पुणे-प्रभाग १३ मधील चार ही नगरसेवक परस्पर सहकार्यातून आणि समन्वयातून प्रभागातील विकास कामे मार्गी लावत आहे,मी ही त्यांच्या बरोबर असून प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार येथील विकास कामे होत आहेत असे आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे व जयंत भावे यांच्या विकास निधीतून गोसावी वस्तीतील ड्रेनेज लाईन नव्याने करण्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या निधीतून गोसावी वस्तीतील गल्ली क्रमांक ३ व ४ येथे बोरवेल च्या कामाचे ही भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या ” आम्हा तिघांच्या निधीतून तब्बल ५० लाख रुपयांचे बजेट येथील ड्रेनेज लाइन नव्याने टाकण्यासाठी खर्च होत आहेत,मात्र ह्या लाईन स्वच्छ राहाव्यात यासाठी येथील रहिवाश्यांनी काळजी घेतली पाहिजे.ड्रेनेज मध्ये अन्न पदार्थ वा अन्य घाण टाकल्यास ती खाण्यास घूस येते व ती ड्रेनेज लाइन पोखरत जाते व ड्रेनेज तुंबते व वारंवार ड्रेनेज सफाई साठी निधी आणि मनुष्यबळ खर्च करावा लागतो.तसेच यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या ही उद्भवते.तरी नागरिकांनी स्वच्छतेवर भर द्यावा व त्यासाठी मी येथे बकेट्स ही पुरवत आहे,असे ही त्या म्हणाल्या.तसेच येथील स्वच्छतागृहास पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने येथे बोर खणण्याचे बजेट टाकले असल्याचे ही त्यांनी सांगितले.
नगरसेवक दीपक पोटे म्हणाले ” गोसावी वस्तीतील सर्व विकास कामे आम्ही करणार असून येथील नागरिकांच्या तक्रारींची दाखल घेऊन आम्ही येथील समस्या सोडविण्यावर भर देत आहोत.”
नगरसेवक जयंत भावे म्हणाले ” आम्ही प्रभागातील विविध विकास कामांसाठी २० कोटी चे बजेट आणले असून प्रभागातील सर्व विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.”
यावेळी प्रशांत हरसुले ,गौरी करंजकर,सौरभ अथनीकर,शंतनू खिलारे,गणेश चव्हाण,एड प्राची बगाटे,ऋत्विक अघोर,शेखर जोशी,प्रसाद श्रीखंडे,जितेंद्र गाडे,सुनील होलबोले,चंद्रकांत पवार,निलेश घोडके,अरुण अहिरे,हेमंत भावे,इ पदाधिकारी ,नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.