Home Blog Page 3198

वक्तृत्व स्पर्धेत रमणबागला सर्वसाधारण विजेतेपद

0

पुणे – ‘आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा समिती’ने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल रमणबागने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. शाळेला मध्यम गटाचे विजेतेपद आणि कनिष्ठ व वरिष्ठ गटात उपविजेतेपद मिळाले. सन्मान गोसावीला वैयक्तिक एन. आर. जोशी पारितोषिक, मिहिर देशपांडेला समयस्ङ्गूर्ती भाषणासाठी शालिनीताई केळकर पारितोषिक आणि हर्ष जोशीला संस्कृतसाठी जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चारूता प्रभुदेसाई, वैशाली भाकरे, ऋचा कुलकर्णी, सुहास देशपांडे, गीतांजली लखादिवे, सुवर्णा केदारी, लता दळवी, अर्चना पंच, चंद्रशेखर कोष्टी, दिपाली चौघुले, मोहन शेटे, गणेश देशमुख या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका रजनी कोलते आणि सह-विभाग प्रमुख सुनीता खरात यांनी नियोजन केले.

नवीन मराठी शाळेत १४० पालकांची आरोग्य तपासणी
– डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत माता पालकांसाठी स्तनातील कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १४० महिलांची तपासणी करण्यात आली. प्रशांती कॅन्सर केअर मिशन, ऑकि‘ड ब‘ेस्ट केअर क्लिनिक यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. चैन्यानंद कोप्पीकर, लालेह बुशेरी, दिपाली चव्हाण यांनी तपासणी केली. स्तनांतील कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जागृती करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मु‘याध्यापिका कल्पना वाघ यांनी सांगितले. तनुजा तिकोने, जयश्री खाडे, अश्‍विनी राजवाडे यांनी संयोजन केले.

फटकळ, परखड…स्पष्ट ते जिव्हाळ्याचे …मधुकाकांच्या आठवणींना उजाळा

0

पुणे – श्रीविद्या प्रकाशनचे संस्थापक मधुकाका कुलकर्णी हे जेवढे फटकळ….स्पष्ट बोलणारे होते तेवढेच प्रेमळ, जिव्हाळा जपणारे होते. मधुकाकांच्या विविध आठवणीतून त्यांच्या सहृदांनी त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू आज एक अनौपचारिक, कौटुंबिक समारंभात उलगडून दाखवले. निमित्त होते आयकर भवन चौकाला मधुकाका कुलकर्णी यांचे नाव देण्याच्या समारंभाचे.

पुणे महापालिकेच्यावतीने प्रभात रोड गल्ली क्रमांक १४ मधील आयकरभवनच्या चौकाला आज ज्येष्ठ प्रकाशक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी चौक असे नाव देण्यात आले. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अरूणा ढेरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. मिलिंद जोशी, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आणि निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते ​

​हे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर आवर्जून उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आणि मंजूषा खर्डेकर, जयंत भावे, दीपक पोटे आदी नगरसेवकांनी या चौकाला मधुकाकांचे नाव देण्याचा प्रस्ताव दिलेला होता.

श्रीविद्या प्रकाशन संस्थेला नुकतीच २६ जानेवारी २०१८ या दिवशी ५० वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून त्यांचे नाव चौकाला देण्याच्या समारंभाचे आज नामकरण करण्यात आले. त्यानंतर सहकारसदन सभागृहात झालेल्या अनौपचारिक व कौटुंबिक कार्यक्रमात सर्वच मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितलं की, मधुकाकांची आणि आपली भेट व पुढे मैत्री ही पुस्तक प्रकाशनामुळे झालेली नाही. विश्वकोष निर्मितीच्या समितीचे आम्ही दोघेही सदस्य असल्याने तेथे आमची प्रथम भेट झाली. पुढे मैत्री झाली आणि श्रीविद्या प्रकाशनने माझी पुस्तके प्रसिद्ध केली. लेखक आणि प्रकाशक या व्यवहारी संबंधांचे रूपांतर मैत्रीत कऱण्याची हतोटी असल्यानेच अनेक मान्यवर लेखक त्यांनी जोडले. त्यांच्या या जिव्हाळ्यामुळेच मलाही अनेक मित्र मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

मधुकाका बोलायला एकदम फटकळ, स्पष्ट पण तेवढेच ते मित्र परिवार, कुटुंबियांच्याबद्दल प्रेमळ होते हे अनेकदा त्यांच्या बोलण्यातून दिसून आल्याचे निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. ते म्हणाले, मधुकाकांची गप्पा मारण्याची हनुमान टेकडी, डेक्कनक्वीन. डेक्कनक्वीनमध्ये त्यांनी एक मंत्र्याला तुम्हाला ग्रंथातलं काही कळत नाही असं सुनावल्याचीही आठवण त्यांनी सांगितली. त्यांच्या फटकळ, परखड स्वभावामुळे मला अनेक व्यक्तिमत्वांचे गुणवैशिष्ट्ये नेमक्य, मोजक्या शब्दात मला समजायची. पत्रकारीतेत मला याचा उपयोग रॉ मटेरियलम्हणून, मुलाखती घेताना अनेकदा झाला. यावेळी त्यांनी पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज अशा महान व्यक्तींना वारंवार भेटण्याची संधी आपल्याला मधुकाकांमुळेच मिळाल्याचे त्यांनी विनम्रपणे सांगितले.

