Home Blog Page 3311

महावितरण ग्राहक संपर्क अभियानात पुणे शहर व ग्रामीणमध्ये 996 अर्ज निकाली

0

 

पुणे : महावितरण ग्राहक संपर्क अभियान अंतर्गत गेल्या तीन दिवसांत पुणे, पिंपरी शहरासह ग्रामीण भागातील 19 ठिकाणी झालेल्या आयोजनात 1097 पैकी 996 अर्ज व तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले तर उर्वरित 101 अर्जांचे ठराविक मुदतीत निरसन करण्यात येत आहे.

वीजग्राहकांसाठी नवीन वीजजोडणी, नावात बदल, पत्त्यात बदल, वीजभार आदींसाठी अर्ज मंजुरी तसेच वीजबिल दुरुस्ती, मीटर बदलण्यासह इतर तक्रारी सोडविण्यासाठी पुणे परिमंडलात महावितरण ग्राहक संपर्क अभियानास सुरवात झालेली आहे. गुरुवार (दि. 13) ते शनिवार (दि. 15) पर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण, आकुर्डी, भोसरी, हडपसर 1, गणेशखिंड व कोथरूड उपविभाग कार्यालय तसेच औंध गाव, सुस रोड, ताथवडे शाखा कार्यालय या ठिकाणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 643 विविध प्रकारचे अर्ज व तक्रारी प्राप्त झाल्या व त्यातील 629 अर्ज व तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. उर्वरित 14 अर्ज व तक्रारींसाठी कार्यालयीन कार्यवाही आवश्यक असल्याने त्या ठराविक मुदतीत सोडविण्यात येत आहे. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी अभियानाच्या विविध ठिकाणी भेटी देऊन वीजग्राहकांशी थेट संवाद साधला.

याशिवाय पुणे ग्रामीणमध्ये मुळशी विभागातील उरुळीकांचन, मुळशी, नसरापूर, हडपसर ग्रामीण उपविभागात, राजगुरुनगर विभागातील तळेगाव, लोणावळा, वडगाव मावळ, चाकण व राजगुरुनगर उपविभागात तर मंचर विभागातील नारायणगाव उपविभागात एकूण 454 तक्रारींपैकी 367 तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले तर उर्वरित 87 तक्रारींचे ठराविक कालावधीत निरसन करून त्यासंबंधी संबंधीत ग्राहकांना कळविण्यात येत आहे. या अभियानात तक्रारींचे जागेवरच निरसन करताना महावितरण मोबाईल अ‍ॅप तसेच महावितरण अंतर्गत ‘ऑनलाईन’ प्रणालीचाही वापर करण्यात आला. सोबतच अभियानात सहभागी नागरिकांना वीजसुरक्षा, महावितरणची ग्राहकसेवेबाबत माहिती देण्यात आली.

फोटो नेम/ओळ – Mahavitaran Abhiyan 15-07-2017 / महावितरण ग्राहक संपर्क अभियानामध्ये पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी विविध ठिकाणी भेट देऊन वीजग्राहकांशी संवाद साधला.

युवा माळी संघटनेच्यावतीने दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

0

पुणे-युवा माळी संघटनेच्यावतीने दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला . बुधवार पेठमधील सावतामाळी भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयोजक दीपक कुदळे , नगरसेविका रंजना टिळेकर , अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेचे सचिव दिलीप राऊत , नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा. सुरेश तोडकर , ओ. बी. सी. नेते मृणाल ढोलेपाटील, नगरसेविका मनिषा संदीप लडकत  आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयोजक दीपक कुदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि , मुलांनी त्यांच्या आवडीप्रमाणे आपले करिअर करावे , जीवनात प्रथम गुरु आपले आई वडील आहेत . विद्यार्थ्यांनी स्माईल नुसार काम केले तर ते नक्कीच यशस्वी होतील . त्यासाठी त्यांनी जीवनात यशस्वी होण्याची पाच सूत्रे समजावून सांगितली . एखाद्या गोष्टीत यशस्वी होण्यासाठी त्यांनी जाणकारी घ्यावी , त्यानंतर ज्ञानकारी व्हावे , त्यानंतर अमंलकारी , त्यानंतर लाभकारी होऊन आपण बराबरी करावी असे त्यानंबी समजावून सांगितले .

