Home Blog Page 3290

२०१३ पासून कर्मचाऱ्यांची अडवलेली ग्रॅज्यूएटी ची १० कोटीची रक्कम तुकाराम मुंडेंनी केली अदा … शाब्बास मुंडे …शाब्बास

0

पुणे- पी एमपीएम एल मधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी खाली हाताने घरी न पाठवता त्यांना ग्रॅज्यूएटी ची रक्कम याच दिवशी देवून निरोप द्यावा ..अशा प्रथेला आज पासून पीएमपीएमएल मध्ये अध्यक्ष – संचालक तुकाराम मुंडे यांनी प्रारंभ केला  . सन २०१३ ते जुलै २०१७ या काळातील ग्रॅज्यूएटी ची ३०४ प्रकरणे त्यांनी निकाली काढली .आणि त्यापोटी ९ कोटी ८७ लाख  ३३ हजार ५६९ रुपये संबधित कर्मचाऱ्यांना गेल्या २२ ऑगस्ट रोजी अदा केले. आणि आज सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना घरी जाण्यापूर्वी सन्मानाने त्यांची ग्रॅज्यूएटी ची रक्कम देत निरोप दिला .

वीजबिल ऑनलाईन भरण्यासाठी अनेक ठिकाणी पथनाट्यांद्वारे जागर

0

पुणे, दि. 31 : महावितरणचे वीजबिल ग्राहकांनी ऑनलाईनद्वारे भरण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीआयटी) विद्यार्थ्यांचा पथनाट्यांद्वारे जागर सुरु आहे. गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी या पथनाट्यांचे प्रयोग होत आहेत.

महावितरणने वीजबिल ऑनलाईनद्वारे भरण्यासाठी वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे सोय उपलब्ध करून दिलेली आहे. पुणे परिमंडलात सद्यस्थितीत 6 लाख 60 हजार वीजग्राहक दरमहा 145 कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा करीत आहेत. ही संख्या आणखी वाढविण्यासाठी महावितरणकडून ऑनलाईन वीजबिल भरणा प्रोत्साहन उपक्रम सुरु आहे. यामध्ये विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीआयटी) विद्यार्थ्यांनीही योगदान देत स्वयंस्फूर्तीने पथनाट्य बसविले असून त्याद्वारे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी ऑनलाईन वीजबिल भरण्याचा जागर सुरु केला आहे. या पथनाट्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच आणखी 20 विद्यार्थी विविध सोसायट्यांमध्ये जाऊन मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजबिल भरण्याचे वीजग्राहकांना प्रात्यक्षिक देत आहेत.

रास्तापेठ येथे गुरुवारी (दि. 31) महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या पथनाट्याद्वारे व्हीआयटीच्या विद्यार्थ्यांनी मने जिंकून घेतली. यावेळी मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, अधीक्षक अभियंता सर्वश्री सुंदर लटपटे, महेंद्ग दिवाकर, विजय भटकर आदींची उपस्थिती होती. व्हीआयटीचे प्रा. राजेश ढाके यांच्या मार्गदर्शनात शिवम वळसकर, समृद्धी माने, आकाश नाईकवाडे, धनश्री अघोर, तन्वी गायकवाड, सारंग पाम्पटवार, गायत्री विठोलीकर, अभिषेक चौथमल, प्रियांशू घोंगे, शार्दुल राजहंस, गायत्री साळोखे, रेवती शहाणे, प्राची महाजन, प्रतिक खर्डे यांनी पथनाट्य सादर केले. गणेशोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी हे पथनाट्य सादर होणार आहे. महावितरणकडून लेखा अधिकारी श्री. विकास निकम यांनी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. पथनाट्याच्या आयोजनासाठी सहाय्यक महाव्यवस्थापक (लेखा व वित्त) सौ. माधुरी राऊत, कार्यकारी अभियंता श्री. किशोर गोर्डे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, श्री. भरत अभंग यांनी सहकार्य केले.

