पुणे : राज्यात रस्त्यांवर एकही खड्डा नाही, असा दावा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना आज सुप्रिया सुळे यांनी खड्ड्याच्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढून टोला लगावला आहे . शिवाय येत्या 1 डिसेंबरपर्यंत राज्यातले सर्व खड्डे बुजवले गेले नाहीत तर मी स्वतः आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील कात्रज उंड्री बायपास व बोपदेव घाट परिसरात खड्ड्यांसह सेल्फी काढून ते फोटो आपल्या फेसबूक पेजवरुन व्हायरल केले. राज्यातील रस्त्यावरचा खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याला सेल्फी विथ खड्डा याद्वारे सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.