पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत कॅपजेमिनि संघाने आयबीएम संघाचा तर मर्क्स संघाने टिएटो संघाचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत हर्षल लुनागेरीयाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर कॅपजेमिनि संघाने आयबीएम संघाचा 6 गडी राखून पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना संकल्प देकाटेच्या नाबाद 44 धावांच्या आधारे आयबीएम संघाने 20 षटकात 6 बाद 123 धावा केल्या. 123 धावांचे लक्ष कॅपजेमिनि संघाने केवळ14.5 षटकात 4 बाद 125 धावासह सहज पुर्ण करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. हर्षल लुनागेरीया सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत शुर्वा भादूरीच्या अफलातून फलंदाजीच्या बळावर मर्क्स संघाने टिएटो संघाचा 40 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना मर्क्स संघाने 20 षटकात 4 बाद 180 धावा केल्या. यात शुर्वा भादूरीने 58 चेंडूत 92 तर राकेश पिल्लेने 36 चेंडूत 56 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विकास बन्सलच्या अचूक गोलंदाजीपुढे टिएटो संघाचा डाव 20 षटकात 9 बाद 141 धावांत गारद झाला. विकासने 23 धावांत 5 बळी घेऊन संघाला विजय मिळवून दिला. शुर्वा भादूरी सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
आयबीएम- 20 षटकात 6 बाद 123 धावा(पियुष कामटीकर 23, संकल्प देकाटे नाबाद 44, विनय पलुरु 21, शशांक त्रिवेदी 2-21) पराभूत वि कॅपजेमिनि- 14.5 षटकात 4 बाद 125 धावा(हर्षल लुनागेरीया नाबाद 59(33), फनेंद्र पाईला 32, संकल्प देकाटे 2-10) सामनावीर- हर्षल लुनागेरीया
कॅपजेमिनि संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.
मर्क्स- 20 षटकात 4 बाद 180 धावा(शुर्वा भादूरी 92(58), राकेश पिल्ले 56(36), अंकित जैन 2-28) वि.वि टिएटो-20 षटकात 9 बाद 141 धावा(स्वप्निल उपाध्ये 21, गणेश अंब्रे 34,धनाजी कालके नाबाद 45, विकास बन्सल 5-23 ) सामनावीर- शुर्वा भादूरी
मर्क्स संघाने 40 धावांनी सामना जिंकला.