डॉ डी वाय पाटील हॉटेल मॅनेजमेंटकडे रंगूनवाला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद

0
पुणे :
डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ने एम ए  रंगूनवाला  ७-ए साईड फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे . स्पर्धेचे हे नववे वर्ष होते . अंतिम सामन्यात हॉटेल शेरेटन फोर पॉईंट्स च्या संघाला ५ गोलनी हरवून  त्यांनी हे
विजेतेपद मिळवले . आझम कॅम्पस येथे ही स्पर्धा झाली . स्पर्धेत १३ संघानी भाग घेतला . यामिनी बाकरी (मनुष्यबळ अधिकारी ,हयात ,पुणे ) आणि सुब्रतो सेन,प्राचार्य अनिता फ्रान्झ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले .
————–

टेलीफोन सल्लागार समितीवर उमेश जैन मांडोत यांची नियुक्ती

0
पुणे: भारताचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या शिफारशीवरून अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाचे प्रांतीय संयुक्त मंत्री,  उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ता उमेश मांडोत यांची नियुक्ती पुणे जिल्हा टेलीफोन सल्लागार समितीच्या सदस्यपदी झाली आहे.
नियुक्ती नंतर मारवाडी,गुजराती, जैन, अग्रवाल समाजाच्या अनेक उद्योगपती,व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी उमेश जैन मांडोत यांना शुभेच्छां दिल्या  .नियुक्ती नंतर पत्रकारांशी बोलतांना, उमेश जैन मांडोत म्हणाले की, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी जो विश्‍वास माझ्यावर ठेवून मला हे पद दिले आहे त्या विश्‍वासास पात्र राहिल. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री  बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, सर्व आमदार, नगरसेवक आणि समाजाच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्ह्यातील सर्व बीएसएनएल टेलीफोन व मोबाइल धारकांच्या समस्या सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न करेन.बीएसएनएल संबंधीत सुचना व तक्रारीबाबत मला मो.9822099281 वर संपर्क साधू शकता.

 

मुंबईपाठोपाठ पुण्यातही ‘एसआरए ‘मध्ये भ्रष्टाचाराचा कळस: माजी उपमहापौर आबा बागुल

0
पुणे
गेल्या ५०-६० वर्षांपासून केवळ दहा टक्के जागेवर पक्की घरे आणि पुणे महापालिकेच्या जागेवर शाळेचे आरक्षण ,त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया,राज्यसरकारकडे रक्कमही अदा असे  असतानाही केवळ बिल्डर्सवर्गाच्या फायद्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दडपशाही मार्गाचा अवलंब करून एसआरए योजना राबविण्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे पुणे महापालिकेने घेतलेली हरकत ,स्थानिक नागरिकांचा विरोध न जुमानता एका बिल्डर्सला ‘अच्छे दिन ‘ कसे येतील यासाठी अधिकाऱ्यांची यंत्रणा आटापिटा करीत असल्याने माजी उपमहापौर आबा बागुल यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. 
याबाबत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस , पालकमंत्री गिरीष बापट यांना पाठविलेल्या पत्राद्वारे आबा  बागुल यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अनागोंदी कारभार आणि अधिकाऱ्यांच्या दडपशाहीच्या कारभाराकडे लक्ष वेधले आहे. आबा बागुल यांनी सांगितले कि, पर्वती येथील सर्व्हे क्रमांक ४७ तावरे कॉलनी  या जागेवर पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात प्राथमिक -माध्यमिक शाळेचे आरक्षण गेल्या  वीस वर्षांपासून आहे. तसेच पालिकेच्या मुख्यसभेनेही एकूण क्षेत्र १ हेक्टरवर शाळेची निर्मिती आवश्यक असल्याचा निर्णयही  घेतलेला आहे.  मात्र या ठिकाणी  केवळ दहा टक्के जागेवर  ५०-६०  वर्षांपासून पक्की घरे आहेत.असे असताना एका बांधकाम व्यवसायिकासाठी एसआरएचे अधिकारीवर्ग अधिकाराचा गैरवापर करून  दबाव निर्माण करीत  प्लॅन मंजुरीचा घाट घालत आहे. वास्तविक लोकांचाही विरोध आहे. झोपडपट्टी नसताना कसली ही योजना ? असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केल्यावर अधिकाऱ्यांनी नोटीसा पाठविल्या आहेत. गुंडांकडून दहशत माजवली  जात आहे. त्यातही   महापालिकेकडून भूसंपादनाची कार्यवाहीही सुरु आहे.त्यापोटी  पुणे महानगरपालिकेने शासनाकडे भूसंपादनासाठी रक्कम जमा केली  आहे. तसेच या ठिकाणी जागेच्या भूसंपादनास पालिकेच्या मुख्यसभेनेही मान्यता दिलेली आहे.स्थानिक नागरिकांनी घेतलेली  हरकत यासंदर्भात   झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयालाही तसे  वेळोवेळी कळविण्यात आलेले असतानाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी मात्र बिल्डर्ससाठी जिथे झोपड्पट्टीच नाही तिथे दडपशाहीच्या जोरावर आणि अधिकाराचा गैरवापर करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा घाट घालत आहे. विशेष म्हणजे येथील रहिवाशांनी मुंबईत न्यायालयात याचिकादेखील दाखल केली असून न्यायालयाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासह पुणे महापालिकेलाही नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे आबा बागुल यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी झोपडपट्टी योजना होऊ दिली जाणार नाही असेही त्यांनी नमूद केले आहे.   

