पुणे, दि.30: सांस्कृतिक,कला,वाङ्मय क्षेत्रात किमान 15 ते 20 वर्षे कालावधीत कामगिरी केलेल्या,50 वर्षांपेक्षा वय जास्त आहे अशा व ज्यांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न 48 हजार पेक्षा जास्त नाही कलावंत आणि साहित्यिक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातून प्राप्त प्रस्तावांची जिल्हा परिषद स्तरावर जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत प्रत्येक वर्षी 60 पात्र वृद्ध साहित्यिक व कलावंताची निवड केली जाते.
या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना संबंधित तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. परिपूर्ण अर्ज 15 दिवसांच्या आत संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावा. असे आवाहन सदस्य सचिव,वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन निवड समिती तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी केले आहे.