यावेळी विद्यार्थ्यांना करिअर विषयावर व्याख्यान देताना नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा. सुरेश तोडकर यांनी सांगितले कि , तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात उत्तुंग उंची गाठणे म्हणजेच करिअर होय . करिअर करण्यासाठी उच्च ध्येय ठेवले पाहिजे . आपल्या आवडीनुसार करिअर निवडले पाहिजे . त्यासाठी विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी वर भर द्यावा .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा  सुनिता भगत यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप लडकत यांनी केले तर आभार स्मिता लडकत यांनी मानले .

बीज रोपण अभियानाद्वारे पर्यावरण संरक्षणाचा संदेश

0

पुणे: आयसीएआय पुणे  डब्यूआयसीएएसए(वेस्टर्न इंडियन चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन) चाप्टर आणि कोलटे पाटील डेव्हलपर्स लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने, बीज रोपण’ मोहीम  हाती घेतली घेण्यात आली होती ज्यात आज पुणे, मुंबई आणि लातुर येथील सुमारे 555 सीए विद्यार्थ्यी आणि सदस्यांनी सहभाग  घेतला .

ह्या उपक्रमामध्ये एआरएआय, वेताळ टेकडी, आणि भांबुर्डे फॅारेस्ट येथे ९९,९९९ बियानांची लागवड अवघ्या ५ तासात केली गेली.

यावेळी  सीए राजेश अग्रवाल  (अध्यक्ष पुणे शाखा डब्यूआयसीएएसए, आयसीएआय) यांनी मोहिमेचे नेतृत्व केले ते म्हणाले कि, “आयसीएआयने ही एक चांगली सुरुवात केली आहे आणि पुण्यातील नागरीकांनी या प्रकल्पास दिशा देण्यासाठी मनापासून योगदान दिले आहे हे पाहून मला खूप आनंद झाला आहे.  या पुढाकाराचा उद्देश  आहे जागरूकता वाढविणे. आधुनिक जीवनशैलीच्या प्रतिकूल परिणामांना तोंड देत असताना पर्यावरणाचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपण खुप गरजेचे आहे.

या मोहिमेत सर्व वयोगटातील मुला-मुलींपासून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता.  आयसीएआय पुणे,डब्यूआयसीएएसएला हा दिवस “वर्ल्ड फूड सीड प्लांटेशन डे” म्हणून घोषित करण्याची इच्छा आहे आणि त्यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्ससाठी अर्ज केला आहे; जेणेकरून अनेक शहरे अश्या उपक्रमासाठी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतील.

आजकाल वनक्षेत्र कमी झाल्यामुळे आपण हवामान बदलासारख्या गंभीर पर्यावरणीय प्रश्नांचा सामना करत आहोत. वृक्षारोपण करून मोठ्या प्रमाणावर जागृकता करून या समस्येचा सामना केला जाऊ शकतो.

हा प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, कारण प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे जी जागतिक तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण आहे. अलीकडील अहवालात असे आढळून आले की जगातील बहुतेक प्रदूषित शहरांच्या चार्ट्समध्ये भारतीय शहरे दुसर्या क्रमांकावर आहेत. ह्यामुळे पर्यावरण संरक्षण काळाची सर्वात मोठी गरज आहे.

यावेळी डब्यूआयआरसी अृॅाफ आयसीएआयचे व्हाईस चेअरमन सर्वेश जोशी  व इतर मान्यवर उपस्थित होते.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग

0

मुंबई मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा शनिवारी मीरारोड येथील एका चित्रपटगृहात मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीकडून विनयभंग करण्यात आला. याविषयी त्यांनी पोलिसांकडे संबंधित व्यक्तीची तक्रार केली. सुरक्षारक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचंही बेर्डे यांनी सांगितलं. ‘बोरिवलीतील ४३ वर्षीय सुनील जानी नामक व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर कलम ३४५ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणी माध्यमांना दिेलेल्या माहितीत बेर्डे म्हणाल्या,’या सर्व प्रकाराचा माझ्या मुलीला धक्काच बसल्याचं सांगत झाल्या प्रकाराबद्दल न घाबरता तक्रार दाखल केल्याचं त्या म्हणाल्या. महिलांच्या विनयभंगाच्या या सर्व घटनांना कुठेतरी आळा घालण्याची गरज असून, या सर्व गोष्टींविरोधात पाऊल उचण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी मांडलं. त्याशिवाय या प्रकरणी आपल्याला सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.

