिली.

UTT सीझन ६ लिलाव: पीबीजी पुणे जॅग्वार्सने अल्वारो रोब्लेसला कायम ठेवले, इजिप्तच्या दिना मेशरेफ, २०२३ चॅम्पियन रीथ रिश्याला करारबद्ध केले

मुंबई : पीबीजी पुणे जॅग्वार्सने इंडियनऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ६ साठी एक मजबूत संघ तयार केला आहे. ज्यामुळे संघ बंगळुरूहून पुण्याला स्थलांतरित होत असताना एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. त्यांच्या रोस्टरचे नेतृत्व स्पॅनिश स्टार अल्वारो रोब्लेस (जागतिक क्रमवारीत ३६) करणार आहे, तर त्यांच्या महिला संघाला इजिप्तची टेबल टेनिस सेन्सेशन दिना मेशरेफ (जागतिक क्रमवारीत ३८) आणि २०२३ यूटीटी चॅम्पियन रीथ रिश्या यांच्या समावेशाने मोठी ताकद मिळाली आहे. या हंगामाचा लिलाव महत्त्वपूर्ण होता, कारण त्यात पहिल्यांदाच खेळाडूंनी लिलाव पूलमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे संघ निवडीमध्ये रणनीतीचा एक नवीन स्तर जोडला गेला.

गेल्या वर्षीचे कर्णधार आणि दुहेरीतील मुख्य खेळाडू, अल्वारो रोब्लेस यांना जॅग्वार्सने १८.१ लाख टोकनमध्ये निवडले, ज्यामुळे तो सीझन ६ मधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लावणारा खेळाडू ठरला. पुण्याने नाशिकमधील उदयोन्मुख प्रतिभा तनीशा कोटेचा यांना कायम ठेवण्यासाठी त्यांच्या आरटीएम कार्डचा वापर केला. दिना मेशरेफसाठी ११ लाख टोकन्स, २०२३ मध्ये गोव्याच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारी रीथ रिश्या व अनिर्बन घोष यांच्यासाठी प्रत्येकी ४ लाख टोकन्स आणि मुदिती दानीसाठी २.२ लाख टोकन्स त्यांनी मोजले.

” अल्वारो परत आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. गेल्या हंगामात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि तो प्रचंड अनुभव घेऊन येतो. तनीशासाठी राईट टू मॅच कार्ड वापरणे हे सातत्य निर्माण करण्याच्या आमच्या हेतूचे प्रतिबिंब आहे. दिना, रीथ, मुदित आणि अनिर्बन यांना समाविष्ट केल्याने आम्हाला एक संतुलित आणि स्पर्धात्मक संघ मिळाला आहे. या हंगामात आमचे लक्ष केवळ पुण्याचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणारा संघ तयार करण्यावर नाही, तर आमच्या महिला खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळाचा फायदा घ्यायचा आहे. ज्या सामन्याच्या निकालांना आणि आमच्या एकूण रणनीतीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे पुणे जॅग्वार्सचे मालक पुनीत बालन म्हणाले.

यूटीटीचे प्रशिक्षक स्लोव्हेनियाच्या अनुभवी वेस्ना ओज्टेरसेक आणि सुभाजित साहा हे सीझन ६ मध्ये जॅग्वार्ससाठी कोचिंग रोस्टर्सचे नेतृत्व करतील.

अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) च्या सह-प्रवर्तक विटा दानी लिलावाबद्दल बोलताना म्हणाल्या, “या लिलावाने संघ कसे तयार करतात यात एक नवीन सखोलता जोडली आहे. अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि तरुण भारतीय प्रतिभेला समान लक्ष दिले जात आहे, हे पाहून उत्साह वाढला. हे संतुलन इंडियनऑइल यूटीटीने गेल्या काही वर्षांत भारतीय टेबल टेनिस परिसंस्थेवर कसा प्रभाव पाडला आहे हे प्रतिबिंबित करते. सीझन ६ मध्ये काय आहे आणि ते कोणत्या पातळीचे स्पर्धेचे आश्वासन देते याबद्दल आम्ही उत्सुक आहोत.”

सर्व आठही संघ पाच साखळी सामने खेळतील, तर अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली नीरज बजाज आणि विटा दानी यांनी सह-प्रमोट केलेली फ्रँचायझी-आधारित लीग २९ मे ते १५ जून दरम्यान अहमदाबादमधील EKA अरेना येथे होईल.

