Home Blog Page 3247

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या हौशी मराठी नाट्यस्पर्धा 6 नोव्हेंबर पासून…

0

 

पुणे-राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी हौशी मराठी नाट्यस्पर्धा घेण्यात येतात.यंदा स्पर्धेची प्राथमिक फेरी 6 नोव्हेंबर पासून दिल्ली, गोवा आणि महाराष्ट्रातील विविध 19 केंद्रांसह एकूण 21 केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदाचे हे 57 वे वर्ष आहे. पुणे महसुली विभागातील स्पर्धा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड अशा दोन विभागात होतील. पुणे शहरातील स्पर्धा भरत नाट्य मंदिर येथे दररोज सायंकाळी सात वाजता होईल.   6 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडेल.

त्यामध्ये 6 नोव्हेंबर रोजी व्यक्ती संस्थेतर्फे चैतन्य सरदेशपांडे लिखित ‘कॉफिन’, 7 नोव्हेंबर रोजी स्वप्न पब्लिक ट्रस्टतर्फे जयवंत दळवी लिखित ‘किनारा’, 8 नोव्हेंबर रोजी स्नेह संस्थेतर्फे योगेश सोमण लिखित ‘श्यामपट’, 9 नोव्हेंबर रोजी रंगशिला संस्थेतर्फे भैरवी पुरंदरे लिखित ‘पन्नास पैकी सत्तेचाळीस फक्त’, 10 नोव्हेंबर रोजी राजमुद्रा रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे निनाद पाठक लिखित ‘ओळख’, 11 नोव्हेंबर रोजी प्रयोग नाट्य संस्थेतर्फे महेंद्र तेरेदेसाई लिखित ‘मुंबई मान्सून’, 12 नोव्हेंबर रोजी नाट्य साधना संस्थेतर्फे मुकुंद कोठारे लिखित ‘ही का ती, ती का ही’, 13 नोव्हेंबर रोजी नाट्यमंडळतर्फे मानस लयाळ लिखित ‘कुलकर्णी आणि कंपनी’, 14 नोव्हेंबर रोजी नटराज नाट्य कला मंडळातर्फे सुरेश खरे लिखित ‘काचेचा चंद्र’ हे नाट्य प्रयोग सादर होतील.

तसेच 15 नोव्हेंबर रोजी क्रिशिव संस्थेतर्फे डॉ. सीमक मोने लिखित ‘तितिक्षा’, 16 नोव्हेंबर रोजी कलापिनी संस्थेतर्फे पु. ल. देशपांडे लिखित ‘सारी रात्र’, 17 नोव्हेंबर जनरल पॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे डॉ. समीर मोने लिखित ‘माटी कर्‍हे कुम्हारसे’, 18 नोव्हेंबर रोजी भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे सुषमा दळवी लिखित ‘सप्तरिपू’, 19 नोव्हेंबर रोजी आवाबेन नवरचना संस्थेतर्फे निळू फुले लिखित ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’, 20 नोव्हेंबर रोजी अनंतरंग संस्थेतर्फे हेमंत ऐदलाबादकर लिखित ‘आया सावंत झुमके’, 21 नोव्हेंबर रोजी आकांक्षा बालरंगभूमीतर्फे नरेश डोंगरवार लिखित ‘काही खायला आहे का?’, 22 नोव्हेंबर रोजी आकार संस्थेतर्फे हेमंत एदलाबादकर लिखित ‘एका ब्लॉगची गोष्ट’, 23 नोव्हेंबर रोजी आगम संस्थेतर्फे डॉ. समीर मोने लिखित ‘अर्थबोध’ हे नाट्य प्रयोग सादर होतील.