स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर; राजू शेट्टींची पुण्यात घोषणा

0

पुणे: सरकारमधून बाहेर पडलो तर पोलिस त्रास देतील…सत्तेची उब मिळणार नाही… कामे होणार नाहीत… याची तयारी आहे कां? असे प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी विचारले…कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला आणि सांगितले, दावी तोडा…त्यानंतर शेट्टींनी आजपासून केंद्र व राज्यातील भाजप सरकार व स्वाभिमानीचा कसलाही संबंध नसल्याचे जाहीर केले. 

गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील भाजप सरकार व स्वाभिमानीत संघर्ष सुरु होता. संघटनेचे सरकारमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेले कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपचे प्रतिनिधी असल्याप्रमाणे काम करत होते. राजू शेट्टी शेतकरी प्रश्‍नावर सरकारवर टीका करत असताना खोत सरकारच्या बाजूने उत्तर देत होत. या संघर्षात शेट्टींच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील उतरले होते. ते खोतांना पाठिंबा देत होते. भाजप प्रवक्‍ते शेट्टींवर तुटून पडत होते. हा वाद सुरु असतानाच शेट्टींनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेवरील पकड मजबूत केली. गेले दोन महिने ते एनडीएमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत देत होते. पहिल्या टप्प्यात त्यांनी सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपपट्टी केली. हा निर्णय त्यांनी चौकशी समितीच्या माध्यमातून घेतला होता. 

दुसऱ्या टप्प्याच्या निर्णयासाठी आज पुण्यात स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत स्वाभिमानी महायुतीबरोबर कां गेली, याचा वृत्तांत त्यांनी सांगितला. मोदींनी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आश्‍वासन पाळले नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी अधिक कर्जबाजारी झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बाजूची धोरणे शासन राबवत नसल्याने एनडीएतून बाहेर पडत असल्याचे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांना हमीभाव आणि सातबारा कोरा करण्याच्या उद्दिष्टाने यापुढे काम करणार आहे, तसेच सर्व पक्षांपासून समान अंतर ठेवणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

