मराठी फिल्म इंडस्ट्रीला ग्लॅमर आणणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच स्टाईल आयकॉन राहिली आहे. तरुणाईने तिचे अनेक ट्रेंड्स फॉलो केलेत, आणि तिचे अनेक फॅशन स्टेटमेंट्स चर्चेचा विषय ठरलेत. हिंदी, तामिळ चित्रपटातून तिने तिचा तामिळ आणि हिंदी चाहत्यांचा वर्ग निर्माण केला. तिच्या अशा उत्कृष्ट कामगिरीला गौरविण्यासाठी ह्या वर्षीचा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ हा पुरस्कार एक खास निमित्त ठरले. यात अभिनेत्री सई ताम्हणकरने दोन पुरस्कार पटकावले आहेत. विशेष म्हणजे सईला या पुरस्कारासाठी तीन विभागात नामांकने मिळाले होते. त्यात ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटासाठी महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री, ‘फॅमिली कट्टा’ चित्रपटासाठी फेव्हरेट सहाय्यक अभिनेत्री आणि ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ यासाठी तिला नामांकने होती. त्यातील ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ आणि ‘महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री’ यासाठी तिला पुरस्कार मिळाले आहेत. हा अवॉर्ड स्वीकारताना देखील सई ताम्हणकर अवॉर्डला साजेसा असाच पेहराव करून आली होती.
डबल धमाका असे दोन अवॉर्ड मिळाल्या बाबत सई म्हणते, “हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे, मी खूप खुश आहे कि प्रेक्षकांनी ‘जाउद्याना बाळासाहेब’ ह्या चित्रपटातली माझ्या भूमिकेवर प्रेम केलं आणि महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री म्हणून गौरवलं तसेच महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाल्यानंतर माझी जबाबदारी आणखी वाढते आणि मला हे दोन अवॉर्ड मिळवून दिल्याबद्दल माझ्या चाहत्यांना खूप खूप धन्यवाद”.
प्रेक्षक व समीक्षकांनी केलेलं कौतुक आणि अभिनयातील कुशालपणा यामुळे सईने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले एक घट्ट स्थान निर्माण केलेलं आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं प्रेम यामुळे सईसाठी 2018 चं उतरार्ध वर्ष खूप खास ठरलं आहे. तसेच सध्या सई, समित कक्कड दिग्दर्शित राक्षद चित्रपटाच्या प्रोमोशन मध्ये व्यस्त आहे. तसेच कार्यक्रमात राक्षस चित्रपटाचा टिसर प्रदर्शित करण्यात आला.
पुणे : पुणे येथील दि मुस्लीम को- ऑपरेटिव्ह बँकेत आज( गुरुवारी ) केंद्रीय गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन बँकेच्या एक- दोन नोंदवह्यांच्या प्रती घेतल्या, या पूर्वीही सीबीआय अधिकारी मुस्लीम बँकेत येऊन गेलेले आहेत, मात्र त्यांनी कोणत्या कारणासाठी बँकेला भेट दिली हे सांगितलेले नाही.
‘बँकेच्याच दोन संचालकांनी बँक व माझ्याविरुद्ध जाणून बुजून तक्रारी केल्याचा किंवा सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीच्या कर्ज प्रकरणाला ज्यांनी विरोध केला, त्यांच्याच राजकीय डावपेचाचा हा भाग असण्याची शक्यता आहे, ‘ असे मुस्लीम को -ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
‘दबाव तंत्राचा वापर करून कर्ज मिळावे किंवा अन्य फायदे मिळतात का हे पाहणे , हे देखील कारण असू शकते. नोटबंदीच्या काळात अनेक सहकारी बँकांच्या नोंदी तपासल्या जात आहेत, त्या तपासणीचाही हा भाग असू शकतो. बँकेचे ठेवीदार, सभासद, हितचिंतक यांनी घाबरून जाऊ नये ‘ , असेही डॉ. पी. ए. इनामदार यांनी म्हटले आहे.
सहा वर्षापासून प्रलंबित असणार्या मागण्या पूर्ण नं झाल्यास तीव्र आंदोलन: डॉ दिपक वलोकर
पुणे-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत असणार्या महाराष्ट्रातील ५० समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना मागील ३ ते ४ महिन्यापासून वेतनासाठी समाजकल्याण कार्यालयात फेर्या माराव्या लागत असून अगोदरच वर्षानुवर्षे प्रलंबित असणार्या मागण्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत चालली असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण संचालनालय तसेच विभागीय आणि जिल्हा स्तरावर प्रलंबित असणार्या या मागण्या पूर्ण नं झाल्यास येत्या २६ जानेवारीपासून महाराष्ट्र असोशिअशन ऑफ शोशल वर्क एज्युकेशन (मासवे) मार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष व कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दिपक वलोकर यांनी कर्वे समाज सेवा संस्था पुणे येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तसेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्रात एकूण ५० अनुदानित समाजकार्य महाविद्यालये असून बहुतांशी महाविद्यालयातील गोरगरीब कर्मचारी हे सतत या नं त्या कारणाने समाजकल्याण कार्यालय पुणे च्या अस्ताव्यस्त कारभारामुळे विविध कामांसाठी सतत पाठपुरावा करून देखील त्यांची कामे रखडवून ठेवली जात असतात यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ] सामाजिक न्यायमंत्री ] सामाजिक न्याय विभागाचे सचिव व समाजकल्याण आयुक्त यांच्या समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचार्यांच्या उपरोक्त प्रश्नांबाबत मास्वेच्या पदाधिकार्यांसोबत वारंवार बैठका झाल्या असून यासंदर्भात निवेदने देखील देण्यात अल्ली असून आजतागायत एक हि प्रश्न निकालात निघाला नसल्याची खंत डॉ वलोकर यांनी व्यक्त केली.