 

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील मतदारांना आवाहन

0

पुणे- 214 पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील  भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादी www.ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार यादीची प्रत या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार मतदार यादीमध्ये ज्या मतदाराच्या नावापुढे छायाचित्र (फोटो) नाहीत अशा मतदारांनी आपले पासपोर्ट साईज रंगीत फोटो व रहिवास पुरावा संबधित बी.एल.ओ. यांच्याकडे किंवा 214 पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ, नवीन प्रशासकीय इमारत आवार, विधान भवनासमोर, पुणे या पत्त्यावर 10 नोव्हेंबर 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) जमा करावेत.  फोटो व रहिवास पुरावा सादर न केल्यास आपण सदर पत्यावर राहात नाहीत असे समजून सदर मतदाराचे नांव मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच मतदार यादीतील जे मतदार मयत असतील त्यांचे नातेवाईकांनी  त्यांची नावे कमी करण्याकरीता नमुना नं.7 चा फॉर्म भरुन या कार्यालयात सादर करावीत. तसेच जे मतदार स्थलांतरीत झाले आहेत त्यांनी नमुना नं.7 चे अर्ज कार्यालयात सादर करावेत व सध्या रहिवास असलेल्या ठिकाणी आपल्या नावाची मतदार नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी 15 नोव्हेंबर 2017 पर्यन्त मुदत

0

मुंबई: राज्यातील थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकऱ्यांच्या थकबाकी वसुलीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना 2017 मध्ये सहभागी होण्यासाठी 15 नोव्हेंबर 2017 पर्यन्त मुदतवाढ देण्यात आली असून योजनेत सहभागी होणाऱ्या कृषीग्राहकांकडून नियमाप्रमाणे थकबाकी वसुली करण्यात येईल. तसेच अनधिकृत जोडणीद्वारे वीजवापर करणाऱ्यांविरुध्द धडक मोहिम राबविण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना 2017′ साठी राज्यातील सर्व कृषिपंपधारक उपसा जलसिंचन योजनेचे ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. जून 2017 चे त्रैमासिक वीज देयके दि. 15 नोव्हेंबर 2017 पूर्वी भरून संबंधिताना या योजनेत सहभागी होता येईल. विद्युत पुरवठा चालू असलेल्या कृषीग्राहकांचा वीजपुरवठा 15 नोव्हेंबर 2017 पर्यन्त महावितरण खंडित करणार नाही. मात्र अशा कृषीग्राहकांनी या योजनेत भाग घेतल्यास 15 नोव्हेंबर 2017 नंतर त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल.

        31 मार्च 2017 अखेरीस असलेली वीजबिलाची मूळ थकबाकी रक्कम हप्त्यात भरण्याची मूभा ग्राहकांना राहणार आहे. ग्राहकांची मूळ थकबाकी 30 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास ती 10 समान हप्त्यांमध्ये प्रत्येक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये भरणा करणे आवश्यक राहील तर मूळ थकबाकी 30 हजारापेक्षा कमी असल्यास ती 5 समान हप्त्यांमध्ये प्रत्येक 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये भरणा करणे आवश्यक राहील. ज्या प्रमाणात 5 समान हप्ते कृषीग्राहक वेळेवर भरतील त्याचप्रमाणात कृषिपंपग्राहकांचे व्याज दंडनियक आकार माफ करण्याबाबत शासनातर्फे विचार करण्यात येईल.

5 किंवा 10 हप्त्यांचा भरणा योजनेच्या कालावधीमध्ये निर्धारित मुदतीप्रमाणे भरणा करणे आवश्यक राहील. तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी मार्च 2017 अखेरची मूळ थकबाकी दि. 31 डिसेंबर 2018 पूर्वी दिलेल्या मुदतीत चालू देयकासहीत भरणे बंधनकारक राहील. योजनेत सहभागी झालेल्या कृषिग्राहकांना 1 एप्रिल 2017 नंतरची चालू वीजबिले पूर्णपणे भरणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी स्थानिकस्तरावर महावितरणतर्फे प्रत्येक आठवड्यात शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत.

सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत वेताळेश्वर क्लब संघ विजयी

0

पुणे- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत खेड विभागात मुलांच्या गटात मांजरेवाडीच्या वेताळेश्वर क्लब संघाने  गुंजाळवाडीच्या सचिन स्पोर्टस् क्लब संघाचा पराभव करत विभागात विजेतेपद पटकावले.

खेड येथे पार पडलेल्या खेड विभागातील सामन्यांमध्ये  मुलांच्या गटात मांजरेवाडीच्या वेताळेश्वर क्लब संघाने गुंजाळवाडीच्या सचिन स्पोर्टस् क्लब संघाचा 16- 5 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले.