डॉ. अरूणा ढेरे यांनी सांगितले की लहानपणापासून आपण मधुकाकांच्या घरातच वावरत आहोत. वडिलांच्या वाढदिवसाला न चुकता साहित्यिक, कवी यांच्या घेऊन दरवर्षी ते येत असत आणि त्यांच्या अनेक मैफली आपण अनुभवल्या आहेत. एकचवेळी केवळ ललित पुस्तकेच नाही तर वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. अगदी शालेय अभ्यासक्रमाचीही पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. डॉ. जोशी यांनी सांगितले की, लक्ष्मीच्या दारी सरस्वतीच्या वीणेचा झंकार ऐकू येत नाही असं म्हणतात. पण आज माधुरीताईंनी लक्ष्मीच्या दारातच (आय़करभवन चौकात) एक सरस्वती उपासकाचे नाव कोरले आहे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मधुकाका केवळ प्रकाशकच नव्हते तर ते कार्यकर्तेही होते त्यामुळेच विविध समित्या, साहित्य परिषदेत त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केल. त्यांनी प्रकाशन व्यवसायात व्यवहार न बघता त्यांनी जिव्हाळा जपला. याच जिव्हाळ्यातून अनेक मान्यवर लेखक त्यांनी श्रीविद्या प्रकाशन संस्थेशी जोडले. त्यामुळेच पु. लं. पासून ते नारळीकरांपर्यंत अनेक लेखकांनी त्यांच्या पुस्तकांचे हक्क मधुकाकांकडे दिले आहेत.

नगरसेविक माधुरी सबस्त्रबुद्धे यांनी मधुकाका व त्यांचे सर्व कुटुंब हे आमचेच कुटुंब आहे. मधुकाका हे भारती निवास कॉलनीचे अध्यक्ष असल्याने अनेक सर्वसाधारण सभा त्यांनी याच सभागृहात बसून केल्या असल्याची आठवण सांगितली. निखील कुलकर्णी तर बालरंजन केंद्रातीलच होता असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी कुलकर्णी आणि त्यांचे जावई अवधूत जोशी कुटुंबियांच्यावतीने विकास आमटे यांच्या लोकबिरादरी, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, मधुकाकांच्या गावातील पिंपरी पेंढारमधील शाळा, नारायणगावची सबनीस विद्यालय, बालरंजन केंद्र आणि डॉ. अरूणा ढेरे यांच्या मायलेकरं या सांस्कृतिक कार्यक्रमाला आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकाकांच्या पणतू टेविन निखिल कुलकर्णी याने त्याच्या भावना व्यक्त करून केले. त्यानंतर निखील कुलकर्णी यांनी औपचारिक स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ऍड. सोनाली श्रीखंडे यांनी तर आभार प्रदर्शन पूर्वा खजूरकर – जोशी यांनी केले.

सोबत फोटो आहे.

चार ही नगरसेवकांमुळे प्रभागाचा विकास – आ मेधा कुलकर्णी

0
पुणे-प्रभाग १३ मधील चार ही नगरसेवक परस्पर सहकार्यातून आणि समन्वयातून प्रभागातील विकास कामे मार्गी लावत आहे,मी ही त्यांच्या बरोबर असून प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार येथील विकास कामे होत आहेत असे आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे व जयंत भावे यांच्या विकास निधीतून गोसावी वस्तीतील ड्रेनेज लाईन नव्याने करण्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या निधीतून गोसावी वस्तीतील गल्ली क्रमांक ३ व ४ येथे बोरवेल च्या कामाचे ही भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या ” आम्हा तिघांच्या निधीतून तब्बल ५० लाख रुपयांचे बजेट येथील ड्रेनेज लाइन नव्याने टाकण्यासाठी खर्च होत आहेत,मात्र ह्या लाईन स्वच्छ राहाव्यात यासाठी येथील रहिवाश्यांनी काळजी घेतली पाहिजे.ड्रेनेज मध्ये अन्न पदार्थ वा अन्य घाण टाकल्यास ती खाण्यास घूस येते व ती ड्रेनेज लाइन पोखरत जाते व ड्रेनेज तुंबते व वारंवार ड्रेनेज सफाई साठी निधी आणि मनुष्यबळ खर्च करावा लागतो.तसेच यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या ही उद्भवते.तरी नागरिकांनी स्वच्छतेवर भर द्यावा व त्यासाठी मी येथे बकेट्स ही पुरवत आहे,असे ही त्या म्हणाल्या.तसेच येथील स्वच्छतागृहास पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने येथे बोर खणण्याचे बजेट टाकले असल्याचे ही त्यांनी सांगितले.
नगरसेवक दीपक पोटे म्हणाले ” गोसावी वस्तीतील सर्व विकास कामे आम्ही करणार असून येथील नागरिकांच्या तक्रारींची दाखल घेऊन आम्ही येथील समस्या सोडविण्यावर भर देत आहोत.”
नगरसेवक जयंत भावे म्हणाले ” आम्ही प्रभागातील विविध विकास कामांसाठी २० कोटी चे बजेट आणले असून प्रभागातील सर्व विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.”
यावेळी प्रशांत हरसुले ,गौरी करंजकर,सौरभ अथनीकर,शंतनू खिलारे,गणेश चव्हाण,एड प्राची बगाटे,ऋत्विक अघोर,शेखर जोशी,प्रसाद श्रीखंडे,जितेंद्र गाडे,सुनील होलबोले,चंद्रकांत पवार,निलेश घोडके,अरुण अहिरे,हेमंत भावे,इ पदाधिकारी ,नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

” साहित्यगंध ” पुस्तकाचे प्रकाशन

0

पुणे-ललित कला साहित्य मंचच्यावतीने ७२ कवीं व लेखकांचे साहित्य असलेले ” साहित्यगंध ” पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिक राहुल भोसले यांच्याहस्ते करण्यात आले . नऱ्हे – आंबेगावमधील ललित कला साहित्य मंचच्या सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास साहित्यिक दिनेश खैरे , साहित्यगंधचे संपादक ललित कोलते , उपसंपादक अमोल झोपे , सहसंपादक ह. भ. प. कलावती सुर्वे , प्रियांका कोलते आदी मान्यवर उपस्थित होते .