घटनेबाबत सांगताना त्या म्हणाल्या ,’‘मुलीसोबत चित्रपट पाहण्यासाठी मी गेले होते. त्यावेळी सुरुवातीपासूनच तो माणूस माझ्याकडे पाहत होता. मी त्याच्याकडे फार काही लक्ष दिलं नाही. त्यानंतर तो मनुष्य उठून गेला. मुख्य म्हणजे तो इतरांनाही त्रास देत होता. काही वेळानंतर तो बाहेर गेला आणि पुन्हा माझ्या बाजूची एक सीट सोडून बसला. थोड्या वेळाने तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणवल्यानंतर मी त्याला मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण, मी त्याचा पाठलाग केला आणि सुरक्षारक्षकांना त्याबद्दलची माहिती दिली

‘इंग्लिश मॅरॅथॉन स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन २०१७’ मध्ये ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’च्या सहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदके

0

पुणे इंग्लिश मॅरॅथॉन ही स्पर्धा मुलांना इंग्रजी भाषा वापरण्यातील त्यांचे कौशल्य सुधारण्यास प्रोत्साहन देते. शब्दसंपत्ती वाढल्याने मुले अधिक उत्तम अभिव्यक्त होण्यास सक्षम बनतात आणि त्यातूनच त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.

 नुकत्याच झालेल्या इंग्लिश मॅरॅथॉन स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन २०१७ स्पर्धेचा निकाल सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला. या स्पर्धेत ४३५ शाळांतील २०००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या ७ विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी विशेष प्रशस्तीपत्रके देऊन गौरवण्यात आले तर ६ रँक होल्डर विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली.

 बक्षीस मिळालेले गुणवान विद्यार्थी पुढीलप्रमाणे

१. आर्यन बिझोरा,                                 इयत्ता तिसरी               मेरिट होल्डर रँक १८

२. बिशाखा पंडित,                                 इयत्ता तिसरी               मेरिट होल्डर रँक २६

३. साहिल बदामी,                                  इयत्ता आठवी              मेरिट होल्डर रँक २६

४. आयुषी राऊत,                                   इयत्ता आठवी              मेरिट होल्डर रँक ३३

५. तपस्विनी शर्मा,                                इयत्ता नववी                मेरिट होल्डर रँक १६

६. अमान जलालुद्दीन पाटील,     इयत्ता नववी                मेरिट होल्डर रँक २५

७. वैभवी राहुल राऊत,               इयत्ता आठवी             सहभागी                        

 या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या उपाध्यक्ष सौ. सुषमा चोरडिया म्हणाल्या, “‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित अशा इंग्लिश मॅरॅथॉन स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन २०१७ स्पर्धेत उज्ज्वल यश मिळवल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. या सातही विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते. या परीक्षा व्यासपीठावर आमच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेची संधी देणाऱ्या संयोजकांप्रतीही आम्ही कृतज्ञ आहोत.

 अध्ययन व अभिनवता यात जागतिक पातळीची उत्कृष्टता देत आपल्या विद्यार्थ्यांना पुरेपूर कामगिरीसाठी प्रोत्साहन देणे हे ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’चे उद्दिष्ट्य आहे

शिवमार्ग दसरा-दिवाळी अंक -2017 साठी साहित्य पाठवा …

0

 

पुणे (प्रतिनिधी):- पुणे येथून गेल्या दहा वर्षांपासून नियमितपणे प्रसिध्द होत असलेल्या मासिक शिवमार्ग-चा दिवाळी अंक-2017 हा दसरा-दिवाळी विशेषांक म्हणून प्रसिध्द होणार असून त्यासाठी नवोदीत,मान्यवर साहित्यिकांनी साहित्य पाठवावे असे अवाहन संपादक श्री.दत्तात्रय सुर्वे यांनी केले आहे.

शिवमार्ग दिवाळी अंकामध्ये प्रामुख्याने प्रचलित व लोकप्रिय अशा विषयांवर अपेक्षित साहित्य प्रसिध्द केले जाणार आहे.त्यामध्ये पुढील काही पैलूंवर प्रकाश झोत टाकण्याचा आमचा मानस आहे…

  •  आमची सायकल सफर…        
  •  गोष्ट माझ्या सायकलची..            
  •  कथा आमच्या मंदिराची..
  •  धम्माल ट्रेकींगची..               
  • आवड माझी वाचनाची…               
  • माझा गूढ अनुभव..
  •  आम्ही अनिवासी ..भारतीय.. 
  • मी आणि माझा व्यवसाय..          
  • जवळची माणसं..

