पुणे: ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित अव्हेरनेस क्लब क्रिकेट करंडक स्पर्धेत रिलाएबल कम्युनिकेशन संघाने एक्सा बिझनेस सल्युशन संघाचा 104 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
के.जे इन्स्टिटयूट, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अतूल शेळकेच्या जलद 74 धावांच्या बळावर रिलाएबल कम्युनिकेशन संघाने एक्सा बिझनेस सल्युशन संघाचा 104 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना रिलाएबल कम्युनिकेशन संघाने 20 षटकात 4 बाद 190 धावा केल्या. यात अतूल शेळकेने 40 चेंडूत 74 तर सोमनाथ काटकेने 40 चेंडूत 46 धावा केल्या. 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एक्सा बिझनेस सल्युशन संघ केवळ 15.4 षटकात सर्वबाद 85 धावांत गारद झाला. रिलाएबल कम्युनिकेशन संघाच्या नौशाद खानने 20 धावा देत 4 गडी बाद केले तर अतुल विटकर व सोमनाथ काटकेने प्रत्येकी 2 गडी बाद करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. अतुल शेळके सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
रिलाएबल कम्युनिकेशन- 20 षटकात 4 बाद 190 धावा(अतूल शेळके 74(40), सोमनाथ काटके 46(40), पार्थ शिंदे 37, प्रसाद निमकर 3-43, सम्राट सोरटे 1-28) वि.वि एक्सा बिझनेस सल्युशन- 15.4 षटकात सर्वबाद 85 धावा(सुरज बागडीया 22, मनिष ए 15, नौशाद खान 4-20, अतुल विटकर 2-12, सोमनाथ काटके 2-3) सामनावीर- अतुल शेळके
रिलाएबल कम्युनिकेशन संघाचा 104 धावांनी विजय