पीबीजी पुणे जॅग्वार्स स्क्वॉड: अल्वारो रोब्लेस (स्पेन) – १८.१ लाख टोकन, दिना मेशरेफ (इजिप्त) – ११ लाख टोकन, तनीशा कोटेचा – ४ लाख टोकन (RTM), अनिर्बन घोष – ४ लाख टोकन, रीथ रिश्या – ४ लाख टोकन्स, मुदीत दानी – २.२ लाख टोकन्स

UTT २०२५ लिलाव – सर्वोच्च बोली लावलेले खेळाडू (Top Buys)

फॅन सिकी – १९.७ लाख (चेन्नई लायन्स)

अॅड्रियाना डाएझ – १९.३ लाख (कोलकाता थंडर ब्लेड्स)

अल्वारो रोब्लेस – १८.१ लाख (PBG पुणे जॅग्वार्स)

झेंग जियान – १७.२ लाख (गोवा चॅलेंजर्स TTC)

बेर्नाडेट सॉक्स – १५.३ लाख (यू मुंबई TT)

दिया चितळे – १४.१ लाख (दबंग दिल्ली TTC)

हर्मीत देसाई – १४ लाख (गोवा चॅलेंजर्स)

अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) बद्दल
२०१७ मध्ये सुरू झालेला अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) हा भारताचा प्रमुख फ्रँचायझी-आधारित टेबल टेनिस लीग आहे, जो नीरज बजाज आणि विता दानी यांनी टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (टीटीएफआय) च्या छत्रछायेखाली प्रचारित केला आहे. आज, यूटीटी ही आठ संघांची स्पर्धा आहे, ज्यामध्ये ४८ जागतिक दर्जाचे खेळाडू प्रतिष्ठित विजेतेपदासाठी लढतात. ही लीग भारत आणि जगभरातील अव्वल खेळाडू आणि प्रशिक्षकांना आकर्षित करते, ज्यामध्ये ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांचे पदक विजेते सामील आहेत. यूटीटी राष्ट्रीय रँकिंग स्पर्धांना प्रायोजित करून, टेबल टेनिस सुपर लीग आणि देशात डब्ल्यूटीटी इव्हेंट्सचे सह-आयोजन करून खेळाला प्रोत्साहन देते. प्रत्येक आवृत्तीसह, यूटीटी जागतिक टेबल टेनिसचा उत्सव म्हणून आपले स्थान मजबूत करते, खेळाचा दर्जा उंचावते आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देते.

ईडी, सीबीआयच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही: रमेश चेन्नीथला.

जनतेला फसवणा-या महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष लढाई तीव्र करणार: हर्षवर्धन सपकाळ.

ED चा गैरवापर करणा-या केंद्र सरकार विरोधात दादरमध्ये काँग्रेसचे आंदोलन.

टिळक भवन येथे प्रभारींच्या उपस्थित काँग्रेस खासदार व ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका संपन्न.

स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ज्ञवल्क्य जिचकार व आपचे धनंजय शिंदे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई, दि. १७ एप्रिल २०१५
केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. मोदी-शाह अशा कारवाया करून काँग्रेस पक्षाला संपवू शकत नाहीत आणि अशा कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही उलट मजबूतपणे या हुकुमशाहीचा मुकाबला करू, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ED च्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील इंडिया बुल्स जवळ आंदोलन केले. या आंदोलनात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, काँग्रेसे वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. रजनीताई पाटील, खा. प्रणिती शिंदे, खा. श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री अॅड. यशमोती ठाकूर, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, डॉ. विश्वजीत कदम, खा. डॉ. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, खा. नामदेव किरसान, खा. बळवंत वानखेडे, खा. डॉ. शोभा बच्छाव, खा. डॉ. शिवाजी काळगे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, यु. बी. व्यंकटेश, आ. भाई जगताप, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, माजी खा. हुसेन दलवाई, माजी आ. राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संघटन ऍड. गणेश पाटील, मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, रामचंद्र दळवी, ब्रीज दत्त, अभिजीत सपकाळ, श्रीरंग बर्गे, सचिव अजिंक्य देसाई, विश्वजीत हाप्पे, यशपाल भिंगे, आनंद सिंह, सुभाष पाखरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, मोदी सरकारने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. जनतेत या कारवाईबद्दल तीव्र रोष आहे. काँग्रेस पक्षाने या दडपशाही विरोधात काल व आज दोन दिवस देशभर आंदोलन केले, महाराष्ट्रातही विविध ठिकाणी आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध केला. मोदी शाह यांच्या सरकार विरोधात यापुढेही काँग्रेस पक्ष मजबूतीने लढा देईल असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी दिला.

महाबळेश्वरला काँग्रेसचे शिबिर..
राज्यातील युती सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन विसरले असून आता फक्त ५०० रुपयेच दिले जात आहेत. महायुतीने केवळ मतांसाठी योजना आणली होती. महायुती लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे, हे काँग्रेसने आधीच सांगितले होते. प्रदेश व जिल्हा स्तरावरील कार्यकारिणीची पुर्नरचना लवकरच केली जाईल आणि महाबळेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे एक शिबीर आयोजित केले जाणार आहे, अशी माहितीही चेन्नीथला यांनी दिली.