या वर्षात अनेक मानन्यवरांची व संस्थांची जन्मशताब्दी साजरी होत आहे.अशांविषयीचे दुर्मिळ साहित्य ,प्रसंग,आठवणी,अनुभव,त्यांच्याछायाचित्रांसह पाठवावेत.त्याचबरोबर राजकारण,साहित्य, कला,उद्योग, संगीत ,कला,व्यापार,काव्य,कादंबरी,कथा,गूढ कथा,पोलीस कथा,व अन्य क्षेत्रातील मान्य वरांची माहिती देण्याचा विचार आहे.त्याविषयी लेख,मुलाखती,परिचय,त्यांच्या छायाचित्रांसह पाठवून सहकार्य करावे ही विनंती. साहित्य ईमेल द्वारे पाठविणार असल्यास ते युनिकोड किंवा श्रीलिपी-7 मध्ये पाठवावे.हा अंक दसर्‍याला प्रसिध्द होणार आहे.आपले लेखन साहित्य तातडीने दि.05 सप्टेंबर 2017 पर्यंत श्री.दत्तात्रय ना.सुर्वे,संपादक मासिक शिवमार्ग,सदाफुली-ए,फ्लॅट नं.12,स.नं.78/79,डावी भुसारी कॉलनी,पौडरोड,कोथरूड,पुणे-411038,

या पत्यावर पाठवावे अशी विनंती  आहे. संपर्क-9423023289,9765626828,9372111575

.еmail -dattasurve 27@gmail .com 

समान पाणीपुरवठा योजनेचे कामही सुरू नाही; कर्जाची रक्कम बँकेला परत द्या माजी उपमहापौर आबा बागुल यांची मागणी; न्यायालयाकडे दाद मागण्याचाही इशारा

0
पुणे
महापालिकेच्या चालू अंदाजपत्रकात  समान पाणीपुरवठा योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद तसेच १५०० कोटींच्या ठेवी , गंगाजळ १०० कोटी ,बँकेतील चालू खात्यात १०० कोटी रुपये अशी मजबूत आर्थिक स्थिती असताना महापालिका प्रशासनाने समान पाणीपुरवठा योजना  (24 बाय 7) राबविण्यासाठी केलेली  बनवा -बनवी आता  अंगलट आली आहे.चोवीस तास पाणीपुरवठ्याचे कोणतेही काम अद्याप सुरु झाले नसल्यामुळे कर्जरोख्यातून उभारलेले दोनशे कोटी बँकेकडे परत करण्याची  मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासनाकडे केली आहे 
कर्जरोख्यांचे सेलिब्रेशन करून मोठ्या गाजावाजात २०० कोटी रुपये पालिकेच्या खात्यात जमा करून घेतले पण आता पहिल्याच महिन्यात तब्बल दीड कोटी रुपयांचे व्याज भरावे लागले  आहे. त्यात  समान पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया नाही ,कोणते कामही सुरु नाही आणि अंदाजपत्रकातील ५०० कोटींची तरतूद यावर्षी  खर्ची पडणारही नाही,असे असताना २०० कोटींचे  कर्ज कशासाठी घेतले असा सवालही  आबा बागुल यांनी  केला आहे.  जर रक्कम खर्च होणारच नसेल तर दीड कोटी रुपये व्याजाचा भुर्दंड पुणेकरांवर लादण्यापेक्षा कर्जाची रक्कम  परत बँकेला देणेच हिताचे ठरेल अन्यथा त्यासाठी  न्यायालयात दाद मागितली जाईल  असा इशाराही  त्यांनी दिला आहे. 
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, शहरातील नागरिकांना २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्याच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करून देशात पहिल्यांदाच कर्जरोख्यांचे ‘सेलिब्रेशन ‘ करणाऱ्या महापालिका प्रशासनाने चालू अंदाजपत्रकात समान पाणी पुरवठ्यासाठी ५०० कोटींची तरतूद असतानाही २०० कोटी रुपये कर्जापोटी पालिकेच्या स्वतंत्र खात्यात जमा करून घेतले. प्रत्यक्षात या योजनेच्या कामावर एक रुपयाही खर्च झालेला नाही. बजेटमधील ५०० कोटी रुपयांमधील १०० कोटी रुपये पाण्याच्या टाक्यांवर खर्ची होतील;पण संपूर्ण ५०० कोटी रुपये यावर्षी खर्च होणारही नाहीत. असे असताना पाण्याच्या नावाखाली या योजनेचे भांडवल केले मात्र  काँग्रेससह अन्य पक्षांनी  कर्जरोख्यांना विरोध केला पण एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पुणे महापालिका गहाण ठेवण्यास परवानगी दिली, त्यामागे पुणेकरांना समान पाणी पुरवठा व्हावा हा उद्देश होता. असे असतानाही आम्ही व्याजाचा नाहक  भुर्दंड करदात्या पुणेकरांवर बसू देणार नाही ही भूमिकाही घेतली होती. पालिकेच्या २०१७-१८ अंदाजपत्रकात ५०० कोटी रुपये समान पाणी पुरवठा योजनेसाठी तरतूद केलेले असताना २०० कोटी रुपये कर्जरोख्यातून प्रशासनाने मिळविले ;पण प्रत्यक्षात  या योजनेवर आजमितीस एक रुपयाही खर्च  झालेला नाही.स्वतंत्र खाते उघडून २०० कोटी रुपये जमा केल्याचा डांगोरा पिटणाऱ्या प्रशासनाच्या गलथान कारभाराचे आता  बिंग फुटले आहे. २०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या व्याजापोटी पालिकेला दरमहा १कोटी ५० लाख रुपये भरावे लागणार आहेत. हा नाहक भुर्दंड पुणेकरांवर पडणार आहे, याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे. पुणेकरांवर  नाहक भुर्दंड लादण्यापेक्षा ज्या कर्जाचे सेलिब्रेशन मुंबईत केले, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह केंद्रीय मंत्री यांच्यासह जे जे उपस्थित होते त्यांच्याकडून व्याजाची रक्कम वसूल का करू नये. आयुक्तांसह मुख्यलेखापाल आणि अधिकारीवर्गाच्या वेतनातून व्याजाची दरमहा दिड कोटींची रक्कम कापून का घेऊ नये असा सवाल आबा बागुल यांनी केला असून कोणत्याही परिस्थितीत करदात्या पुणेकरांवर व्याजाचा बोजा पडू दिला जाणार नाही त्यासाठी न्यायालयात दाद मागितली जाईल असे स्पष्ट केले आहे. 