समाजकल्याण कार्यालयातून काही फाइल्स गहाळ असल्याचे सांगितले जाते, निवृत्त कर्मचार्यांना पेन्शन लागू करून घेण्यासाठी समाजकल्यानच्या दारी येरजारया माराव्या लागत असतात तसेच विध्यार्थी शिक्षकांच्या प्रमाणानुसार शिक्षकांची उपलब्धता नसून देखील अशा ठिकाणी मंजूर पदे भरली जात नाहीत व नवीन पदे भरण्यास देखील मान्यता दिली जात नाही, बरेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी अनेक वर्षापासून पदोन्नती,] सी ए एस (CAS)प्रमोशन पासून वंचित असल्याने हा सरळ सरळ समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचार्यांच्या मुलभूत हक्क व मानवाधिकाराचे उल्लंघन करण्याचा प्रकार असल्याचे मत डॉ वालोकर यांनी व्यक्त केले.
दर महिन्याचे वीज, पाणी तसेच इतर वेगवेगळे खर्च, घराचे तसेच विम्याचे हप्ते व आजारपणाचा खर्च हा संपूर्णपणे पगारामधूनच करावा लागत असल्याने प्रत्येक कर्मचार्याचा व त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा त्याच्या मासिक वेतनावरच अवलंबून असल्याने कर्मचार्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गंभीर करणाऱ्या समाजकल्याण कार्यालय, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासनाच्या विरोधात येत्या २६ जानेवारीनंतर आरपारची लढाई सुरु करणार असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.
यावेळी कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा. महेश ठाकूर, रजिस्ट्रार विनायक कस्तुरे, अधीक्षक सतीश खुडे, ग्रंथालय सहायक प्रकाश पवार, भारती विद्यापीठ समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ विजय कुलकर्णी तसेच कर्वे समाज सेवा संस्था व भारती विद्यापीठ समाजकार्य महाविद्यालय पुणे च्या शिक्षक व शिक्षेकतर कर्मचार्यांनी त्यांना समाजकल्याण कडून मिळत असलेल्या दुजाभावाच्या वागणुकीबद्दल निराशा व्यक्त केली..
पुणे – येथील यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) येथे महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामीण विकास विभागाचे माजी सचिव सुधीर ठाकरे यांच्या हस्ते तर विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी श्री. ठाकरे आणि श्री. दळवी यांचे स्वागत केले. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव अविनाश सणस आदी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रगती व पुढील दिशा” या विषयावर विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्ताने लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन भरवण्यात आले.
पुणे-पदमश्री नामदेव ढसाळ हे क्रांतिकारी दलित साहित्यिक होते , खेड्यापाड्यातील अन्याय अत्याचार संपविण्याची त्यांनी युवकांची लढाउ संघटना निर्माण केली त्यांच्या शब्दाचा दरारा विलक्षण होता . त्यांनी जनतेला मोठा दिलासा दिला . असे उद्गार प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी काढले .
दलित पँथरचे संस्थापक पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या ४ व्या स्मृतीदिनानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने अभिवादन सभा शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली .यावेळी पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेस झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. रतनलाल सोनग्रा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट ,लखनौचे माजी आमदार दादुजी गुप्ता, पुणे शहर अध्यक्ष मोहंमद शेख , काशिनाथ गायकवाड , सुनिता आडसुळे , प्रतिभा गायकवाड , प्रा. सुरेश धिवार , दत्ता कांबळे , सुरेखा भालेराव , वामन कदम , वैशाली अवघडे , गणेश लांडगे , संतोष जगताप , महादेव मोरे , संतोष सोनवणे , महेश जाधव , अर्चना वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी लखनौचे माजी आमदार दादुजी गुप्ता म्हणाले कि , पदमश्री नामदेव ढसाळ आमचे मित्र होते . त्यांनी आपल्या सामाजिक लढ्यातून मानवतावादी संदेश देउन तसे साहित्य त्यांनी निर्माण केले . पँथर नेते नामदेव ढसाळ यांनी झोपडपट्टी सुरक्षा दलाला नेहमीच प्रेरणा दिली . भगवान वैराट यांनीझोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून आपला लढा उभा केला .
अकाल तख्तचे माजी जत्थेदार दर्शनसिंग यांचा संवाद कार्यक्रम खासगी जागेत होत असताना आणि श्री गुरुसिंग सभा गुरूद्वारा (गणेश पेठ)चा आयोजनाशी काहीही संबंध नसताना या कार्यक्रमाच्या विरोधात गणेश पेठ गुरूद्वारा समोर बेकायदेशीर धरणे आंदोलन करून समाजाची दिशाभूल करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न माजी विश्वस्त भोलासिंग अरोरा, मोहनसिंग राजपाल आणि त्यांच्या सहकार्यांनी केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदन श्री गुरूसिंग गुरूद्वारा (गणेश पेठ) विश्वस्तांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिले. या निवेदनाची प्रत गणेश पेठ पोलीस चौकीत देखील देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटविले.
गुरूद्वाराचे विश्वस्त प्रितपाल सिंग खंडुजा, रणजीतसिंग अजमानी, जगजीत सिंग जुनेजा यांनी हे निवेदन पोलीस आयुक्तांना दिले होते.
भोलासिंह अरोरा, बलबीरसिंह होरा, रणजीतसिंह अरोरा, हरपालसिंह राजपाल, हरमिंदरसिंह अरोरा, मोहनसिंह राजपाल, दर्शनसिंह ढिल्लो, परमजीत सिंह सलुजा, भजनसिंह खंडुजा, हरमिंदर कौर खंडुजा, कुलदीपसिंह टुटेजा यांच्याविरोधात हा तक्रार अर्ज देण्यात आला होता.
अकाल तख्तचे माजी जत्थेदार दर्शनसिंग खालसा यांचा संवाद कार्यक्रम शहरात 19 ते 21 जानेवारी दरम्यान सुखनिवास या खासगी जागेत होत आहे. अकाल तख्त हुकुमानुसार या आयोजनात गणेश पेठ गुरूद्वारा
ने
कसलाही संबंध
ठेवलेला
नाही.