सर्वभाषिक साहित्यिकाकरिता त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी व्यासपीठ मिळावे याकरिता तरुणांनी एकत्रित येऊन ललित कला साहित्य मंचची स्थापना करण्यात आली आहे . यामध्ये सर्व भाषिकांना प्राधान्य देण्यात आले आहे . जनमाणसातील माणसासाठी साहित्यातील अनमोल शोधासाठी प्रत्येक भाषेतील भाषिकांसाठी फुलपाखरासम करून छद उदयास आला.  ” साहित्यगंध ” या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे या पुस्तकात कथा , कविता , लेख , चारोळी , हायकू , गझल , शायरी आदीं साहित्याचा समावेश असून भाषा व मर्यादा यास बंधन नाही . साहत्यिकांना सर्व भाषेतील साहित्य त्यांच्या इच्छेप्रमाणे विनामूल्य  ” साहित्यगंध ”  या पुस्तकात साहित्य प्रकाशित करण्यात आले आहेत . यामधील सर्व साहित्यिकांना हे पुस्तक मोफत देण्यात आले .  या पुस्तकाची प्रस्तावना नांदेड येथील  स्वामी रामानंदतीर्थ  मराठवाडा विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पी. विठ्ठल यांनी लिहली आहे .  साहित्यगंध असे ललित कला साहित्य मंचचे अध्यक्ष व ” साहित्यगंध ” पुस्तकाचे संपादक ललित कोलते यांनी सांगितले .

नवोदित कवी लेखकांना या पुस्तकामधून साहित्य प्रकाशित केले  असून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले . त्यामुळे ललित कला साहित्य मंच साहत्यिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवित आहे . असे साहित्यिक राहुल भोसले यांनी सांगितले .

या कार्यक्रमाचे प्रास्तविक हरिचंद्र धिवार यांनी केले तर सूत्रसंचालन दुहिता खडके यांनी तर आभार दिनेश खैरे यांनी मानले .

आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज २०१८ स्पर्धेत नमिश हूड, स्वराज ढमढेरे, अथर्व येलभर, सुर्या काकडे यांची आगेकूच

0
पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज २०१८ स्पर्धेत १० वर्षाखालील मुलांच्या गटात  नमिश हूड, स्वराज ढमढेरे, अथर्व येलभर,  सुर्या काकडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
 
सिल्वर स्पोर्ट्स क्लब, वाकड येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत  १० वर्षाखालील मुलांच्या गटात सातव्या मानांकित  स्वराज ढमढेरेने श्रीराम जोशीचा ५-२ असा पराभव करून आगेकूच केली. सोळाव्या मानांकित  नमिश हूडने त्रिशिक वाकलकरचा ५-० असा तर, अथर्व येलभरने देवेश रेड्डीचा ५-१असा पराभव केला.  पंधराव्या मानांकित अर्जुन परदेशी व दहाव्या मानांकित  कार्तिक शेवाळे यांनी अनुक्रमे सनत कढले व पृथ्वीराज हिरेमठ यांचा ५-२ अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली.
सहाव्या मानांकित अमन शहाने वैष्णव रानवडेवर ५-०असा विजय मिळवला.  पाचव्या मानांकित अभय नागराजनने कैवल्य क्षीरसागरचे आव्हान  ५-०असे सहज मोडीत काढले.  स्पर्धेच्या दुसऱ्या मालिकेत एकूण १०० हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: १० वर्षाखालील मुले: स्वराज ढमढेरे(७)वि.वि.श्रीराम जोशी ५-२; नमिश हूड(१६)वि.वि.त्रिशिक वाकलकर ५-०; अथर्व येलभर वि.वि.देवेश रेड्डी ५-१; दक्ष पाटील वि.वि.आशमान पाटील ५-०; अर्जुन परदेशी(१५)वि.वि.सनत कढले ५-२; अमन शहा(६)वि.वि.वैष्णव रानवडे ५-०; कार्तिक शेवाळे(१०)वि.वि.पृथ्वीराज हिरेमठ ५-२; अभय नागराजन(५)वि.वि.कैवल्य क्षीरसागर ५-०; सुर्या काकडे(८)वि.वि.विश्वराज इंगवले ५-१.    

समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविला पाहिजे डॉ. जयंत नारळीकर

0
एमआयटी-डब्ल्यूपीयू तर्फे‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा
 