‘एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च’चा ‘स्थापना दिन’ साजरा

0
पुणे:
 
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलटिन एज्युकेशन सोसायटीच्या ‘एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च’चा 11 वा ‘स्थापना दिन’ गुरूवारी साजरा करण्यात आला. 
महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रान्त्झ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. श्रीनिवास श्रीरंगम् (महाव्यवस्थापक, नोवाटेल इमॅजिका, खोपोली), नासिर शेख (महाव्यवस्थापक, हॉटेल मेरियट, चाकण), रेखा बांदल (पुणे जिल्हा परिषद सदस्य), पंकज प्रधान (मनुष्य बळ व्यवस्थापक, हॉटेल मेरियट, चाकण) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रान्त्झ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. 

गोयल गंगा फौंडेशच्या वतीने २५०० रोपांचे वाटप

0

पुणे :- गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला २५०० हजार रोपांचे वाटप करण्यात आले.पर्यावरण दिनाच्यावेळी पर्यावरण पूरक कामे करण्याची प्रतिज्ञा करत एक पाऊल पुढे जात त्यांनी हा उपक्रम राबविला.

यावेळी गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल म्हणाले कि, नागरी वस्ती असलेल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करुन वातावरणमध्ये होणारे बदल व प्रदुषण नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.येणाऱ्या पिढीमध्ये पर्यावरण टिकवण्यासाठीची सुरुवात स्वत: पासुन करायला हवी ही भावना रुजवली पाहिजे.

पर्यावरणाचा ऱ्हास, प्रचंड प्रमाणात होत असलेली जंगलतोड रोखली जावी आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात निसर्गसौंदर्य टिकून राहावे हाच वृक्ष संवर्धनाचा संदेश या उपक्रमांतर्गत  देण्यात आला.

