पुणे – ‘आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा समिती’ने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल रमणबागने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. शाळेला मध्यम गटाचे विजेतेपद आणि कनिष्ठ व वरिष्ठ गटात उपविजेतेपद मिळाले. सन्मान गोसावीला वैयक्तिक एन. आर. जोशी पारितोषिक, मिहिर देशपांडेला समयस्ङ्गूर्ती भाषणासाठी शालिनीताई केळकर पारितोषिक आणि हर्ष जोशीला संस्कृतसाठी जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चारूता प्रभुदेसाई, वैशाली भाकरे, ऋचा कुलकर्णी, सुहास देशपांडे, गीतांजली लखादिवे, सुवर्णा केदारी, लता दळवी, अर्चना पंच, चंद्रशेखर कोष्टी, दिपाली चौघुले, मोहन शेटे, गणेश देशमुख या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका रजनी कोलते आणि सह-विभाग प्रमुख सुनीता खरात यांनी नियोजन केले.
नवीन मराठी शाळेत १४० पालकांची आरोग्य तपासणी
– डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत माता पालकांसाठी स्तनातील कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १४० महिलांची तपासणी करण्यात आली. प्रशांती कॅन्सर केअर मिशन, ऑकि‘ड ब‘ेस्ट केअर क्लिनिक यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. चैन्यानंद कोप्पीकर, लालेह बुशेरी, दिपाली चव्हाण यांनी तपासणी केली. स्तनांतील कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जागृती करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मु‘याध्यापिका कल्पना वाघ यांनी सांगितले. तनुजा तिकोने, जयश्री खाडे, अश्विनी राजवाडे यांनी संयोजन केले.