उडान योजना निश्चितपणे विमानवाहतूकीच्या क्षेत्रामधील अफाट संधीची कवाडे उघडणार

0
पुणे –
नागरी विमानवाहतूक मंत्रालयाच्या प्रतिष्‍ठेच्या, प्रादेशिक जोडणी योजना – उडानमुळे, या क्षेत्रातील रोजगारक्षमतेला अभूतपूर्व बळ मिळाल्‍यामुळे संपूर्ण विमानवाहतूक उद्योगासाठी जणू जादूचा पेटाराच उघडला आहे.  या सुरू केलेल्‍या नवीन योजनेमुळे, पायलट आणि विमान देखरेख अभियंत्‍यांची मागणी वाढीस लागेल असा या क्षेत्रामध्ये आता असा जोरदार विश्वास निर्माण झाला असून संपूर्ण देशातील विविध शहरांमध्ये या विषयावरील चर्चासत्रे आणि व्याख्याने यांच्या आयोजनामध्ये वाढ दिसून येत आहे.
उडान या प्रादेशिक जोडणी योजनेमुळे, या क्षेत्रातील विविध उद्योगांनी आपल्‍या विस्‍तार योजनांना गती दिली आहे.  यामध्ये उडी घेत, १९९५ साली महाराष्‍ट्रातील बारामती येथील कार्व्हर एव्हिएशन प्रा. लिमिटेड, या अत्‍याधुनिक उड्‌डयन विद्यालयाने, विविध शहरांमधून, नामवंत अशा तज्‍ज्ञ पायलट आणि विमान देखरेख अभियंता (एएमइ), यांची चर्चासत्रे आयोजित करण्यास सुरूवात केली आहे.
नरेंद्र मोदींच्या प्रादेशिक जोडणीच्या ध्येयाची पूर्ती करत, उड्‌डयन मंत्रालयाने उडान ही योजना सुरू करताना एकूण पाच कंपन्यांना, एका तासासाठी २,५०० रुपये इतक्‍या दराचे, १२८ मार्ग बहाल केले आहेत.  उडान योजनेमुळे संपूर्ण देशाच्या दुर्गम भागातील 45 जुने विमानतळ जोडले जाऊन तेथील आर्थिक विकासाला पाठबळ मिळणार आहे.
मुख्य उड्डाण प्रशिक्षक कॅप्टन निखिल जाधव म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये आधीच विविध चर्चासत्रे आयोजित केली आहेत आणि त्‍याचा अपेक्षित परिणाम म्‍हणजे कार्व्हर एव्हिएशनच्या अकादमी विषयी प्रसार आणि तेथे दिल्‍या जाणार्‍या अभ्‍यासक्रमांचा उड्‌डयनाविषयी उत्‍सुक असणार्‍या युवकांना, उड्‌डयन उद्योगातील करिअर विषयी शिक्षित करणे हा आहे.’’
पुणे येथील जेएम फोर हॉटेल येथे आयोजित चर्चासत्राला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता, कार्व्हर एव्हिएशन यांच्या वतीने होतकरूंना ‘‘उड्‌डयन क्षेत्रातील करिअर आणि संधी’’ याविषयी शिक्षित करण्यासाठी पुण्याची नियोजनबध्द यात्रा आयोजित करण्यात आली होती.  या क्षेत्रामध्ये करिअर करु इच्छिणार्‍या युवकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.  तसेच पुणे, मुंबई यासारख्या शहरांमध्ये अशा तर्‍हेची चर्चासत्रे आयोजित करून जास्‍तीत जास्‍त इच्छुक तरुणांबरोबर संपर्क साधण्याचा आम्‍ही प्रयत्‍न करीत आहोत.
जाधव यांनी असेही सांगितले की, उडान योजनेमुळे उड्‌डयन क्षेत्रातील अफाट संधीची कवाडे निश्चित उघडणार असून, यामुळे नवीन विमान कंपन्या, विमान, प्रशिक्षित पायलट आणि विमान देखरेख अभियंत्‍यांची गरज निर्माण होणार आहे.
ते म्हणाले, “मुंबईमध्ये आपल्‍या कार्याचा विस्‍तार करण्याची कार्व्हर एव्हिएशनची योजना असून तेथे अत्‍याधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.  यासाठी आमच्याकडे 150 इतके मनुष्यबळ आणि 11 विमाने असून याव्यतिरिक्त आम्ही 4 नवीन विमाने खरेदी करणार आहोत.  याशिवाय 70 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 120 कोटींचा महसूल मिळविण्याची आमची योजना आहे.’’

शासकीय योजनांच्या प्रसार आणि प्रचारासाठी ‘संवादपर्व’चांगले व्यासपीठ – तहसिलदार हनुमंत पाटील