पुणे : “ देश स्वतंत्र होऊन आज ७० वर्ष झाली, तरी आजही समाजात अज्ञान व अंधश्रद्धा यांनी थैमान घातले आहे. तरूण पिढीने मनावर घेतले, तर हे चित्र पालटू शकेल. निदान माझ्या हयातीत तरी तसे घडलेले पाहवयास मिळेल. अशी मला आशा आहे.” अशी भावना भारतीय खगोल शास्त्रज्ञ व आयुकाचे संस्थापक व माजी संचालक पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली. 
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेे, भारत अस्मिता फौंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे  आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळ्यातील ‘भारत अस्मिता तंत्र-विज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर डॉ. नारळीकर बोलत होते.
सुप्रसिद्ध व्यवस्थापन शिक्षक व सल्लागार श्रीमती रमा बिजापूरकर यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’. भारतीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व हिंगोलीचे खासदार श्री. राजीव सातव यांना ‘भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार’, पं. राजन व पं. साजन मिश्रा यांना ‘भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ तसेच, मनोज जोशी यांना ‘भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ पुरस्कार’, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना ‘भारत अस्मिता तंत्र-विज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. स्मृतिचिह्न व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे  स्वरुप होते. 
 ज्येष्ठ संगणक तज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टिम प्रा.लि.चे अध्यक्ष श्री. नानिक रूपानी आणि एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या हस्ते भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता फाऊंडेशनचे समन्वयक प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटीडब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा.डी.पी.आपटे, एमआयटीडब्ल्यूपीयूच्या मॅनेजमेंट (पीजी)च्या अधिष्ठाता प्रा.डॉ. सायली गणकर, एमआयटीडब्ल्यूपीयूच्या मॅनेजमेंट (यूजी)चे डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल.के.क्षीरसागर आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. जयंत नारळीकर म्हणाले,“ पारतंत्र्याच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांना असे वाटत होते, की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण येथे विज्ञाननिष्ठ समाजाची निर्मिती करू. त्यांनी पंतप्रधान या नात्याने बरीच पावले उचलली. पण, या देशातल्या जुनाट रूढी व अवैज्ञानिक परंपरांवर मात करणे त्यांना शक्य झाले नाही. खरे म्हणजे ही जबावदारी आपणा सर्वांचीच, विशेषकरून सुशिक्षित लोकांची आहे. पण ते सुद्धा त्याच्याच आहारी जाताना दिसून येत आहेत.
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ भारतीय परंपरेला अध्यात्माची बैठक आहे. त्यामुळे भारतात १४ विद्या आणि ६४ कलांना महत्व आहे. या देशाला सुरूवातीपासून ज्ञानाची परंपरा लाभलेली आहे. या देशाची संस्कृती ही एकमेवाद्वितीय आहे. त्यामुळे विश्‍वात शांती निर्माण करण्यासाठी भारत महत्वपूर्ण भूमिका बजावेल.”
श्रीमती रमा बिजापूरकर म्हणाल्या, “ सर्वात मोठी गुरू दक्षिणा म्हणजे शिष्याला दिल्या गेलेल्या ज्ञानाची सतत उन्नती करणे. त्या साठी सतत ज्ञानाविषयी उत्सुकता असावयास हवी. सतत नाविन्याचा ध्यास असायला हवा. तसेच,हे कार्य सातत्याने करायला हवे. त्याचप्रमाणे सदैव क्रियाशील राहणेसुद्धा महत्वाचे आहे.”
राजीव साताव म्हणाले, “ या देशात सॅम पिट्रोडा आणि डॉ. विजय भटकर यांनी कम्प्यूटर व डिजिटल क्रांति आणून देशाचा कायापालट केला. या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक युवकाने कोणत्या ना कोणत्या पक्षात सामील झाले पाहिजेे. या दृष्टीने युवकांनी मनात पक्का विचार केला तर हा देश प्रत्येक क्षेत्रात उंची गाठेल.”
मनोज जोशी म्हणाले,“शिक्षक हा साधारण नसतो त्याचाजवळ निर्मिती आणि प्रलय या दोन्हीही करण्याची शक्ती असते. भारत भूमीमध्ये राष्ट्र सेवेपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. त्यामुळेच राजनीतीमध्ये नीती हाच शब्द योग्य आहे. त्यात कल्याण आणि दंड या गोष्टी समाविष्ठ आहेत.”
पं. राजन व पं. साजन मिश्रा म्हणाले, “भारतीय शिक्षण पद्धतीतून स्पर्धा संपविण्यात आली तर प्रतिभाशाली विद्यार्थी पुढे येतील. ज्ञानाने परिपूर्ण होण्याचा व चांगल्या मार्गावर चालण्याचा सल्ला शिक्षक देत असतो. परंतू, गुरू हा तुमचा अहंकार नाहीसा करून तुम्हाला ओल्या माती सारखे करून नंतर तुम्हला योग्य आकार देतो.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“नव्या पिढीला दिशा देण्याचे कार्य भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून होत आहे. विज्ञान आणि अध्यत्माच्या समन्वयातून निर्माण होणार्‍या पिढीच्या माध्यमातून भारत देश विश्‍व गुरू बनण्यास वेळ लागणार नाही. २१व्या शतकात भारत हा जगाच्या ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल आणि या जगाला शांतीचा मार्ग दाखवील. भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांच्या द्वारे भारतीय तरुणांमध्ये भारतीय अस्मिता जागविण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे.”
नानिक रूपानी म्हणाले,“ भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारा ऐवजी प्राईड ऑफ इंडिया हा शब्द योग्य अर्थाने शोभून दिसेल. कारण येथे ज्यांचा सत्कार होत आहे, ती देशातील महान व्यक्तिमत्वे आहेत. विश्‍व शांतीसाठी एमआयटी संस्थेने चालविलेले उपक्रम अद्वितिय आहेत.”
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी प्रास्ताविकात पुरस्कारांमागील पार्श्‍वभूमी विशद केली. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सायली गणकर यांनी आभार मानले.

पुणे इंटरनॅशनल डिजिटल फोटोग्राफी सलोन एक्झीबिशनला प्रारंभ-जगभरातील १७५ फोटोग्राफर्सचा सहभाग

0
पुणे :
‘ आर्ट इनसाईट मीडियम ‘ संस्थेतर्फे आयोजित “पुणे इंटरनॅशनल डिजिटल फोटोग्राफी सलोन एक्झीबिशन’ ला प्रारंभ  झाला.जेनिफर मिस्त्री, श्याम ढवळे, अजय जाधव, प्रबुद्ध घोष  यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाला प्रारंभ झाला.
 मोनालिसा कलाग्राम ( कोरेगाव पार्क,गल्ली क्र. ७ ) येथे ४ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.
कलर डिजिटल इमेज, मोनोक्रोम डिजिटल, फोटो ट्रॅव्हल डिजिटल या ३ प्रकारात हे प्रदर्शन सुरू आहे, अशी माहिती  ‘ आर्ट इनसाईट मीडियम ‘ चे सचिव प्रबुद्ध घोष, अध्यक्ष अजय जाधव यांनी दिली.
जगभरातील १७५ फोटोग्राफर्सनी यात भाग घेतला आहे. निवडक ४० फोटो  , आणि ५०० स्लाईड प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. जगाच्या फोटोग्राफी नकाशावर पुण्याला आणणे, हा या प्रदर्शनाचा हेतू आहे, अशी माहिती अजय जाधव यांनी दिली.
…..

