पुणे –
नागरी विमानवाहतूक मंत्रालयाच्या प्रतिष्ठेच्या, प्रादेशिक जोडणी योजना – उडानमुळे, या क्षेत्रातील रोजगारक्षमतेला अभूतपूर्व बळ मिळाल्यामुळे संपूर्ण विमानवाहतूक उद्योगासाठी जणू जादूचा पेटाराच उघडला आहे. या सुरू केलेल्या नवीन योजनेमुळे, पायलट आणि विमान देखरेख अभियंत्यांची मागणी वाढीस लागेल असा या क्षेत्रामध्ये आता असा जोरदार विश्वास निर्माण झाला असून संपूर्ण देशातील विविध शहरांमध्ये या विषयावरील चर्चासत्रे आणि व्याख्याने यांच्या आयोजनामध्ये वाढ दिसून येत आहे.
उडान या प्रादेशिक जोडणी योजनेमुळे, या क्षेत्रातील विविध उद्योगांनी आपल्या विस्तार योजनांना गती दिली आहे. यामध्ये उडी घेत, १९९५ साली महाराष्ट्रातील बारामती येथील कार्व्हर एव्हिएशन प्रा. लिमिटेड, या अत्याधुनिक उड्डयन विद्यालयाने, विविध शहरांमधून, नामवंत अशा तज्ज्ञ पायलट आणि विमान देखरेख अभियंता (एएमइ), यांची चर्चासत्रे आयोजित करण्यास सुरूवात केली आहे.
नरेंद्र मोदींच्या प्रादेशिक जोडणीच्या ध्येयाची पूर्ती करत, उड्डयन मंत्रालयाने उडान ही योजना सुरू करताना एकूण पाच कंपन्यांना, एका तासासाठी २,५०० रुपये इतक्या दराचे, १२८ मार्ग बहाल केले आहेत. उडान योजनेमुळे संपूर्ण देशाच्या दुर्गम भागातील 45 जुने विमानतळ जोडले जाऊन तेथील आर्थिक विकासाला पाठबळ मिळणार आहे.
मुख्य उड्डाण प्रशिक्षक कॅप्टन निखिल जाधव म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये आधीच विविध चर्चासत्रे आयोजित केली आहेत आणि त्याचा अपेक्षित परिणाम म्हणजे कार्व्हर एव्हिएशनच्या अकादमी विषयी प्रसार आणि तेथे दिल्या जाणार्या अभ्यासक्रमांचा उड्डयनाविषयी उत्सुक असणार्या युवकांना, उड्डयन उद्योगातील करिअर विषयी शिक्षित करणे हा आहे.’’
पुणे येथील जेएम फोर हॉटेल येथे आयोजित चर्चासत्राला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता, कार्व्हर एव्हिएशन यांच्या वतीने होतकरूंना ‘‘उड्डयन क्षेत्रातील करिअर आणि संधी’’ याविषयी शिक्षित करण्यासाठी पुण्याची नियोजनबध्द यात्रा आयोजित करण्यात आली होती. या क्षेत्रामध्ये करिअर करु इच्छिणार्या युवकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तसेच पुणे, मुंबई यासारख्या शहरांमध्ये अशा तर्हेची चर्चासत्रे आयोजित करून जास्तीत जास्त इच्छुक तरुणांबरोबर संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
जाधव यांनी असेही सांगितले की, उडान योजनेमुळे उड्डयन क्षेत्रातील अफाट संधीची कवाडे निश्चित उघडणार असून, यामुळे नवीन विमान कंपन्या, विमान, प्रशिक्षित पायलट आणि विमान देखरेख अभियंत्यांची गरज निर्माण होणार आहे.
ते म्हणाले, “मुंबईमध्ये आपल्या कार्याचा विस्तार करण्याची कार्व्हर एव्हिएशनची योजना असून तेथे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आमच्याकडे 150 इतके मनुष्यबळ आणि 11 विमाने असून याव्यतिरिक्त आम्ही 4 नवीन विमाने खरेदी करणार आहोत. याशिवाय 70 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 120 कोटींचा महसूल मिळविण्याची आमची योजना आहे.’’