0

बारामती दि. 30 : राज्य शासनाच्या सर्व विभागांचा मुख्य कणा हा महसूल विभाग आहे.सामान्य जनतेच्या विविध
कामांच्या निमित्ताने सर्वाधिक संपर्क महसूल विभागाशी येत असतो. शासन नेहमीच विविध योजना राबवित असते.
योजनांच्या प्रसार आणि प्रचारासाठी माहिती विभागाने संवादपर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ उपलब्ध
करुन दिले असल्याचे गौरवोद्गार तहसिलदार हनुमंत पाटील यांनी काढले.
गणेशोत्सव काळात माहिती कार्यालयाच्या वतीने संवादपर्व कार्यक्रमाचे आयोजन सांगवी, (ता. बारामती)
येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, माळेगांव कारखान्याचे संचालक चंद्रराव
तावरे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, सांगवीच्या सरपंच श्रीमती
सीमा तावरे, उपसंरपंच भानुदास जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष विलास तावरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग,
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राहुल तावरे, माजी अध्यक्ष किरण तावरे, माहिती कार्यालयाचे प्रतिनिधी
विलास कसबे, शरद नलवडे, मिलींद भिंगारे, ए. एम. खान, भिमराव गायकवाड, परिसरातील नागरीक, महिला
मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तहसिलदार पाटील म्हणाले, शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना
राबविल्या जात असतात. या योजनांचा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहचणे महत्वाचे आहे. यासाठी
माहिती कार्यालयाने योजनांच्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना संवादपर्वच्या
माध्यमातून चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.
तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी ठिबक सिंचन योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात
विमा योजना, मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय कृषी विकास योजनांविषयी माहिती दिली. गट विकास अधिकारी प्रमोद
काळे यांनी पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांविषयी सविस्तर माहिती दिली.
उपस्थित बांधवांच्या शंकेचे निरसनही काळे यांनी यावेळी केले.
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राहुल तावरे म्हणाले, समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना संजय
गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना याच्या माध्यमातून मदत मिळवून
देण्यात येत आहे. माहिती कार्यालयाचा संवादपर्व कार्यक्रम हा अत्यंत स्तुत्य असून याद्वारे आपणाला विविध
विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून योजनांची माहिती होणार आहे. शासन विविध योजना राबवित असून
त्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. तावरे यांनी यावेळी केले.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी माहिती कार्यालयाच्या कामकाजाची रुपरेषा सांगितली.
संवादपर्व कार्यक्रम राबविण्याचा उद्देश विस्तृतपणे सांगून समाजातील स्वयंसेवी संस्था, खेळाडू, कृषी विषयक
उल्लेखनीय काम केलेल्या संस्था, उद्योजक यांना माहिती कार्यालयाच्या वतीने प्रचारासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन
देण्याची ग्वाही दिली. शासकीय योजनांच्या प्रसिध्दीकरीता माहिती विभाग आकाशवाणी, दूरदर्शन, दूरचित्रवाणी,
दिलखुलास कार्यक्रम, तसेच मासिक लोकराज्य या माध्यमांचा वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण तावरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार निलेश तावरे यांनी मानले.

उमाजी नाईक यांची जयंती ७ सप्टेंबरला सर्वत्र साजरी होणार;पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पाठपुराव्याला यश

0

पुणे :- उमाजी नाईक यांच्या जयंती शासकीय नियमानुसार यापुढे प्रत्येकवर्षी ७ सप्टेंबरला साजरी होणार आहे असा अद्यादेश आज शासनाकडून काढण्यात आला आहे. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

अधिवेशन काळात संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्या सह जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी रामोशी समाजाच्या शिष्ठमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भातील चर्चा घडवून आणली होती. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी उमाजी नाईक यांची जयंती सरकारच्या वतीने साजरी करण्याची ग्वाही  दिली होती. त्यानुसार आज महाराष्ट्र शासनाने अद्यादेश काढून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय,निम-शासकीय कार्यालयात ७ सप्टेंबर रोजी उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.

इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे आद्यक्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर  रोजी  सर्वत्र साजरी केली जाते.  सरकारच्या वतीने ही त्यांची जयंती साजरी व्हावी अशी रामोशी समाजाची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती. शासनाच्या अध्यादेशाने त्यांची ही मागणी पूर्ण होत असल्याने त्यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीच उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठीही मुख्यमंत्र्यांनी  १ कोटी रुपये तर  जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून १ कोटी रुपयांचा निधी देण्याचे श्री बापट यांनी मान्य केले आहे . पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने  स्मारकाचे काम ही लवकरच सुरु होईल असा विश्वास रामोशी समाजाकडून व्यक्त होत आहे.