उपांत्य फेरीत वेताळेश्वर क्लब संघाने मंचरच्या कमलजादेवी कबड्डी क्लब संघाचा  26- 16 असा पराभव केला.

 स्पर्धेतील प्रत्येक विभागातील विजेता व उपविजेता संघात(मुले व मुली) 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी बारामती येथे सुपर प्लेऑफ सामने होणार आहेत.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुले- उपांत्य फेरी

वेताळेश्वर क्लब, मांजरेवाडी-26 वि.वि कमलजादेवी कबड्डी क्लब, मंचर- 16

सचिन स्पोर्टस् क्लब, गुंजाळवाडी- 27 वि.वि महाराणा प्रताप, मंचर- 18

अंतिम फेरी- वेताळेश्वर क्लब, मांजरेवाडी-16 वि.वि सचिन स्पोर्टस् क्लब, गुंजाळवाडी- 5

‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ च्या वतीने ‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे आयोजन

0

पुणे :

‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’, ‘पुणे महानगरपालिका’, ‘सस्टेनॅबिलीटी इनिशिएटीव्ह’, ‘सस्टेनेबल लिव्हींग इनटीग्रीएटेड सोल्यूशन्स’, ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’ आणि ‘गंगोत्री ग्रीन बिल्ड’ संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या गृहसंस्था, पुणेकर नागरिक पाणी कचरा व ऊर्जा यांचे उल्लेखनीय व्यवस्थापन करतील त्यांचा पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ चे अध्यक्ष गणेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पत्रकार परिषदेला गणेश जाधव, विश्‍वास लेले, गिरीश मठकर, अनघा पुरोहित, निरंजन उपासनी, मनीषा कोष्टी व मकरंद केळकर हे उपस्थित होते.स्पर्धेचे उदघाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दिनांक 5 नोव्हेंबर 2017 रोजी गांधीभवन कमिन्स कंपनीच्या मागे, कोथरूड, येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. स्पर्धेनंतर निरंजन उपासनी, सुचिस्मिता पै व अमर चक्रदेव या तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
‘गंगोत्री ग्रीन बिल्ड’ संस्था स्पर्धेची प्रायोजक आहे.गिरीश मठकर (प्रकल्प संचालक, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन), गणेश जाधव (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन) आणि विश्‍वास लेले (समन्वयक, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन) हे स्पर्धेचे निमंत्रक आहेत.
स्पर्धेसाठी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत नावनोंदणी आवश्यक असून, रेखा लेले 9420483394 आणि विश्‍वास लेले – 9422319710 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी पुण्यातील गृहसंस्था व पुणेकर यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’च्या वतीने गणेश जाधव यांनी केले.
स्पर्धेच्या तयारीसाठी लागणारा कालावधी दिनांक 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत असून, प्रकल्प तपासणी 10 ते 20 फेब्रुवारी 2018 रोजी होईल आणि पारितोषिक वितरण समारंभ 23 फेब्रुवारी 2018 रोजी होणार आहे.

 

” बेटियोको पढायेंगे …. बेटीयोको बढायेगे ….. ” या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन संपन्न

