पुणे, ता. १५ – शहर भाजपच्या वतीने टॅली व जीएसटी, शिवणकाम, रिकव्हरी कन्सल्टंट आणि प्लंबिंग या विषयांचे कौशल्य विकासाचे विनामूल्य अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली आहे. यासाठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’चे सहकार्य लाभले आहे.
अभ्यासक्रमाची सुरुवात १ ऑगस्टपासून होणार असून, तो यशस्वीपणे पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना नोकरीची शंभर टक्के हमी देण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थींसाठी अभ्यासक्रम विनामूल्य आहे.
प्रवेशासाठी किमान दहावी उत्तीर्ण आणि वय वर्ष १८ पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी चाळीस दिवसांचा आहे. २५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
भाजप मध्यवर्ती कार्यालय, हॉटेल सन्मान, जंगली महाराज रस्ता, संभाजी पार्कसमोर येथे अर्ज उपलब्ध आहेत. वेळ ः स. ११.०० ते सायं. ५.०० पर्यंत, अधिक माहितीसाठी ०२० २५५३३४४४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

—————————-