तरीही
या कार्यक्रमाशी गुरूद्वाराचा संबंध जोडून त्याविरुद्ध भोलासिंह अरोरा आणि सहकार्यांनी गणेश पेठ गुरूद्वारा
समोर ध
रणे आंदोलन सुरू केले होते. तसेच या निमित्ताने आगामी दिवसात नियोजित असलेल्या गुरूद्वाराच्या सर्वसाधारण सभेचा संबंध जोडून दिशाभूल केली जात आहे. गुरूद्वराची जाणूनबुजून बदनामी केल्याबद्दल धरणे आंदोलनातील सहभागींवर कायेदशीर कारवाईचा विचार विश्वस्त मंडळ करीत आहे
,अशी माहिती विश्वस्त मंडळाने पत्रकाद्वारे दिली .
गुरूद्वारामध्ये जो कार्यक्रम होणार नाही. त्याविरोधात गुरूद्वारासमोर धरणे आंदोलन करून समाजाची व गुरूद्वाराची बदनामी करण्याचा खोडसाळपणा भोलासिंह, मोहनसिंह राजपाल यांचा गट करत आहे. 2016 साली गुरूद्वारा विश्वस्त निवडणुकीत 7 जागा जिंकून आल्यावरसुद्धा फेरनिवडणूक व्हावी अशा हेतूने त्यांनी राजीनामे दिले होते. मात्र, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या विश्वस्त तरतुदीनुसार निवडणूक रद्द न झाल्याने या असंतुष्ट गटाचे मनसुबे उधळले गेले. त्यामुळे काहीतरी कारण काढून ते विद्यमान विश्वस्तांविरुद्ध तक्रारी, खोडसाळपणा करीत असतात आणि त्यासाठी आपल्या राजकीय पदांचा गैरवापर करीत असतात. दबाव आणत असतात. निवेदनातील मजकुराची कल्पना न देता आधीच समाजातील व्यक्तींच्या सह्या घेऊन त्याचा गैरवापर करीत असतात
,असे या पत्रकात म्हटले आहे .
भोलासिंग अरोरा, राजपाल गटाचा दर्शनसिंह यांच्या कार्यक्रमाला विरोध असेल तर त्यांनी सुखनिवास या ठिकाणी जाऊन, जिथे कार्यक्रम होणार, तिथे जाऊन धरणे आंदोलन करावे, गुरूद्वारासमोर बेकायदेशीर धरणे धरून शीख समाज, गुरूद्वाराला बदनाम करणे चुकीचे होते, असे विद्यमान विश्वस्त प्रितपालसिंह खंडुजा रणजितसिंह अजमानी, जगजीतसिंह जुनेजा यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अरोरा, राजपाल यांच्या कुरापतींची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही पत्रकाद्वारे विश्वस्तांनी केली आहे.
या धरणे आंदोलनामुळे गुरूद्वारा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, गुरूद्वारा परिसरातील शांतता बाधित होत होती. शीख समाजात फूट पाडण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे विश्वस्तांनी म्हटले आहे.
पुणे- कार्टूनिस्ट कंबाईन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन 20आणि 21 जानेवारी रोजी ठाण्यात आयोजित करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचे अध्यक्ष विवेक मेहेत्रेयांनी दिली.
शनिवार,20 आणि रविवार21जानेवारीअसे दोन दिवस संमेलन ज्ञानदेव सभागृह व कचराळी तलाव या दोन ठिकाणी होणार आहे. मेहेत्रे म्हणाले की, मराठी व्यंगचित्रकारांचे नाव जगभरात व्हावे, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी कार्टूनिस्ट कंबाईन असे संस्थेचे नामकरण केले. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सर्वसामान्य माणसाला व्यंगचित्रकलेची ओळख व्हावी, या हेतूने शाळा-शाळांमध्ये व्यंगचित्रकार जाऊन कार्यशाळा घेणार आहेत. यात प्रामुख्याने शाळा मुख्याध्यापक आणि कला शिक्षक यांच्याशी संवाद साधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.
पहिल्यांदा मुली, महिला, तसेच सर्व वयोगटासाठी विनामूल्य व्यंगचित्र कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
देश-विदेशातील सुमारे 73व्यंगचित्रकार यांचा संमेलनात प्रत्यक्ष सहभाग आहे. नगरसेविका रुचिता राजेश मोरे आणि पितांबरी उद्योग समूह यांचेया संमेलनासाठी सहकार्य लाभले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती आहे. परंतु हे संमेलन कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही. कार्टूनिस्ट कंबाईनने यापूर्वी नांदेड, दादर, नागपूर येथे संमेलन आयोजित केले होते.त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. आताही लोकसहभाग सकारात्मक असल्याचे मेहेत्रे यांनी सांगितले. व्यंगचित्र कलेला उर्जितावस्था यावी, या हेतूने आयोजनात सहभाग घेतल्याचे राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले.
संमेलनाच्या माध्यमातून व्यंगचित्रकार शाळा-शाळांमध्ये जाऊन कार्यशाळा घेणार असलेल्या उपक्रमाचे पोस्टर यावेळी प्रकाशित करण्यात आले. व्यंगचित्रकारगजानन घोंगडे यांनी संमेलनाचा लोगो तयार केला आहे. 400हून अधिक व्यंगचित्रेप्रदर्शनात पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची अप्रकाशित सामाजिक चित्र यानिमित्ताने कला रसिकांना पाहता येणार आहेत.संमेलनात उपस्थित राहणारे सर्व राजकीय नेते केवळ कलारसिक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, महापौर मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर संमेलनात सहभागी होणार आहेत.
व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते रविवारी पारितोषिक वितरण समारंभ सोहळा होणार आहे. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चित्र रसिकांना पाहता येणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार सुरेश क्षीरसागर, व्यंगचित्रकार सामाजिक कार्यकर्ता गणेश जोशी, अमोल ठाकूर, कार्टूनिस्ट कंबाईनचे सचिव व्यंगचित्रकार महेंद्र भावसार, प्रसिद्धी प्रमुख राजेश दाभोळकर आदी उपस्थित होते.