0

पुणे-रॉयल ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक प्रफुल कोठारी (रॉयल ग्रुप) लिखित गाणे ” हम बेटियोको पढायेंगे …. हम बेटीयोको बढायेगे ….. ” या ध्वनिचितफितीचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाले. पूना क्लबमधील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास रॉयल ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक प्रफुल कोठारी , गौरी ढोलेपाटील , श्रीमती शांताबाई कोठारी , योगिता कोठारी , रिध्दी कोठारी , लब्धी कोठारी , आरजू सोमजी , अंशिका कर्णावट , प्रियांका मेहता , सपना मुथ्था , प्रिया कर्णावट , शीतल चोरडिया , सोनिया लखानी , संजय कोठारी , मनीष मेहता , अंकुश मेहता , योगेश कर्णावट, आशा मेहता , डॉ. क्रांती जांभुळकर , रियाझ नदाफ व अन्य  मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन रॉयल ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक प्रफुल कोठारी (रॉयल ग्रुप), गौरी ढोलेपाटील , श्रीमती शांताबाई कोठारी , योगिता कोठारी व उपस्थित असलेल्या मुलींच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी रॉयल ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक प्रफुल कोठारी (रॉयल ग्रुप) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , समाजात स्त्री भृण त्या रोखण्यासाठी आपण या गाण्याची निर्मिती केली आहे . समाजात मुलीविषयी असणारी कमीपणाची भावना या गाण्यामुळे नक्कीच कमी होईल , भारतातील सर्व मुली , विशेषकरून शेतकऱ्याच्या मुली व पोलिसांच्या मुलींसाठी आपण हे गाणे समर्प्रित करीत आहोत . हे गाणे लोकांनी आपल्या गाण्यातून समाजात नक्कीच जनजागृती होईल . या गाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आपण ध्वनी चित्रचित्रफितीचे वाटप सामाजिक संस्थांना मोफत वाटप करणार आहोत .

ऑरगॅनिझशन फॉर सोशल सर्विस ट्रस्टचे अध्यक्षपदी निहार लड्ढा

0

पुणे :सामाजिक कार्यकर्ते, असलेले निहार लड्ढा हे ओएसएसटीचे (ऑरगॅनिझशन फॉर सोशल सर्विस ट्रस्ट ) अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ओएसएसटीची हि जबाबदारी १ नोव्हेंबर , २०१७ रोजी ते घेतील. ते गेल्या सहा वर्षांपासून या संस्थेचा भाग आहेत.या संघटनेची सुरुवातच समाज सुधारण्यासाठी केली गेली आहे . आपल्या समाजातील स्त्रियांना सबळ बनवणे , पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरुकता निर्माण करणे , रक्तदान शिबीर, दारिद्र्यग्रस्त लोकांना मदत करणे आणि विविध अनाथालयांमध्ये व वृद्धांसाठी घरे देण्यास मदत करणे. तसेच अनेक समाजपयोगी उपक्रम ते राबवितात .निहार लड्ढा एका वृत्तमाध्यमाशी संवाद साधताना हे समजले कि त्यांच्याकडे एक चांगली टीम आहे. जे सामाजिक समस्यांचे निर्मूलन करण्यास तयार आहेत. ओएसएसटीची विविध राज्यांमध्ये त्यांची शाखा आहे: बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश इ.
निहार लड्ढा हा इन्सिग्निया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत .त्यांच्या विविध शाखा आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून एमबीए पूर्ण केले. महाविद्यालयीन काळात त्यांचा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग होता. त्यांच्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे, समर्पण आणि आशावादी विचारांमुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

लेखनावर जीएसटी हा साहित्य-संस्कृतीवर घाला – सोनवणी

0

पुणे- जगातील अगदी हुकूमशाही राजवटींनीही साहित्य-कलांवर कोणताही कर लावल्याचे उदाहरण नाही. मात्र सध्या जीएसटीच्या (वस्तू व सेवा कराच्या) कक्षेत साहित्यिकांच्या लेखनालाही सामाविष्ट करुन साहित्य-संस्कृतीवरच घाला घातला आहे. याचा परिणाम भारतातील साहित्य संस्कृतीवर विपरित होऊन त्याचा फटका वाचकांनाही बसणार आहे. लेखकांवरील हा जिझिया तत्काळ रद्द करावा अशी मागणी लेखक-संशोधक संजय सोनवणी यांनी केली आहे.