काँग्रेस खासदार व ज्येष्ठ नेत्यांची बैठक..
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.३० वाजता काँग्रेस पक्षाच्या खासदारांची बैठक झाली, त्यानंतर दुपारी २ वाजता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. संवाद, समन्वय रणनिती यावर या बैठकीत चर्चा झाली तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांवर सभागृहात व सभागृहाबाहेर आवाज उठवणे आणि जनतेचे मुद्दे उपस्थित करण्यावर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

काँग्रेस पक्ष प्रवेश.
काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ज्ञवल्क्य जिचकार यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला. निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, ती मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.
आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते धनंजय शिंदे यांनीही आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोघांचेही काँग्रेस परिवारात स्वागत केले.

वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीचे स्वागत, नवीन कायदा रद्द करा: नसीम खान.

मुंबई, दि. १७ एप्रिल २०२५
केंद्रातील मोदी सरकारने बहुतमताच्या जोरावर घटना विरोधी वक्फ विधेयक मंजूर करून घेतले असले तरी काँग्रेस पक्ष व विविध संघटनांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याची मा. सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. मा. सुप्रीम कार्टाने वक्फ दुरुस्ती कायद्याला दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीचे स्वागत करून नवीन वक्फ कायदा रद्द करावा, अशी मागणी माजी मंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नसीम खान पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला मुस्लीम समाजाच्या हिताचे काहीही देणेघेणे नाही. गरिब मुस्लिमांच्या कल्याणाच्या नावाखाली त्यांनी जो कायदा मंजूर केला तो घटनाविरोधी आहे. भाजपा खोटी माहिती पसरवून अपप्रचार करत आहे. काँग्रेस पक्षासह विविध पक्ष व संघटानांनी वक्फ कायद्यातील दुरुस्तीवर गंभीर आक्षेप घेतले होते. भाजपामध्ये जे मुस्लीम समाजाचे नेते होते त्यांना आता भाजपात काहीही स्थान राहिलेले नाही, त्यांची राजकीय कारकिर्द मोदी शाह यांच्या भाजपानेच संपवली आहे. काँग्रेस पक्षात मात्र सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतले जाते, त्यांना योग्य ती संधी दिली जाते.काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा सर्व जाती धर्मांचे झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती घेतली तर त्यांच्या ते लक्षात येईल. भाजपानेच त्यांचा पक्षात अल्पसंख्यांकांना काय स्थान आहे ते सांगावे आणि काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोणाला करावे हे सांगण्याचा अधिकार मोदींना नाही असेही नसीम खान म्हणाले.

वक्फ विधेयक असंवैधानिकच आता आमची कायदेशीर लढाई सुरूच राहील”- खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली-

वक्फ सुधारणा विधेयकालाच असंवैधानिक ठरविणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी आपण संपूर्ण वक्फ कायद्याला असंवैधानिक मानत असल्याचं म्हटलं आहे.

वक्फ विधेयकाची मागील काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी लोकसभा आणि राज्यसभेत हे वक्फ विधेयक मंजूर करण्यात आलं
त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या वक्फ विधेयकाला मंजूरी दिली. त्यानंतर या वक्फ विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं. मात्र, वक्फ विधेयकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

“आम्ही संपूर्ण वक्फ सुधारणा विधेयकालाच असंवैधानिक मानत आहोत. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत आम्ही आधीपासून बोलत आलेलो आहोत. अनुच्छेद २५,अनुच्छेद २६, अनुच्छेद १५, अनुच्छेद २९ चं उल्लंघन होत असल्याचं मी याअगोदरही म्हटलं होतं आणि आता देखील तेच म्हणत आहे”, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.”तसेच आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की केंद्रीय वक्फ वक्फ बोर्डावर आणि राज्य वक्फ बोर्डावर कोणतहीही नियुक्ती केली जाणार नाही. असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जेपीसीच्या चर्चेदरम्यान देखील सरकारने प्रस्तावित केलेल्या सर्व सुधारणांना मी विरोध केला होता. त्या संदर्भातील अहवाल देखील मी दिला होता. तसेच वक्फ सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान मी हे विधेयक असंवैधानिक म्हटलं होतं. तसेच आता या कायद्याविरुद्ध आमची कायदेशीर लढाई सुरूच राहील”, असं खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

न्यायालयाने कोणत्या कलमांवर स्थगिती दिली?