‘राक्षस’ येतोय २३ फेब्रुवारीला

0

‘राक्षस’ हा शब्द उच्चारताच आपल्या मनात निर्माण होते भय आणि गूढ अशा भावनांचे मिश्रण. जंगल हे फक्त जीवसृष्टीनेच भरलेले नसून त्यात अनेक क्लिष्ट कोडी दडलेली असतात. जेव्हा सामान्य माणूस हा जंगलांच्या गूढ दुनियेत शिरतो तेव्हा नेमकं काय घडतं हे ‘राक्षस’च्या माध्यमातून प्रेक्षकां समोर  येणार आहे. मराठी मधील बहुचर्चित  सस्पेन्स थ्रिलर  असलेल्या ‘राक्षस’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला यामुळे ‘राक्षस’ बद्दल प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांच्या  ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ ने आपल्या हटके अशा नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती ती उत्कंठा आता या ट्रेलर मुळे आणखी वाढली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी ‘राक्षस’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे.

‘राक्षस’ ही एक जंगलात घडणारी कथा आहे. जंगल म्हणजे फक्त घनदाट झाडांचा समूह नाही तर त्याला ही भावना असतात, जंगल हसतं, रडतं, गाणं  गातं. किर्रर्र  अशा अरण्यात  एक छोटी मुलगी आपल्या आईला सांगतेय  बाबांना  राक्षसाने गिळलय’,  तर दुसरीकडे  सई ताम्हणकर कशाचा तरी शोध घेताना दिसत आहे. शरद केळकर आदिवासी पाड्यावर  तर कधी जंगलात दिसतोय. हे नेमकं काय रहस्य आहे? याचे उत्तर  ‘राक्षस’ या  चित्रपटात बघायला  मिळणार आहे.

राक्षस चित्रपटात बालकलाकार ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सईद, पूर्णानंद वांदेकर, उमेश जगताप, विठ्ठल काळे, पंकज साठे, अनुया कळसकर, अनिल कांबळे, मकरंद साठे, जयेश संघवी, सविता प्रभुणे, साक्षी व्यवहारे, अभिजित झुंझारराव, सोमनाथ लिंबारकर इत्यादी कलाकारांच्या सुंदर अभिनयानं वेगळ्या आशयाच्या या चित्रपटाला योग्य तो न्याय दिला आहे. आदिवासी पाडयांवर बालपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी तन्मयी देव यांच्यासह ‘राक्षस’ची कथा लिहिली आहे. या  ‘राक्षस’ मध्ये नेमकं काय रहस्य आहे? हे येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना समजणार आहे.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत

0

पुणे : राज्यातील सामाजिक न्याय विभागा अंतर्गत शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवंबौद्ध विद्यार्थ्यांसाठी शासनाने गेल्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना जाहीर केली असून पुणे विभागातील 5669 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ दिलेली आहे, दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.

11 वी, 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवंबौद्ध विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेणे किंवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेचा लाभ घेणे हे दोन पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध राहणार आहेत.

या योजनेनूसार पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्त्या सहित प्रतिवर्ष 30 हजार रुपये, इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उंच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 51 हजार रुपये तर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 43 हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. ह्या रक्कमे व्यतिरिक्त बैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 2 हजार शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे दिनांक 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज http://sjsa.maharashtra.gov.inhttp://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन समाज कल्याण पुणे विभागाचे प्रादेशिक उपायुक्त पी. एस. कवटे यांनी केले आहे.

लोहगाव विमानतळ परिसरातील घरे वाचविण्यासाठी आणि कोंढवा जल वाहिनी परवानगी साठी खा . वंदना चव्हाण ,नगरसेवकांची संरक्षण मंत्र्यांबरोबर चर्चा

0

पुणे :लोहगाव विमानतळाजवळील घरे पाडण्याच्या पुणे पालिकेच्या नोटीसनंतर संरक्षण खात्याच्या निकषानुसार फेरसर्वेक्षण करावे या मागणी संबंधी आणि कोंढवा येथील संरक्षण खात्याच्या जागेतून जलवाहिनी ला परवानगी मिळण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी खासदार वंदना चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबरोबर दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली . 

राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने ही चर्चा झाली .  

कोंढवा येथे ६ कोटी खर्च करून  पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे . संरक्षण खात्याच्या ४०० मीटर  जागेतून जलवाहिनी  मार्ग प्रस्तावित आहे . उर्वरित काम पूर्ण झाले आहे .  ६० लाख लिटर क्षमतेची  पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे . नगरसेवक नंदा लोणकर यांनी जलवाहिनीसाठी  संरक्षण खात्याची ना  हरकत परवानगी साठी सातत्याने तीन वर्षे प्रयत्न करून अद्याप ना हरकत परवानगी मिळालेली नाही . यासाठी नगरसेविका नंदा लोणकर ,नगरसेवक गफूर पठाण ,नारायण लोणकर ,माजी नगरसेवक रईस सुंडके ,हाजी फिरोज हे खा . वंदना चव्हाण यांच्यासमवेत संरक्षण मंत्र्यांना भेटले . 

लोहगाव विमानतळाला लागून असलेल्या बांधकामांना पाडण्याच्या नोटीस पालिकेने बजावलेल्या आहेत . या प्रश्नासंबंधी संरक्षण खात्याच्या नियमांनुसार पालिकेने पुन्हा सर्वेक्षण करावे ,अन्यथा रहिवाशांवर अन्याय होईल ,अशी विनंती नगरसेवक सुनील टिंगरे यांनी केली . त्यांच्या समवेत हेमंत खेसे ,हर्षल टिंगरे ,सचिन अगरवाल उपस्थित होते . 

