ठाण्यात दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन

Date:

पुणे- कार्टूनिस्ट कंबाईन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन 20 आणि 21 जानेवारी रोजी ठाण्‍यात आयोजित करण्‍यात आल्‍याची माहिती अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचे अध्यक्ष विवेक मेहेत्रे यांनी दिली.

            शनिवार,20 आणि रविवार 21 जानेवारी असे दोन दिवस संमेलन ज्ञानदेव सभागृह व कचराळी तलाव या दोन ठिकाणी होणार आहे. मेहेत्रे म्हणाले की, मराठी व्यंगचित्रकारांचे नाव जगभरात व्हावे, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी कार्टूनिस्ट कंबाईन असे संस्थेचे नामकरण केले. संमेलनाचे उद्घाटन  प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

            सर्वसामान्य माणसाला व्यंगचित्रकलेची ओळख व्हावी, या हेतूने शाळा-शाळांमध्ये व्यंगचित्रकार जाऊन कार्यशाळा घेणार आहेत. यात प्रामुख्याने शाळा मुख्याध्यापक आणि कला शिक्षक यांच्याशी संवाद साधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.

            पहिल्यांदा मुली, महिला, तसेच सर्व वयोगटासाठी विनामूल्य व्यंगचित्र कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

देश-विदेशातील सुमारे 73 व्यंगचित्रकार यांचा संमेलनात प्रत्यक्ष सहभाग आहे. नगरसेविका रुचिता राजेश मोरे आणि पितांबरी उद्योग समूह यांचे या संमेलनासाठी सहकार्य लाभले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती आहे. परंतु हे संमेलन कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही. कार्टूनिस्ट कंबाईनने यापूर्वी नांदेड, दादर, नागपूर येथे संमेलन आयोजित केले होते.त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. आताही लोकसहभाग सकारात्मक असल्याचे मेहेत्रे यांनी सांगितले. व्यंगचित्र कलेला उर्जितावस्था यावी, या हेतूने आयोजनात सहभाग घेतल्याचे राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले.

            संमेलनाच्या माध्यमातून व्यंगचित्रकार शाळा-शाळांमध्ये जाऊन कार्यशाळा घेणार असलेल्या उपक्रमाचे पोस्टर यावेळी प्रकाशित करण्यात आले. व्‍यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी संमेलनाचा लोगो तयार केला आहे.  400 हून अधिक व्यंगचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची अप्रकाशित सामाजिक चित्र यानिमित्ताने कला रसिकांना  पाहता येणार आहेत. संमेलनात उपस्थित राहणारे  सर्व राजकीय नेते केवळ कलारसिक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, महापौर मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर संमेलनात सहभागी होणार आहेत.

            व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते रविवारी पारितोषिक वितरण समारंभ सोहळा होणार आहे. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चित्र रसिकांना पाहता येणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार सुरेश क्षीरसागर, व्यंगचित्रकार सामाजिक कार्यकर्ता गणेश जोशी, अमोल ठाकूर, कार्टूनिस्ट कंबाईनचे सचिव व्यंगचित्रकार महेंद्र भावसार, प्रसिद्धी प्रमुख राजेश दाभोळकर आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नसरापूर प्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल

आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात...

उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’

राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन पुणे, दि २:...

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...