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने न्यायालयाला दोन मुद्द्यांवर आश्वासन दिलं. त्यानुसार पुढील सुनावणी होईपर्यंत नव्या कायद्यानुसार बाहेरील सदस्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली जाणार नाही. त्याशिवाय, वक्फ बोर्डानं एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची असल्याचं जाहीर केलं असेल, तर त्यात पुढील सुनावणीपर्यंत हस्तक्षेप करणार नाही. या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली असून येत्या ७ दिवसांत केंद्र सरकारला या मुद्द्यांवर भूमिका सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, आजच्या अंतरिम आदेशांन्वये पूर्ण कायद्यावर कोणत्याही प्रकारे स्थगिती आणली जात नसल्याचं सरन्यायाधीशांनी यावेळी स्पष्ट केलं. “कुणीतरी कायद्यावर पूर्ण स्थगितीची मागणी केली. पण आम्ही तशी स्थगिती लागू करत नाही आहोत. आज आम्हाला परिस्थिती बदलू द्यायची नाहीये. पाच वर्ष इस्लामचं पालन करण्याची अटही कायद्यात आहे. तिच्यावर स्थगिती आणलेली नाही”, असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.

वक्फ कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाने दिले अंतरिम आदेश!

नवी दिल्ली -केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी लोकसभा व राज्यसभेत वक्फ विधेयक मंजूर करून घेतलं. यानंतर राष्ट्रपतींच्य स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रुपांतर झालं.पण या विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर त्यावर सविस्तर सुनावणी सुरू झाली. या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. वक्फ कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीवर तात्पुरती स्थगिती आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

आज सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने न्यायालयाला दोन मुद्द्यांवर आश्वासन दिलं आहे. त्यानुसार पुढील सुनावणी होईपर्यंत नव्या कायद्यानुसार बाहेरील सदस्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली जाणार नाही. त्याशिवाय, वक्फ बोर्डानं एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची असल्याचं जाहीर केलं असेल, तर त्यात पुढील सुनावणीपर्यंत हस्तक्षेप करणार नाही. या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली असून येत्या ७ दिवसांत केंद्र सरकारला या मुद्द्यांवर भूमिका सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार व न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत कायद्याच्या विरोधात याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील राजीव धवन, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, सी. यू. सिंह, राजीव शाकधर, संजय हेगडे, हझेफा अहमदी व शादान फरासत या वकिलांनी बाजू मांडली. तर केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी व रणजित कुमार यांनी बाजू मांडली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्यावर आक्षेप घेणाऱ्या जवळपास १५० हून अधिक याचिका दाखल झाल्या आहेत. याचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने यातल्या फक्त पाच याचिकाच प्रातिनिधिक म्हणून स्वीकारल्या जाऊन त्यावरच सुनावणी घेतली जाईल. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी सर्व याचिकांमधून पाच याचिका प्रातिनिधिक म्हणून निवडून न्यायालयाला सादर करण्यास सहमती दर्शवली असल्याचंही न्यायालयानं यावेळी नमूद केलं.
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे सात दिवसांचा अवधी मागितल्यानंतर न्यायालयाने त्याल मंजुरी दिली आहे. तसेच, यानंतरची या प्रकरणाची सुनावणी ५ मे रोजी दुपारी २ वाजता ठेवण्यात आली आहे. सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना येत्या १४ मे रोजी निवृत्त होत असून त्याआधीच या प्रकरणाची सुनावणी घेतली जाईल.

वक्फ कायद्यावर पूर्ण स्थगिती नाहीदरम्यान, आजच्या अंतरिम आदेशांन्वये पूर्ण कायद्यावर कोणत्याही प्रकारे स्थगिती आणली जात नसल्याचं सरन्यायाधीशांनी यावेळी स्पष्ट केलं. “कुणीतरी कायद्यावर पूर्ण स्थगितीची मागणी केली. पण आम्ही तशी स्थगिती लागू करत नाही आहोत. आज आम्हाला परिस्थिती बदलू द्यायची नाहीये. पाच वर्ष इस्लामचं पालन करण्याची अटही कायद्यात आहे. तिच्यावर स्थगिती आणलेली नाही”, असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.

‘कला उत्सव’ मधून अवतरणार अद्वितीय ‘चित्र’ कलेची दुनिया

द्विज आर्ट्सच्या वतीने दि. २१ व २२ एप्रिल दरम्यान प्रदर्शनाचे आयोजन ; तब्बल ११२ कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश
पुणे : द्विज आर्ट्सच्या माध्यमातून पुण्यातील कला क्षेत्रात विशेष स्थान मिळवलेल्या चार कलाकारांनी एकत्र येत ‘कला उत्सव’ या आगळ्यावेगळ्या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दिनांक २१ व २२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात हे प्रदर्शन होणार आहे, अशी माहिती हेतल शहा आणि दीपाली जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला हेतल शहा, दीपाली जगताप, अवंती करंजवाला आणि मोहिनी गेंदे उपस्थित होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात चित्रकार चारूहास पंडित यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, महेश थोरात आणि  हनुमंत जगनगडा हे मान्यवर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. चित्रकार हेतल शहा, दीपाली जगताप, अवंती करंजवाला आणि मोहिनी गेंदे या आपापल्या कला वर्गांमधून कलाकार घडवणाऱ्या गुरू असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सुंदर कलाकृती प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