‘या दोन्ही प्रश्नात आपण अहवाल मागवू आणि लवकरात लवकर निर्णय घेऊ ‘,असे आश्वासन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्याची माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली 

भूषण आणि पल्लवीच्या स्वप्नांचा प्रवास

0

स्वप्नांचा प्रवास कधी तो एकट्याचा असतो तर कधी कुणाला सोबत घेऊन. अभिनेता भूषण प्रधान सुद्धा स्वप्नांच्या प्रवासाला निघाला आहे. या प्रवासात अभिनेत्री पल्लवी पाटील त्याच्या सोबत आहे. तू तिथे असावे या आगामी मराठी सिनेमातून भूषण आणि पल्लवीची हळवी प्रेमकथा लवकरच आपल्यासमोर उलगडली जाणार आहे. या चित्रपटातील ‘रोज रोज यावे तू स्वप्नात माझ्या, ‘धुंद बेधुंद व्हावे मी स्वप्नात माझ्या’ असे बोल असलेले मधुर प्रेमगीत नुकतेच चित्रित करण्यात आले.

नयनरम्य लोकेशन्सवर शूट करण्यात आलेले हे गीत करताना एक वेगळाच मूड जमून आला. तसेच अनाहुतपणे ओठांवर सजणारं हे गीत तरल प्रेमाची अनुभूती देईल असा विश्वास भूषण व पल्लवीने व्यक्त केला. श्रीकृष्ण राऊत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला बेला शेंडे व स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज लाभला आहे. दिनेश निंबाळकर यांनी  संगीत दिले आहे तर जीतसिंग यांनी गीताचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. जी कुमार पाटील एंटरटेण्मेंटची प्रस्तुती असलेल्या तू तिथे असावे या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत.

भूषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा आशिष-दिपक यांची आहे. संगीत दिनेश अर्जुना तर छायांकन बाशालाल सय्यद यांचं आहे. सहनिर्माते आकाश कांडूरवार, प्रशांत ढोमणे, शरद अनिल शर्मा असून कार्यकारी निर्माते रोहितोष सरदारे आहेत.

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘मेकअप’ अव्वल -भांडूप परिमंडलाचे ‘नजरकैद’ द्वितीय

0

पुणे : महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘मेकअप 1986’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. तर भांडूप परिमंडलाचे ‘नजरकैद’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या नाट्यस्पर्धेचा समारोप कविवर्य मोरोपंत नाट्यमंदिरात गुरुवारी (दि. १) झाला. महावितरणचे प्रादेशिक संचालक (पुणे) संजय ताकसांडे, प्रादेशिक संचालक (कल्याण) सतीश करपे, प्रादेशिक संचालक (नागपूर) भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर (बारामती) यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर परीक्षक कमल हावळे, राज काझी, हेमंत एदलाबादकर तसेच प्रभारी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी पी.एस. पाटील, अनिल कांबळे यांची उपस्थिती होती.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुणे परिमंडलाने श्रीरंग गोडबोले लिखित व हेमंत नगरकर दिग्दर्शित  ‘मेकअप 1986’ हे नाटक सादर केले. मानवी नात्यांचा उत्कंठावर्धक नाट्यातून वेध घेणार्‍या सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नागपूर परिमंडलाने देवेंद्र वेलणकर लिखित व अभय अंजीकर दिग्दर्शित ‘ते दोन दिवस’ हे नाटक सादर केले. एकीकडे उमद्या मुलाचा मृत्यू आणि इतर भावंडांच्या भवितव्याची काळजी वाहणारे आईवडील याची गुंतागुंत सादर करणाऱ्या नाटकास प्रेक्षकांनी दाद दिली. पहिल्या दिवशी लातूर परिमंडलाने ‘रातमतरा’ तर भांडूप परिमंडलाने ‘नजरकैद’ नाटक सादर केले.
नाट्यस्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून पुणे परिमंडलाच्या ‘मेकअप 1986’ या नाटकाला परीक्षकांनी कौल दिला तर भांडूप परिमंडलाच्या ‘नजरकैद’ या नाट्यकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला.  वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी पुढीलप्रमाणे – दिग्दर्शन : प्रथम – हेमंत नगरकर (पुणे), द्वितीय – डॉ.संदीप वंजारी (भांडूप),  अभिनय (पुरुष) :  प्रथम – डॉ.संदीप वंजारी (भांडूप), द्वितीय – संतोष गहेरवार (पुणे),  अभिनय (स्त्री) : प्रथम – अपर्णा माणकीकर (पुणे), द्वितीय – दीप्ती थोरात (भांडूप),  नेपथ्य : प्रथम – राजीव पुणेकर (पुणे), द्वितीय – संजय राऊळ (भांडूप),  प्रकाशयोजना : प्रथम – सारिका सातपुते (पुणे), द्वितीय – राजेश पंडित (भांडूप), संगीत : प्रथम – संजय राऊळ/महेंद्र चुनारकर (भांडूप), द्वितीय – विकास निकम (पुणे), रंगभूषा : प्रथम – सचिन गुरव (लातूर), द्वितीय – सुप्रिया पुंडले/शैलजा सानप (पुणे), उत्तेजनार्थ (अभिनय) : अभय अंजीकर (नागपूर), वर्षा इदुलापल्ली (भांडुप), विवेक शेळके (पुणे), लक्ष्मण वारकरी (लातूर).
प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी या नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या चारही नाटकांतील कलावंतांचा जिवंत अभिनय, संवादफेक आणि संहितेशी समरूप होणे या बाबींचे कौतुक केले. याप्रसंगी प्रादेशिक संचालक (कल्याण) सतीश करपे, प्रादेशिक संचालक (नागपूर) भालचंद्र खंडाईत, परीक्षक राज काझी, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी पी.एस. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. कार्यक्रमास मुख्य अभियंता रामराव मुंडे (कल्याण), एम.जी. शिंदे (पुणे), आर.जी. शेख (नागपूर), किशोर परदेशी (कोल्हापूर), उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) सुमीत कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

.