पुणे – कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय मुख्यालय, पुणे व ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे इन्स्टिटयूट ऑफ इर्न्फोमेशन अँड टेक्नोलॉजी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 19 जानेवारी, 2018 रोजी कॉलेजच्या आवारात सकाळी 10.30 वाजता विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी पुणे जिल्हयातील पुणे शहर, भोसरी, चाकण, शिरुर, आय.टी.पार्क औद्योगिक परिसरातील सुमारे-40 उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून सुमारे 4 हजार 500 रिक्त पदे कळविण्यात आलेली आहेत. या रिक्त पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, एमबीए इ. पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी शुक्रवार, दिनांक 19 जानेवारी, रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. सहभाग घेणाऱ्या सर्व उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजकांची मागणी पाहून आपली ऑनलाईन संमती नोंदवावी. या बाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 020-26683613 वर श्री.रणदिवे, वरिष्ठ लिपिक यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन उपसंचालक श.बा.अंगणे यांनी केले आहे.
पुणे: शहराच्या पर्यावरण अहवालावर महापालिकेची खास सभा म्हणजे केवळ भाजपचीच बोलघेवडी शाळा ठरली .भाजपचे शहर अध्यक्ष यावेळी पालिकेतील पत्रकार कक्षात उदय जोशी यांच्यासह उपस्थित होते . कॉंग्रेस ,राष्ट्रवादी ,शिवसेना , मनसे यांनी मात्र तोंडाला कुलूप लावूनच ..म्हणजेच मौन पाळूनच बहिष्काराचे हत्यार उपसले . महापालिका आयुक्तांसह असंख्य अधिकाऱ्यांनीही या सभेकडे पाठ फिरविली . महापौर मुक्ता टिळक यांनी साडेअकरा वाजता सभेचे कामकाज सुरू केले. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी गंभीर विषय आहे, त्यावर सर्वांना बोलू द्यावे असे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना सूचवले. त्यांनी विषय आज मंजूर करायचा आहे, वेळ होईल. आमचे आठ तुमचे तीन काँग्रेसचे दोन असे करू म्हणून सांगितले. तुपे यांनी ते अमान्य करत तुमच्याच लोकांना बोलू द्या आम्ही कोणीच बोलणार नाही अशी भूमिका घेतली.
त्यानंतर सुरूवात ज्योत्स्ना एकबोटे यांनी केली. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने शहरात विविध आजारांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यांच्या भाषणानंतर गोपाळ चिंतल यांनी तब्बल तासभर बोलंदाजी केली. पंतप्रधानांपासून शहरातील आमदारांपर्यत अनेकांची नावे घेत त्यांनी भाजपाचे गुणगान केले. कंटाळलेल्या सदस्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी भाषण सुरूच ठेवले. अधिकाऱ्यांवर टीका करत त्यांनी महापौरांनी स्मार्ट सिटी व महापालिकेत सुरू असलेल्या वादावर तोडगा काढावा असे सांगितले.
माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी काही अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित करत शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत. त्यासाठी जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. वाहनांच्या हॉर्नला लगाम घालण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या. मेट्रोचे काम सुरू असताना कर्वे रस्त्यावरील वाहतूक व पर्यावरण यांची वाट लागणार असल्याने त्याचे निराकरण करण्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी केली.(https://www.facebook.com/MyMarathiNews/ या फेसबुक पेजवर पालिकेची मुख्य सभा लाईव्ह केलेली आहे . )
पुणे– ‘व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेड’च्या ‘फॉरेस्ट एज’ या प्रकल्पाच्या प्रारंभाच्या दिवशीच 68 सदनिका म्हणजे जवळपास 85 टक्के सदनिका विकल्या गेल्या असल्याची माहिती पुणे शहरात मुख्यालय असलेल्या, अतिशय विश्वासार्ह आणि प्रसिद्ध अशा व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेड (BSE Scrip ID VASCONEQ) या विकासकांतर्फे देण्यात आली. हा प्रकल्प खराडी येथे असून, या संकुलातील पहिल्या टॉवरमध्ये 80 सदनिका आहेत. या प्रकल्पाचा प्रारंभ मकरसंक्रातीच्या दिवशी करण्यात आला.
या प्रकल्पात टू बीएचके अपार्टमेंट असून, आधुनिक निवास म्हणून विकसित करण्यात येत असलेला हा प्रकल्प 1.7 एकर परिसरात वसविण्यात येणार आहे. हेल्थ टेक होम्स (आरोग्यदायी तंत्रज्ञानयुक्त घरे) असे यांचे प्रारूप असून, पुण्यात अशा प्रकारची घरे प्रथमच तयार होत आहेत.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेडच्या रिअल इस्टेट विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश म्हात्रे म्हणाले, ‘तीन दशकांहून अधिक काळाची परंपरा असलेली व्हॅस्कॉन कंपनी उत्तमतेच्या ध्यासासाठी आणि ग्राहकांना त्यांच्या पैशांचे योग्य मूल्य देण्यासाठी ओळखली जाते. ‘फॉरेस्ट एज’ या प्रकल्पाला ग्राहकांकडून पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रतिसादाने, ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास अधोरेखित झाला आहे. आम्हाला या प्रतिसादाचा अतिशय आनंद असून, ग्राहकांना प्रेरणादायी वातावरण देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू.’
हा प्रकल्प पुणे विमानतळ, प्रस्तावित पुणे मेट्रो स्टेशन आणि पुणे रेल्वे स्टेशन अशा महत्त्वाच्या आस्थापनांपासून केंद्रबिंदूवर आहे, तसेच वर्ल्ड ट्रेड सेंटर, ग्लोबल बिझनेस हब, इऑन आयटी पार्क, वेकफिल्ड आयटी चेम्बर्स अशा काही महत्त्वाच्या उद्योग केंद्रांजवळ आहे. रुग्णालय, रेस्टॉरंट्स आणि मनोरंजन केंद्रेही या प्रकल्पापासून नजीक आहेत.
