पुणे : महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘मेकअप 1986’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. तर भांडूप परिमंडलाचे ‘नजरकैद’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या नाट्यस्पर्धेचा समारोप कविवर्
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुणे परिमंडलाने श्रीरंग गोडबोले लिखित व हेमंत नगरकर दिग्दर्शित ‘मेकअप 1986’ हे नाटक सादर केले. मानवी नात्यांचा उत्कंठावर्धक नाट्यातून वेध घेणार्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नागपूर परिमंडलाने देवेंद्र वेलणकर लिखित व अभय अंजीकर दिग्दर्शित ‘ते दोन दिवस’ हे नाटक सादर केले. एकीकडे उमद्या मुलाचा मृत्यू आणि इतर भावंडांच्या भवितव्याची काळजी वाहणारे आईवडील याची गुंतागुंत सादर करणाऱ्या नाटकास प्रेक्षकांनी दाद दिली. पहिल्या दिवशी लातूर परिमंडलाने ‘रातमतरा’ तर भांडूप परिमंडलाने ‘नजरकैद’ नाटक सादर केले.
नाट्यस्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून पुणे परिमंडलाच्या ‘मेकअप 1986’ या नाटकाला परीक्षकांनी कौल दिला तर भांडूप परिमंडलाच्या ‘नजरकैद’ या नाट्यकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी पुढीलप्रमाणे – दिग्दर्शन : प्रथम – हेमंत नगरकर (पुणे), द्वितीय – डॉ.संदीप वंजारी (भांडूप), अभिनय (पुरुष) : प्रथम – डॉ.संदीप वंजारी (भांडूप), द्वितीय – संतोष गहेरवार (पुणे), अभिनय (स्त्री) : प्रथम – अपर्णा माणकीकर (पुणे), द्वितीय – दीप्ती थोरात (भांडूप), नेपथ्य : प्रथम – राजीव पुणेकर (पुणे), द्वितीय – संजय राऊळ (भांडूप), प्रकाशयोजना : प्रथम – सारिका सातपुते (पुणे), द्वितीय – राजेश पंडित (भांडूप), संगीत : प्रथम – संजय राऊळ/महेंद्र चुनारकर (भांडूप), द्वितीय – विकास निकम (पुणे), रंगभूषा : प्रथम – सचिन गुरव (लातूर), द्वितीय – सुप्रिया पुंडले/शैलजा सानप (पुणे), उत्तेजनार्थ (अभिनय) : अभय अंजीकर (नागपूर), वर्षा इदुलापल्ली (भांडुप), विवेक शेळके (पुणे), लक्ष्मण वारकरी (लातूर).
प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी या नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या चारही नाटकांतील कलावंतांचा जिवंत अभिनय, संवादफेक आणि संहितेशी समरूप होणे या बाबींचे कौतुक केले. याप्रसंगी प्रादेशिक संचालक (कल्याण) सतीश करपे, प्रादेशिक संचालक (नागपूर) भालचंद्र खंडाईत, परीक्षक राज काझी, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी पी.एस. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. कार्यक्रमास मुख्य अभियंता रामराव मुंडे (कल्याण), एम.जी. शिंदे (पुणे), आर.जी. शेख (नागपूर), किशोर परदेशी (कोल्हापूर), उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) सुमीत कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
.