जुड़वा 2″ के अगले गीत “सुनो गणपती बप्पा मोरया” कल होगा रिलीज़

साल की सबसे प्रतीक्षित फिल्मों में से एक “जुड़वा 2” के दूसरे गाने का टीज़र रिलीज हो गया है। “सुनो गणपती  बप्पा मोरया” नामक इस त्यौहार वाले गीत में वरुण धवन के टपोरी रूप से रूबरू होंगे दर्शक जिसमे वरुण अपनी दमदार ऊर्जा के साथ डांस फ्लोर पर धूम मचाते हुए नज़र आएंगे।

उत्तम ऊर्जा से भरपूर यह गीत कल दर्शको के सामने पेश होने के लिए तयार है लेकिन गीत के टीज़र ने पहले से दर्शको के बीच प्रत्याशा पैदा कर दी है।

गणेश महोत्सव जैसे शुभ अवसर पर रिलीज हो रहा गणपति बप्पा का यह गीत सही समय पर अपनी दस्तक दे रहा है। साथ ही यह गीत गणपती विसर्जन जैसे मौके के लिए भी उत्तम गाना माना जा रहा है।

वरुण धवन उर्फ राजा, श्री गणेश के सबसे बड़े भक्त है इसिलए बप्पा का यह भक्त रंगों से भरपूर इस त्योहार को धूमधाम से मनाता हुआ नज़र आ रहा है।

“सुनो गणपती  बप्पा मोरया” में राजा और गणपति के बीच एक अनदेखी दोस्ती देखने मिलेगी जहाँ राजा अपने बेस्टफ़्रेंड बप्पा के साथ हर सुख-दुःख बांटते हुए नज़र आएंगे।

फ़िल्म के इस गीत के लिए वरुण धवन ने आठ दिन नंगे पैर पूरी श्रद्धा के साथ शूट किया था जो इस बात को दर्शाता है कि सिर्फ फ़िल्म में नही, असल जिंदगी में भी वरुण धवन गणपती  के भक्त है और पूरी श्रद्धा के साथ उनकी भक्ति में विश्वास करते है।
“चलती है क्या 9 से 12” जैसे सदाबहार गीत के बाद, अब निर्माता इस गाने के ज़रिए दर्शकों का मनोरंजन करने के लिए तयार है।

‘जुड़वा 2’ के ट्रेलर को रिकॉर्ड तोड़ प्रतिसाद प्राप्त हो रहा है और हँसी से भरपूर इस ट्रेलर ने दर्शको का दिल जीत लिया है।

“जुड़वा 2” में वरुण धवन को राजा और प्रेम के रूप में पेश किया जाएगा, और जैकलीन फर्नांडीज , तापसी पन्नू मूल फ़िल्म से करिश्मा कपूर और रंभा की भूमिका अदा करती हुई नज़र आएंगी।

साजिद नाडियादवाला द्वारा निर्मित, डेविड धवन द्वारा निर्देशित, फ़िल्म जुड़वा 2 को फॉक्स स्टार स्टूडियोज और नडियादवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत किया जाएगा। फ़िल्म 29 सिंतबर को नज़दीकी सिनेमाघरों में दस्तक देगी।

मान्यवर वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलाकार मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे, दि.30: सांस्कृतिक,कला,वाङ्मय क्षेत्रात किमान 15 ते 20 वर्षे कालावधीत कामगिरी केलेल्या,50 वर्षांपेक्षा वय जास्त आहे अशा व ज्यांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न 48 हजार पेक्षा जास्त नाही कलावंत आणि साहित्यिक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातून प्राप्त प्रस्तावांची जिल्हा परिषद स्तरावर जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत प्रत्येक वर्षी 60 पात्र वृद्ध साहित्यिक व कलावंताची निवड केली जाते.

या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना संबंधित तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. परिपूर्ण अर्ज 15 दिवसांच्या आत संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावा.  असे आवाहन सदस्य सचिव,वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन निवड समिती तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी केले आहे.