फ्रेम फोटोग्राफर च्या संघर्षाची …

0
        एका कार्यक्रमाचे फोटो शूट करून मी माझ्या ऑफीस वर आलो, कॉम्प्युटर

        वर फोटो लोड करायला लावले आणि अचानक लाईट ( दिवे ) गेली. माझं लक्ष 
        भिंती वरील माझ्या प. पु. गुरुदेवांच्या फोटो कडे गेले, मी फोटो कडे
         लक्षपूर्वक पाहत होतो आणि माझे मन भूतकाळात गेले. मी कोण होतो,
        कसा घडलो आणि आज काय आहे, असा जीवनपटच डोळ्या समोर उलगडू
        लागला.     

         लहानपणी घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, वडील पिंपरी येथील

         हिंदुस्तान अँटिबायोटिक्स मध्ये कामाला, प्रसंगी रस्त्यावर बसून मफलर  
         विकण्याचेही काम त्यांनी केले. हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूल च्या
शिक्षकांमुळे इयत्ता सहावीला असताना शिक्षकांनी संस्कार  दिले ते
स्वावलंबनाचे. त्यांनी सांगितले होते कोणावरही अवलंबून न राहता आपण

         आपल्या  पायावर उभे राहावे. मी सातवीला असतानाच मनाचा निश्चय केला
         कि आपला खर्च आपणच कमवायचा.
         माझे मित्र सचिन शहा यांचा त्याकाळातील ६०, ९० च्या ऑडिओ कॅसेट मध्ये
         गाणी रेकॉर्डिंग करून देण्याचा व्यवसाय  होता. मी त्यांच्या कडे गेलो आणि
         गाणी रेकॉर्डिंग करून कॅसेट मध्ये भरून देण्याचे काम करू लागलो.
         दहावी पर्यंत हे काम केले. त्या नंतर पुढे मी विविध ठिकाणी विविध कामे
         केली. पण मनात विचार आला कलात्मक क्षेत्र निवडावे, म्हणून मी सातारा
         रोड वरील एका फोटो स्टुडिओत नोकरीला लागलो.
         मी त्या स्टुडिओत पडेल ती सर्व कामे अगदी साफसफाई सुद्धा करीत होतो.
         मालक फोटो काढतानाचे व व ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटिंग करतानाचे निरीक्षण
         करायचो व त्या प्रमाणे शिकण्याचा प्रयत्न करीत असे. पिंपरी वरून सातारा
         रोड येथील स्टुडिओ पर्यंत येण्याजाण्या साठी बस भाडे १८० रुपये  महिना
         असे तो मी दारोदारी फिरून कॅसेट रेकॉर्डिंग करून जमवीत असे. मी विविध
         मासिके, पुस्तके यातुन फोटोग्राफीचे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत असे.
         एकदा असेच एका समारंभात मालक आणि मी फोटो काढत असताना
         माझ्या चुकी मुळे मालकाने मला जोरात मारले व मी स्टेज वरून खाली
         पडलो, कुठे चुकले हे विचारून परत माझ्या कामाला लागलो.
         सतत ३ वर्ष मी या स्टुडिओत काम करीत होतो, मालकाने एक रुपयाही
         पगार दिला नव्हता पण मी त्यांना गुरु मानून त्यांच्या कडून मिळेल तेवढी
         कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांनी दिलेल्या कलेवरच
         आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे व तेव्हा मी ते काम सोडून दिले.
         काही दिवस मुंबईतही काम केले पण म्हणावं  तस यश मिळत नव्हते,

         माझे गुरु प.पु. देवाजी महाराज यांनी माझी पत्नी संगीता हिला सांगितले,
          ” सुशील को फोटोग्राफीमेही करियर करना चाहिए ! ” त्यांचा आशीर्वाद
         घेतला आणि परत पुणे गाठले व मनाशी ठरवले आता फक्त फोटोग्राफीचं
         करायची. पुढे मित्र,आईवडील यांच्या सहकार्याने माझा
         स्वतःचा पहिला ” PENTAX- ME SUPER ” हा कॅमेरा विकत घेतला.
         अनेकांना जाऊन भेटत असे, काम देण्याची विनंती करीत आहे.
         काही कामानिमित्ताने मी त्या वेळेसचे खासदार श्री. सुरेश कलमाडी व
         सौ. मीरा कलमाडी यांच्या संपर्कात आलो. सौ. मीरा कलमाडी यांनी मला
         खासदार श्री. सुरेश कलमाडी यांचे कार्यक्रम ” कव्हर ” करण्याची संधी दिली,
         त्यांच्या विश्वासास मी पात्र ठरलो. त्यांनी ” पुणे फेस्टिवल ” चे काम मला
        दिले आणि हा माझ्या आयुष्यातील ” टर्निंग पॉईंट ” ठरला. या निमित्ताने
        अनेक दिग्गज  कलाकार जसे अमिताभ बच्चन, हेमामालिनी, लता मंगेशकर,
        व अनेक नामवंत कलाकार तसेच राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा,
        ए.पी.जी. अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी व पंतप्रधान श्री. पी.व्ही. नरसिहराव,
        इंद्रकुमार गुजराल, मनमोहनसिंग, तसेच केंद्रीय मंत्री मा. शरदजी पवार,
        सुशीलकुमारजी शिंदे, ते मुख्यमंत्री मा. पृथ्वीराजजी चव्हाण अशा मातब्बरांचें
        अगदी जवळून म्हणजे तीन फुटाच्या आत फोटो घेण्याची संधी मिळाली.
        माझ्या ऑफबीट, हटके फोटोंना पत्रकारितेच्या क्षेत्रात न्याय  दिला तो
        दैनिक सकाळ मधील त्या वेळेसचे पराग करंदीकर
        यांनी. दैनिक सकाळ मध्ये माझ्या नावासह छायाचित्र प्रसिद्ध होऊ लागले.
        लाखो वाचकांना माझ्या फोटोतून आनंद मिळाले,
         मॉरिशियस च्या सांस्कृतिक मंत्री  शीला बापू  या माझ्या काढलेल्या
         फोटोंवर व बातमीवर बेहद खुश होऊन निरोप देताना म्हणाल्या होत्या
         ” Can I get A Person like You ” तर सुप्रसिध्द गायिका पिनाझ मसानी
         रात्री झालेल्या कार्यक्रमाचे  सुंदर फोटो पाहून म्हणाल्या
           ” I have never seen  A Person like You “. 
            संगीतकार कल्याणजी   आनंदजी यांचा कार्यक्रम
         रात्री बारा वाजता संपला व त्याच रात्री अडीच वाजता त्या कार्यक्रमाचे फोटो
         त्यांच्या हातात ठेवले आणि ते पाहून ते आश्चर्यचकित झाले ( कारण तो
         काळ कॅमेरा रोल चा होता,आता सारख्या सुविधा तेव्हा नव्हत्या) आणि
         त्यांनी रात्री अडीच वाजता ज्युसबार उघडायला लाऊन मला ज्युस पाजले.
         मी समजतो कि हीच माझ्या कामाची पावती व हीच कमावलेली माझी
         संपत्ती.
         अगदी निःस्वार्थ भावनेने, कुठलीही अपेक्षा न ठेवता पुण्यातील अनेक
         दैनिकांना छायाचित्र पुरविले.
         ” नेकी कर, दरिया में डाल ” या तत्वाने आयुष्य जगत आहे.
         या माझ्या संघर्षमय अंधारातील जीवनात ” प्रकाश ” आला तो ”
         “सकाळ  ” मुळेच.
          एवढ्यात लाईट्स आले, मी भानावर आलो, कॉम्पुटर सुरु केला आणि
          टिपलेल्या फोटोत ” जिवंतपणा ” आणण्याचे काम करू लागलो.
 