‘फॉरेस्ट एज’ हा व्हॅस्कॉन, क्लोव्हर बिल्डर्स आणि श्री मधुर रिएल्टर्स यांचा संयुक्त प्रकल्प असून, त्यात व्हॅस्कॉनचा 50 टक्के वाटा आहे.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेडबाबत
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स ही पुण्यात मुख्यालय असलेली बांधकाम व्यवसायातील आघाडीची नोंदणीकृत कंपनी आहे. कंपनीने गेल्या 30 वर्षांहून अधिक काळात भारतातील 30हून अधिक शहरांत 5 कोटी चौरस फुटांवर निवासी, औद्योगिक, आयटी पार्क, मॉल, मल्टिप्लेक्स, हॉस्पिटॅलिटी आणि कम्युनिटी वेल्फेअर सेंटर्स या प्रकारांतील 200 हून अधिक प्रकल्प साकारले आहेत. कंपनीचा भविष्यकाळात ईपीसी आणि परवडणारी घरे या प्रकारांवर भर असणार आहे.
पुणे :‘रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’, ‘जाणीव युवा’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्तविद्यमाने ‘वॉटर आलिंपियाड स्पर्धा’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ऑलिंपियाड प्रकल्पाचे उद्घाटन ‘प्राज इंडस्ट्रीज’ चे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या हस्ते नुकतेच झाले.
ही स्पर्धा २० मार्च २०१८ ला होणार असून, दिनांक ३१ जानेवारी २०१८ पर्यंत नावनोंदणी करायचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) होते. यावेळी ‘रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड’ चे अध्यक्ष अशोक भंडारी, सतीश खाडे (रोटरी क्लब पुणे सिंहगड रोडचे प्रकल्पाचे मुख्य सम्नवयक आणि प्रकल्प अध्यक्ष) उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पसमधील ‘पर्यावरण शास्त्र विभाग’ येथे हा कार्यक्रम झाला. रोटरीच्या या उपक्रमाचे ‘प्रोटॉन जल’ हे मुख्य प्रायोजक आहेत.
विद्यार्थ्यांना जलसंवर्धन क्षेत्रातील करीयर संधीसाठी प्रोत्साहन देण्यासाठीचा रोटरीचा उपक्रम स्तुत्य आहे, असे उद्गार अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज प्रमोद चौधरी यांनी काढले.
‘पाणी संकट संबंधित मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत आणि येत्या दशकामध्ये या मुद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पाणी संकट आणि पाणीटंचाई विषयी तंत्रज्ञान आणि जनजागृती काही प्रमाणात दिलासा देऊ शकतात. म्हणूनच नवोदित तंत्रज्ञांनी या विषयावर नाविन्यपूर्ण आणि कृती करण्यासाठी युवकांना संधी देणे आवश्यक आहे, त्याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये प्रोजेक्ट स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन, संकल्पना सूचना, पोस्टर स्पर्धा आणि लघुपट स्पर्धा यांचा समावेश आहे सर्व क्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात,’ अशी माहिती रोटरी क्लब पुणे सिंहगड रोडचे प्रकल्प अध्यक्ष सतीश खाडे यांनी दिली.
या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोटरीच्या वतीने विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत. ती पुढीलप्रमाणे :
1. शिष्यवृत्तीचे वाटप. यामध्ये मिळणार्या शिष्यवृत्तीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना अमेरिकेतील कोणत्याही संस्थेत पाणी संकट विषयातून एम एस करता येऊ शकेल. या शिष्यवृत्तीची मर्यादा साडे चौतीस हजार पाऊंड इतकी असेल.
2. बाविस देशांमधून एका देशामध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी संधी. यामध्ये विद्यार्थ्याला जाण्या-येण्याचा आणि तेथील राहण्याचा खर्च रोटरीच्या वतीने करण्यात येणार असून, विद्यार्थ्याच्या इंटर्नशिपचा देखील खर्च करण्यात येणार आहे.
3. ‘सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन’ (सीडब्ल्यूपीआरएस) सारख्या संस्थांमध्ये किंवा पाणी विषयावर विविध तंत्रज्ञान विकसित करणार्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच पाणी विषयक प्रशिक्षण करणार्या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेता येण्यासाठी संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
4. ‘किसान एक्स्पो’ सारख्या प्रदर्शनामध्ये प्रकल्प मांडता येण्याची संधी दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना पाणी समस्या आणि पाणी टंचाईबाबत संवेदनशील करणे आवश्यक आहे. जलसंवर्धन, पाणी जतन, पाणी पुनर्वापराचे आधुनिक तंत्रज्ञानात्मक उपाय मिळवण्याचे मार्ग त्यांनी शोधणे गरजेचे आहे. उद्योगसंस्था आणि प्रशिक्षण संस्था यांची या कामात मदत घेता येऊ शकेल हे विद्यार्थ्यांना या ऑलिंपियाडच्या माध्यमातून समजावे हा उद्देश आहे. ज्यामुळे समाजाला याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लाभ मिळेल.
पुणे, – यशापेक्षा पराभव माणसाला खुप काही शिकवून जात असतो. किंबहुना पराभव हीच यशाची महत्वाची आणि पहिली पायरी असते, असे प्रतिपादन भारताचे माजी पाच वेळचे बिलियर्डस् जगज्जेते गीत सेठी यांनी आज केले.
महर्षी कर्वे शिक्षण संस्था व डॉ.भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर(बीएनसीए)यांच्या तर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा दामिनी स्पोर्टस् 2018चे पारितोषिक वितरण भारताचे माजी पाच-वेळचे बिलियर्डस् जगज्जेते गीत सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओजीक्युचे मनिष साबडे, बीएनसीएचे मुख्याध्यापक डॉ.अनुराग कश्यप, प्रा. उमेश चव्हाण, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू अश्लेषा बोडस, महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या क्रीडा समितीचे चेअरमन प्रा.अनिल माणकीकर , प्राचार्य डॉ.मंजू हुंडकेकर, प्रा.संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित खेळाडू आणि संवाद साधताना ते बोलत होते.