खास सणानिमित्त सुंगधीत हेअर शाईन व बादाम तेल सादर

0
पुणे (प्रतिनिधि) : प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपण सुंदर दिसावे. महिला आणि पुरूषांचे सौंदर्य उजळून दिसण्यास केशरचना फार महत्वाचे मानले जाते. सुंदर केसांची संपूर्ण देखभाल करण्यासाठी आता पिंपरी-चिंचवड येथील एस्सेन प्रोडक्टस इंडिया लि.ने संपुर्ण महाराष्ट्रात 100% शुध्द परिवार खोबरेल तेल बाजारात उपलब्ध केले आहे.
ही घोषणा पत्रकार परिषदेत परिवार खोबरेल तेलाचे निर्माते एस्सेन प्रोडक्टस इंडिया लि.चे चेअरमन भीमसेन अग्रवाल यांनी केली. भीमसेन अग्रवाल म्हणाले की, परिवार खोबरेलतेल सोबतच प्युअर केअर व सेहत खोबरेलतेल 100% शुध्द खोबरेलतेल बॉटेल व पाऊच मध्ये परवडणार्‍या दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. हे शुद्ध खोबरेलतेल पुणे,पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, ठाणे,नासिक, सातारा, कोल्हापुर,सांगली, जळगांव, सारख्या महाराष्ट्रातील अनेक विस्तारलेल्या शहरात आणि या सारख्या शहरांच्या ग्रामीण भागासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र आणि खानदेश, कोकण आदि सहित संपुर्ण महाराष्ट्रात आमच्या कंपनीने परिवार,सेहत, प्युअर केअर शुध्द खोबरेलतेल आकर्षक पॅकमध्ये उपलब्ध केले आहे.
गणेशोत्सावाची सर्वांना शुभेच्छा देत पुढे श्री भीमसेन अग्रवाल म्हणाले की, या शुध्द खोबरेलतेला सोबतच येणार्‍या सर्व सणांचा विचार करून कंपनीने सुगंधित हेअर शाईन व बादाम तेल ही आम्ही ग्राहकांसाठी विविध आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात सर्वत्र उपलब्ध केले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, परिवार , प्युअर केअर व सेहत खोबरेतेल 100% शुध्द असल्या कारणाने हे तेल केसांना नियमित लावल्याने महिला-पुरूषांच्या केसांसाठी लाभदायक ठरेल. आमच्या कंपनीने कमीत कमी किंमतीत महिला-पुरूष, युवक-युवतींना हे 100% शुद्ध खोबरेलतेल उपलब्ध केले आहे. हे तेल 50 एम एल पासुन 500 एम एल च्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत. अग्रवाल म्हणाले कि, सामान्यापासुन सर्व स्तरांतील नागरिकांना स्वस्त किंमतीत सौंदर्य खुलवण्यासाठी, काळेभोर निरोगी केस मिळावे यादृष्टीने हे तेल महाराष्ट्राच्या बाजारात कंपनीच्या वतीने उपलब्ध केले आहे. याच्या नियमित वापराने महिला-पुरूषांचे केस पांढरे होण्याचे प्रमाण खुप कमी होते आणि डैंड्रफ रहित लांब घनदाट चमकदार काळे केस लाभतात

खासदार संजय काकडे यांची नवी मोहीम; ७२ नगसेवकांनी भेट घेवून दिल्या शुभेच्छ्या (व्हिडीओ)

0

पुणे- जे बोलेल ते होईल ..अशी ख्याती प्राप्त झालेल्या खासदार संजय काकडे यांनी आज आपल्या वाढदिवशी आपला संकल्प जाहीर केला आहे . आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छ्या देण्यासाठी महापालिकेतील तब्बल ७२ नगरसेवकांनी काकडे पॅलेसवर हजेरी लावली . शिवाय कॉंग्रेस ,राष्ट्रवादी, शिवसेना ,मनसे च्या आजी माजी नगरसेवकांनी देखील इथे प्रत्यक्ष काकडे यांची भेट घेवून शुभेच्छ्या दिल्या. पुढील विधानसभेत एक हाती सत्ता भाजप मिळवेल ..शिवाय किती जागा मिळवेल ? हे त्यांनी आजच आपला संकल्प म्हणून सांगितले आहे . महापालिका निवडणुकी बाबत त्यांनी अशाच प्रकारचा संकल्प सोडला होता . आणि त्यांच्या संकल्पानुसार महापलिकेत भाजपला जागांची संख्या प्राप्त झाली होती .  या पार्श्वभूमीवर काकडे यांच्या वाढदिवसाला आणि संकल्पाला राजकीय दृष्ट्या महत्व दिले जात आहे . पहा नेमके खासदार काकडे यांनी काय म्हटले आहे . ..

