पुणे – महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’च्या ‘आपले पोलीस, आपली अस्मिता ’ विशेषांकाचे प्रकाशन अपर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पोलीस उप निरीक्षक अण्णासाहेब टापरे, सहायक यू.टी. साळुंखे, पोलीस नाईक ए.बी. पवार,चाबूकस्वार, लगस, हवालदार तांबे आणि इतर उपस्थित होते. लोकराज्य मासिकाच्या या विशेषांकात सायबर गुन्हे, महिला व बाल सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,दहशतवाद, नक्षलवादाचा बिमोड, सुरक्षित वाहतूक अशा विविध मुद्यांचा समावेश आहे. पोलीस दलातील भरतीसाठी या लोकराज्य मासिकातील माहिती उपयुक्त ठरु शकते. या मासिकाची किंमत दहा रुपये असून जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, ससून हॉस्पीटलजवळ, पुणे येथेअंक विक्रीसाठी उपलब्ध आहे.