जागतिक कौशल्‍य दिनी व्‍यावसायिक प्रशिक्षण संस्‍थांचा गौरव

0

पुणे- सध्‍या नोक-यांची संख्‍या कमी असल्‍याने व्‍यावसायिक प्रशिक्षण संस्‍थांनी (व्‍हीटीपी) बेरोजगार तरुणांना कौशल्‍यावर आधारित प्रशिक्षण देऊन रोजगाराच्‍या व स्‍वयंरोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करुन देऊन सामाजिक बांधीलकी जपावी, असे आवाहन येरवडा कारागृहाचे अधीक्षक उमाजी पवार यांनी केले. जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्‍यावतीने आयोजित जागतिक युवा कौशल्‍य दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्राचे उपसंचालक शरद अंगणे, उद्योजक दौलत बाफना, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, केंद्राचे  सहायक संचालक विजय कानिटकर, कौशल्‍य विकास अधिकारी संगीता चौधरी आदी उपस्थित होते.

कौशल्‍य विकास सोसायटी मार्फत नोंदणीकृत झालेल्‍या व ज्‍या संस्‍थांनी उमेदवारांना कौशल्‍यावर आधारित प्रशिक्षण दिले, जास्‍तीत जास्‍त रोजगाराच्‍या संधी निर्माण केल्‍या अशा पाच संस्‍थांचा गौरव करण्‍यात आला. इन्‍फोनेट बीपीओ सर्व्‍हिसेस प्रा. लि;, विमाननगर, ऑल इंडिया इन्‍स्‍टीट्यूट  ऑफ लोकल सेल्‍फ गव्‍हर्नमेंट, कोथरुड, उन्‍नती सामाजिक संस्‍था, सांगवी, संकल्‍प एज्‍युकेशन सोसायटी, धनकवडी आणि निरा एज्‍युकेशन सोसायटी, निरा  या संस्‍थांचा स्‍मृतिचिन्‍ह आणि गौरवपत्र देऊन सन्‍मान करण्‍यात आला. केंद्राचे उपसंचालक शरद अंगणे यांनी जागतिक कौशल्य दिनाचे महत्‍त्व विशद केले. ‘स्‍कील इंडिया’ ही एक महत्‍त्‍वाकांक्षी योजना असून यामध्‍ये व्‍हीटीपींना काम करण्‍यास मोठी संधी आहे. राज्‍यातील मनुष्‍यबळ अधिकाधिक कौशल्‍यपूर्ण झाल्‍यास विकासाची गती आणखी वाढेल, असे ते म्‍हणाले.

केंद्राचे  सहायक संचालक विजय कानिटकर यांनी प्रास्‍ताविक केले. सूत्रसंचालन हिंमत टाकळकर तर आभार प्रदर्शन इनूजा शेख यांनी केले.

भाजपच्या वतीने कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम

0
पुणे, ता. १५ – शहर भाजपच्या वतीने टॅली व जीएसटी, शिवणकाम, रिकव्हरी कन्सल्टंट आणि प्लंबिंग या विषयांचे कौशल्य विकासाचे विनामूल्य  अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली आहे. यासाठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’चे सहकार्य लाभले आहे.
अभ्यासक्रमाची सुरुवात १ ऑगस्टपासून होणार असून, तो यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना नोकरीची शंभर टक्के हमी देण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थींसाठी  अभ्यासक्रम विनामूल्य आहे.
प्रवेशासाठी किमान दहावी उत्तीर्ण आणि वय वर्ष १८ पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी चाळीस दिवसांचा आहे. २५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
भाजप मध्यवर्ती कार्यालय, हॉटेल सन्मान, जंगली महाराज रस्ता, संभाजी पार्कसमोर येथे अर्ज उपलब्ध आहेत. वेळ ः स. ११.०० ते सायं. ५.०० पर्यंत, अधिक माहितीसाठी ०२० २५५३३४४४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
—————————-

तनुश्री रक्षित आणि स्वप्निल लोंढे एक्रॉबॅटिक रॉक एन रोलमध्ये सादर करणार एरियल कला