पुणे, पिंपरी चिंचवड शहर व परिसरासाठी नवीन पाच अतिउच्चदाब उपकेंद्रांचा प्रस्ताव महावितरण व महापारेषणची समन्वय बैठक

0

पुणे, दि. 29 : पुणे शहर व लगतच्या परिसरातील नागरीकरणामुळे येत्या काही वर्षांत विजेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी तसेच सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी पाच नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र अतिशय आवश्यक असल्याची गरज महावितरण व महापारेषणच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवना’त पुणे परिमंडलातील महावितरण व महापारेषणच्या यंत्रणेतील समन्वयासाठी मंगळवारी (दि. 29) बैठक झाली. यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे, मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहिदास मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे शहरी व ग्रामीण भागासह औद्योगिक वसाहतींमध्ये वीजयंत्रणेवरील ताण व वीजपुरवठ्याची स्थिती याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. पुणे शहराच्या लगत निर्माणधीन असलेले निवासी, व्यापारी संकुल व औद्योगिकरणामुळे विजेची मागणी वाढणार आहे. त्यासाठी महावितरण, राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून कामे सुरु झालेली आहेत. परंतु येत्या काही वर्षांतील वीजयंत्रणेवरील ताण पाहता खेड सिटी (कन्हेरसर), सीटीसी (रास्तापेठ), भूगाव, मारुंजे आणि इऑन खराडी याठिकाणी अतिउच्चदाब उपकेंद्रांची गरज असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. या पाचही अतिउच्चदाब उपकेंद्रांचा प्रस्ताव मुख्य कार्यालयास पाठविण्यात येईल, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली.

सद्यस्थितीत असलेल्या महावितरण व महापारेषणच्या वीजयंत्रणेतून पुणे परिमंडलातील सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक समन्वय साधण्याबाबत चर्चा झाली व त्यासंबंधीचे काही निर्णय घेण्यात आले. तसेच महावितरणच्या वीजयंत्रणेवरील वीजभाराचा ताण कमी करण्यासाठी महापारेषणच्या काही उपकेंद्रांत तांत्रिक उपाययोजना करण्याबाबत निर्णय झाले. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात असणाऱ्या अतिभारित वाहिन्यांवरील ताण कमी होणार आहे. याशिवाय चाकण व तळेगाव औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांनाही या उपाययोजनांचा दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी फायदा होणार आहे. या बैठकीला अधीक्षक अभियंता सर्वश्री महेंद्र दिवाकर, सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, उत्क्रांत पायगुडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

संततधार पावसामुळे गणेश मंडळांनी वीजसुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 29 : सध्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात संततधार पाऊस सुरु असून तो येत्या दोन-तीन दिवसांत कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमिवर सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी केले आहे.

गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. या पावसामुळे संभाव्य वीजअपघात टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजयंत्रणेची पुन्हा एकदा तपासणी करून वीजसुरक्षेबाबत योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी व नसल्यास त्वरीत अर्थिंग करून घ्यावे. वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडलेल्या असल्यास विद्युत प्रवाहापासून अपघाताची शक्यता असते. प्रामुख्याने मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये (टिना) विद्युत प्रवाह येऊ शकता. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी तसेच पावसाच्या पाण्यापासून वीज संचमांडणीही सुरक्षित ठेवावी.

वेगवान हवा किंवा पावसाच्या पाण्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाहीत किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची तपासणी करावी. सुरक्षित अंतरापेक्षा ही लाईटिंग अधिक उंचावर असल्याची तपासणी करीत राहावी. सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी सध्याच्या संततधार पावसामुळे वीजसुरक्षेबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गणेश मंडपातील वीजयंत्रणेची वायरमनकडून दैनंदिन तपासणी करण्यात यावी.

पावसामुळे शार्टसर्किट होणे किंवा वीजव्यवस्थेत बिघाड होणे व इतर संभाव्य शक्यता लक्षात घेऊन गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास मंडळांनी संबंधित अभियंते, कर्मचारी किंवा महावितरणच्या 24 तास सुरु असणाऱ्या 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.