जीएसटीच्या नियमांप्रमाणे लेखकांच्या मानधनावर १२% जीएसटी आकारण्यात येणार आहे. म्हणजेच हा साहित्यावरीलच कर आहे. वीस लाखाच्या मर्यादेच्या आत जीएसटी नोंदणी अनिवार्य नसली तरी तो कर मग त्याच्या प्रकाशकाला भरावा लागणार असल्याने तो लेखकांच्या मानधनातून कपात केला जाईल. नाहीतर जीएसटी नोंदणी करत प्रकाशकाला तो आकारावाच लागेल, मग मानधन १ रुपया का असेना. याचा भुर्दंड वाचकांनाही पडणार असून याची परिणती पुस्तकांच्या किंमती वाढण्यात होतील. लेखक हे सध्या त्यांना मिळालेल्या मानधनावर आयकरत भरण्यास बाध्य असतांना लेखनावरच कर लावून सरकारने भारतीय साहित्य संस्कृतीला आदिम युगात नेण्याचा चंग बांधला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लादलेले हे अप्रत्यक्ष बंधन आहे. लेखकांनी लेखन करायचे की आपल्या तुटपुंज्या मानधनाचे हिशोब दरमहा कर सल्लागाराकडे देण्याचा उपद्व्याप करत बसायचे हा गंभीर प्रश्न या कराने उपस्थित केला आहे. या जीएसटीमुळे प्रकाशन व्यवसायही संकटात येत कशीबशी तग धरुन राहिलेली साहित्य संस्कृतीच लोप पावण्याची शक्यता निर्माण झाली आहे असेही सोनवणी म्हणाले.

साहित्यावर कर लावण्याचे कार्य कोणतीही सुसंस्कृत सत्ता करत नसते. हा एकुणातच संस्कृतीच्या अस्तित्वावर घाला असून कालिदास, व्यास, वाल्मिकींच्या महाकाव्यांवरच कर लावल्यासारखे आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्रातील साहित्यिक, प्रकाशक व वाचकांना सोबत घेत या जिझियाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे संजय सोनवणी यांनी सांगितले.

 

महावितरणच्या क्रीडास्पर्धेत प्रादेशिक कार्यालयाच्या संघाला विजेतेपद

0

पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलाने आयोजित केलेल्या एकदिवसीय क्रीडा स्पर्धेत प्रादेशिक कार्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. एम. जी. शिंदे यांच्याहस्ते स्पर्धेतील विजेत्या संघांना व खेळाडूंना बक्षीस प्रदान करण्यात आले.

येथील वाडिया कॉलेजच्या मैदानात शनिवारी (दि. 28) आयोजित क्रीडास्पर्धा शिस्तीत व उत्साहात झाली. महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. एम. जी. शिंदे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर, राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय व राज्यस्तरावर प्रतिनिधीत्व केलेल्या महावितरणमधील अनेक दिग्गज खेळाडूंसह सुमारे 140 पुरुष व महिला अधिकारी, कर्मचारी यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

या स्पर्धेत प्रादेशिक कार्यालय, गुणवत्ता व नियंत्रण कार्यालय आणि गणेशखिंड मंडल यांच्या संयुक्त संघाने कबड्डी तसेच महिला व पुरुषांच्या बॅडमिंटन, टेबल टेनीस स्पर्धेत विजेतपद मिळविले. इतर वैयक्तिक क्रीडा स्पर्धेतही या संघाच्या खेळाडूंनी वर्चस्व मिळविले. सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविलेल्या पुणे परिमंडल, रास्तापेठ मंडलाच्या संयुक्त संघाने व्हॉलीबॉल व क्रिकेटमध्ये विजेतेपद पटकाविले. सायंकाळी झालेल्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात विजेत्या संघांना व खेळाडूंना प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. एम. जी. शिंदे यांच्याहस्ते बक्षिस प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनासाठी अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर, श्री. सुंदर लटपटे, श्री. राजेंद्र पवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते पुढीलप्रमाणे – कुस्ती – अजित लोखंडे (57 किलो गट), चंद्गकांत दरेकर (61 किलो गट), सुरेश जाधव (65 किलो गट), निखिल केदार (97 किलो गट), गणेश भोकरे (खुला गट). धावस्पर्धा – 100 मीटर – गुलाबसिंग वसावे (पुरुष गट) व – शिल्पा जाधव (महिला गट), पुरुष गटातील धावस्पर्धेत 200 मीटर व 400 मीटर – गुलाबसिंग वसावे, 800 मीटर – वैभव राऊत, 1500 मीटर- भूषण म्हात्रे. लांबउडी – प्रदीप धनवे (पुरुष गट) व संगीता देशमुख (महिला गट). उंचउडी – योगेश गायके व राजेंद्ग हवालदार (पुरुष गट) तर शितल नाईक (महिला गट). गोळाफेक – पांडुरंग धनवट (पुरुष गट) व शितल नाईक (महिला गट). थाळीफेक – ज्ञानेश्वर गुरव (पुरुष गट) व संगीता देशमुख (पुरुष गट). भालाफेक – कल्लेश्वर सांगवे (पुरुष गट) व धनश्री कुबेर (महिला गट). कॅरम – श्री. कांबळे (पुरुष गट) व वर्षा बोपटे (महिला गट) तर बुद्धीबळ स्पर्धेत श्री. नाईकनवरे (पुरुष गट) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

