पुणे-राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी हौशी मराठी नाट्यस्पर्धा घेण्यात येतात.यंदा स्पर्धेची प्राथमिक फेरी 6 नोव्हेंबर पासून दिल्ली, गोवा आणि महाराष्ट्रातील विविध 19 केंद्रांसह एकूण 21 केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदाचे हे 57 वे वर्ष आहे. पुणे महसुली विभागातील स्पर्धा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड अशा दोन विभागात होतील. पुणे शहरातील स्पर्धा भरत नाट्य मंदिर येथे दररोज सायंकाळी सात वाजता होईल. 6 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडेल.
त्यामध्ये 6 नोव्हेंबर रोजी व्यक्ती संस्थेतर्फे चैतन्य सरदेशपांडे लिखित ‘कॉफिन’, 7 नोव्हेंबर रोजी स्वप्न पब्लिक ट्रस्टतर्फे जयवंत दळवी लिखित ‘किनारा’, 8 नोव्हेंबर रोजी स्नेह संस्थेतर्फे योगेश सोमण लिखित ‘श्यामपट’, 9 नोव्हेंबर रोजी रंगशिला संस्थेतर्फे भैरवी पुरंदरे लिखित ‘पन्नास पैकी सत्तेचाळीस फक्त’, 10 नोव्हेंबर रोजी राजमुद्रा रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे निनाद पाठक लिखित ‘ओळख’, 11 नोव्हेंबर रोजी प्रयोग नाट्य संस्थेतर्फे महेंद्र तेरेदेसाई लिखित ‘मुंबई मान्सून’, 12 नोव्हेंबर रोजी नाट्य साधना संस्थेतर्फे मुकुंद कोठारे लिखित ‘ही का ती, ती का ही’, 13 नोव्हेंबर रोजी नाट्यमंडळतर्फे मानस लयाळ लिखित ‘कुलकर्णी आणि कंपनी’, 14 नोव्हेंबर रोजी नटराज नाट्य कला मंडळातर्फे सुरेश खरे लिखित ‘काचेचा चंद्र’ हे नाट्य प्रयोग सादर होतील.
तसेच 15 नोव्हेंबर रोजी क्रिशिव संस्थेतर्फे डॉ. सीमक मोने लिखित ‘तितिक्षा’, 16 नोव्हेंबर रोजी कलापिनी संस्थेतर्फे पु. ल. देशपांडे लिखित ‘सारी रात्र’, 17 नोव्हेंबर जनरल पॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे डॉ. समीर मोने लिखित ‘माटी कर्हे कुम्हारसे’, 18 नोव्हेंबर रोजी भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे सुषमा दळवी लिखित ‘सप्तरिपू’, 19 नोव्हेंबर रोजी आवाबेन नवरचना संस्थेतर्फे निळू फुले लिखित ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’, 20 नोव्हेंबर रोजी अनंतरंग संस्थेतर्फे हेमंत ऐदलाबादकर लिखित ‘आया सावंत झुमके’, 21 नोव्हेंबर रोजी आकांक्षा बालरंगभूमीतर्फे नरेश डोंगरवार लिखित ‘काही खायला आहे का?’, 22 नोव्हेंबर रोजी आकार संस्थेतर्फे हेमंत एदलाबादकर लिखित ‘एका ब्लॉगची गोष्ट’, 23 नोव्हेंबर रोजी आगम संस्थेतर्फे डॉ. समीर मोने लिखित ‘अर्थबोध’ हे नाट्य प्रयोग सादर होतील.