दीपाली जगताप म्हणाल्या, या प्रदर्शनात एकूण ११२ कलाकार सहभागी होणार असून, विशेष म्हणजे ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनात एकूण ६५० हून अधिक चित्रे असणार आहेत. चारकोल, सॉफ्ट पेस्टल, वॉटर कलर्स, ऍक्रेलिक पेंटिंग्स, कॅलिग्राफी, टेक्स्चर आर्ट अशा विविध माध्यमांतील कलाकृतींनी सजलेले हे प्रदर्शन रसिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे.  प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सनश्योर एनर्जीकडून सुझलॉनला 100.8 मेगावॅटचा पवन ऊर्जा ऑर्डर मिळाली

अक्षय्यऊर्जा वापराला चालना देण्यासाठी आयपीपींसोबत भागीदारी

पुणे: सुझलॉन स्वतंत्र ऊर्जा उत्पादक (IPPs) द्वारे मोठ्या कंपन्यांमध्ये अक्षय्य ऊर्जेचा वापर वाढवत आहे. याच माध्यमातून भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला आणि 2030 पर्यंत 500 GW नॉन-फॉसिल इंधन क्षमता साध्य करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला पाठिंबा देत आहे. या वचनबद्धतेला अधिक भक्कम करत, सुझलॉनने सनश्योर एनर्जीकडून 100.8 मेगावॅट ईपीसी पवन ऊर्जा ऑर्डर मिळवली आहे, ज्यामुळे पवन ऊर्जेमध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील जत भागात राबवला जाणार आहे.

या करारांतर्गत, सुझलॉन 48 अत्याधुनिक S120 विंड टर्बाइन जनरेटर (WTGs) हायब्रिड लॅटिस टॉवर्स (HLT) सह पुरवेल. यासोबतच प्रत्येकी 2.1 मेगावॅट क्षमतेचे रेटिंग दिले जाईल. ते विंड टर्बाइन पुरवेल, बसवलेल्या उपकरणांचे निरीक्षण करेल आणि प्रकल्पाची अंमलबजावणी करेल, ज्यामध्ये त्याची उभारणी आणि कार्यान्वयन समाविष्ट आहे. कार्यान्वित झाल्यानंतर व्यापक ऑपरेशन्स आणि त्याची देखभाल देखील करेल. हा प्रकल्प सनश्योर एनर्जीच्या अक्षय्य ऊर्जा पोर्टफोलिओमध्ये वाढ करेल आणि महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील ग्राहकांना चोवीस तास वीज देण्याच्या त्यांच्या ध्येयाला पाठबळ देईल.

सुझलॉन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जे.पी. चालासानी म्हणाले, “2030 पर्यंत भारताचे 500 गिगावॅट नॉन-फॉसिलचे इंधन लक्ष्य साध्य करण्यासाठी मोठ्या कंपन्यांनी पवन ऊर्जा स्वीकारणे अत्यावश्यक आहे. पवन ऊर्जेचा प्रसार मोठ्या  प्रमाणात होत असून स्वतंत्र ऊर्जा उत्पादक (आयपीपी) त्याची ही क्षमता ओळखूनच वीज अधिक सुलभ, परवडणारी आणि उच्च दर्जाची बनविण्यासाठी पवन उर्जेला प्राधान्य देत आहेत. हे संक्रमण केवळ आमच्या ऊर्जा उद्दिष्टांना समर्थन देत नाही तर संपूर्ण उद्योगात शाश्वत आर्थिक वाढ आणि नवोपक्रमाला चालना देते.”

सुझलॉन ग्रुपच्या इंडिया बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक श्रीवास्तव म्हणाले, “भारताच्या अक्षय्य ऊर्जा संक्रमणाला चालना देणाऱ्या सनश्योर एनर्जीसोबत त्यांच्या पहिल्या पवन प्रकल्पात भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. देशातील अक्षय्य ऊर्जा चळवळीला चालना देण्यासाठी भारतातील असंख्य स्वतंत्र वीज उत्पादकांसोबत (आयपीपी) सहयोग करण्याचे आमचे ध्येय आहे.”