लेखक : सुशिल राठोड
पत्ता : १३९३/९५ शुक्रवार पेठ, विष्णुकृपा सोसायटी, पुणे – ४११००२
मोबाइल न. ९८२२२०८३३३
          

14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत इन्फोसिस संघाला विजेतेपद

0

पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत  इन्फोसिस संघाला विजोतोपद

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत  कॅपजेमिनि संघाला नमवून  इन्फोसिस संघाने विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना सामनावीर शारॉन थॉमसनच्या अचूक गोलंदाजीपुढे  कॅपजेमिनि संघ केवळ 18 षटकात सर्वबाद 84 धावांत गारद झाला. 84 धावांचे लक्ष  इन्फोसिस संघाने केवळ 11.5 षटकात 4 गडी गमावत 88 धावांसह सहज पुर्ण केले. यात संदिप शांघाई व आशय पालकर यांनी प्रत्येकी 29 धावा करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. केवळ   13 धावांत 4 गडी बाद करणारा शारॉन थॉमसन सामनावीर ठरला.

स्पर्धेतील विजेत्या  इन्फोसिस संघाला 50 हजार रूपये व करंडक तर उपविजेत्या  कॅपजेमिनि संघाला 30 हजार रूपये व करंडक असे पारितोषीक देण्यात आले. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज इन्फोसिसचा प्रभज्योत मल्होत्रा व सर्वोत्कृष्ट गोलंदाज कॅपजेमिनि संघाचा  दिपक कुमार यांना प्रत्येकी 5 हजार रूपये व मानचिन्ह तर मालिकावीर इन्फोसिस संघाचा आशय पालकर याला 10 हजार  रूपये व मानचिन्ह अशी पारीतोषिके देण्यात आली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी भारतीय खेळाडू व आसाम क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपुत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  आयडीयाज्‌ अ सास  इंडियाचे संचालक प्रशांत केएस, अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय जोगळेकर, आयडीयाज्‌ अ सास इंडियाच्या फायनान्स् हेड मल्लिका जेम्स् व स्पर्धा संचालक अश्विन पन्हाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘टेनिसन ने निसर्गाचे दुसरे रूपही कवितेतून दाखवले’ : डॉ. सुप्रिया सहस्त्रबुद्धे

0
पुणे : ‘आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन ला निसर्गकवी म्हटले जात असले तरी त्यांनी निसर्गाची प्रलयंकारी रूपेही काव्यातून मांडली. इंग्लंडमधील काव्यबहारीचा काळ त्यांनी आणखी समृद्ध केला,’ असे प्रतिपादन  मॉडर्न महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या माजी विभागप्रमुख डॉ. सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी केले.
‘रसिक मित्र मंडळ’ आयोजित ‘एक कवी – एक भाषा’ उपक्रमातील ५३ व्या व्याख्यानमालेदरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी ‘ रसिक मित्र मंडळ’ चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला उपस्थित होते. 
‘पुणे श्रमिक पत्रकार भवन’ येथे हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी झाला. या दृकश्राव्य व्याख्यानाला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, ‘आल्फ्रेड टेनिसनच्या वेळचा काळ हा काव्याच्या दृष्टीने बहारीचा होता. व्हिक्टोरियन इंग्लंडमध्ये समृद्धी होती आणि वैचारिक, बुद्धिप्रामाण्यवादी विचारांना ऐकले जात होते. अशा काळात निसर्गकवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेनिसन यांनी निसर्गाची प्रलयंकारी रूपेही कवितेतून मांडली. ‘इन मेमोरियम’, ‘बेटर टू हॅव लव्ह्ड’, ‘होम दे ब्रॉट वॉरियर डेड’ अशा गाजलेल्या कवितांचा उल्लेख सहस्त्रबुद्धे यांनी या व्याख्यानात केला. 
टेनिसन हे कवितांबरोबर त्यांच्या लिखित वचनांसाठी प्रसिद्ध होते. कवितेतही त्यांनी सर्वनामांचा चांगला उपयोग केला, असेही डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी या व्याख्यानात सांगितले.
प्रदीप निफाडकर यांनी प्रास्ताविक केले. सुरेशचंद्र सुरतवाला यांनी रसिक मित्र मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली.