पुणे- 214 पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादी www.ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार यादीची प्रत या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार मतदार यादीमध्ये ज्या मतदाराच्या नावापुढे छायाचित्र (फोटो) नाहीत अशा मतदारांनी आपले पासपोर्ट साईज रंगीत फोटो व रहिवास पुरावा संबधित बी.एल.ओ. यांच्याकडे किंवा 214 पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ, नवीन प्रशासकीय इमारत आवार, विधान भवनासमोर, पुणे या पत्त्यावर 10 नोव्हेंबर 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) जमा करावेत. फोटो व रहिवास पुरावा सादर न केल्यास आपण सदर पत्यावर राहात नाहीत असे समजून सदर मतदाराचे नांव मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच मतदार यादीतील जे मतदार मयत असतील त्यांचे नातेवाईकांनी त्यांची नावे कमी करण्याकरीता नमुना नं.7 चा फॉर्म भरुन या कार्यालयात सादर करावीत. तसेच जे मतदार स्थलांतरीत झाले आहेत त्यांनी नमुना नं.7 चे अर्ज कार्यालयात सादर करावेत व सध्या रहिवास असलेल्या ठिकाणी आपल्या नावाची मतदार नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.