0
पुणे: एक्रॉबॅटिक रॉक एन रोल हा एक एकमेव असा आकर्षक क्रीडा प्रकार आहे ज्यामध्ये स्त्री व पुरुष संघ सहकारी एका तंत्रानुसार विशिष्ट पद्धतीच्या पायांच्या हालचालींद्वारे अत्यंत अवघड अशी एरिअल व फिरकी कला सादर करतात.
पुण्याचे तनुश्री रक्षित आणि स्वप्निल लोंढे ‘वर्ल्ड गेम्स २०१७’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
 सराव व अत्यंत खडतर प्रशिक्षणाच्या बलावर  हे दोघे या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. तनुश्री म्हणाल्या की, “संगीतावर आधारित अत्यंत जटिल एरियल कला सादर करणे खूप रोमहर्षक असते पण ते अमलात आणताना अफाट संयम, समर्पण व चिकाटीची गरज असते.ह्याविषयी बोलताना स्वप्निल म्हणाले की, “हंगेरीस्थित कॅटलिन किस (Katalin Kis) व मीक्लोस होर्वाथ (Miklos Horvath) या आमच्या प्रशिक्षकांच्या अमूल्य मार्गदर्शना शिवाय आमचे स्वप्न कधीच पूर्ण झाले नसते”. या खेळासाठी लागणारी उपकरणे भारतात उपलब्ध नसल्यामुळे तनुश्री व स्वप्निल यांचे प्रशिक्षण हंगेरी येथेच झाले आहे.
बारामती ऍग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार या मराठमोळ्या खेळाडुंचे  प्रायोजक आहेत. बारामती ऍग्रो लिमिटेडच्या विशेष व्यवसाईक सामाजिक जबाबदारी (सी.एस.आर) द्वारे वेळोवेळी अशा प्रसंगी आर्थिक साहाय्य करत असल्याचे रोहित यांनी परिषदेमध्ये सांगितले. रोहित पवार म्हणाले की, “मला जेंव्हा या खेळाडूंच्या पार्श्वभूमी बद्दल समजले तेंव्हा मी या दोघांना मदत करायचे ठरविले. मला विश्वास आहे की जेंव्हा आपण अशा तरुणांना समर्थन देऊ  तेव्हा ते ३० देशांच्या खेळाडूंना टक्कर देत भारताचे प्रतिनिधित्त्व करण्यास प्रोत्साहित होतील. मराठी सिनेमाला आपण जागतिक पातळीवर आपला ठसा उमटावंताना पहात आहोत. आता अशा ऑफ बीट खेळांमध्ये अशी कामगिरी करून स्वतःची ओळख तयार करण्याची वेळ आली आहे. आपल्या देशाच्या खेळाडूनमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. त्यांना आपण योग्य व्यासपीठ, पायाभूत सुविधेसोबत आदर व मान्यता दिल्यास आपले तरुण नक्कीच चांगली कामगिरी करतील”.
‘वर्ल्ड गेम्स २०१७’चे आयोजन पोलंड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये रिदम स्पोर्ट श्रेणीमधील एक्रॉबॅटिक रॉक एन रोल या क्रीडाप्रकारामध्ये प्रथमच भारतीय खेळाडु सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. हे दोघे हंगेरी येथे १४ जुलै रोजी होणाऱ्या प्री वर्ल्ड गेम्स ट्रेनिंग कॅम्पसाठी रवाना होणार आहेत व त्यानंतर पोलंड येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड गेम्स २०१७’ मध्ये सहभागी होणार आहेत.
स्पर्धेबद्दल:
२७ अधिकृत क्रीडा प्रकार व ४ निमंत्रित क्रीडा प्रकार समाविष्ट असलेले ‘वर्ल्ड गेम्स २०१७’ हे एक बहु क्रीडा स्पर्धा रॉकलॉ, पोलंड येथे २० जुलै ते ३० जुलै रोजी आजोजित करण्यात आले आहेत.
तारीख: २० जुलै ते ३० जुलै, २०१७
स्थळ:स्टैन्डिन मेजेस्की वी रॉक्लावी, रॉक्लॉ पोलंड (Standin Miejski We Wroclawiu) Wroclaw, Poland
मुख्य ठिकाण:स्टैन्डिन मेजेस्की वी रॉक्लावी (Standin Miejski We Wroclawiu)
उद्घाटन: २० जुलै, २०१७
समारोप: ३० जुलै, २०१७
यजमान शहर: रॉकलॉ, पोलंड
एक्रॉबॅटिक रॉक एन रोल हे रिदम स्पोर्ट श्रेणीमध्ये मोडते व ते २९ जुलै, २०१७ रोजी अनुसूचित करण्यात आले आहे.