गीत सेठी पुढे म्हणाले की, आज हा आपण कार्यक्रम विजेत्यांना बक्षिस देण्याकरिता आयोजित केला आहे. पण मी बोलणार आहे, ते न जिंकलेल्या खेळाडूंबद्दल, जे खेळाडू जिंकू शकले नाहीत आणि ज्यांना दुसरा तिसरा क्रमांकही मिळविता आला नाही. त्यांनी आपण का जिंकू शकलो नाही?याचा विचार करण्याची गरज आहे. आपण आपल्या सर्व क्षमतेचा वापर करून कामगिरी बजावल्यास का जिंकू शकणार नाही. मला असे वाटते की, आपणच प्रयत्न करण्यात कमी पडतो आणि म्हणून जिंकू शकत नाही.
सेठी पुढे म्हणाले की, सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहलीच उदाहरण मी याबाबतीत देईन. कारण या दोघांनी आपल्या कारकिर्दीत अपयशाचाही अनेकदा सामना केला आहे. परंतु त्यातून सावरून पुन्हा यश मिळविण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि अखेर यशाचे शिखरही गाठले. मला वाटते की, आपल्यापैकी प्रत्येकाने हा आदर्श ठेवायला हवा, मग तुमच्यापासून यश किती दिवस दूर पळेल. त्यामुळे विजेत्यांचे अभिनंदन करताना न जिंकलेल्या खेळाडूंना भविष्यातील यशासाठी माझ्या शुभेच्छा.
बीएनसीएचे मुख्याध्यापक डॉ.अनुराग कश्यप म्हणाले की, आपल्या नियमित स्पोर्टस् अॅक्टिव्हिटीमध्ये स्नुकर व बिलियर्डस्चा समावेश करावा असे मला वाटते. कारण त्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकंदरीत एकाग्रतेत सुधारणा होईल. तसेच त्यांचा संयम वाढेल आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वातही चांगली प्रगती होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांचे मी खास आभार मानतो.
महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या क्रीडा समितीचे चेअरमन प्रा. अनिल माणकीकर म्हणाले की, 1938मध्ये अण्णांच्या 80व्या वाढदिवशी पुणे शहरांतील तत्कालीन संस्थांमध्ये मुलींसाठी स्पोर्टस् मीट घेण्याचे ठरविण्यात आले. त्यामध्ये काही सुधारणा व्हाव्यात असे मला वाटते आणि 2006-07मध्ये पहिला दामिनी स्पोर्टस् उपक्रम सुरू केला. पुण्याबाहेरील संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी एकत्र येतील आणि त्यांच्यात वैचारिक देवाणघेवाण होईल, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. यावर्षी सातारा, वाई, नागपूर, रत्नागिरी इत्यांदी ठिकाणांहून 128विद्यार्थीनींनी आपला सहभाग नोंदविला आहे.
आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा दामिनी स्पोर्टस् 2018मध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, खो-खो, बुध्दिबळ, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, लांबउडी, 100मीटर धावणे, 4X100मीटर रिले, स्लोसायकल चालविणे, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, क्रॉस कंट्री, रस्सीखेच, योगासने, सुर्य नमस्कार या खेळांचा समावेश होता. कबड्डी स्पर्धेत श्री सिध्दिविनायक महिला महाविद्यालय(एसएसव्हीएमएम)संघाने विजेतेपद पटकावले. बुध्दिबळमध्ये पुण्याच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन संघाने प्रथम क्रमांक पटकावला. खो-खो स्पर्धेत श्री सिध्दिविनायक महिला महाविद्यालय(एसएसव्हीएमएम)संघाने अव्वल क्रमांक पटकावला. टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन संघाने विजेतेपद संपादन केले.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने बेरोजगारांना रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. पुणे येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालिका अनुपमा उमाजी पवार यांनी दिलेली माहिती.
रोजगारवस्वयंरोजगार (सेवायोजन) विभागाचापूर्वेतिहास– रोजगार व स्वयंरोजगार संघटना जुलै 1945 मध्ये स्थापन करण्यात आली. ही सेवा 1946 पर्यंत सैनिकांच्या पुनर्वसनासंबंधाने कार्यरत होती. या सेवेचा विस्तार 1948 पासून बेरोजगार उमेदवारांसाठी देशभरात सेवायोजन कार्यालयाच्या माध्यमातून सुरु करण्यात आला. तथापि, या संदर्भातील आवश्यकता विचारात घेऊन केंद्र शासनाने देशातील लोकसंख्येच्या प्रमाणात सेवायोजन सेवेचा प्रभावी लाभ कशाप्रकारे जनतेला देता येईल याचा विचार करण्यासाठी 1952 साली बी.शिवराय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीने सेवायोजन संघटनेच्या पुनर्रचनेत व्यावसायिक संशोधन, व्यवसाय मार्गदर्शन व सेवायोजन क्षेत्राची माहिती या बाबीचा समावेश केला. त्याप्रमाणे या संघटनेच्या दैनंदिन प्रशासनाच्या दृष्टीने राष्ट्रीय सेवायोजन संघटनेचे कामकाज राज्य शासनाकडे 1 नोव्हेंबर 1956 साली हस्तांतरीत करण्यात आले.
रोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे कामकाज प्रभावीपणे करण्यासाठी लोकसभेव्दारे सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) अधिनियम 1959 पारित करण्यांत येऊन तो दिनांक 1 मे 1960 च्या नियमावलीन्वये लागू करण्यात आला. या कायद्यातील तरतुदीनुसार 25 व त्यापेक्षा जास्त कामगार/कर्मचारी असणाऱ्या खाजगी आस्थापना व सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच आस्थापनांना मनुष्यबळांची तिमाही माहिती देण्याचे बंधन आहे. सेवायोजन संबंधाने धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र शासनास असून असे घेतलेले निर्णय राज्य शासनाकडून सेवायोजन कार्यालयामार्फत राबविले जातात. राज्य पातळीवर असे निर्णय राबविण्याची जबाबदारी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त यांच्याकडे असते. या संचालनालयाच्या अधिपत्याखाली राज्यातील सर्व केंद्रांचा कारभार चालविला जातो. शासनाच्या महत्त्वाकांक्षी रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीचा कार्यक्रम परिणामकारकरित्या राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 मे 1997 पासून रोजगार व स्वयंरोजगार या स्वतंत्र विभागाची स्थापना केली. रोजगाराबाबत बदलत्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीत पुन्हा कौशल्य व उद्योजकता विभागाचे नामकरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2015 पासून कौशल्य विकास व उद्योजकता या स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे. सद्यस्थितीत बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी कमी झाल्याने त्या उमेदवारांना या विभागामार्फत नव-नवीन प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्यात वाढ करुन उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कार्यालयाचीमाहिती– जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय पुण्यातील रास्ता पेठ येथे कार्यरत असून या कार्यालयातर्फे अशिक्षित, कोणतीही कुशल शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांची रोजगार व स्वयंरोजगाराकरिता नांव नोंदणी केली जाते. उद्योजकांच्या मागणीनुसार संगणक प्रणालीव्दारे नोंदणीधारकांची रोजगारासाठी शिफारस केली जाते. अडचणी आल्यास उद्योजक व उमेदवार यांना मार्गदर्शनही केले जाते. तसेच या कार्यालयाकडून अन्य कामकाजही केले जाते.
कार्यप्रणालीचेसंगणकीकरण– संगणकीकरणामुळे व वेबपोर्टलव्दारे उमेदवारांना व उद्योजकांना www.mahaswayam.in या वेबपोर्टलवर विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामुळे उमेदवारांची नांव नोंदणी, नूतनीकरण, अपडेशन, शैक्षणिक पात्रता वाढ, अनुभव, पत्ता बदल, ईमेल, मोबाईल नंबरची नोंदणी इत्यादी कामे ऑनलाईन पध्दतीने जलदगतीने करणे शक्य झाले आहे. तसेच उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी उमेदवारांची यादी प्राप्त करुन घेणे, रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेणे, त्यांच्याकडील रिक्तपदे अधिसुचित करणे अशी कामेही ऑनलाईन पध्दतीने करणे शक्य झाले आहे. संगणकीकरणामुळे इतर कार्यालयीन कामकाजही सुरळीतपणे व जलदरित्या होण्यास सहाय्यभूत झाले आहे.
रोजगारविषयकसेवांचेविकेंद्रीकरण– इच्छुक उमेदवारांची नाव नोंदणी, नूतनीकरण, शैक्षणिक पात्रता वाढ, नोंदणीचे स्थलांतरण व संपर्कात बदल या सर्व सेवा महा ई सेवा केंद्र, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन यांच्यामार्फत सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे या सेवा घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात जावे लागत नाही.
सेवाविकेंद्रीकरणाचेलाभ – 1. सेवा घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्तापेठ, पुणे या कार्यालयात उपस्थित राहण्याची गरज भासत नाही. 2. सेवांची गाव व तालुका पातळीवर उपलब्धता. 3. उमेदवारांचा वेळ, प्रवास व आर्थिक खर्चात बचत. 4. फक्त मूळ कागदपत्रे पडताळून नोंदणी करता येईल. 5. कोणत्याही सेवा सुविधा केंद्रातून व प्रत्यक्ष मोबाईल/ संगणकाव्दारे रोजगारविषयक सेवा घेण्याची सोय.
अ) बेरोजगारांचीनांवनोंदणी/नुतनीकरण/शैक्षणिकपात्रतावाढ– सद्य:स्थितीत वेबपोर्टलव्दारे उमेदवारांची ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. उमेदवार त्याचा लाभ घेऊ शकतात. उमेदवारांनी नाव नोंदणी केल्यानंतर ती एक वर्षासाठी वैध राहते. त्यानंतर उमेदवारांना त्यांचे कार्ड पुढील एक वर्षाकरिता चालू राहण्यासाठी त्यांनी वर्षातून किमान एकदा लॉगीन होणे गरजेचे आहे. याबाबत स्मरण करुन देण्याच्या दृष्टीने संबंधित उमेदवारास त्याच्या भ्रमणध्वनीव्दारे संदेश दिला जातो.
ब) रोजगाराबाबतमार्गदर्शनकरणे – शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांना त्यांच्याकडील रिक्त होणारी पदे सेवायोजन कार्यालयाच्या वेब पोर्टलवर अधिसुचित करण्याचे बंधनकारक आहे. www.mahaswayam.in या वेबसाईटवर रिक्तपदे अधिसुचित करुन उद्योजक स्वत: नोंदणीकृत बेरोजगार उमेदवारांची यादी प्राप्त करुन घेऊ शकतात व उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊ शकतात. या यादीमध्ये ज्या उमेदवारांची निवड उद्योजकांकडून करण्यात येते, अशा उमेदवारांना एसएमएस व्दारे त्याबाबतची माहिती कळविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
क) व्यवसायमार्गदर्शन – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शनाकरिता आवश्यक ते साहित्य, दैनिके, साप्ताहिके, पुस्तके, माहितीपत्रके इ. उमेदवारांकरिता उपलब्ध आहेत. तसेच ग्रंथालयाची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असणारी सर्व विषयाची निरनिराळ्या प्रकाशनांची पुस्तके, मासिके, दैनिके उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
ड) सेवायोजनक्षेत्रमाहितीसंकलन – पुणे जिल्ह्यातील नोव्हेंबर 2017 अखेर सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील एकूण 11 हजार एक आस्थापना या कार्यालयाच्या नोंदणी पटावर आहेत. या यंत्रणेचे संपूर्णत: संगणकीकरण झाले असून या आस्थापनांकडील मनुष्यबळांची माहिती दर तिमाहीस ऑनलाईन संकलित करण्यात येते. या माहितीचे एकत्रिकरण करुन वरिष्ठ कार्यालयाकडे व श्रम मंत्रालय, दिल्ली यांच्याकडे नियमितपणे सादर केली जाते.