पुण्यात केवळ 17 लाख वृक्षांची झाली गणना ..(व्हिडीओ)

0

पुणे- पुण्यात ४० लाखाहून अधिक वृक्ष असतील अशी अपेक्षा आहे मात्र आजतागायत केवळ 17 लाख झाडांचाच  सर्वे झाला आहे . आणखी 1 वर्षानंतर पुण्यात कोणती ,झाडे कुठे आणि किती याची सर्व माहिती वेबसाईट वरून नागरिकांना प्राप्त होईल अशी माहिती महापालिका  आयुक्त कुणाल कुमार यांनी आज मुख्य सभेत दिली .
पुण्यातील विविध ठिकाणी झालेल्या वृक्षतोडीबाबत आज विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसच्या च्या नगरसेवकांनी मुख्य सभेत निदर्शने केली आणि प्रशासनाचा निषेध केला . विविध ठिकाणी प्रशासनाने असंख्य  झाडांची कत्तल केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला .

पुणे महापालिका परिसरात गेल्या आठ महिन्यात झाडे उन्मळून पडण्याच्या इतक्या घटना घडल्या आहेत की त्यामुळे भाजप सरकारने नव्याने आणलेला जीएसटी रेरा कायद्यामुळे झाडे आत्महत्या करत आहेत का, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी मुख्यसभेत उपस्थित केला.तुपे म्हणाले की मागील आठ महिन्यात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिल्डरांना  अडसर होणारीच झाडे का उन्मळून पडत आहेत याची चौकशी होण्याची गरज आहे. भाजप नगरसेवक योगेश मुळीक यांनी देखील वडगाव शेरी येथे 59 झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती देत चुकीच्या पद्धतीने वृक्षतोडीला परवानगी देण्यात येत आहे. झाडे उन्मळून पडली असे सांगून विकासक बेकायदा झाडे तोडत असून अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला यावेळी सर्वपक्षीय सभासदांनी वृक्षतोडी बाबत आक्षेप नोंदवला.नगरसेवक सुभाष जगताप यांनी यावेळी पुणे वृक्ष लागवडीत ,जपनुकीत कसे उणे आहे ? हे पर्यावरण अहवालाचा दाखला देत सांगितले …. पहा हा व्हिडीओ या बाबत खुलासा करताना आयुक्त म्हणाले की, वृक्षतोडीच्या संदर्भतील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येणार असून यामुळे अर्जाची नेमकी संख्या समोर येणार आहे. तसेच बेकायदा वृक्ष तोड करण्यावर फौजदारी कारवाई करण्याची महापालिकेची तयारी असल्याचे त्यानीं सांगितले.

अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचा स्थायी कडून निषेध (व्हिडीओ)

0

पुणे- केवळ आश्वासने देणे,भूल थापा देणे, वेळ मारून नेणे, बनवाबनवी करणे यात काही विशिष्ट  लोक आघाडीवर असतात असे म्हणतात पण आता असेच आरोप पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दर दिवशी होऊ लागले आहेत . केवळ लोकच नाहीत तर आता असे आरोप नगरसेवक आणि खुद्द स्थायी समितीने हि केले आहेत . निव्वळ आरोप करून भागले नाहीतर आज चक्क स्थायी समितीची सभा अशा अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी तहकूब करून हा असंतोष  नोंदविण्यात आला . पहा याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी काय म्हटले आहे . …