सनश्योर एनर्जीचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी (सीसीओ) श्री. मनीष मेहता म्हणाले, “आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम अक्षय्य  ऊर्जा उपायांसह सक्षम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. महाराष्ट्रात पवन ऊर्जेचा समावेश करण्यासाठी आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार केल्याने चोवीस तास आमच्या (आरटीसी) अक्षय्य ऊर्जा क्षमता वाढतील, ज्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांच्या वीज वापराचा आणखी मोठा वाटा नैसर्गिक उर्जेसह भरून काढता येईल. हा प्रकल्प सनशुअर एनर्जीच्या अक्षय्य ऊर्जा पोर्टफोलिओमध्ये विविधता आणतो आणि 2030 पर्यंत 10 गिगावॅट क्षमतेपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सुझलॉनसोबतची ही भागीदारी आम्हाला भारताच्या व्यवसायांसाठी सर्वात विश्वासार्ह स्वच्छ ऊर्जा उपाय तयार करण्यात आणि भारताच्या शाश्वत भविष्यासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यात मदत करेल.”

पुणे शहर जिल्हा इंटक काँग्रेसच्या अध्यक्षपदी चेतन आगरवाल 

पुणे – काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चेतन सुरेश आगरवाल यांची पुणे शहर जिल्हा इंटकच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी.संजीवा रेड्डी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम  यांनी नियुक्तीचे पत्र चेतन आगरवाल यांना सुपूर्द केले.

चेतन आगरवाल कॉंग्रेस पक्षाचे जुने निष्ठावंत  कार्यकर्ते असून पक्षाच्या माध्यमातून ब्लॉक सरचिटणीस, युवक काँग्रेस सरचिटणीस, शहर काँग्रेस सरचिटणीस यासह पुणे जिल्हा विद्युत मंडळ समन्वय समिती तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती (महाराष्ट्र शासन) अशा विवीध पदांवर काम केले आहे. क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. 

चेतन आगरवाल यांचे वडील कै.सुरेश आगरवाल हे सुद्धा विद्युत मंडळामधे इंटक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. घरामधून कामगार क्षेत्राचा  अनुभव मला मिळाला त्याचा उपयोग मी इंटक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत करीन, असे चेतन आगरवाल यांनी सांगितले. भाजप सरकारने कामगारांसाठी जुलमी कायदे केले आहेत त्या विरोधात कामगारांना न्याय मिळेपर्यंत लढत रहाणार आहे, अशी प्रतिक्रिया चेतन आगरवाल यांनी दिली.

कथाकट्टाचे “भय इथले संपत नाही”

ब्लॅक बॅाक्स क्रिएशन्स निर्मित “भय इथले संपत नाही” हा एक आगळावेगळा अभिवाचनाचा कार्यक्रम शुक्रवार ११ एप्रिल २०२५ रोजी भरत नाट्य मंदीर येथे सादर झाला. कथाकट्टाच्या कलाकारांनी या दोनअंकी प्रयोगामधे ४ भय व गूढ कथांचे नाट्यमय पध्दतीने अभिवाचन केले. या कार्यक्रमासाठी नारायण धारप, रत्नाकर मतकरी, राजीव तांबे आणि आशुतोष उकिडवे यांच्या उत्तम कथांची निवड केली होती. प्रभावी नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीताचा परिणामकारक उपयोग यामुळे प्रेक्षकांना उत्तम नाट्यानुभव मिळाला. पात्रांच्या गरजेनुसार आकर्षक रंगभूषा आणि वेशभूषा केल्यामुळे त्या अनुभवामध्ये अधिक भर पडली. कार्यक्रमादरम्यान कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून नाट्यवाचन करत रसिकांना खिळवून ठेवले.

या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन श्री. देवेंद्र भिडे यांचे होते. तर मानसी जोगळेकर, वंदना गरगटे, पूजा गिरी, डॅा. समीर डोलारे, सिद्धी गंदीगुडे, पराग फडके, जन्मजेय खुर्जेकर, माधव सोमण, मधूर डोलारे, रेणुका भिडे, देवेंद्र भिडे, तन्वी गिरी, सचिन यंदे, अथर्व कुलकर्णी, आरोही डोलारे, अंतरा डोलारे यांचा सहभाग होता. प्रकाशयोजना योगेंद्र साने, संगीत संयोजन – निरंजन देशपांडे, रंगभूषा – नरेंद्र वीर यांचे होते.

या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. “भय इथले संपत नाही” चा पुढचा प्रयोग शुक्रवार २५ एप्रिल रोजी रात्री ९.३० वा भरत नाट्य मंदीर येथे रंगणार आहे. तरी एक अनपेक्षित पध्दतीने भय व गूढ कथांचा नाट्यानुभव देणारा अभिवाचनाचा हा कार्यक्रम पाहण्यास उत्सुक प्रेक्षकांनी जरूर हजेरी लावावी.

