पुणे इंग्लिश मॅरॅथॉन ही स्पर्धा मुलांना इंग्रजी भाषा वापरण्यातील त्यांचे कौशल्य सुधारण्यास प्रोत्साहन देते. शब्दसंपत्ती वाढल्याने मुले अधिक उत्तम अभिव्यक्त होण्यास सक्षम बनतात आणि त्यातूनच त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.
नुकत्याच झालेल्या ‘इंग्लिश मॅरॅथॉन स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन २०१७’ स्पर्धेचा निकाल ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला. या स्पर्धेत ४३५ शाळांतील २०००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’च्या ७ विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी विशेष प्रशस्तीपत्रके देऊन गौरवण्यात आले तर ६ रँक होल्डर विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली.
बक्षीस मिळालेले गुणवान विद्यार्थी पुढीलप्रमाणे
१. आर्यन बिझोरा,
२. बिशाखा पंडित,
३. साहिल बदामी,
४. आयुषी राऊत,
५. तपस्विनी शर्मा, इयत्ता नववी मेरिट होल्डर रँक १६
६. अमान जलालुद्दीन पाटील, इयत्ता नववी मेरिट होल्डर रँक २५
७. वैभवी राहुल राऊत, इयत्ता आठवी सहभागी
या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या उपाध्यक्ष सौ. सुषमा चोरडिया म्हणाल्या, “‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित अशा ‘इंग्लिश मॅरॅथॉन स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन २०१७’ स्पर्धेत उज्ज्वल यश मिळवल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. या सातही विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते. या परीक्षा व्यासपीठावर आमच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेची संधी देणाऱ्या संयोजकांप्रतीही आम्ही कृतज्ञ आहोत.”
अध्ययन व अभिनवता यात जागतिक पातळीची उत्कृष्टता देत आपल्या विद्यार्थ्यांना पुरेपूर कामगिरीसाठी प्रोत्साहन देणे हे ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’चे उद्दिष्ट्य आहे