अव्हेरनेस क्लब क्रिकेट करंडक स्पर्धेत रिलाएबल कम्युनिकेशन संघाचा विजय

0
पुणे: ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट  प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित अव्हेरनेस क्लब  क्रिकेट करंडक स्पर्धेत रिलाएबल कम्युनिकेशन संघाने एक्सा बिझनेस सल्युशन संघाचा 104 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
के.जे इन्स्टिटयूट, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अतूल शेळकेच्या जलद 74 धावांच्या बळावर रिलाएबल कम्युनिकेशन संघाने एक्सा बिझनेस सल्युशन संघाचा 104 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना रिलाएबल कम्युनिकेशन संघाने 20 षटकात 4 बाद 190 धावा केल्या. यात अतूल शेळकेने 40 चेंडूत 74 तर  सोमनाथ काटकेने 40 चेंडूत  46 धावा केल्या. 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एक्सा बिझनेस सल्युशन संघ केवळ 15.4 षटकात सर्वबाद 85 धावांत गारद झाला. रिलाएबल कम्युनिकेशन संघाच्या नौशाद खानने 20 धावा देत 4 गडी बाद केले तर अतुल विटकर व सोमनाथ काटकेने प्रत्येकी 2 गडी बाद करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. अतुल शेळके सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
रिलाएबल कम्युनिकेशन- 20 षटकात 4 बाद 190 धावा(अतूल शेळके 74(40), सोमनाथ काटके 46(40), पार्थ शिंदे 37, प्रसाद निमकर 3-43, सम्राट सोरटे 1-28) वि.वि एक्सा बिझनेस सल्युशन- 15.4 षटकात सर्वबाद 85 धावा(सुरज बागडीया 22, मनिष ए 15, नौशाद खान 4-20, अतुल विटकर 2-12, सोमनाथ काटके 2-3) सामनावीर- अतुल शेळके
रिलाएबल कम्युनिकेशन संघाचा 104 धावांनी विजय

पुण्याऐवजी खासदार संजय काकडे मुंबईतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमवेत …

0

मुंबई : महाराष्ट्र सरकार व मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे ‘राष्ट्रीय एकता दिवस’निमित्त आयोजित केलेल्या ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रमात भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची उपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. पुण्यातील खासदार काकडे यांची मुंबईतील कार्यक्रमामध्ये थेट मुख्यमंत्र्यांसोबत स्टेजवरील उपस्थिती लक्षवेधी ठरली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच खासदार काकडे यांना मान दिल्याने त्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

या कार्यक्रमाला राज्यपाल सी विद्यासागर राव, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती. खासदार काकडे यांचे कार्यक्षेत्र पुणे असताना मुंबईत झालेल्या रन फॉर युनिटीच्या कार्यक्रमात स्टेजवर प्रमुख मान्यवरांच्या रांगेत बसण्याचा सन्मान मिळाला तो खरे तर, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच. कार्यक्रमाला 25 हजार विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.

महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजपाची एकहाती सत्ता आणण्यात खासदार संजय काकडे यांनी निर्णायक व मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे खासदार काकडे यांचे आधीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर असलेले विश्वासाचे बंध आणखी घट्ट झाले. त्यानंतर खासदार काकडे यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील भाजपाचा आमदार नसलेल्या 40 विधानसभा मतदार संघाची 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या मतदार संघात भाजपाचे कमळ फुलविण्याचा चंग खासदार काकडे यांनी बांधला आहे.

भाजपाची ताकद वाढविण्याबरोबरच 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खासदार काकडे यांनी आमदारांची संख्या वाढवून भाजपाची महाराष्ट्रातही एकहाती सत्ता येण्यासाठी नियोजन चालविले आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा झेंडा रोवायचा तर, तशाच खमक्या नेत्याची गरज भाजपाला होती. पुणे महापालिका निवडणुकीत खासदार काकडे यांनी त्यांच्या राजकीय कसबाची झलक दाखविली. आणि गरजसअसलेला खमक्या नेता खासदार काकडे यांच्या रुपाने भाजपाला मिळाला. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात भाजपाचा यापूर्वी कधीही आमदार नसलेल्या मतदार संघात काम करण्याचे धाडस खासदार काकडे यांनी दाखविले आहे.