ब्राह्मसंगीत पुणेकरांनी अनुभवल्या भक्त अनंत आनंदधारा

पुणे प्रार्थनाच्यावतीने चैत्रोत्सव २०२५ चे उत्तर – उपासना ग्लोबल फोरमच्या समाजाचे ब्राह्म संगीत सादरीकरण
पुणे : भक्ती, सौंदर्य आणि सत्य आराधनेचे प्रतीक असलेले ‘आनंद लोके, मंगला लोके, बिराजो सत्य’ हे स्तुतीगीत, ‘हे सखा मम हृदये रहो विश्वे सर्व काजे, ध्याने ज्ञाने हृदये’, या गीतांतून व्यक्त होणारे आत्मीय भक्तीभाव… हे भय होते तेव्हा अभय, नूतन, या जननी गीतातून देवाची करुणामय आळवणी… रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या अशा विविध ब्राह्मण गीते पुणेकरांनी आध्यात्मिक आनंदधारेचा अनुभव प्रकट केला.

पुणे प्रार्थना समाजाच्या चैत्रोत्सव २०२५ चे उत्तर आले. फक्त उपासना ग्लोबल फोरम, पुणे यांच्या पूर्ततेसाठी ‘अनंत आनंदधारा’ या विशेष कार्यक्रमात ब्राह्म संगीत सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष डॉ. सुषमा जोग, सचिव डॉ. दिलीप जोग, तसेच उषाताई शर्मा, प्रशांत पडवे, धनराज निंबाळकर, भास्कर मुजुमदार, डॉ.शिल्पा मुजुमदार हे सदस्य, तसेच डॉ. माधवी मित्रा, मुखोपाध्याय, अमित मझुमदार, सुरेखा शर्मा आदि मान्यवर उपस्थित होते.

श्रेया करमाकर, संदीप रॉय, प्रियांका भट्टाचार्य, मोता दास, सयारी दास, सौमिली दास, शॉम्पा रॉय, कुमकुम शहा, पांचाली गोस्वामी, मोमिता कुमार, मोमिता चॅटर्जी, रंजनाशील, निलांजन भट्टाचार्य यांनी सादरीकरण केले. अक्षय शेळके (तबला), अंजली राव (व्हायोलिन), तमन रॉय यांनी संगत केली. उपासना ग्लोबल फोरमच्या शर्मिला मझुदार यांनी सूत्रसंचालन केले. त्याच अनुपम चक्रवर्ती, सोनिया शहा, मोमिता चक्रवर्ती या चित्रकारांनी हरिमंदिराचे चित्र रेखाटून रंगवले व पुणे प्रार्थना समाजाला भेट दिली.

कार्यक्रमाची ऋग्वेदाल ‘संगच्छध्वं संवदवं संवो मनसिभीम’ या मंत्राने. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांच्या विविध गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
‘ओई पोहाईलो तुला राती…’, ‘प्रभु पूजीबो तोमोरे आजी…’ या गीतांच्या सादरीकरणावरून ऐकून भक्तिभाव निर्माण केला. डॉ. दिलीप जोग आणि डॉ. सुषमा जोग यांनी रविंद्रनाथ टागोर यांनी रचले ‘पादप्रांते राखो शेबोके’ हे गीते कार्यक्रमाची सांगता केली.

‘फुले’ चित्रपटाबाबत ‘ब्राह्मणांना नेमकं काय खटकतंय?:दिग्दर्शक अनुराग कश्यपांचा संतप्त सवाल, पीएम मोदींचे नाव घेत सेन्सॉर बोर्डावर केली टीका

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ब्राह्मण महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत, ती दृष्ये हटवण्यास आणि काही दृष्यांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. सीबीएफसीच्या या निर्णयावर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी संताप व्यक्त केला आहे. अनुरागने सोशल मीडियावर एक लांब पोस्ट लिहून सीबीएफसीवर टीका केली. त्याचबरोबर त्यांनी पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक मोठी गोष्ट देखील लिहिली.

This error message is only visible to WordPress admins

Error: No feed found.

Please go to the Instagram Feed settings page to create a feed.

This error message is only visible to WordPress admins

Error: No feed found.

Please go to the Instagram Feed settings page to create a feed.

This error message is only visible to WordPress admins

Error: No feed found.

Please go to the Instagram Feed settings page to create a feed.

This error message is only visible to WordPress admins

Error: No feed found.

Please go to the Instagram Feed settings page to create a feed.

This error message is only visible to WordPress admins

Error: No feed found.

Please go to the Instagram Feed settings page to create a feed.

https://www.instagram.com/p/DIhdnKRNtQU/?utm_source=ig_web_copy_link

This error message is only visible to WordPress admins

Error: No feed found.

Please go to the Instagram Feed settings page to create a feed.

अनुराग कश्यपने पोस्टमध्ये काय म्हटलं?

