फटकळ, परखड…स्पष्ट ते जिव्हाळ्याचे …मधुकाकांच्या आठवणींना उजाळा

Date:

पुणे – श्रीविद्या प्रकाशनचे संस्थापक मधुकाका कुलकर्णी हे जेवढे फटकळ….स्पष्ट बोलणारे होते तेवढेच प्रेमळ, जिव्हाळा जपणारे होते. मधुकाकांच्या विविध आठवणीतून त्यांच्या सहृदांनी त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू आज एक अनौपचारिक, कौटुंबिक समारंभात उलगडून दाखवले. निमित्त होते आयकर भवन चौकाला मधुकाका कुलकर्णी यांचे नाव देण्याच्या समारंभाचे.

पुणे महापालिकेच्यावतीने प्रभात रोड गल्ली क्रमांक १४ मधील आयकरभवनच्या चौकाला आज ज्येष्ठ प्रकाशक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी चौक असे नाव देण्यात आले. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अरूणा ढेरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. मिलिंद जोशी, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आणि निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते ​

​हे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर आवर्जून उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आणि मंजूषा खर्डेकर, जयंत भावे, दीपक पोटे आदी नगरसेवकांनी या चौकाला मधुकाकांचे नाव देण्याचा प्रस्ताव दिलेला होता.

श्रीविद्या प्रकाशन संस्थेला नुकतीच २६ जानेवारी २०१८ या दिवशी ५० वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून त्यांचे नाव चौकाला देण्याच्या समारंभाचे आज नामकरण करण्यात आले. त्यानंतर सहकारसदन सभागृहात झालेल्या अनौपचारिक व कौटुंबिक कार्यक्रमात सर्वच मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितलं की, मधुकाकांची आणि आपली भेट व पुढे मैत्री ही पुस्तक प्रकाशनामुळे झालेली नाही. विश्वकोष निर्मितीच्या समितीचे आम्ही दोघेही सदस्य असल्याने तेथे आमची प्रथम भेट झाली. पुढे मैत्री झाली आणि श्रीविद्या प्रकाशनने माझी पुस्तके प्रसिद्ध केली. लेखक आणि प्रकाशक या व्यवहारी संबंधांचे रूपांतर मैत्रीत कऱण्याची हतोटी असल्यानेच अनेक मान्यवर लेखक त्यांनी जोडले. त्यांच्या या जिव्हाळ्यामुळेच मलाही अनेक मित्र मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

मधुकाका बोलायला एकदम फटकळ, स्पष्ट पण तेवढेच ते मित्र परिवार, कुटुंबियांच्याबद्दल प्रेमळ होते हे अनेकदा त्यांच्या बोलण्यातून दिसून आल्याचे निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. ते म्हणाले, मधुकाकांची गप्पा मारण्याची हनुमान टेकडी, डेक्कनक्वीन. डेक्कनक्वीनमध्ये त्यांनी एक मंत्र्याला तुम्हाला ग्रंथातलं काही कळत नाही असं सुनावल्याचीही आठवण त्यांनी सांगितली. त्यांच्या फटकळ, परखड स्वभावामुळे मला अनेक व्यक्तिमत्वांचे गुणवैशिष्ट्ये नेमक्य, मोजक्या शब्दात मला समजायची. पत्रकारीतेत मला याचा उपयोग रॉ मटेरियलम्हणून, मुलाखती घेताना अनेकदा झाला. यावेळी त्यांनी पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज अशा महान व्यक्तींना वारंवार भेटण्याची संधी आपल्याला मधुकाकांमुळेच मिळाल्याचे त्यांनी विनम्रपणे सांगितले.

डॉ. अरूणा ढेरे यांनी सांगितले की लहानपणापासून आपण मधुकाकांच्या घरातच वावरत आहोत. वडिलांच्या वाढदिवसाला न चुकता साहित्यिक, कवी यांच्या घेऊन दरवर्षी ते येत असत आणि त्यांच्या अनेक मैफली आपण अनुभवल्या आहेत. एकचवेळी केवळ ललित पुस्तकेच नाही तर वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. अगदी शालेय अभ्यासक्रमाचीही पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. डॉ. जोशी यांनी सांगितले की, लक्ष्मीच्या दारी सरस्वतीच्या वीणेचा झंकार ऐकू येत नाही असं म्हणतात. पण आज माधुरीताईंनी लक्ष्मीच्या दारातच (आय़करभवन चौकात) एक सरस्वती उपासकाचे नाव कोरले आहे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मधुकाका केवळ प्रकाशकच नव्हते तर ते कार्यकर्तेही होते त्यामुळेच विविध समित्या, साहित्य परिषदेत त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केल. त्यांनी प्रकाशन व्यवसायात व्यवहार न बघता त्यांनी जिव्हाळा जपला. याच जिव्हाळ्यातून अनेक मान्यवर लेखक त्यांनी श्रीविद्या प्रकाशन संस्थेशी जोडले. त्यामुळेच पु. लं. पासून ते नारळीकरांपर्यंत अनेक लेखकांनी त्यांच्या पुस्तकांचे हक्क मधुकाकांकडे दिले आहेत.

नगरसेविक माधुरी सबस्त्रबुद्धे यांनी मधुकाका व त्यांचे सर्व कुटुंब हे आमचेच कुटुंब आहे. मधुकाका हे भारती निवास कॉलनीचे अध्यक्ष असल्याने अनेक सर्वसाधारण सभा त्यांनी याच सभागृहात बसून केल्या असल्याची आठवण सांगितली. निखील कुलकर्णी तर बालरंजन केंद्रातीलच होता असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी कुलकर्णी आणि त्यांचे जावई अवधूत जोशी कुटुंबियांच्यावतीने विकास आमटे यांच्या लोकबिरादरी, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, मधुकाकांच्या गावातील पिंपरी पेंढारमधील शाळा, नारायणगावची सबनीस विद्यालय, बालरंजन केंद्र आणि डॉ. अरूणा ढेरे यांच्या मायलेकरं या सांस्कृतिक कार्यक्रमाला आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकाकांच्या पणतू टेविन निखिल कुलकर्णी याने त्याच्या भावना व्यक्त करून केले. त्यानंतर निखील कुलकर्णी यांनी औपचारिक स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ऍड. सोनाली श्रीखंडे यांनी तर आभार प्रदर्शन पूर्वा खजूरकर – जोशी यांनी केले.

सोबत फोटो आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...