रोजगारप्रोत्साहनकार्यक्रम – या विभागाच्यावतीने रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत या कार्यालयात नाव नोंदविलेल्या उमेदवारांना त्यांचे कौशल्य व क्षमता वाढविण्यासाठी खाजगी आस्थापनामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते.या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा असून यासाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्यांना दरमहा 300 ते 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते.
अ) रोजगारमेळावे– या कार्यालयाकडून बेरोजगार उमेदवार व उद्योजकांचे मेळावे आयोजित केले जातात. आतापर्यत सन 2016-17 व 2017-18 मध्ये एकूण 17 मेळावे आयोजित करुन बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
ब) अण्णासाहेबपाटीलआर्थिकमागासविकासमहामंडळ
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाचे कुठलेही महामंडळ अस्तित्वात नाही, अशा लाभार्थ्यांना महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत स्वयंरोजगार सुरु करण्यासाठुी 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. यात राष्ट्रीयीकृत बँकेचा सहभाग 60 टक्के, उमेदवारांचा सहभाग 5 टक्के तर 35 टक्के रक्कम महामंडळाकडून बीज भांडवल म्हणून देण्यात येते. हे कर्ज पाच वर्षात परतफेड करावयाचे असते. यासाठीचा अर्ज व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्राबाबतची माहिती महामंडळाच्या www.mahaswayamrojgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना काही अडचण आल्यास महामंडळाच्या 020-28342525/24/23/22/21 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
क) कौशल्यविकासकार्यक्रम
पुणे जिल्ह्यासाठी जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समिती स्थापन करण्यात आलेली असून जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. कुशल मनुष्यबळाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आराखडा तयार करणे, कुशल मनुष्यबळास रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सहाय्य मार्गदर्शन, नियंत्रण करणे व जिल्हानिहाय प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्मितीचा आढावा घेणे हा या समितीचा उद्देश आहे. जिल्ह्यात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी व्हि.टी.पी (व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर) संस्थांची नोंदणी करण्यात येत असून त्याच्या इम्पॅनलमेंटसाठी नोडल एजन्सीकडे (एमएसएसडीसी) पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. याशिवाय कौशल्य विकास व प्रचार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात 279 प्रशिक्षण संस्था सुचीबद्ध झालेल्या आहेत. त्यामध्ये प्रशिक्षण सुरु असून डिसेंबर 2017 अखेर 9 हजार 810 उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे.
या कायद्यानुसार या केंद्राकडे दरवर्षी दर तिमाहीस (मार्च, जून, सप्टेंबर व डिसेंबर) नियमातील तरतूदीनुसार पात्र असलेल्या आस्थापनेतील सर्व मनुष्यबळांबाबतची माहिती (ई.आर-1) या कार्यालयाकडे विहीत वेळेत ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे. या विहीत वेळेत ही सर्व विवरणपत्रे या विभागाच्या www.mahaswayam.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा सर्व आस्थापनांना उपलब्ध करुन दिलेली आहे. या कार्यालयाच्या कक्षेत येणा-या उद्योजकांचे संबंधित अभिलेख तपासण्याचे अधिकार या कार्यालयातील राजपत्रित अधिका-यांना आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कसुरदार आस्थापनांची तपासणी नियमितपणे करण्यात येते.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक झाला असून बेरोगगार युवक व उद्योजकांना गतीमानतेने सेवा देण्यात यशस्वी होत आहे.
पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत कॅपजेमिनि संघाने आयबीएम संघाचा तर मर्क्स संघाने टिएटो संघाचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत हर्षल लुनागेरीयाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर कॅपजेमिनि संघाने आयबीएम संघाचा 6 गडी राखून पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना संकल्प देकाटेच्या नाबाद 44 धावांच्या आधारे आयबीएम संघाने 20 षटकात 6 बाद 123 धावा केल्या. 123 धावांचे लक्ष कॅपजेमिनि संघाने केवळ14.5 षटकात 4 बाद 125 धावासह सहज पुर्ण करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. हर्षल लुनागेरीया सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत शुर्वा भादूरीच्या अफलातून फलंदाजीच्या बळावर मर्क्स संघाने टिएटो संघाचा 40 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना मर्क्स संघाने 20 षटकात 4 बाद 180 धावा केल्या. यात शुर्वा भादूरीने 58 चेंडूत 92 तर राकेश पिल्लेने 36 चेंडूत 56 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विकास बन्सलच्या अचूक गोलंदाजीपुढे टिएटो संघाचा डाव 20 षटकात 9 बाद 141 धावांत गारद झाला. विकासने 23 धावांत 5 बळी घेऊन संघाला विजय मिळवून दिला. शुर्वा भादूरी सामनावीर ठरला.
पुणे – महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या‘लोकराज्य’च्या ‘आपले पोलीस,आपली अस्मिता’विशेषांकाचे प्रकाशन अपर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग,पोलीस उप निरीक्षक अण्णासाहेब टापरे, सहायक यू.टी. साळुंखे,पोलीस नाईक ए.बी. पवार,चाबूकस्वार,लगस,हवालदार तांबे आणि इतर उपस्थित होते. लोकराज्य मासिकाच्या या विशेषांकात सायबर गुन्हे,महिला व बाल सुरक्षा,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,दहशतवाद,नक्षलवादाचा बिमोड,सुरक्षित वाहतूक अशा विविध मुद्यांचा समावेश आहे. पोलीस दलातील भरतीसाठी या लोकराज्य मासिकातील माहिती उपयुक्त ठरु शकते. या मासिकाची किंमत दहा रुपये असून जिल्हा माहिती कार्यालय,नवीन मध्यवर्ती इमारत,ससून हॉस्पीटलजवळ,पुणे येथेअंक विक्रीसाठी उपलब्ध आहे.