खासदार काकडे यांच्या या कामांमुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख बनत गेली. त्यामुळेच आजच्या मुंबईतील कार्यक्रमात कुठलाही संबंध नसताना खासदार काकडे यांना स्टेजवर मानाचे स्थान देत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही खासदार काकडे यांचे महत्व अधोरेखीतच केल्याचे दिसते.

‘नवभारत निर्मिती संकल्प ते सिध्दी’च्या वतीने ‘एकता दौड‘

0

पुणे, ता. ३१ – ‘भारत माता की जय’, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अशा घोषणा देत देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त ‘नवभारत निर्मिती संकल्प ते सिध्दी’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘एकता दौड‘ला आज पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
खंडजीबाबा चौकातून सुरू झालेल्या ‘एकता दौड’ला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी हिरवा झेंडा दाखविला. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, समन्वयक योगेश गोगावले, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून आपल्याला ‘एक भारत’ मिळाला आहे. या देशाच्या एकात्मतेचे संवर्धन करताना जगात सर्वात पुढे असणारा श्रेष्ठ भारत निर्माण करायचा आहे. त्यासाठी गरीबी, भ‘ष्टाचार, अस्वच्छता, जातीयवाद, दहशतवाद यांच्यापासून मुक्त नवभारत निर्मितीसाठी कटिबध्द होण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केले.
उपक‘माचे समन्वयक योगेश गोगावले यांनी प्रास्ताविक भाषण केले व नवभारत निर्मितीची शपथ दिली. स. प. महाविद्यालयाजवळ एकता दौडचा समारोप झाला. ३० शाळांमधील पाच हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. पुणे जिल्हा क्रीडा समिती, क्रीडा परिषद या संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
डॉ. के. एच. संचेती, सिंबायोसिसचे डॉ. शां. ब. मुजुमदार, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे राजन गोरे, सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी दीपक माने, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दीलीप सेठ, लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर, लेफ्टनंट जनरल व्ही. एम. पाटील, पुणे मॅरेथॉनचे प्रल्हाद सावंत, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे संस्थापक सचिव बाळासाहेब लांडगे, बुध्दीबळपटू आकांक्षा हगवणे, जलतरणपटू राहुल मोरे, नीलीमा पोंक्षे, मारुती आडकर, मंजू जुगधर, शकुंतला खटावकर, गुरुबंस कौर, रेखा भिडे, हेमंत जोगदेव आदी मान्यवर सहभागी झाले होते.

 

विद्यार्थ्यांच्या सहभागाने राष्ट्रीय एकता दौडमध्ये उत्साह

0

पुणे :  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दौड आज उत्साहपूर्वक वातावरणात पार पडली. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त या एकता दौडमध्ये  विद्यार्थ्यांचा सहभाग मोठया प्रमाणावर होता.

विधानभवन पुणे येथे आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ तसेच माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी  यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय ‘संकल्प दिन’ या निमित्ताने जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दोन्ही प्रतिमाचे पूजन करुन आदरांजली  वाहिली.

यावेळी उपस्थितांना मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन. मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यांमुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सुध्दा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे. ही राष्ट्रीय एकता दिवस शपथ दिली. तसेच बॉक्सींग स्पर्धेत  मनोज पिंगवे, योगामध्ये डॉ.पल्लवी गव्हाणे यांनी अर्जुन पुरस्कार मिळवल्याने विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यांचा सत्कार करुन ‘एकता दौडला’ सुरुवात करण्यात आली.

या एकता दौडमध्ये स्केटींग ग्रुप, सरदार दस्तुर गर्ल्स, सेंट मिराज गर्ल्स, दस्तुर बॉईज स्कूल, आबेदा इमनामदार महाविद्यालय, एनसीसी 36 मराठा, भारत फोर्स, एनसीसी ग्रुप, स्वयंसेवी संस्था, महसूल तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. एकता दौड विधानभवन-फर्स्ट चर्च रोड- साधू वास्वानी चौक- अलंकार टॉकीज- जनलर वैद्य मार्गे संपन्न झाली.