“धडक २च्या स्क्रिनिंग वेळी सेन्सॉर बोर्डने असं सांगितलं की मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केली आहे. याच आधारावर संतोष सिनेमादेखील भारतात प्रदर्शित झाला नाही. आता ‘फुले’ सिनेमावरुन ब्राह्मण समाजाला आक्षेप आहे. पण, भाऊ जर जाती व्यवस्थाच नाही राहिली तर ब्राह्मण कुठून आले? कोण आहात तुम्ही? तुम्हाला का त्रास होत आहे? जर जाती व्यवस्थाच नसती तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले नसते. एक तर ब्राह्मण नाहीच आहेत, कारण मोदींच्यानुसार भारतात जाती व्यवस्थाच नाहीये. की सगळे मिळून सगळ्यांना मुर्ख बनवत आहेत? भारतात जाती व्यवस्था आहे की नाही, हे तुम्ही मिळून आधी काय ते ठरवा. लोक मुर्ख नाहीत. तुम्ही ब्राह्मण आहात की तुमचे पूर्वज होते जे आता इथे नाहीत…काय ते ठरवा”.अनुराग कश्यपने याआधी ‘फुले’ सिनेमावरुन चाललेल्या वादामुळे संतप्त पोस्ट शेअर केली


दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने ‘फुले’ चित्रपटाच्या निर्मात्यांना एकूण 12 बदल सुचवले आहेत. त्यात अनेक संवाद वगळण्याची, काही संवाद लहान करण्याची आणि ऐतिहासिक संदर्भ आणि उपशीर्षकांमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे.

सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले 12 बदल खालीलप्रमाणे

चित्रपटाच्या सुरुवातीला दिलेल्या डिस्क्लेमरचा स्क्रीन टाइम वाढवावा. जेणेकरून ते जास्त काळ स्क्रीनवर राहील आणि वाचता येईल.
चित्रपटातील एक दृश्य, जिथे एक माणूस झाडू मारत आहे आणि काही मुले सावित्रीबाईंवर शेण फेकत आहेत, ही दृश्ये बदलावी लागतील.
चित्रपटातील संवाद, “शूद्राने झाडू बांधून चालले पाहिजे…” ते “आपण अशाच प्रकारे सर्वांपासून अंतर राखले पाहिजे का…?” बदलण्यास आणि सुधारित करण्यास सांगितले आहे.
एका संवादांत, ”3000 वर्षे जुनी… गुलामगिरी…” ऐवजी ”ती अनेक वर्षे जुनी आहे…” असा शब्द वापरायला हवा.
“पेशवाई असती तर… हात आणि पाय वेगळे केले असते…”, हा संवाद “तुम्ही भाग्यवान आहात, राजेशाही असती तर… तुमचे हात आणि पाय वेगळे केले असते…” ने बदलावा लागेल.
‘मांग’, ‘महार’ यांसारखे शब्द ‘ऐसी छोटी छोटी जाती’ बदलावे.
जातिव्यवस्थेवर मनु महाराजांच्या व्हॉईस ओव्हरमध्ये “आबादी है आबाद… और उनका जीवन साथ होगा…” च्या जागी “आबादी है, आबाद नहीं… आझादी की…” असा बदल करावा.
चित्रपटाच्या एका सबटायटलमध्ये वर्ष चुकीचे आहे, ते बदलले पाहिजे.
“तीन एम आहेत… आणि आपण तेच करणार आहोत…” हा संवाद काढून टाकावा.
निर्माते AWBI प्रमाणपत्र सादर करतात.
चित्रपटात दाखवलेल्या ऐतिहासिक गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या संदर्भांशी संबंधित कागदपत्रे सादर करा.
चित्रपटाच्या सबटायटल्समधून ‘जात’ हा शब्द काढून टाकावा आणि त्याऐवजी ‘वर्णा’ हा शब्द वापरावा.
या 12 बदलांनंतर सेन्सॉर बोर्ड ‘फुले’ चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देईल. याचा अर्थ 12 वर्षांपेक्षा जास्त वयाचे कोणीही हा चित्रपट पाहू शकतात. मात्र, 12 वर्षांखालील मुले त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली हा चित्रपट पाहू शकतात.

‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली

‘फुले’ हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात समाजसुधारक, विचारवंत ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या संघर्षाची कहाणी दाखवली जाणार आहे. फुले दाम्पत्याने अस्पृश्यांसाठी केलेले काम, त्यांनी समाजात आणलेल्या सुधारणा, महिला शिक्षणासाठी उचललेली पावले हे सर्व मोठ्या पडद्यावर दाखवले जाईल. फुले दाम्पत्याने समाजातील मागासवर्गीयांसाठी केलेले कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. या सिनमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी केले आहे. स्कॅम 1992 वेब सिरीज फेम अभिनेता प्रतिक गांधी ज्योतिबा फुलेंची भूमिका साकारत आहे, तर सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा दिसणार आहे. 11 एप्रिल रोजी फुले चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण, त्याची तारीख बदलण्यात आली असून, आता 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.