इंदिराजींच्या बदनामीची मोहीम -पुण्यातील इंदू सरकार चित्रपटाचे प्रमोशन काँग्रेसने हाणून पाडले

0

पुणे-मधूर भांडारकर दिग्दर्शित माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित असलेल्या इंदू सरकार चित्रपटाला पुणे शहर काँग्रेसने विरोध करत आज (15 जुलै) पुणे शहरात होणारे त्याचे प्रमोशन हाणून पाडले. काँग्रेस नेत्यांना दाखविल्याशिवाय आणि त्यांच्या परवानगीशिवाय हा चित्रपट पुणे शहरात प्रदर्शित केल्यास काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व चित्रपटाचे प्रदर्शन रोखून धरतील, असा इशारा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आला. परंतु मधूर भांडारकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांना भेटावयास नकार दिल्याने आंदोलकानी नारेबाजीला सुरुवात केली होती. परंतु विनापरवानगी आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचे आंदोलन मोडीत काढले.

दिग्दर्शक मधुर भांडारकर त्यांच्या आगामी इंदू सरकार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी एनआयबीएम रस्त्यावरील बीटोज बार अॅण्ड किचन या हॉटेलमध्ये दुपारी दीड पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते तिथे विरोध करू शकतात हे लक्षात आल्यानंतर ती पत्रकार परिषद रद्द केली. त्यानंतर भांडारकर बावधानमधील सूर्यदत्ता इनस्टिट्यूटमधील पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र त्या ठिकाणीही काँग्रेस कार्यकर्ते विरोध करण्यासाठी तयार असल्याने मधुर भांडारकर यांनी तोही कार्यक्रम रद्द केला आणि ते पुणे स्टेशनजवळील क्राऊन प्लाझा या ठिकाणी पोहोचले. या हॉटेलमधे तीन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याचे कळवण्यात आले. मात्र, त्या आधीच माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते  क्राऊन प्लाझा हॉटेलमध्ये घुसले. त्यामुळे येथील पत्रकार परिषदही ही रद्द करण्यात आली.

मित्रांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रशालेत ‘बहावा’ या वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण

0

पुणे-

न्यु इंग्लिश स्कूल,प्रशालेतील १९९६-९७ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी कै. भूषण इनामदार या त्यांच्या मित्रांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रशालेत ‘बहावा’ या वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण केले. या कार्यकमासाठी १९९६-९७ सालचे. १५ माजी विद्यार्थी शालाप्रमुख मोने उपशालाप्रमुख सौ. मिनोचा, पर्यवेक्षिका सौ. गायकवाड, शिक्षक प्रतिनिधी सौ. मिश्रा, पर्यावरणमंडळ विभागप्रमुख सौ. कोपेल्ली, सेवक श्री. सकट, पर्यावरण मंडळाचे सदस्य विद्यार्थी, तसेच इ. १०वी क व इ. ६वी अ या वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात शाला प्रमुखांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी प्रास्ताविकात माजी विद्यार्थी के. भूषण इनामदार ह्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बहावा या वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात येत आहे हे सांगितले. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेचे माहितीपत्रक देऊन स्वागत करण्यात आले. तद्नंतर श्री. नाईक (माजी विद्यार्थी), शालाप्रमुख श्री. मोने, चि. निमकर निसर्ग भास्कर, चि. निवंगुणे अभिजीत ह्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

मी साधा नगरसेवक , मुक्ता बर्वे कसा होऊ ? ( व्हीडीओ)

0


पुणे-मी साधा नगरसेवक , सिलेब्रिटी नाही ,मुक्ता बर्वेने फोटो टाकले कि सारे महापालिकेतील पदाधिकारी नाट्यगृहात धावले … आणि स्वच्छतेसाठी सरसावले..कोणी कोणाला झापले ..निलंबित केले … अबब ..केवढा गजहब …. मी काय साधा नगरसेवक , लोकांनी निवडून दिलेला .. मी शाळेच्या समस्या घेवून हज्जारदा पालिकेत अधिकाऱ्यांकडे,पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी करतो आहे ..पण कोणाला काही घाम फुटेना ..मुक्त बर्वेने एकदा तक्रार केली तर घाम फुटला .. शाळेतील मुले आपापल्या वर्गाची स्वच्छता करतात हे काय दिसत नाही कोणाला ?२७ वर्गात १५ शिक्षक ,दर सहा महिन्याला कंत्राटी शिक्षक आणि त्याला पगार महिना सहा हजार रुपये .. काय सांगू व्यथा ….. कसा अजब गजब कारभार पाहायला मिळतो आहे निवडून आल्यावर कळतो आहे … सारा तमाशा ..पहा हा व्हीडीओ.अर्थात प्रत्यक्षात भावना मारून शब्द सांभाळून केलेला हा संवाद …