खास सणानिमित्त सुंगधीत हेअर शाईन व बादाम तेल सादर
पुणे (प्रतिनिधि) : प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपण सुंदर दिसावे. महिला आणि पुरूषांचे सौंदर्य उजळून दिसण्यास केशरचना फार महत्वाचे मानले जाते. सुंदर केसांची संपूर्ण देखभाल करण्यासाठी आता पिंपरी-चिंचवड येथील एस्सेन प्रोडक्टस इंडिया लि.ने संपुर्ण महाराष्ट्रात 100% शुध्द परिवार खोबरेल तेल बाजारात उपलब्ध केले आहे.
ही घोषणा पत्रकार परिषदेत परिवार खोबरेल तेलाचे निर्माते एस्सेन प्रोडक्टस इंडिया लि.चे चेअरमन भीमसेन अग्रवाल यांनी केली. भीमसेन अग्रवाल म्हणाले की, परिवार खोबरेलतेल सोबतच प्युअर केअर व सेहत खोबरेलतेल 100% शुध्द खोबरेलतेल बॉटेल व पाऊच मध्ये परवडणार्या दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. हे शुद्ध खोबरेलतेल पुणे,पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, ठाणे,नासिक, सातारा, कोल्हापुर,सांगली, जळगांव, सारख्या महाराष्ट्रातील अनेक विस्तारलेल्या शहरात आणि या सारख्या शहरांच्या ग्रामीण भागासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश, कोकण आदि सहित संपुर्ण महाराष्ट्रात आमच्या कंपनीने परिवार,सेहत, प्युअर केअर शुध्द खोबरेलतेल आकर्षक पॅकमध्ये उपलब्ध केले आहे.
गणेशोत्सावाची सर्वांना शुभेच्छा देत पुढे श्री भीमसेन अग्रवाल म्हणाले की, या शुध्द खोबरेलतेला सोबतच येणार्या सर्व सणांचा विचार करून कंपनीने सुगंधित हेअर शाईन व बादाम तेल ही आम्ही ग्राहकांसाठी विविध आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात सर्वत्र उपलब्ध केले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, परिवार , प्युअर केअर व सेहत खोबरेतेल 100% शुध्द असल्या कारणाने हे तेल केसांना नियमित लावल्याने महिला-पुरूषांच्या केसांसाठी लाभदायक ठरेल. आमच्या कंपनीने कमीत कमी किंमतीत महिला-पुरूष, युवक-युवतींना हे 100% शुद्ध खोबरेलतेल उपलब्ध केले आहे. हे तेल 50 एम एल पासुन 500 एम एल च्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत. अग्रवाल म्हणाले कि, सामान्यापासुन सर्व स्तरांतील नागरिकांना स्वस्त किंमतीत सौंदर्य खुलवण्यासाठी, काळेभोर निरोगी केस मिळावे यादृष्टीने हे तेल महाराष्ट्राच्या बाजारात कंपनीच्या वतीने उपलब्ध केले आहे. याच्या नियमित वापराने महिला-पुरूषांचे केस पांढरे होण्याचे प्रमाण खुप कमी होते आणि डैंड्रफ रहित लांब घनदाट चमकदार काळे केस लाभतात