पुणे :
‘ आर्ट इनसाईट मीडियम ‘ संस्थेतर्फे आयोजित “पुणे इंटरनॅशनल डिजिटल फोटोग्राफी सलोन एक्झीबिशन’ ला प्रारंभ झाला.जेनिफर मिस्त्री, श्याम ढवळे, अजय जाधव, प्रबुद्ध घोष यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाला प्रारंभ झाला.
मोनालिसा कलाग्राम ( कोरेगाव पार्क,गल्ली क्र. ७ ) येथे ४ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.
कलर डिजिटल इमेज, मोनोक्रोम डिजिटल, फोटो ट्रॅव्हल डिजिटल या ३ प्रकारात हे प्रदर्शन सुरू आहे, अशी माहिती ‘ आर्ट इनसाईट मीडियम ‘ चे सचिव प्रबुद्ध घोष, अध्यक्ष अजय जाधव यांनी दिली.
जगभरातील १७५ फोटोग्राफर्सनी यात भाग घेतला आहे. निवडक ४० फोटो , आणि ५०० स्लाईड प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. जगाच्या फोटोग्राफी नकाशावर पुण्याला आणणे, हा या प्रदर्शनाचा हेतू आहे, अशी माहिती अजय जाधव यांनी दिली.
…..